निवांत समय

June 26, 2017

साधं सुधं!!

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ४
आज दिनांक २९ मे. आज सिंगापूर इथलं वास्तव्य संपवुन आम्ही हॉंगकॉंगला प्रस्थान करणार होतो. हे विमान सकाळी ८:४० वाजताचे असल्यानं आम्ही सकाळी ५ वाजताच विमानतळाकडे प्रयाण केलं. इतक्या सकाळी आम्हां सर्वांना नास्ता देणं शक्य नसल्यानं सर्वांना पॅकबंद कोरडा नास्ता आणि ज्युस देण्यात आला. तौफिक इतक्या भल्या पहाटे हॉटेलवर हजर होता आणि आमच्यासोबत आम्हांला सोडण्यास विमानतळावर सुद्धा आला. 

सिंगापूर एअरलाईन्सनं  आम्हां वीणा वर्ल्डवाल्यांना खास वागणुक दिली असं मला वाटून गेलं. आमच्यासाठी खास दोन तीन कॉउंटर उघडण्यात आले होते. त्यामुळं आमचं चेक-इन झटपट आटपलं. आणि मग मिळालेला वेळ आम्ही सर्वांनी विंडो शॉपिंग आणि फोटो शुटिंगमध्ये व्यतित केला. 


तिथं आम्ही सर्वांनी दिलेल्या नाश्त्याचा फडशा पाडला. निहारिका ही विमानतळावरील धावत्या मार्गिकेवरून वेगानं धावत पुढंमागं करीत होती. तिला ओरडण्याचा मी उगाचच प्रयत्न करत होतो. सुरुवातीला हा प्रयत्न यशस्वी झाला असं वाटलं पण नंतर मात्र तिनं आपली ही धावपळ सुरूच ठेवली. 

विमान तसं वेळेवर आलं होतं. पुन्हा एकदा A380 होतं. खिडकीची सीट मिळविण्याचा प्रयत्न सोहमशी वाटाघाटी अयशस्वी झाल्यानं सफल झाला नाही. सर्वजण वेळेवर स्थानापन्न झालो असलो तरी विमानानं वेळेवर उड्डाण केलं नाही. वैमानिकानं त्याबद्दल रीतसर दिलगिरी व्यक्त केली. चीनचे आणि बाजूच्या देशांचे संबंध दक्षिण चीन समुद्राच्या प्रश्नावरून ताणले गेले असल्यानं एका विशिष्ट वेळीच त्या समुद्रावरून उड्डाण करावं असं काहीसं तो वैमानिक म्हणाला असं मला वाटलं. चीन हा तसा दादागिरी करणारा देश असल्यानं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. हे प्रयाण तसं काहीसं नियमित स्वरूपाचं नव्हतं. इथं एका परदेशातून अजुन दुसऱ्या परदेशात आम्ही प्रवास करत होतो. 

शेवटी एकदा ८:४० चं विमान साडेनऊच्या आसपास निघालं. हवेत स्थिरस्थावर झाल्यावर लगेच हवाई सुंदरी आणि हवाई सुंदर मंडळींची खानपानसेवेची लगबग सुरु झाली. हिंदू नॉनव्हेज मिल मध्ये मासे आणि बाकीचे प्रकार होते. हवेत सर्व काही क्षम्य आहे ह्या विचारांती आम्ही फारसं मनाला लावून घेतलं नाही. 

हाँगकाँग जसं जवळ येत चाललं तसं विविध बेटं आम्हांला दिसू लागली. त्यापैकी काही बेटांचं प्राजक्ताने केलेलं छायाचित्रण!  

हॉंगकॉंगचे लँडिंग जरा हादरा देणारं असंच होतं. एकदम दणक्यात आपटून मग वैमानिकानं विमान वेळीच थांबविण्यात यश मिळविलं. हॉंगकॉंगच्या इमिग्रेशनसाठी लागणारा सहजसुलभ फॉर्म आम्ही आधीच भरुन ठेवला होता. हाँगकाँगचे इमिग्रेशन अधिकारी काहीसे खडूस असतात आणि उगाचच येणाऱ्या प्रवाशांना त्रास देतात असं सागरने बजावून ठेवलं होतं. तुमचा आवडता अभिनेता कोणता असा प्रश्न विचारल्यास अक्षयकुमार असं उत्तर द्यावं असं त्यानं आम्हांला बजावून ठेवलं होतं. चीनच्या अधिकाऱ्यांशी पंगा घेण्याच्या मूडमध्ये मी नसल्यानं असा काही प्रश्न विचारला गेल्यास निमुट तेच उत्तर द्यावं असं मी मनोमनी ठरवलं होतं. नशिबानं आमच्यापैकी कोणालाच हाँगकाँगचे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्रास दिला नाही. आणि त्यामुळं आमच्यापेक्षा सागरनेच जास्त सुटकेचा निश्वास टाकला. 
विमातळावर वाय फाय फ्री होतं. त्यामुळं मंडळी सर्व खाली माना घालून आपल्या भ्रमणध्वनीसोबत मग्न झाली. 

हल्ली प्रत्येक देशात स्थानिक गाईड असावेत असा नियम अंमलात आणला गेला आहे. आम्हांला लिली नावाची गाईड मिळाली होती. तिनं आमच्यासाठी सबवे सँडविच आणि सफरचंदच्या स्वादाचं शीतपेय ह्यांची सोय केली होती. भूक असो वा नसो समोर आलेल्या अन्नाला नाही म्हणायचं नाही ह्या तत्वाचा स्वीकार करून आम्ही त्याचा फडशा पाडला. 

अखेरीस बसमध्ये आसनस्थ होऊन आमच्या हॉंगकॉंगमध्ये प्रवासास आरंभ झाला. लिली स्वतःशीच बडबडत होती असं मला वाटत होतं. पण तिच्या बोलण्याकडं फारसं लक्ष न दिल्यानं वैतागुन तिनं आम्हां सर्वांना एकतर तुम्ही बोला किंवा मी बोलीन असा निर्वाणीचा इशारा दिला. तिच्या ह्या धमकीला आम्ही तसे घाबरत नव्हतो पण केवळ गाईड ह्या पदाचा मान म्हणून आम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचं ठरवलं. 

हॉंगकॉंगचे बसमधून दिसणार दर्शन विहंगम वगैरे होतं असं मी उगाचच म्हणणार नाही. ऊन मी म्हणत होतं. 
काही वेळानं बस एका फारशा आधुनिक नसणाऱ्या भागात थांबली. टुकार अशा एका ज्वेलरी दुकानात आम्हांला नेण्यात आलं. आमचे अचंबित चेहरे पाहुन ही भेट वीणा वर्ल्डच्यातर्फे नसुन लिलीच्या आग्रहास्तव असल्याचा खुलासा तात्काळ सागरने केला.  
त्यांनतर आम्हांला समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात आले. ही वेळ चुकीचीच होती . साडेपाच वाजले असले तरी उन्हाचे चांगलेच चटके बसत होते. 


ह्या फोटोत जे काही बंगले दिसत आहेत (दिसत नसले तरी आहेत असा समज करुन घ्या !) त्यातील एका बंगल्यात जॅकी चॅन राहतो आणि तुम्ही सुदैवी असल्यास तो काही वेळ बाहेर येऊन पर्यटकांना हात करतो असे सागर म्हणाला. लिली ही गाईड आम्हांला मिळाली म्हणजे आमचे सुदैव कितपत जोरात आहे ह्याची अटकळ आधीच आम्ही बांधली होती. त्यामुळं आम्ही जॅकीच्या दर्शनाची आस मनी धरली नाही. फारशा आकर्षक नसलेल्या बीचच्या भेटीनंतर आमची बस स्काय टेरेस हाँगकाँगच्या दिशेनं वेगानं दौडू लागली. हा मार्ग एका मार्गिकेचा होता. पण ड्रायव्हर अगदी कौशल्यानं बस हाकत होता. 


वाटेत लागलेलं हे एक क्रिकेटचं मैदान ! हॉंगकॉंग इथं होणारी सिक्स अ साईड ही स्पर्धा ह्याच मैदानावर होत असावी असा सोयीस्कर समज मी करून घेतला. 


जसजसं आम्ही उंचावर जात होतो तसतसं दृश्य विहंगम होत होतं. थोड्याच वेळात आम्ही स्काय टेरेस हाँगकाँग इथं पोहोचलो. हॉंगकॉंगचा हा सर्वाधिक उंचीचा भाग! इथून उंच बिल्डिंगवाल्या हॉंगकॉंगचा विहंगम दृश्य पाहायला मिळतं. इथं वारा अगदी वेगानं वाहत होता त्यामुळं छायाचित्रणास अडथळा येत होता. तरीदेखील जिद्दीनं आम्ही काही फोटो काढले.  


(फोटो सौजन्य - अभिजीत जोशी )

खाली उतरल्यावर इंद्रजित ह्यांनी चौकशी करून चहा कुठं मिळेल हे शोधून काढलं आणि मग आम्ही त्या प्रसन्न वातावरणात चहाचा आस्वाद घेतला. 

त्यानंतर एका चांगल्याशा उपहारगृहात भरपेट जेवण करून आम्ही पुन्हा खरेदीला लेडीज मार्केटमध्ये खरेदीला बाहेर पडलो. सकाळी चारच्या आधी उठलेले जीव खरंतर बिछान्यात जाऊन झोपण्याचे मनसुबे रचत होते पण देवाच्या आणि वीणा वर्ल्डच्या मनात मात्र वेगळंच होतं. 

लेडीज मार्केट म्हणजे flea मार्केट. इथं घासाघीस करण्यास पूर्ण वाव. पण आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या असा सल्ला आम्हांला  आधीच देण्यात आला होता. त्यामुळं मी सावधगिरीचा पवित्रा बाळगून होतो. 


फारशी काही खरेदी न करता आम्ही दिलेल्या वेळी परत आलो. आमच्या सहप्रवाशांचा मोबाईल आम्ही जिथं जेवण घेतलं त्या हॉटेलात राहिला होता. लिली आणि सागरनं मेहनत करून तो परत मिळेल ह्याची सोय केली. 

शेवटी बस पुन्हा एकदा सुरु झाली ती आम्हांला आमच्या ८२ मजली L'Nina ह्या हॉटेलवर घेऊन जाण्यासाठी! आम्हांला ३८ व्या मजल्यावर खोली मिळाली होती. ह्या मजल्यावरून हाँगकाँग शहराचं दिसणार रूपं अगदी विहंगम होतं. आकाशातून आपण एका चकमकणाऱ्या शहराकडं पाहत आहोत असा भास होत होता. 
सकाळी चारला सिंगापुरला उठलो तो नक्की आजचाच दिवस होता ना ह्याविषयी शंका व्यक्त करुन आम्ही झोपी गेलो. 

दिनांक ३० मे हॉंगकॉंग - डिस्नेलँड 

८२ मजली हॉटेलातील सर्व पाहुण्यांना एकत्र नास्ता द्यायचा म्हणजे खानसाम्याला किती मेहनत करावी लागत असणार ह्याचा विचार करतच आम्ही नवव्या मजल्यावरील ब्रेकफास्ट रूम मध्ये शिरलो. इथं बऱ्यापैकी प्रशस्त आसनव्यवस्था होती. चीनमध्ये असल्यानं आम्ही प्रत्येक पदार्थाकडे शंकेनं पाहत होतो. शेवटी मफिन, ज्यूस, अंडी आणि ब्रेडच्या आधारे आम्ही आमचा नास्ता आटपला. परंपरेला धरून थोडं छायाचित्रण सुद्धा केलं. उगाचच एखाद्या स्थळाला आम्ही फोटो न काढल्यामुळं न्यूनगंड यायला नको. 


काही मंडळींना बसमध्ये येण्यास उशीर झाला . त्यांची सागरने काहीशा मृदू स्वरात खरडपट्टी काढली. आणि बस डिस्नेलँडच्या दिशेनं धावू लागली. आज कोणतातरी फेस्टिवल असल्यानं रहदारी जास्त असू शकते असं सागर म्हणाला. त्यामुळं बुधवार असल्यानं सर्व राईड अगदी कमी गर्दीत मिळतील असा समज असलेली आमच्यातील काही मंडळी चिंतेत पडली. 

आतापर्यंत बसचा प्रवास कमी असल्यानं वीणा वर्ल्ड स्पेशल अंताक्षरी खेळण्यास सागरला संधी मिळाली नव्हती. ती उणीव त्यानं ह्या प्रवासात भरून काढली. सुधीर जोशी ह्यांनी आपल्या भारदस्त आवाजात जुनीपुराणी हिंदी गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन केलं. ते बारा जणांच्या ग्रुपमधील असल्यानं बाकीजण त्यांना अधूनमधून दाद देणं, त्यांची थोडीफार मस्करी करणं हे प्रकार सुरु होते. काही महिलावर्गाने सुद्धा अगदी जुनी गाणी गाऊन आपल्या रसिकतेचा प्रत्यय आणून दिला. सागरने सुद्धा चांगलं गायन केलं. वीणा वर्ल्ड ह्या सर्व टूर व्यवस्थापकांना गाण्यांचं प्रशिक्षण देत असावं असा मला संशय आहे. 

ग्रुप फोटो ही वीणा वर्ल्डची अजून एक प्रथा! डिस्नेच्या प्रवेशद्वाराशी काढलेला हा आमच्या ग्रुपचा फोटो ! डिस्नेमध्ये शिरल्यावर उन्हाचा प्रचंड दाह जाणवत होता. आम्ही त्याचा मुकाबला करत प्रथम 'It is a small world'  ह्या राईडच्या दिशेनं कूच केलं. ही राईड मला मनापासून आवडली. २००२ साली लॉस अँजेलिसला आम्ही दोघांनी डिस्नेला भेट दिली होती. त्यावेळी खरंतर लहान मुलांसाठी असलेल्या ह्या सर्व राईड आपल्याला सुद्धा आवडल्या म्हणून मी आश्चर्यचकित झालो होतो. आता अजुन १५ वर्षांनी सुद्धा मला ह्यातील बऱ्याच राईड आवडल्या. एकंदरीत आपल्यामध्ये अजुनही बाल्याचा काही अंश शिल्लक आहे ही भावना मला सुखावून गेली. 

ह्या राईडमध्ये जगभरातील बालकांच्या आवाजात विविध सुश्राव्य गीतं आपल्या कानांवर पडत राहतात. एकंदरीत दृकश्राव्य ह्यांचा अत्यंत सुंदर मिलाफ असलेल्या ह्या राईडचा आनंद लुटून आम्ही प्रसन्न मनानं बाहेर पडलो. सोहमला देखील ही राईड आवडली. २००२ च्या मानानं युनिव्हर्सलच्या राईड काहीशा जास्त आक्रमक झाल्या आहेत असं प्राजक्ता म्हणाली होती. त्यामानानं डिस्नेच्या राईड ह्या सुखदायक असतील अशी अपेक्षा ठेऊन आम्ही आलो होतो आणि ह्या पहिल्याच राईडनं आमची आशा पुर्ण केली. 
Mickey’s PhilharMagic

ह्या त्रिमितीय ऍनिमेशन प्रकारात आपण डिस्नेच्या विविध पात्रांच्या करामतीनं भारावुन जातो. छोटा चेतनच्या वेळी वापरलेला त्रिमितीय चष्मा वापरण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. ह्यात सांगायची गोष्ट अशी की पहिल्यांदा आम्ही इथं गेलो असता काही तांत्रिक कारणास्तव हा शो बंद झाला. आम्हां सर्वांची दिलगिरी व्यक्त करुन मग आम्हांला बाहेर जाण्यास सांगितलं गेलं. डिस्नेमध्ये सुद्धा तांत्रिक बिघाड होऊ शकतो बरं का मंडळी!  

Mystic Manor

जगभरातील काही खास गोष्टींचं हे काहीसं गूढ असं संग्रहालय! काहीसा विक्षिप्त असा जगभर प्रवास करणारा लॉर्ड हेनरि ह्याचं हे संग्रहालय. त्याच्या सोबत त्याचा माकड मित्र अल्बर्ट ! अंधारामुळं आणि हलणाऱ्या गाडीमुळं छायाचित्रणाचा दर्जा सुमार !Toy Soldier Parachute Drop
हा थोडाफार प्रमाणातील धाडसी खेळप्रकार ! ह्यात आपल्याला ह्या पॅराशूटमध्ये बसवून साधारणतः चार पाच मजल्याच्या उंचीपर्यंत वर नेलं जातं आणि मर्यादित वेगानं खाली आणलं जातं. हा प्रकार चार पाच वेळा केला जातो. सिंगल रायडर म्हणुन गेल्यानं माझ्या शेजारी अनोळखी टीनएजर बसला होता. ही राईड सुरु होण्याआधी त्यानं माझा हात पकडून सर्व काही ठीक होईल ना अशी नजरेनंच विचारणा केली. मी ही मोठ्या आत्मविश्वासानं त्याला हो रे बाबा सर्व काही ठीक होणार असं सांगितलं ! जणु काही हा सर्व प्रकार मीच डिझाईन केला होता किंवा मी ही राईड आतापर्यंत पाच दहा वेळा घेतली असेल. मग ज्यावेळी खाली थोड्याफार प्रमाणात वेगात आणलं जायचं त्यावेळी मी सुद्धा जोरात 'ओ .... ओ ' असं ओरडून घेतलं. हल्ली वाढत्या वयानुसार अशी मुक्तपणे बोंबलायची संधी मिळत नसल्यानं जिथं मिळते तिथं मुक्तपणे तिचा वापर करावा हा समवयस्कांना सल्ला ! Dumbo the flying elephant

राईडचा हा एक एकदम बच्चू प्रकार ! समोर दिसला म्हणुन घेतला. इथं रांगेत आमच्यासमोर एक चिनीवंशीय तिशीच्या आसपास असलेली स्त्री, तिचा मस्तीखोर मुलगा आणि छोटी मुलगी होती. तिला छोट्या मुलीला घेऊन काही वेळासाठी जायचं होतं. त्यामुळं आमच्याशी काहीतरी बडबडून ती त्या मुलाला आमच्यासोबत ठेवून गेली. ती परत येईपर्यंत तो मुलगा रागानं माझ्याकडं पाहत होता आणि मी ही त्याला जमेल तितकी खुन्नस देत होतो. शेवटी एकदाची ती बाई परत आली आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. त्या पोरग्यानं माझी फारशी तक्रार केली असं वाटलं नाही, कारण ती बाई मग आम्हांला धन्यवाद म्हणून निघून गेली. 

Cinderella Carousel

गावच्या जत्रेत असले प्रकार बहुदा आपण सर्वांनी पाहिले असणार. ही सुद्धा लुटुपुटीची राईड. सोहम नगरकर आणि कुलकर्णी कुटुंबियांसोबत राईड घ्यायला गेल्यानं मी आणि प्राजक्तानेच ही राईड घेतली. शूर मराठा सरदार आपल्या लाडक्या पत्नीसोबत घोडेस्वार होऊन परक्या मुलुखाची टेहेळणी करत आहे असं वर्णन करण्याचा मला इथं मोह होत आहे. Jungle river cruise 

हा एका बोटीतून प्रवास करण्याचा प्रकार ! ही राईड सुरु होण्याआधी पाण्याची कारंजी होती. तिथं यथेच्छ भिजणाऱ्या गोंडस चिनी बालकांचा हा एक फोटो ! वाढत्या वयानुसार आपल्याला कोणी गोंडस म्हणून संबोधित नाही आणि आपण असले प्रकार मनसोक्त करत नाहीत! असो !


राईडसाठी दोन प्रकारच्या रांगा होत्या. एक चिनी समजणाऱ्या लोकांसाठी आणि दुसरी न समजणाऱ्या ! आपलं नाव कोटणीस सांगून पहिल्या रांगेत शिरण्याचा मोह मी टाळला ! 


बोटीमध्ये आमच्या सोबत असलेला मार्गदर्शक उगाचच चित्रविचित्र आवाज काढून भय निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. आजूबाजूला खोटेखोटे हत्ती, मगर वगैरे येत होते. अशा वेळी आपण सुद्धा घाबरलो आहोत असा भास निर्माण केल्यास चांगली वातावरण निर्मिती होऊन सर्वांनाच बरं वाटतं. 
Hong Kong Disney Land Railroad
सोहम अजूनही नगरकर आणि कुलकर्णी ह्यांच्या सोबत होता. त्यामुळं मी आणि प्राजक्तानं रेलगाडीत बसून डिस्नेलँडची सफर केली. ह्या बऱ्याच विस्तृत भागात पसरलेल्या डिस्नेचा काही भागच ह्या रेलराईड मध्ये समाविष्ट होतो. इथं शूर मराठी सरदाराशी तुलना करण्यासारखं काही मला आढळलं नसल्यानं ती उपमा वापरली नाही. Fantasy Garden

इथं डिस्नेमधील विविध पात्रं आपल्याला भेट देतात किंबहुना आपण त्यांना भेट देतो. कडक उन्हानं काळवंडलेलो आम्ही ह्या फँटसी गार्डनमध्ये फारसा वेळ घालविण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. पण बाकी ह्या लोकांनी ह्या सर्व पात्रांना चांगल्या पार्श्वभूमीवर सादर केलं आहे. 
डिस्नेराईड 

डिस्नेराईड दिवसातून दोन वेळा होते. दुपारच्या उन्हात इतका वेळ बसता येणार नाही म्हणून आम्ही संध्याकाळची राईड घेणं पसंत केलं होतं. मागच्या अनुभवावरून आम्ही बऱ्याच आधीपासून राईड जिथून जाईल आणि जिथं रात्रीची रोषणाई दिसेल अशी मोक्याची जागा पकडून रस्त्यावरच ठाण मांडलं होतं. त्या परिसरातील ही नयनरम्य दृश्ये !


थोड्या वेळानं राईड सुरु झाली आणि मिनी, मिकी वगैरे विविध पात्रे आपल्यासमोर मोठ्या आकर्षक स्वरूपात येतात. रात्रीच्या रोषणाईत हा प्रकार खूपच सुंदर वाटत राहतो. ह्या मुख्य पात्रांच्या सोबत अजून सहाय्यक पात्रे सुद्धा येतात. त्यांना खास द्यावीशी वाटते. दररोज चेहऱ्याला रंग फासून तोचतोच प्रकार न कंटाळता करणं हे सुद्धा कौतुकास्पदच ! 


राईड संपली आणि पाच मिनिटांच्या अंतरानं एक अविस्मरणीय अशी फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. संपूर्ण आकाशाला विविध रंगानी उजळून टाकणारी ही आतषबाजी अनुभवणं हा एक आयुष्यभरात लक्षात राहण्याजोगा अनुभव होता. त्याचं शब्दांत वर्णन करता येणं कठीणच ! ज्या अचुकतेनं हे विविध रंगांचे फटाके , नळकांडे आकाशात उधळले जातात त्याची दाद द्यायलाच हवी. ही आतषबाजी केवळ डोळ्यात साठवून घेण्यावर मी भर दिल्यानं त्याचे फोटो नाहीत!

रात्रीचे दहा वाजायला आले होते. सागर आपल्या बाकीच्या ट्रीपच्या गोष्टी आम्हांला सांगत होता. पुन्हा एका चांगल्याशा उपहारगृहात नेऊन चविष्ट जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला आणि जड देहानं आणि पावलाने आम्ही बसकडे वळलो!

(क्रमशः )

by Aditya Patil (noreply@blogger.com) at June 26, 2017 01:56 AM

June 25, 2017

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

मोहम्मद अयुबची निघृण हत्या


Ayub Pandith lynching


काश्मिरमध्ये गुरुवारी रात्री मोहम्मद अयुब पंडित या डीएसपीची कर्तव्य बजावत असतांना हिंसक जमावाने निघृण हत्या केली. श्रीनगरमधील ऐतिहासिक असलेल्या जामा मशिदीबाहेरच ही घटना घडली. ती शब-ए-कद्रची रात्र होती. ही रात्र मुस्लिम आपल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थनांत घालवतात. साध्या वेशातील मोहम्मद अयूब मशीदीबाहेर येणा-या लोकांची छायाचित्रे त्यांच्या ड्युटीचा एक भाग म्हणून काढत होते. लोकांनी त्याला नुसता आक्षेप घेतला नाही तर ते हिंसक बनू लागले. सर्व्हिस रिव्हाल्वर मधून चिडलेल्या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही केला. लोकांनी तरीही त्यांच्यावर हल्ला करत त्यांना विवस्त्र करत पाशवी मारहाण करत दगडांनी ठेचायला सुरुवात केली. त्यात त्यांच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत मखदूमसाहिब या सुफी संताच्या कबरीच्या चौकापर्यंत फरफटत नेण्यात आले.

ज्या सुफी संतांच्या शिकवणुकीवर आपण चालत आहोत असा अभिमान काश्मिरी मुस्लिम बाळगत होते त्या संताच्या कबरीच्या दारात अयुबचे प्रेत फरफटवत आणने हा सुफी तत्वज्ञानाचा खुनच नाही काय असा प्रश्न पडल्यास नवल नाही. मशिदीबाहेर येणारे लोक आपल्या जीवनातील पापाची क्षमा मागून आलेले होते. नवे पाप करायला आपण मोकळे झालो आहोत असे त्यांना वाटले असेल. या घटनेने काश्मिर समूळ हादरला. मुस्लिमांकरवी होणा-या मुस्लिम हत्या काश्मिरमध्ये गेली तीन वर्ष नव्या दमाने सुरु झालेल्या हिंसाचारात नवीन नाही. पण सरकारी अधिका-याची हत्या व तीही रमजानमधील एका पवित्र दिवशी ज्या पद्धतीने केली गेली आहे ती इस्लामियांना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.

या घटनेने १९९८ सालची अजून एक निघृण घटनेची आठवण काही पत्रकारांनी काढली आहे. शब्बे कद्रच्याच रात्री एका गांवात काश्मिरमध्ये २३ पंडितांची अशीच ठेचून निघृण हत्या केली गेली होती. या हत्याकांडाबद्दल खुद्द काश्मिरी मुस्लिमांत संतापाची लाट उसळली होती. पण आता झालेल्या शब्बे कद्रच्या रात्रीची हत्या राजकीय व सरकारी अधिका-यांच्या गोटातील संताप व निषेधात्मक प्रतिक्रियांपुरती उरलेली दिसते. याची शरम अन्य मुस्लिमांना वाटतेय असे काही अद्याप तरी दिसलेले नाही. 

प्रश्न केवळ पवित्र रमजानचा वा शब-ए-कद्रच्या दयावंत रात्रीचा नाही तर एकुणातच काश्मिरी मुस्लिमांत भडकत असलेल्या निघृणतेच्या भावनांचा आहे. सरकारवर त्यांचा विश्वास उरलेला दिसत नाही. सरकार विश्वास मिळवायचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे असेही दिसत नाही. अनेक टाळता येवू शकणा-या बाबीही केल्या जातात व असुरक्षिततेला खतपाणी घातले जाते. अयुब साध्या वेशात असायला हवे होते काय? ड्रेसवर असते तर ते वाचू शकले असते काय? हे प्रश्न जरी पडले तरी प्रशासनाचीही चूक होते आहे. रात्रीच ही घटना घडली पण प्रेत पुरते ठेचलेले असल्याने ओळखही पटलेली नव्हती. सकाळी सहा वाजता अयुबच्या घरच्यांचा "मोहम्मद अयूब अजून घरी आलेले नाहीत..." हा फोन जाईपर्यंत ते प्रेत अनोळखीच राहिले. डीएसपी स्तरावरच्या अधिका-यासोबत दुसरे काही पोलिसही असायला हवे होते असे त्यांच्या वरिष्ठांना का वाटले नाही? एक रिपोर्ट सांगतो की त्यांच्यासोबत एक पोलिस होता, पण जमाव हिंसक झाल्यावर तो पळून गेला. तो पोलिस सांगतो की त्याला मोहम्मद अयुबनेच रिलीव्ह केले होते. खरे काय ते समजेल किंवा समजणारही नाही, पण झाली घटना ही प्रशासनालाही खाली मान घालायला लावणारी आहे.

काश्मिरमध्ये, विशेषत: दक्षीण भागात पुर्वी कधी न ऐकलेली "काश्मिरी तालीबान" ही नवीच संघटनाही उदयाला आली आहे. अल कायदा तर आहेच. फुटीरतावादी दहशतवादी हत्याकांडांना नागरिक व मुलांची दगडफेकही सामील झाली आहे. काश्मिर पुर्वी धुमसत होता, आता ज्वालामुखी फुटतो आहे. अयुबच्या हत्येकडे एक गंभीरतेचा इशारा म्हणून पहात तातडीने सामंजस्याचे व मनोमिलनाचे प्रामाणिक प्रयत्न करने ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. धार्मिक तेढ माजवणा-यांच्या मुजोरीला खपवून घेण्याचा तर आजीबात नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. सर्वांनीच तो सुटण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे.

by Sanjay Sonawani (noreply@blogger.com) at June 25, 2017 12:41 PM

अपूर्व मेघदूतआषाढाच्या पहिल्याच दिवशी कवीकुलगुरू कालिदासांचे मेघदूत रंगमंचावर जिवंत अवतरलेले पहायला मिळणे हे भाग्यच आहे. मेघदूत हा निवांत वाचत अनुभवण्याचा विषय अशी सर्वसाधारण समजूत असल्यास नवल नाही. कालिदासाची प्रतिभाच एवढी की काव्याविष्कारात जेव्हा तो बोलतो तेव्हा तो हृद्य प्रतिमांच्या विलक्षण जगात घेऊन जात असतो. मेघदूतात त्याने विरही यक्षाचा पत्नीला संदेश देण्यासाठी निवड केलीय तीही एका मेघाची. कालिदासाशिवाय मेघ-दूताची निवड तरी कोण करणार? हे अजरामर काव्य मंचित करण्याचा विचार करणे हाच एक वेडाचार असे कोणीही म्हणेल. ज्यांना मेघदूत माहीत आहे ते तर नक्कीच. पण तसे झाले आहे. पण हे येथेच संपत नाही. मेघदूताचे नाट्यरुपांतर करणे, त्याच्या काव्याचा अनुवाद तितक्याच समर्थपणे करत रुढ नाट्यसंकेतांना फाट्यावर मारत काव्याने ओथंबलेले, कसलेही नाट्य नसलेले, विशेष घटनाही नसलेले आणि तरीही नृत्य व कालिदासाच्या प्रतिभेला कोठेही न उणावता येणारी गीते हे घेत रंगावृत्ती बनवणे आणि नाट्याचा परमोत्कर्ष त्यात साधता येणे हाही तसा सामान्यपणे अशक्यप्राय प्रकार!
आणि सर्वाहून अशक्यप्राय बाब म्हणजे सर्व अंध कलाकार घेऊन कालिदासाच्या प्रतिभेला जिवंत करत अक्षरश: डोळ्यांचे पारणे फेडायचा विचार करणे तर या मर्त्य भूतलावर तर अशक्यच! पण हे झाले आहे. अशक्यप्राय आव्हाने पेलायला घ्यायची सवय असलेल्या स्वागत थोरात या माझ्या मित्राने हे कालिदासाचे मेघभरले आभाळ पेलले आहे. रंगावृत्ती करणारे प्रतिभाशाली लेखक गणेश दिघे यांनी मेघदूताचे शाश्‍वत सौंदर्य त्यांच्या रंगावृत्तीत उतरवलेले आहे आणि अद्वैत मराठे, गौरव घावले, प्रविण पाखरे ते रुपाली यादव, तेजस्विनी भालेकर इत्यादी 19 त्याच ताकदीच्या खर्‍याखुर्‍या भूमिका जगणार्‍या कलावंतांनी या खरेच अपूर्व असलेल्या मेघदूतात कालजेयी रंग भरले आहेत. ज्यांनी पाहिले नाही त्यांनी काहीच पाहिले नाही. ज्यांनी ऐकले नाही त्यांनी काहीच ऐकले नाही.
अपूर्व मेघदूत या नाटकाच्या सुरुवातीसच परागंदा झालेला वयोवृद्ध, जर्जर असा कालिदास येतो आणि आपल्याला मेघदुताच्या कथागाभ्यात घेऊन जातो. यक्ष म्हणजेच कालिदास याची खात्री सुरुवातीलाच पटते. कालिदास आपल्यास्थानी यक्षाला कल्पितो हीच त्याच्या प्रतिभेची दिव्य खूण. यक्ष म्हणजे तसे सुखासीन, दैवी सामर्थ्य असलेले, कुबेराचा अलकापुरीत सुखनैव राहणारे लोक. या यक्षाला विरहाचा शाप मिळतो आणि प्रियेच्या, आपल्या यक्षिणीच्या विरहात त्याला एका पर्वतावर झुरावे लागते. हा विरही यक्ष आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसणार्‍या मेघालाच आपला दूत बनवतो आणि आपला निरोप तिला द्यायला सांगतो. या काव्यात कालिदास वाटेत येणारी नगरे, अरण्ये, पर्वत यांचे हृदयंगम वर्णन करत आपल्या प्रियेला ओळखायचे कसे याचे परमोत्कर्षकारी काव्यमय वर्णनही करतो. नाटकात नद्या-नगरे, पशू-पक्षी यांची वर्णने नृत्य-संगीतातून जिवंत केली जातातच पण छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ त्यात आगळे-वेगळे रंग भरतात.
 हे नाटक अंध कलाकारांनी सादर केलेय हे खरेच वाटत नाही इतक्या त्यांच्या हालचाली सराईत आहेत. यामागे अर्थात दिग्दर्शक स्वागत थोरातांचे अविरत कष्ट आहेत. जवळपास 80 दिवस आणि रोज 6-7 तास तालीम त्यांनी घेतलीय. न कंटाळता कलाकारांनी त्यांना साथ दिली. रंगमंचावरील त्यांचा वावर, त्यांची कसलेल्या नर्तक-नर्तिकांची वाटावीत अशी नृत्ये या कष्टातूनच साकार झालीत. त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. या नाटकाची निर्मिती करण्याचे अलौकिक धाडस रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांनी करून मराठी रंगभूमीला एक मोठी देणगी दिली आहे. नाट्यरसिक त्यांच्या नेहमीच ऋणात राहतील. हे नाटक पाहिलेच पाहिजे, पण ते अंध कलाकारांनी सादर केलेय या सहानुभूतीच्या भावनेतून नाही. कालिदासाचे काव्य नाट्यरुप कसे घेते, कसे जिवंत केले जाऊ शकते या अद्भुत आणि यच्चयावत विश्‍वातील एकमात्र आविष्कारासाठी हे नाट्य पाहिलेच पाहिजे.
 संजय सोनवणी
Published in Weekly Chaprak, 

by Sanjay Sonawani (noreply@blogger.com) at June 25, 2017 11:07 AM

विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी

योग: कर्मसु कौशलम्- सौपा अर्थ.


बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते .
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् .
(भगवद्गीता. २/५०)

(सामान्य अर्थ:  बुद्धी वापरून कर्म करणारा व्यक्ती  चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्त होऊ शकतो. म्हणून योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो.)   

योगयुक्त होऊन  कौशल्याने कर्म केल्यास मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकतो. योगयुक्त होणे म्हणजे काय? हा प्रश्न मनात आलाच. 

योग माणसाला पर्मार्थाशी जोडतो. म्हणून इशोपनिषदात काही मिळते का म्हणून ग्रंथ उघडून बघितला. ईशोपनिषदात भगवंत म्हणतात "पूर्णातून कितीही पूर्ण निघत गेले तरी शेवटी पूर्णच उरते. त्या साठी त्याग सहित उपभोग करावा लागतो".  अर्थात जे घेतले आहे, ते परत करावेच  लागते. असे केल्याने पूर्ण पूर्णच राहते. (१-१=०). या पद्धतीने कर्म करणे म्हणजे योगयुक्त कर्म करणे. दुसर्या शब्दात कर्माचे चक्र पूर्ण करणे म्हणजे योगयुक्त कर्म. 

आपण सर्वांनाच माहित आहे, वाईट कर्मांचे वाईट फळ भोगावेच लागतात. त्या शिवाय मुक्ती नाही. कधी-कधी बुद्धी वापरून चांगले कर्म केले तरी माणूस कर्म बंधनातून मुक्त होत नाही. कसे काय? हा प्रश्न मनात आला. उदा:  एक कारपेंटर लाकडापासून आपले सर्व ज्ञान आणि अनुभव वापरून अतिशय सुंदर फर्निचर बनवितो. चांगले कर्म केले तरी तो कर्मबंधनातून मुक्त  होत नाही. कारण फर्निचरसाठी लाकूड लागते. लाकडासाठी झाड तोडावे लागते. असेच झाडतोड सुरु राहिली तर एक दिवस फर्निचर बनविण्यासाठी लाकूडच मिळणारच  नाही. अर्थातच त्याच्या कर्मावर बंधन आले. पुन्हा त्याला फर्निचर तैयार करता येणार नाही.  तोडलेल्या झाडांच्या जागी पुन्हा नव्याने झाडांची लागवड केल्याशिवाय कारपेंटरचे कर्म पूर्ण होणार नाही.  पूर्णापासून पूर्ण वेगळे केले तरी पूर्ण पूर्णच राहते.(झाडापासून फर्निचर बनले तरी झाड पूर्णच राहिले पाहिजे).    

एक प्रश्न पुन्हा मनात येतो, योगयुक्त होऊन कौशल्याने कर्म  कसे करता येईल?  

उदा: एक शेतकरी शेतात  गहू किंवा धान पिकवितो. काही स्वत: साठी ठेवतो, काही विकतो आणि काही पुढच्या वर्षी बियाण्यांसाठी ठेवतो. बियाणांसाठी धान्य वेगळे ठेवले नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा पिक घेता येणार नाही, हे त्याला लक्षात ठेवावे लागते. (या साठी बुद्धी लागतेच). 

जनावर आणि माणसांनी खालेल्या अन्नाचा त्याग मल-मूत्र आणि शेण या मार्गाने होतो. अर्थात  शेतीतून मिळालेल्या अन्नाच्या अवशेषांचा त्याग मनुष्य आणि जनावरे करतात.  मल मूत्र आणि शेण पुन्हा खताचा माध्यमाने जमिनीला परत करणे म्हणजे "तेन त्यक्तेन भुञ्जीथा". जेवण रुपी कर्माचे चक्र पूर्ण करणे. शेतातील सर्व कचरा-कडबा जाळण्याजागी तो जमिनीला परत करायला पाहिजे तो माणसांच्या किंवा जनावरांचा उपयोगाचा नाही पण तो जमिनीतून मिळाला आहे, तो जमीनीला परत केलाच पाहिजेच.  त्या शिवाय शेतकर्याचे  कर्मचक्र पूर्ण होणार नाही. 
 
शेती जगविण्यासाठी पाणी पाहिजेच. ऋग्वेद काळात इंद्राने वज्राच्या सहाय्याने पर्वतांचे हृदय फोडून नद्यांना मुक्त केले. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली.  कृष्णाने हि द्वापर युगात, ब्रज (जिथे दहा हजार गायी पाळल्या जातात) ९९ तीर्थांची स्थापना केली आणि इंद्राच्या लहरी (अतिवृष्टी आणि कमीवृष्टी) पासून गायींची आणि  ग्वालांची  रक्षा केली. आज हि सरकार पाणी अडवून, बंधारे बांधून आणि कालवे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करते. शेतकरी हि शेतात विहीर आणि तलाव बांधून पाण्याची व्यवस्था करतो. जेवढे पाणी आपल्याला कालव्यातून मिळते, जेवढे पावसाचे पाणी विहिरीत आणि तलावात साठविल्या जाते, तेवढ्याच पाण्याचा उपयोग शेतकर्याने केला पाहिजे. जास्त केला तर पुढे शेतीसाठी पाणीच मिळणार नाही तो शेती करू शकणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. कर्माचे चक्र तुटेल आणि शेतकरी कर्मबंधनात अटकेल. त्याचे फळ त्याला भोगावे लागेल. गेल्या दुष्काळात कर्मबंधनाची झळ मराठवाड्याने सोसली आहे, शेती तर सोडा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आगगाडीने करावी लागली. उपलब्ध पाण्याच्या कौशल्याने शेतीसाठी उपयोग करणे व पुन्हा तेवढेच पाणी साठविणे म्हणजे योगयुक्त रीतीने पाण्याचा उपयोग करणे.

वरच्या उदाहरणाने योगयुक्त कर्म म्हणजे काय. हे समजले असेलच. पुन्हा एक प्रश्न मनात आला.  श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश करून अर्जुनाला युद्धासाठी का तैयार केले? एक सुदर्शन चक्र युद्धासाठी पुरेसे होते. पण श्रीकृष्णाने तसे केले नाही. कारण तसे केल्याने कुरुक्षेत्राच्या रणमैदानात सर्व योध्यांचे कर्मचक्र पूर्ण झाले नसते. कुणालाहि मुक्ती मिळाली नसती. 

by VIVEK PATAIT (noreply@blogger.com) at June 25, 2017 06:34 AM

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

Ceaseless Search for the Aryans!

Image result for genetics aryan issue


 I came across the article published in The Hindu “How genetics is settling the Aryan migration debate” by Tony Joseph.
The wonder is they have still embraced the outdated term like Aryans. The well-known fact is the invention of farming cannot be attributed to a single source. We have the oldest archaeological proof from Zagros mountains dating back to 10000 years BC. In fact, no civilisation ever develops in isolation. There are always exchanges between the civilisations along with the independent innovations and inventions and language forms a majority part of any culture.


 When we speak of the ancient past, genetics as a modern tool being used to understand our ancestry, many times give conflicting results for the samples we have are very scarce and that too contaminated by the onslaught of nature. Not more than 101 skeletons have been genetically examined so far and yet the geneticist's can make any claim to explain riddles of the ancient history.


 For example, their report published in The Hindu boldly affirms that sometime around 2000 BC -1500 BC Indo-European language speakers did stream in India with their distinct culture and Sanskrit language! A major unanswered question is, how genetics told these experts which language they spoke and what material culture they really lived from their genes?  The report is fake on many counts when it claims the migration was negated by the research so far, as two major recent reports have dealt with the very issue of the PIE migration through genetics and had conveniently confirmed the migrations of the PIE speakers’, contrary to the claim made by The Hindu.


 A large team led by Morten E Alentoft examined about 101 sampled ancient individuals from Europe and Central Asia. They also used the archeological evidence of chariot burials (2000-1800 BC) to find the migration pattern. The report relies on the hypothesis of the linguists that ‘the spread of Indo-European languages must have required migration combined with social or demographic dominance and this expansion has been supported by archweologists pointing to striking similarities in the archeological record across western Eurasia during the third millennium BC. The genomic evidence for the spread of the Yamnaya people from the Pontic-caspian Steppe to both northern Europe and Central Asia during the early Bronze Age corresponds well with the hypothesized expansion of the IE languages.'  (You may read this report on https://www.nature.com/nature/journal/v522/n7555/full/nature14507.html)


The report appeared in “Science” (Feb. 15) is based on the research of a large team of geneticists led by David Reich and Iosif Lazaridis of Harward Medical School. The DNA samples suggest that the Yamnaya people (DNA obtained from 4 skeletons) could have moved from Steppes 4500 years ago. This paper claims to have connected two far-flunged material cultures to specific genetic signatures. The report states that the team says they spoke a form of Indo-European language. Earlier it was considered that the origins of PIE were 6000 years ago. To meet this gap, hypothetically, it is being proposed that this may be secondary migration!


 It is also agreed by the genetic scientists that they cannot tell the language of people from their DNA's. I have read the original report and it is admitted that they cannot tell for sure the ancestry of the original PIE speakers of Bronze Age because this was not the independent culture but was an admixture of East European or Caucasus hunter-gatherers and near eastern people. So, genetically too, Yamna people were blending of three distinct ancestries. Hence, if at all PIE existed, its origin cannot be attributed to the archaic skeletons from which the DNA’s were extracted to make a big claim.

 

Migrations is a historical fact around the globe for many reasons, but it is a bold claim that the movement of the certain group of the people belonging to some hypothetical culture destroyed or impacted heavily the languages and cultures of the old inhabitants of the regions unless they could outnumber them. Also attributing migrations of about 4500 years ago to the invention of the agriculture is a farfetched lie because the invention of the agriculture dates back to not less than 10000 BC. Also one cannot credit ceratin group of the people for any invention that changed the face of the mankind.


 It is a fact that the Vedic religion and its original adherents entered India sometime around 1000 BC but their number was not as high to outnumber local inhabitants. The scriptural proofs indicate that the cultural and linguistic traits of India influenced the Vedic religion and language of the migrant's. Indo-European language theory is renaming of old Aryan race theory and European supremacist approach still works hard by their ceaseless misrepresentation of the Genomic analysis to make out over and again their theory!


 Comparison of the modern and ancient DNA cannot tell the story of the mankind because DNA samples are too a few and prone to give conflicting results as they have in recent past. Still, the report of Hindu theoretically considers there were two groups, one that was came to India tens of thousand years ago and other came to India 4,000 to 3,500 years ago. This second group is claimed to be Indo-Aryan when there is no proof what were DNA’s of the Indo-Aryans because genetics do not tell us racial or linguistic traits.

The author of this article published in Hindu, Tony Joseph, however, cautions us to treat population genetic models with caution because it works on the assumption which may be wrong or limited to the scope of their study!  The main assumption that those migrated about 4,000 to 3,500 years ago were speakers of the Indo-Europen language is such a baseless and unscientific assumption that the whole conjecture falls apart. 


The issue of the ancient humanities is complex. Origin of the languages cannot be attributed to any special group of the people. Geology might be playing the significant role in the origin of different languages. The spread of the cultures do not necessarily require demographic migrations. Migrations do not impact local cultures to the extent of erasing their language and cultures. The issue is actually overrated by the people who are in search of hypothetical Superman! 

by Sanjay Sonawani (noreply@blogger.com) at June 25, 2017 04:14 AM

सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

Genomics : A Geological connection!

 Image result for aryans dna

No matter what branch of the science they use, whether archaeology, scriptural, linguistics or genetics, there are two sides standing opposite of each other to prove Aryan migration or no migration using the same data. They just have to either misinterpret, distort or fake the extant proofs  Why so? And what could be the truth?

Indo-Aryan migration theory proponents were the westerners those wanted to pull back their history far back in order to prove the whites were superior. Since the Aryan term came forth from Rig Veda, they had to add Vedics to in the Aryan fold to make out their theory. Horses and Chariots became the centre of their fancy as Rig Vedic Aryans rode chariots driven by the domesticated horses, they were fair, tall, blue eyed and with golden hair were made heroes out of the fancied idea of a superior race!

The theory of Aryan origin has taken so much so turns and twists that it is highly difficult to understand its course. When Aryan Race Theory got defamed, thanks to Hitler, they came forth with linguistic theory supported by archaeology. The main attention was focused on the horse-chariot burials. It was utterly forgotten that though Vedic Aryans performed horse sacrifices it was not their custom to bury the dead men with horses and chariots. The people of ancient times roaming in the territories of Pontiac Stepps and nearby areas used domesticated horses because they were still pastoralists and horses available in these regions. 

The horses make no tribe superior in warfare and language. Still, horse-chariot issue and the burials became a significant basis to draw the migration maps for IE proponents. They forgot that the technologies do spread by many ways including religious concepts. There is no necessary need for physical migration of the people. Vedic religion finds no parallel in the so-called IE world except for Avesta. Elsewhere we do not find so much so affinity in linguistic and religious similarity. They had migrated to India, yes, but their number was too a small to cause any genetic impact on the huge populations here. 

IE language group is not caused by the demographic migrations. It has no biological connection as suggested by Talageri. Genetics does not confirm the language spoken by the people. Genetical proofs do not indicate the migrations but show the affinity with the geological and geographical features wherever so-called IE languages are spoken. The regional markers do derive from the geological features of the land where human being lived for generations. The geology and minaral distribution of the landmass decide general psychology and languages of the people. Rather human genetics is influenced by these physical factors and none else.

ANI (Ancestral North Indians) and ASI (Ancestral South Indians) DNA variation belongs to the geological construction of both the regions. They vary in great degree. You may refer to geological reports and can see clearly what demarcates ANI and ASI. The same thing applies to the South Asia and most of the Europe where we find the whole land mass have similar geological features and hence the languages spoken in these regions find some or other general similarities or affinity. The similarities in the mix of DNA elements like R1a and others in varied percentage is most likely is owed to the geological and geographical factors. It does not prove the migrations but the degree of impact of the geological factors on the DNA. Rather R1a Haplogroup is not the migration marker but is a geographical marker which is influenced by the geology of the region the person in question lived.

Indus civilisation had trade connections with the Semitics from for at the least 1500 years. Through the vast course of the time, North-Western Indians and Iraqi people’s DNA too should find some affinities to count on. But the geneticists are silent on this part. Indians have travelled for the trade not only taking sea route but the land route that courses through Iran. The men must have come in the intimate contacts with the women of society delving in the en route regions in question. The DNA results would be stronger to suggest an Indo-Semitic connection but it is not yet looked for! 

However, the linguists like Graziadio Ascoli was first to scientifically advocate this relationship in 1943 though it was proposed first by Richard Lepsius in 1836! However, this discussion was limited to the relationship between Semitic and Indo-European languages. The similarities are not negligible. However, the supremacist European scholars kept on their research limited to find the original homeland of the mysterious Indo-Europeans and their movements in different parts of the globe. However, R1a is not traceable in the Semitic populations. Their geology is quite different! 

The haplogroup was first identified in the 24000-year-old remains of so-called Malta boy from Altai region. It is assumed that R1a probably branched from R1* after last glacial maximum. Geneticists assume that place of the origin of R1a is Central Asia and Southern Russia and from there they migrated to Europe and elsewhere. Based on this insignificant raw material various scholars have used genetical data to assume the periods when the migrations took place.  

It also is claimed that the European Neolithic farmers genome miss the R1a in the European autosmal admixture. Hence it is claimed that R1a did not come to Europe with Neolithic farmers only propagated from Eastern Europe. However, the fact that geneticists admit is that modern Sardinians also lack this admixture! Did they check geological features of Sardinia?

Ancient DNA testing has confirmed the presence of haplogroup R1a1a in samples from the Corded Ware culture in Germany (2600 BCE), from Tocharian mummies (2000 BCE) in Northwest China, from Kurgan burials (circa 1600 BCE) from the Andronovo culture in southern Russia and southern Siberia, as well as from a variety of Iron-age sites from Russia, Siberia, Mongolia and Central Asia. New found skeletal remains also have been examined.

Now, the billion dollar question is, the Indo-European migrators that possessed R1a  could migrate to the difficult terrains of Europe and North India, but why they did not migrate, even in small branches, to North Africa and South India? What prohibited their journey to these lands that could influence their superior language and culture over the local populace?

Why there is no Indo-Semitic haplotype has been traced so far when all probabilities there was relationship over the millenniums between the Indians and the North Africans and interaction of Central Asian populations with both as well?

I think, the genetics too, like linguistics has been misused. Both the parties to the debate, i.e. indigenous Aryan Theory proponents and Aryan Migration Theorists are misusing the data and using the same to make out their rustic theories. I have proposed first time the relationship between geology and the language. I am sure and will prove that there is corelationship between certain percentages of genetic markers and the local geology and geography. Geology of the regions does impact the chemistry of the human body (and genetic structures) living for generations moulding their psychology and so the material expressions through language and culture. The overall geology of Eurasia is a single plate though is filled up with different geological features those mark the individual linguistic boundaries as well though the basic structure remains moreover common to varying degree. There are other factors as well that influence the genetic structures of the people with regions but we will discuss this in great detail in the next installment.

Trying to find caste dynamics from genomic data is a foolish adventure. Trying to prove migrations of the people speaking some hypothetical language too is misleading and is not a good science. Using the same data attempting to prove the Aryans were indigenous is another falsity studded with supremacist approach. The migrations is the fact and will remain a trend in future as well. The M17 distribution or R1a is not a product of the migrations but it is natural development caused by the geological features of the lands people live in.

We haven't been told what was the population of so-called PIE speakers. We are not told how many so-called Indo-Aryans entered India. Nor it is considered how many migrated out from India from its local stock. It is not considered the formation of R1a or other admixture might have related to some other unknown and yet inexplicable phenomena. Why Indo-Semitic gene flow is not traceable when in all probability it should form a major genetic structure of the North-Indians and Middle –East populations along with the Iranians and Afghans!

It appears that the racial war fought on academic grounds has reached to the despicable proportions. They misused the linguistics, archaeology and now using the baby science that is called genomics!

-Sanjay Sonawaniby Sanjay Sonawani (noreply@blogger.com) at June 25, 2017 03:05 AM

सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती

June 24, 2017

Global Vegan

आतल्यासहित माणूस

ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट!

एक होती ठकू. स्वैपाकाच्या बाबतीत महानाठाळ. आईने स्वैपाक शिकवायचा प्रयत्न केला, पण ठकूने कधी दाद दिली नाही. कॉलेजबरोबर हजारो उद्योग असत, त्यामुळे ठकू घरी कमीच असे. मुळात स्वैपाकघरात खादाडीशिवाय इतर कशासाठीही जायची संकल्पनाच ठकूला फारशी पसंत नव्हती. वरण-भात आणि भरपूर दूधसाखरवाली उकळी कॉफी हे दोनच पदार्थ होते, जे ठकूला कुणाच्याही मदतीशिवाय सुरुवातीपासून शेवटापर्यंत जमत असत. पोहे आणि साबुदाण्याची खिचडी कशी करतात हे ठकूला फक्त बघूनच माहिती होते. पण ठकूला खाण्याबद्दल मात्र प्रेम होते.
ठकूने वयाची दोन दशके पूर्ण केल्यावर ‘स्वैपाक येत नाही तर लग्न झाल्यावर कसे होणार?’ वगैरे कंटाळवाणे प्रश्न गणगोतात मूळ धरू लागले होते. तिच्याबरोबरीच्या मुली कशा स्वैपाकात एक्स्पर्ट झाल्यात, वगैरेची वर्णने असायचीच तोंडी लावायला. तेवढ्यात ठकूला सुटकेचा मार्ग मिळाला. ठकू अमेरिकेत शिकायलाच निघाली. पण हाय रे कर्मा! जशी जशी एकेक माहिती मिळायला लागली तसे ठकूला कळून चुकले की अगदी नॉनव्हेज खायची सुरुवात करायची ठरवली तरी आता तिथे गेल्यावर जेवणखाणाच्या बाबतीत ‘स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही!’ हेच अंतिम वगैरे सत्य आहे.
ठकूबरोबर पाठवायच्या संसाराची खरेदी झाली. त्यात प्रेशर पॅन नावाची एक आखुडशिंगी बहुगुणी वस्तू आणली गेली. रंगीत तालीम म्हणून त्यात डाळतांदळाची खिचडी ठकूकडून करून घेण्यात आली. खिचडी बरी झाली होती बहुतेक. आणि आपल्या नेहमीच्या प्रेशर कुकरप्रमाणेच याचेही तीन शिट्ट्यांचे गणित आहे हे वगळता बाकी काही ठकूच्या लक्षात राह्यले नाही.
बाकी संसारात दोन लंगड्या (म्हणजे प्रेशर कुकरात ज्यात डाळ भात लावतात ती भांडी), एक दोन कुंडे, एक दोन पातेली, तवा, दोन ताटे, दोन कपबशा, दोन वाट्या-भांडी, चमचे, बेसिक डाव, छोटी विळी, मिसळणाचा डबा – त्यात डबल पिशव्या लावून भरलेल्या हळद-जिरं-मोहरी-हिंग-तिखट वगैरे वस्तू, काकूने घरी करून दिलेला गोडा मसाला हे सगळे होते. त्यात ठकूच्या युनिव्हर्सिटी टाऊनमधे म्हणजे जॉर्जिया प्रांतातल्या अथेन्स नावाच्या गावामधे देसी स्टोअर नव्हते. त्यासाठी अटलांटालाच जावे लागेल, असे कळले होते. तिथे जायला लगेच वेळ मिळेल न मिळेल हा विचार करून डाळी-तांदूळ-पोहे-साबुदाणा असा सगळा बेसिक शिधाही भरून दिलेला होता.  ‘मी तिकडे शिकायला जाणारे, स्वैपाक करायला नाही हे लक्षात आहे ना?’ ठकूने एकदा विचारलेही आईला. आईने अर्थातच दुर्लक्ष केले.
ठकू पुण्यातून निघाली. व्हिसा आयत्यावेळेला झाल्याने ठकू दोन दिवस आधीच मुंबईत मामाकडे पोचलेली होती. एअरपोर्टवर निघायच्या आधी सेण्डॉफचे जेवण म्हणून मामीने खास पुरणपोळ्या केल्या होत्या. सगळ्या गडबडगोंधळात ठकूला जेवण गेलं नाही. शेवटी मामीने दोन पुरणपोळ्या बांधून दिल्या तूप घालून. त्या चुकून ठेवल्या गेल्या चेक इन लगेजमधे. त्यांचं दर्शन अथेन्सला पोचल्यावरच झालं.  गेल्या गेल्या देशमुख काकांच्या घरीच गेल्याने पुरणपोळ्यांकडे बघायची वेळच आली नाही. भरपूर तूप लावल्यावर काहीही टिकतेच, या कॉन्फिडन्सने ठकूनेही दुर्लक्ष केले. मग चार-पाच दिवसांनी जेव्हा ठकूने आपल्या अपार्टमेंटमधे जाण्यासाठी बॅग परत आवरायला घेतली तेव्हा ते पाकिट बघितले. मामीने प्रेमाने दिलेल्या त्या पोळ्यांना एव्हाना बुरशी लागलेली होती. पुरणाच्या पोळ्या टिकत नाहीत हे नीटच कळले ठकूला. ते पाकिट कचर्‍यात टाकताना पहिल्यांदा घरच्यांपासून इतके लांब आलोय, आता कदाचित तीन वर्षं कुणाची भेटही होणार नाही, आता लाड संपले आणि आता आपल्या जेवणाची जबाबदारी आपली, हे सगळे पारच अंगावर आले. अमेरिकेत पोचल्यावर ठकू त्या दिवशी पहिल्यांदा भरपूर रडली.
ठकूला अपार्टमेंट मिळाले. देशमुख मावशींनी ग्रोसरी स्टोअरची ओळख करून दिली होती. पण कांदे, बटाटे, ब्रेड, दूध सोडल्यास अजून काय घ्यायचे हेही ठकूच्या लक्षात येत नव्हते. मॅगीची पाकिटे दिसत नव्हती. “या ग्रीन पेपर्स. कॅप्सिकम नव्हे. इथे ग्रीन पेपर्स म्हणायचे. भेंडीला ओक्रा म्हणायचे. लेडीज फिंगर नाही. आणि ही कोथिंबीर! म्हणजे सिलॅंट्रो. नीट बघून घे नाहीतर पार्स्ली घेशील चुकून. या अनसॉल्टेड बटर स्टिक्स. या कढवायच्या तुपासाठी. बाकी तुला अंडी, फळं, बटर, केचप वगैरे लागेल. हा किचन टॉवेल्सचा रोल. इथे जुनी फडकी वापरत नाहीत.” मावशी ट्रेनिंग देत होत्या. चार कांद्यांच्याएवढा आकार असलेला एक कांदा, तसलेच अवाढव्य बटाटे, भोपळी मिरच्या बघून ठकू चकित झाली होती. बहुतेक सगळ्याच भाज्या आकाराने अजस्र होत्या.
मिळालेल्या रूममेटने ताटवाटी सोडले तर किचनचे काहीच आणले नव्हते. कधी आयुष्यात कुकरही लावला नव्हता. कांदा चिरणे यापलीकडे तिचा अनुभव नव्हता. स्वैपाक या विषयात आपल्यापेक्षा ढढ्ढमगोळा कुणी असेल याची ठकूने कल्पनाच केली नव्हती. ठकूने मग उगीच आपण सिनीयर असल्यासारखी मान उडवून घेतली. स्वैपाक सुरू झाला. एक दिवस वरणभात तूप मीठ लिंबू, एक दिवस डाळ तांदूळ खिचडी, एक दिवस तांदूळ डाळ खिचडी आणि त्यात एक भोपळी मिरची, एक दिवस बटाट्याची भाजी ब्रेडबरोबर इत्यादी. पहिल्यांदा वरणभात तूप मीठ लिंबू करून खाल्ल्यावर जी तृप्ती आली होती, ती आजही ठकूला आठवते. कोणाला कळले नाही, पण त्या घासागणिक ठकूला त्या परक्या देशात सुरक्षित वाटत गेले होते.
पहिल्या दिवशी लक्षात आले की कुकरच्या शिट्ट्या पटापटा वाजतायत आणि वस्तू शिजतच नाहीयेत. मग दोन स्वैपाक-ढ प्राणी संशोधनाला लागले. शेवटी कळले की ’अरे हा गॅस नाही, ही तर कॉइल आहे!’ कॉइलचे गणित समजून घेताना थोडी करपा करपी, भात सांडणे वगैरे झाले पण हळूहळू जमले. त्यातच पहिल्यांदा जेव्हा कुकरची शिट्टी वाजली तेव्हाच अजून एक भोंगा सुरू झाला. कुठून काय वाजतेय काहीच कळेना. मजल्यावर समोर राहणारी देसी मुले लगेच धावत आली आणि त्यांनी एका कोपर्‍यात छताला लावलेल्या एका वस्तूला टपली मारून शांत केले. तो स्मोक डिटेक्टर असतो आणि तो ’लांडगा आला रे!’ सारखी ’आग लागली रे!’ अशी हूल उठवत असतो. त्यामुळे शेगडीच्या वरचा भणाणा आवाजाचा एक्झॉस्ट चालू केल्याशिवाय काहीही रांधायला घ्यायचे नाही. तरीही उगाच तो बोंबललाच, तर त्याला टपली मारून पाडायचा. तळण बिळण करायचे तर काढूनच ठेवायचा आणि तळणाचा धूर गेला की मग लावायचा इत्यादी ज्ञानदान त्या मुलांनी केले.
पहिल्यांदा हॉटेलमधे जाऊन पास्ता खाल्ल्यावर त्यातल्या चीजने घशात कसेतरी झाले होते. नंतर बरेच दिवस कुठलीही वस्तू ऑर्डर करताना ठकू चीज नको म्हणूनच सांगे. ९८ साली सदाशिव पेठेतून उठून अमेरिकेत गेल्यामुळे ठकूला अभारतीय पदार्थांची फारशी ओळख नव्हती. जिभेला चीज हे प्रकरण फारसे माहिती नव्हते. डोमिनोजचा पि्झ्झा पुण्यात तेव्हा मिळायला लागला होता, पण ते सगळं पुलाच्या पलीकडे. पुलाच्या अलीकडच्या सर्वसाधारण जिभांना त्या चवी तेव्हा फार माहिती नव्हत्या.
ठकूचे रूटीन चालू झाले. लेक्चर्स आणि कॉस्चुम शॉपमधले काम आणि असाइनमेंटस् या सगळ्यातून स्वैपाक करून जेवायला संध्याकाळचा जेमतेम तासभर मिळे. बाहेरचे खाणे खिशाला झेपणार नाहीये, हे कळायला लागले होते. रोज करून करून ठकूला हळूहळू स्वैपाकाचे लॉजिक लक्षात यायला लागले होते. ‘फोडणी – चिरलेली भाजी किंवा डाळ-तांदूळ किंवा दोन्ही – मसाला किंवा नो मसाला – परतणे – पाणी – शिजवणे – मीठ घालून सारखे करणे’ हा क्रम लक्षात ठेवला की हाताशी असलेले कुठलेही पदार्थ वापरून जेवणाची वेळ निभू शकते आणि तिखट-आंबट-नेमके खारट-इलुसे गोड या चवींचे गुणोत्तर बरोबर राखले की जे काय तयार होते ते चविष्टच घडते हे ठकूच्या लक्षात आले होते. ठकू आणि रूममेटची ‘बटाट्याचे व खिचड्यांचे १००१ प्रकार’ असे पुस्तक लिहिण्याच्या दिशेने वाटचाल चालू झालेली होती.
दरम्यान टॉर्टिया नावाचे ग्रोसरी स्टोअरमधे मिळणारे प्रकरण रोट्यांसारखे खाता येते आणि क्रोगरमधे (ग्रोसरी स्टोअरची एक चेन) खवलेला, फ्रोजन ओला नारळ मिळतो असे दोन शोध लागले. एकीकडे भरलं वांगं, गवार-बटाटा रसभाजी, फ्लॉवरची साबुदाणा खिचडी भाजी अशा सगळ्या आवडत्या भाज्यांची आठवण यायला लागलीच होती. बेसिक लॉजिक कळल्याने कॉन्फिडन्सही वाढला होता. मग आई काय काय करते, त्याचे चित्र नजरेसमोर आणून एक दिवस भरली वांगीही घडली. शप्पथ, आईच्या हातच्या भाजीसारखीच चव आली होती! त्या चवीने एकदम त्या अपार्टमेंटचे घर होऊन गेले ठकूसाठी. असा ‘टॉळीभाजी’चा डबा नेताना तर ठकूला भरूनच आले होते.
ठकू संध्याकाळीच स्वैपाक करायची. अर्धा स्वैपाक रात्री जेवायची आणि उरलेला अर्धा म्हणजे ‘लेफ्टोव्हर’ दुसर्‍या दिवशी लंचला डब्यातून घेऊन जायची. दुपारी ग्रेड स्टुडंटससाठी ठेवलेल्या मायक्रोवेव्हमधे गरम करून घ्यायची. संपूर्ण डिपार्टमेंटमधे ती एकटीच भारतीय असल्याने तिच्या डब्याबद्दल लोकांना उत्सुकता असायची. कधी कुणी चव घ्यायचे, कुणी नाही. एका अमेरिकन मैत्रिणीने साध्या वरणभात तूप मीठ लिंबू प्रकरणाची चव घेऊन हे थोडेसे पार्मेजान राइससारखे लागतेय असे सांगितले. त्यानंतर इतके वेळा पार्मेजान घातलेल्या वस्तू खाऊनही अजून ठकूला साधर्म्य सापडलेले नाही.
सॅलड म्हणजे लेट्यूस, काकडी, गाजर, टोमॅटो वगैरे घासफूस एवढेच नव्हे हे नव्यानेच कळले ठकूला. ग्रोसरी स्टोअरमधे सॅलडसाठी घासफूसच्या तयार पिशव्या मिळतात. त्यातला मूठभर पसारा घेऊन त्यावर अजून हव्या त्या वस्तू आणि ड्रेसिंग घालून पोटभरीचे सॅलड तयार होऊ शकते हे लॉजिक लक्षात आल्यावर ठकूला प्रयोग सुचला. आदल्या रात्री बटाटे उकडून ठेवले. सकाळी तूप जिर्‍याच्या फोडणीवर परतून उपासाच्या स्टाइलची भाजी केली. ती भाजी एका डब्यात घेतली. एका डब्यात घासफूसच्या पिशवीतला दीड दोन मूठ पसारा आणि एका डब्यात दही बरोबर घेतले. लंचच्या वेळेला भाजी गरम केली. घासफूस, भाजी + ड्रेसिंग म्हणून दही असे सॅलड मिक्स केले. चव महान लागली. पुढच्या वेळेला ठकूने तिचे ‘इंडियन स्टाइल पोटॅटो सॅलड’ अमेरिकन मित्रमैत्रिणींना चाखायला दिले. आवडले बहुतेकांना. चक्क ठकूने रेसिपी वगैरे सांगितली. त्यांनी ठकूला ‘सुगरण’ किताब बहाल करून टाकला. मग हे अनेकदा झालं. प्रयोग करण्यासाठी खरोखरीचे सुगरण असायची गरज नाही आणि लॉजिक लक्षात ठेवून केलेले प्रयोग यशस्वीच होतात हे ठकूला पक्के कळले.
दरम्यान ठकूला तिच्या अमेरिकेतच राहणार्‍या मामीआज्जीने एक सॉलिड पुस्तक भेट दिले. तिथल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाने प्रकाशित केलेले ‘मॉम्स किचन’ नावाचे ते पाककृतींचे पुस्तक. घरचे लाड सोडून परदेशात शिकायला येणार्‍या आणि स्वैपाकात पूर्ण ढ असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पार फोडणी कशी करायची, वरणभात अशा बिगरीतल्या गोष्टींसकट सगळे शिकवलेले होते. भारतातल्या अनेक वस्तूंची अमेरिकन नावे त्यात दिलेली होती. मापे दिलेली होती. नवख्या येरूंच्या डोक्यावरून जाईल अशी खास शेफवाली भाषा न वापरता, प्रत्येक कृती सोप्या भाषेत दिलेली होती. त्या पुस्तकामुळे मुळातली स्वैपाक-ढ असलेली ठकू वर्षभरात १०-१५ जणांना पार्टीला बोलावून चार पदार्थ करून घालण्याइतकी एक्स्पर्ट झाली.
पहिल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत हमस व पिटा ब्रेडची ओळख झाली होती. मेक्सिकाली ग्रिलमधले व्हेज कॉम्बो, लोकल पिझ्झा शॉप्समधले वेगवेगळे पिझ्झा वगैरेंची सवयही झाली होती. चीजबद्दल बसलेली अढीही निघून गेली होती. तिसर्‍या वर्षापर्यंत साऊथचे वॉफल हाऊस तिचेही आवडते झाले होते. वॉफल्स, हॅश ब्राऊन्स आणि ब्रेकफास्ट करताना कॉफी व ऑरेंज ज्यूस आलटून पालटून घेताना एकत्र होणारा स्वाद हे तिला आपलेसे वाटायला लागले होते. युनिव्हर्सिटीच्या कॅफेटेरियामधे असलेल्या ट्रेजमधून स्वत:चे स्वत: सॅलड करून घ्यायचे असे. ड्रेसिंग्ज पण ठेवलेली असत. त्याची मग वजनाप्रमाणे किंमत ठरे. गार्बान्झो बीन्स म्हणजे भिजवलेले छोले वापरून आणि त्यावर रांच ड्रेसिंग ओतून घेऊन ती सॅलड करून घेत असे, स्वत:चे लंचलाड म्हणून. अथेन्सच्या डाऊनटाऊनमधल्या गिरो / यिरो रॅपमधे मिळणार्‍या फलाफल रॅपने ती जिवाचे अथेन्स करू लागली होती.
तिथल्या तिन्ही उन्हाळ्यात ठकू न्यू मेक्सिको प्रांतातल्या सॅन्टा फे गावात सॅन्टा फे ऑपेरा कंपनीमधे उन्हाळी इंटर्नशिप करायला गेली. इतके दिवस डिपार्टमेंटला ती एकटीच भारतीय असली तरी रूममेट देसी होती. आता इथे पूर्ण ऑपेरा कंपनीत ती एकटीच भारतीय होती. रूममेटस अमेरिकनच होत्या. ठकू अजूनही शाकाहारीच होती. भारतीय मसाल्यांच्या वासाचा अभारतीय माणसांना त्रासही होऊ शकतो, हे आता तिला कळले होते. पण तिच्या भारतीय जेवणाचा प्रॉब्लेम कुणालाच नव्हता. ‘आम्हांलाही कधी चव बघू देशील का?’ हीच विचारणा असे. ‘चव बघायला विचारायचं काय त्यात!’ भारतीय ठकूला प्रश्न पडे. ‘तू हिंदू आहेस तर तुला मी घरात बीफ शिजवले तर चालेल का? तुझा अपमान तर नाही ना होणार?’ किंवा ‘शाकाहारी आहेस तर आम्ही मांसाहारी पदार्थ शिजवले/ खाल्ले घरात तर चालेल का?’ असे मात्र प्रत्येक वर्षीच्या अमेरिकन रूममेटस विचारत. ‘बायांनो, तुम्ही काय शिजवता, खाता याबद्दल बोलणारी मी कोण? तुम्ही तुमच्या सवयीचे अन्न खाण्याने माझा अपमान कसा काय होईल?’ ठकू सांगायची. मग सगळं मजेत पार पडायचं. ठकूच्या मोठ्ठ्या नॉनस्टिक भांड्यात नॅन्सी तिचं बीफ लझानिया करायची. झालं की भांडे साफ करून ठेवायची. मग त्या भांड्यात ठकूच्या साबुदाणा खिचडीची फोडणी पडायची.
सॅन्टा फे गावानेच नाही तर तिथल्या स्थानिक मेक्सिकन अन्नानेही ठकूवर गारूड केले. उन्हाळी रविवार दुपारी शाकाहारी मेक्सिकन जेवण आणि बरोबर फ्रोजन स्ट्रॉबेरी मार्गारिटा आणि मग सिएस्टा (चक्क वामकुक्षी!) हा कार्यक्रम तिच्या अगदीच आवडीचा झाला. इथेच मेक्सिकन चवीची झालर असणारी वेगवेगळी चीजही ठकूने चाखली आणि चापलीही. त्यातलेच एक हालापिनो जॅक चीज.
ठकूला मांसाहार करणे जमले नाही, पण अपेयपान मात्र ठकूने चवीने आपलेसे केले. विविध दारवांची चव घेणे, त्यांची वळणे ओळखणे, कशात काय आणि कसे मिक्स करता येऊ शकते वगैरे सगळ्या गमतीजमती तिला फार आवडल्या. स्वैपाकासारखेच कॉकटेल्स बनवणे हे प्रकरण कला आणि शास्त्र दोन्ही आहे हेही उमजले.
पदवी पूर्ण करून तीन वर्षांनी ठकू परत देशात आली. स्वैपाकाबद्दलची मोडलेली अढी आणि पेयांच्या प्रांताची तोंडओळख या दोन गोष्टी या अमेरिकेच्या वास्तव्याने दिल्या. तिथे असताना नव्याने ओळख झालेले अभारतीय पदार्थ करायला शिकण्याइतके सुगरणपण तिला डसले नाही. पण अमेरिकन, इटालियन, मेडिटेरेनिअन, मेक्सिकन, ओरिएंटल अशा खाद्य आणि पेयांच्या चवी मात्र आपल्या संवेदनांमधे साठवून घेऊन आली.
त्या चवींची आठवण येते. मग ठकू प्रयोगाला लागते. आता अनेक परदेशी मसाले व विशिष्ट वस्तू इथे मिळायला लागलेल्या असल्यामुळे ठकूचे प्रयोग तिच्या आठवणीतल्या चवींच्या जवळ जातात. अथेन्सच्या ड’पाल्मामधल्या पास्त्याचे आणि सॅन्टा फे च्या मारियाजमधल्या फ्रोजन मार्गारिटाचे गणित तिला इथे सुटलेय. तिथे असताना वरणभात तूप मीठ लिंबू याने जितके छान वाटले होते, तितकेच छान आणि आश्वस्त तिला आता स्वत:च्या हातच्या या पदार्थांनी वाटते.
- नी
-----------------------------------------------------------------------------------------
हा लेख डिजिटल दिवाळीच्या २०१६ च्या अंकात प्रथम प्रसिद्ध झाला होता. 

by Nee Pa (noreply@blogger.com) at June 24, 2017 07:44 AM

सूर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका : सूर्यकांती

काय वाटेल ते……..

एका लग्नाची गोष्ट

पण मला इतक्यात लग्नच करायचं नाही. सोज्वळ अगदी ठामपणे म्हणत होती. गेले अर्धा तास लग्न या विषयावरच दोघांचाही संवाद/विसंवाद सुरु होता. अगं पण नाही का म्हणतेस? चांगली २५ वर्षाची झालीस, आता नाही तर कधी करणार मग लग्नं? तुझ्या वयाची असतांना … Continue reading

by महेंद्र at June 24, 2017 03:33 AM

June 23, 2017

वास्तू वेध

मुंबई.. पॅरिसपेक्षाही महागडीच..

मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सव्‍‌र्हेक्षण केले जाते. यंदा केलेल्या सव्‍‌र्हेक्षणात मुंबई ५७ व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे, तर मुंबई देशातील सर्वाधिक महागडे शहर नोंदले गेले आहे.

ए दिल हैं मुश्किल जिना यहाँ.. जरा बचके ये हैं बंबई मेरी जान.. असे म्हणत रोज मुंबईच्या दिशेने पोटाकरिता धाव घेणा-या लाखो स्थलांतरीत तसेच पर्यटकांकरिता आता मुंबईत राहायचे तर आपले खिसे अजून सैल करावे लागणार आहेत. मर्सर या संस्थेने केलेल्या एका सव्‍‌र्हेनुसार मुंबईतले राहणीमान पॅरिसपेक्षाही महागडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नोटाबंदी, सातवा वेतन आयोग, आयटी सेक्टरमधील मंदी, १ जुलैपासून लागू होणा-या जीएसटीबाबतची संभ्रमावस्था या सर्व पार्श्वभूमीवर आधीच हैरान झालेल्या मुंबईकरांना अणि मुंबईत येऊ इच्छिणा-यांकरिता आणखी एक धक्कादायक सत्य नुकतेच समोर आले आहे आणि ते?म्हणजे, मुंबई जगातील महागडय़ा शहरांपैकी ५७ व्या नंबरचे महागडे शहर ठरले आहे. मुंबईतले राहणे आता पॅरिस, डल्लास, अन् ऑकलँडपेक्षाही महागडे ठरले आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आकर्षण जगभरातील लोकांना आहे. मुंबईतील वैभवशाली वास्तू पाहण्यासाठी, येथील समुद्रकिना-यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक मुंबईत येतात. तसेच अनेक परदेशी नागरिक नोकरीनिमित्त, शिक्षणासाठीही मुंबईत येतात. मात्र  मर्सर संस्थेने केलेल्या सव्‍‌र्हेक्षणानुसार मुंबई हे पर्यटकांसाठी आणि नोकरीनिमित्ताने आलेल्या नागरिकांसाठी महाग शहर ठरले आहे. येथे होणारा अर्थार्जनाचा खर्च हा अधिक आहे. जागतिक क्रमवारीत मुंबईचा ५७ वा क्रमांक लागतो. २०१६ साली मुंबईचा ८२ वा क्रमांक होता.

मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सव्‍‌र्हेक्षण केले जाते. यंदा केलेल्या सव्‍‌र्हेक्षणात मुंबई ५७ व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. हे शहर सव्‍‌र्हेक्षणात प्रथम स्थानावर आहे. भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे. या सव्‍‌र्हेक्षणात नवी दिल्ली ९९ व्या स्थानावर आहे. तर चेन्नई (१३५), बंगळूरु (१६६), कोलकाता (१८४) या शहरांचाही समावेश आहे. मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड (६१), डल्लास आणि पॅरिस (६२), कॅनबेरा (७१), सीटल (७६) आणि व्हिएना (७८) या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे. चीज, बटर, मासे, मटण यांच्या किमती गेल्या काही वर्षामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत.

जगभरातील पर्यटकांची याच खाद्यपदार्थाना अधिक पसंती मिळते. याशिवाय कांदे, टोमॅटो, अननस यासारख्या फळे आणि भाज्यांच्या किमतीमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. वाहतुकीचा खर्चही मुंबईत अधिक दिसून आला आहे. टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.
टय़ुनिस (२०९), बिशकेक (२०८), कोपजे आणि विन्डोक (२०६), ब्लाटायर (२०५), बिलीसी (२०४), मॉन्टेरेरी(२०३), सॅराजेवो (२०२), कराची (२०१) आणि मिन्स्क (२००) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत, असे या सव्‍‌र्हेक्षणात नमूद केले आहे. लुएन्डा या शहरानंतर हॉंगकाँग (२), टोकियो (३), ज्युरिच (४), सिंगापूर (५) ही जगभरातील महागडी शहरे आहेत. याशिवाय सीऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या दहामध्ये समावेश आहे. या यादीमध्ये युरोप खंडातील शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे.

देशातील शहरांची क्रमवारी

शहर                        २०१७-२०१६

मुंबई                          ५७-८२

नवी दिल्ली                 ९९-१३०

चेन्नई                        १३५-१५८

बंगळुरू                       १६६-१८०

कोलकाता                   १८४-१९४  

नोटाबंदीमुळे घरांच्या किमती वाढल्या
२०१६ साली जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या तर भाडय़ाने घर घेऊन तात्पुरती स्वत:ची सोय करणा-यांची संख्या वाढली. यामुळे या किमतीमध्येही आपसूकच वाढ झाली. याचाच परिणात महागाईत झाला आहे.

रुचिका पाल, मर्सरच्या भारतातील प्रमुख

by प्रतिनिधी at June 23, 2017 09:45 PM

विविधरंगी कुशन्स

घराचे सुशोभीकरण करताना आपलं घर टापटीप कसं राहील याकडे सर्वाचाच कल असतो. नवीन घर खरेदी केल्यावर किंवा आहे त्याच घराला नवेपणा देण्यासाठी प्रत्येकजणच तत्पर असतो. यावेळी कुणी घराला दरवर्षी रंगाच्या माध्यमातून नवेपणा देतो तर कुणी पडदे, फर्निचरच्या माध्यमातून घराला नवेपणा आणतो. विशेषत: हॉलच्या सुशोभीकरणावर अधिक भर दिला जातो. हॉलमध्ये असणारे सोफे आणि त्यावरील कुशन्स हे घरात येणा-यांचे लक्ष वेधून घेतात. हॉल आणि तिथलं फर्निचर जर आकर्षक रित्या मांडलं गेलं असेल तर ते घर अधिक सुरेख भासतं. सोफा व त्यावरील कुशन्स तर मनोवेधक भासतात.

अलीकडे घराघरात आपल्याला हॉलमध्ये नव्या डिझाईन्सचे कुशन्स पाहायला मिळतात. विविध रंगांतील कुशन्सची सोफ्यावर तसेच बेडवर केलेली मांडणी पाहता घराच्या भिंतींचा रंग, सोफ्याचा रंग आणि कुशन्सचा रंग यांची रंगसंगती मनाजोगी ठेवली तर ते घर अधिक उठून दिसते. सोफा आणि बेडवरील कुशन्सच्या रंगसंगती पाहिल्या तर सहा महिने वर्षाच्या फरकाने त्यांचं स्वरूप बदलताना दिसते. यामुळे घराला नवेपणा येऊन घराची ठेवण जपली जाते.

व्हाईट रंगाच्या बेडवर पिंक किंवा विविध रंगाचे कुशन्स भुरळ पाडतात. कुशन्सच्या चौकोनी, आयताकृती, गोलाकार स्वरूपातील डिझाईन्स साध्या किंवा उच्च प्रतीच्या किमतीतही उपलब्ध असलेले दिसून येतात. कुशन्सचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. लोकरीने विणलेले, हस्तकलेचा वेध घेणारे कुशन्स विशेष कला जपणारे ठरतात. राजस्थानी ढाच्यातील कुशन्स हे जरासे निराळे आणि लक्षवेधक, चटकन खरेदीस भाग पडणारे. असे कुशन्स विविध रंगांत, विविध ढंगात आपल्या हॉलची शान राखतात. हँड एम्ब्रॉडरी केलेले कुशन्स डिझाईन्सच्या माध्यमातून मनात घर करतात. यामध्ये दोन किंवा तीन पिसच्या माध्यमातून हे कुशन्स रेग्युलर स्वरूपात किंवा समारंभाच्या निमित्तानेही घर सजावटीसाठी उपयोगी पडतात.

यामध्ये रिबन वर्क केलेल्या कुशन्स, राजस्थानी मिरर वर्क, कॉटन कुशन कवर, एम्ब्रॉडरी पॅच वर्क केलेले कुशप, ब्रोकेड सिल्क कुशन कवर, फ्लॉवर कुशन कवर, तसेच हेवी एम्ब्राडरी कुशन कवर, आदी नव्या स्वरूपात, आकर्षक रंगात, डिझाईनमध्ये आकर्षून घेणारे ठरतात. असे कुशन्स आपण ऑनलाईनही मागवू शकतो. रंगांचा नजराणा केवळ घराच्या बाबतीतच लागू पडतो असं नाही तर घराबरोबरच घरातील सोफा तसेच त्यावरील कुशन्सचे रंग, तसेच राजस्थानी ढंगातील त्याचे वेगळय़ा स्वरूपातील डिझाइन्स पाहिले तर घराला नवेपणा तर देता येतोच पण एका कलेच्याही आपण मोहात पडतो.

by प्रियानी पाटील at June 23, 2017 09:40 PM

क्रेडिट स्कोअर नियमित तपासण्याची ७४ टक्के?भारतीयांना सवय

भारतातल्या १,००२ शहरी ग्राहकांच्या क्रेडिट आणि वित्तविषयक सवयींबाबत ट्रान्सयुनियनने सर्वेक्षण केले. या ग्राहकांपैकी ७४ टक्के ग्राहक वर्षातून किमान दोन वेळा आपला क्रेडिट स्कोअर तपासत असल्याचे निदर्शनास आले आहे. घरकर्जाकरिता हा स्कोअर महत्त्वाचा मानला जातो..

क्रेडिट स्कोअर तपासण्यामागचे अनेक उद्देश या सर्वेक्षणादरम्यान लोकांनी सांगितले. उत्तरे दिलेल्या लोकांपैकी २९ टक्के लोकांनी प्राथमिकत: आपली क्रेडिट सुधारण्यासाठी आपण ते तपासत असल्याचे कारण दिले, तर अन्य २८ टक्के लोकांनी नवीन कर्ज किंवा नवीन क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपण असे करत असल्याचे सांगितले. नवे घर, घरबांधणीकरिता कर्ज घेताना, ईएमआय, पगाराची सांगड घालताना या क्रेडिट स्कोअरचा ग्राहक आणि बँकाही प्राधान्याने विचार करतात. आश्चर्याची बाब म्हणजे, कर्ज देणारी संस्था किंवा बँका कर्जाचे नियम व अटी ठरवण्यापूर्वी प्रत्येक ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर तपासून पाहत असतात, याबाबत ६२ टक्के लोकांना माहितीच नव्हती. भारतातील तरुण शहरी प्रौढ व्यक्ती क्रेडिटवर जास्त अवलंबून आहेत. १८ ते २४ वर्षे वयोगटातील जवळजवळ ४९ टक्के तरुण क्रेडिट स्कोअर वाढवण्याच्या उद्देशाने तो सतत तपासून पाहत असतात. तर, ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे हे प्रमाण केवळ २० टक्के आहे.  ही आकडेवारी ट्रान्सयुनियनच्या वतीने यूगोव्ह पीएलसीने केलेल्या सर्वेक्षणानुसार नोंदवण्यात आली आहे. या सर्वेक्षणात एकूण १,००२ प्रौढांना समाविष्ट करण्यात आले. १० ते १६ एप्रिल २०१७ या कालावधीत हे सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने पार पडले आहे.

by प्रतिनिधी at June 23, 2017 09:35 PM

घराचे रंगकाम करताना ..

घर जसे आतून सजवून चकाचक करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करतो, त्याप्रमाणेच ते बाहेरूनही स्वच्छ दिसावे याकरिता आकर्षक रंग-रंगोटीची आवश्यकता असते. घरांच्या भितींना बाहेरून पेट करताना शक्यतो सिमेंट पेंट, ऑईल पेंटचा वापर केला जातो. बाजारात अनेक प्रकारच्या कंपन्यांमार्फत अनेकविध रंग, अनेक पर्यायात हव्या तशा बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

पावसाळय़ात घराला, इमारतींना बाहेरून रंगकाम करणं अधिक हितावह ठरते. याचे कारण बाहेरचे रंगकाम करण्यापूर्वी संपूर्ण बिल्डिंग धुवून, घासून घ्यावी लागते. कारण पावसाळ्यात इमारतीच्या बाहेरील भागावर शेवाळसदृश्य वनस्पती पकडलेली असते. त्यामुळे तिला घासून साफ केल्यामुळे इमारतीचा भाग व्यवस्थित साफ होतो. त्याला रंगही चांगला पकडतो. त्यासाठी खूप पाण्याचीही आवश्यकता असते. तसेच सिमेंट पेंटला एक कोट केल्यावर दुसरा कोट करण्यापूर्वी त्यावर पाणी मारणे आवश्यक असते. असे न केल्यास पुन्हा उन्हामुळे तापून रंगाची भुकटी पडू लागते. त्यामुळे पावसाळा संपत आला असताना बाहेरील रंगकाम केल्यामुळे पाण्याची बचत होते. रंगकामाला आवश्यक असलेला ओलावा इमारतींच्या भिंतींना या मोसमात नैसर्गिकरीत्या मिळतो. त्यामुळे रंग वर्षभर टिकतोही. पावसाळ्यात भिंतींना ओलावा येतो. या ओलाव्यामुळे भिंतींना केलेला गिलावा, लांबी ओली राहिल्यामुळे कालांतराने रंगाचे पापुद्रे सुटतात. त्यामुळे रंग निघून जातो.

पाऊस कमी झाल्यावर इमारतीला बाहेरच्या बाजूने रंगकाम करताना प्लास्टर करावं. त्यानंतर रंगकामाला सुरुवात करावी. त्यामुळे इमारतींतून होणा-या गळतीला अटकाव होतो. इमारतीच्या भिंतीचं आयुष्य वाढतं. लोखंडी सळ्या, खांबांना गंज पकडत नाही.

by प्रतिनिधी at June 23, 2017 09:30 PM

Holy Cow! Vegan Recipes

The best damn vegan brioche doughnut (with a vanilla glaze and aquafaba)

This vegan brioche doughnut rises a mile high and has a vanilla glaze that crunches between your teeth before you bite into the soft, fluffy, tender doughnut. A soy-free, nut-free recipe. Sometimes...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

by Vaishali at June 23, 2017 01:00 PM

स्मृति

H 4 Dependent Visa (5)

पॅरालीगलचे शिक्षण प्रत्यक्ष कॉलेजमधे जाऊन घेण्याचा विचार केला तेव्हा परत गुगलशोध घेतला. आम्ही राहतो त्या शहरात कम्युनिटी कॉलेज होते. या कॉलेजचा मुख्य कँपस डाऊनटाऊनला होता. तिथे ये-जा करायला बसही सोयीची होती. नेमके त्याच वेळेला वेदर चॅनल वर कॉलेजची जाहीरात आली ती अशी की फॉल सेमेस्टरला रजिस्टर करा अमुक तारखेच्या आत. या कॉलेजचा नॉर्थ कँपस आमच्या अपार्टमेंटच्या जवळ होता. तिथे जाऊन प्रत्यक्ष कॉलेज पाहिले. हे कॉलेज आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटच्या दुसऱ्या चोकात होते पण तरीही चालण्याच्या अंतरावर नव्हते. फॉल सेमेस्टर साठी रजिस्ट्रेशन केले. माझी एक दूरवर राहणारी डॉक्टर मैत्रिण नोषवी हिने मला कॉलेजबद्दल सर्व माहीती सांगितली. मी विचारले होते त्याबद्दल तिला म्हणजे तिने पण माझ्यासारखाच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. ती पण डिपेंडंट विसावर होती.पॅरालीगलमध्ये ३ कोर्सेस होते. पहिला सर्टिफिकेट कोर्स, दुसरा डिप्लोमा आणि तिसरा डिग्री कोर्स. त्यात मी सर्टिफिकेट कोर्स करायचा ठरवला.
रजिस्ट्रेशन केल्यावर कॉलेजचे पत्र आले ते म्हणजे "तुम्ही दोन्ही प्रकारचे टॅक्सेस भरले आहेत का? आणि तुम्ही किती वर्ष या राज्यात राहत आहात? " या दोन्ही नियमांमध्ये मी बसत होते म्हणून मला इन-स्टेट फी लागू झाली, नाहीतर मला तिपट्ट फी भरावी लागली असती. कॉलेजच्या वेबसाईट वर माहीती वाचली. प्रत्येक विषयाला किती क्रेडीट आहेत ते कळाले. कॉलेजचे वेळापत्रक पाहिले. कोणत्या वर्गात बसायचे तेही पाहिले आणि माझे कॉलेज जीवन सुरू झाले. विनायक मला रोज कॉलेजला न्यायला-आणायला येत होता. आमच्या अपार्टमेंटच्या पुढच्या चौकात विनायकचे ऑफीस होते तर त्यापुढील चौकात माझे कॉलेज होते. कारने अवघी ५ मिनिटे.

ज्या दिवशी कॉलेज सुरू झाले त्यादिवशी गणपती फेस्टिवलचा पहिला दिवस होता. मी घरातल्या घरात गणपतीच्या मूर्तीची पूजा करते आणि मोदकांचा स्वयंपाक करते पण मला काहीही करता आले नाही. आईने मला एक सुपारीत कोरलेला चांदीचा गणपती दिला होता. त्याची गंध, हळद कुंकू, लावून आणि अक्षता वाहून पूजा केली. नैवेद्यासाठी वाटीमध्ये साखर ठेवली. नमस्कार केला आणि कॉलेजला गेले. पहिला दिवस छान होता. वर्गात काही तरूण तरूणी आणि काही मध्यमवयीन माझ्यासारख्या बायकाही होत्या. सर्वांच्याच हातात जाडे पुस्तक होते. तोषवीने सांगितले होते की इथे पुस्तके रेंटने घेतात. म्हणजे रेंटने पुस्तके घ्यायची आणि सेमेस्टर झाली की परत करायची. मी विचारले असता तिने सांगितले होते. कारण कि नेमलेले पुस्तक साधारण २०० डॉलर्स होते. मी तिला म्हणाले की अशी प्रत्येक विषयाची पुस्तके विकत घेतली तर दिवाळेच निघेल. तेव्हा तिने पुस्तके रेंट करतात असे सांगितले होते.
आम्ही विचार केला की आधी कॉलेजच्या लायब्ररीत पुस्तके असतील तर कशाला रेंट करायची. पण तसे नव्हते. लायब्ररीत पुस्तके नव्हती. कॉलेजमध्येही पुस्तके विकत घ्या नाहीतर रेंटने घ्या अशीच पाटी होती. तिथे जाऊन विचारले तर रेंटने घ्यायची पुस्तके पण महाग होती. कॉलेजमधून घरी आल्या आल्या ऍमेझॉनच्या साईट वर पुस्तक रेंट केले. पुस्तक घरी आल्यावर खूप धीर आला. Currin सरांनी पहिल्या दिवशी आम्हाला सर्वांना प्रिंट केलेला कागद दिला. त्यावर सर्व सिलॅबस मधले चॅप्टर, त्याच्या तारखा, त्यावर असाईनमेंटच्या आणि परीक्षेच्या तारखा असे सर्व काही होते. कारभार खूपच पद्दतशीर होता. Currin सर Clarke बाई कसे होते, त्यांची शिकवण्याची पद्दत कशी होती, असाईनमेंट आणि परीक्षा यांचा ताळमेळ कसा साधत होते ते सर्व पूढील लेखात!

by rohinivinayak (noreply@blogger.com) at June 23, 2017 12:33 PM

देवा तुझ्या द्वारी आलो

माझिया मना जरा सांग ना

मनाचे खेळ- भाग २

आरती घरी आली तरी डोक्यातून विचार जातंच नव्हते. 
आल्या आल्या अमितने विचारलंच,"काय गं इतका उशीर झाला आज?". 

"अरे ते क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू चालू आहे ना म्हणून. अमु कुठेय?" तिने स्वतःला सावरत विचारलं. 

"झोपली ती मघाशी. "

"काय अरे शी. इतका उशीर झाला. सॉरी."

"इट्स ओके. झालंय तिचं नीट जेवण, होमवर्क. चल जेवून घेऊ.", म्हणत त्याने दोघांचं ताट वाढून घेतलं. 
तिचं जेवणात लक्षही नव्हतंच. कसंबसं जेवण उरकून तिने पुन्हा लॅपटॉप सुरु केला. 
अमितच्या चेहऱ्यावर जरा आठ्या पडल्याच. 

"इतक्या उशिरा येऊनही अजून काम आहेच?", त्याने विचारलं. 

"ह्म्म्म अरे जरा चेक करायचे आहे. थोडा वेळ बसते. तू काय करणार आहेस? जागा आहेस का झोपतोयस?" तिने विचारलं. 

"आहे मी जागा, बैस जरा वेळ." म्हणत त्याने टीव्ही सुरु केला. 

टीव्हीच्या आवाजात लक्ष लागेना म्हणून बेडरूममध्ये जाऊन बसली. घोळ छोटा नव्हता. लाखो रुपयांचा होता. आणि तोही फक्त ३ महिन्यातला. म्हणजे याच्या आधी किती असेल काय माहित? तिने तीही माहिती काढायचा प्रयत्न केला. पण मागच्या क्वार्टरची माहित तिला मिळत नव्हती. अमित आत येऊन तिच्याकडे पाहून तिच्याशेजारी बसला. 

"काय झालं सांगशील का? किती टेन्शन मध्ये आहेस? सगळं ठीक आहे ना?" त्याने काळजीने विचारलं. 

"अरे मी हे मनोजचे रिपोर्ट चेक करत होते."....मनोज म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडा उरतलाच होता. ती पुढे बोलू लागली. 

".....तर त्यात काहीतरी घोळ वाटतोय. तू बसतोस का जरा शेजारी? एकदा टॅली करून बघू." 
त्याने मग तिला मदत केली बराच वेळ आणि नक्की किती रुपयांचा घोळ आहे तेही दोघांनी लिहून काढलं. 
त्याने कॉफी बनवली. बाहेर कॉफी घेत दोघेही विचार करत बसले होते. 

"मी तुला सांगतो मला हा मनोज कधी पटलाच नाही. एकतर नको इतका आगाऊ वाटतो मला तो." अमितने विषय काढला. तिला बोलायचे त्राण नव्हतेच. तो बोलत राहिला. 

"तू इतकी मारामारी करतेस रेव्हेन्यू साठी, नवीन क्लाएंट मिळवण्यासाठी हे मी पाहिलंय. हा बाबा आपला नेहमी पुढे असतोच, शिवाय बाकी ऐश चालूच असते त्याची. काहीतरी घोळ घालतच असणार आहे. नाहीतर तू सांग एकट्याच्या पगारात इतकं भागतं का?", त्याच्या या प्रश्नावर तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिने कधी विचारच केला नव्हता मनोज असं करू शकतो. एखाद्या गोष्टीत कामचुकारपणा करणे वेगळं आणि हे असे घोटाळे वेगळे. आपला मित्र, एकेकाळी आवडणारा व्यक्ती असा असू शकतो? ती विचार करत होती. 

"तुला सांगतो आरती, मला तर शंका आहे त्याच्या मनातून तू अजूनही गेली नाहीयेस. मी पाहतो ना कसा तुझ्याकडे पाहतो तो." त्याने पुढे बोलणं चालूच ठेवलं. 

"हे बघ आता या विषयावर बोलायलाच हवं का? आमच्यात काही नाहीये हे तुला सांगायची मला गरज वाटत नाही. उगाच कशाला तिकडे जायचं परत?", तिने वैतागून विचारलं. 

"तसं नाही ग. माझं म्हणणंय की त्याला वाटत असेल तुही त्याची मैत्रीण आहेस तर या अशा चुका कुणाला सांगणार नाहीस. नाहीतर त्याने तुला हे असं एकटं सोडलंच नसतं. तुला सांगतोय तू आपलं रिपोर्ट करून टाक. उद्या काही बाहेर आलं तर त्याला मदत केली म्हणून तुही आत जाशील." हे मात्र त्याचं म्हणणं बरोबर होतं. 

आपण आताही विचार करतच आहे की त्याला रिपोर्ट कसं करणार याचा? उद्या त्याला साथ दिली म्हणून मलाही बाहेर काढतीलच की. झोपायला गेलं तरी विचार कमी होत नव्हते. ती तशीच बेडवर पडून राहिली. कधीतरी तिची झोप लागून गेली. 
----------------------------------------

सकाळी ती लवकर आवरून निघाली. गेल्या गेल्याच तिने मनोजला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावून घेतलं. त्याच्यासमोर तिने सर्व हिशोब मांडला आणि जाबही विचारला. 

"असं कसं करू शकतोस मनोज तू? तुला माहित आहे कंपनी पॉलिसी. जेल होईल तुला क्लाएंटला असं खोटं बिल केल्याबद्दल. तुझ्याकडून अशी अजिबात अपेक्षा नव्हती. एखादी चूक समजू शकतो पण हा तर घोटाळा आहे मोठा.", आरती. 

मनोजला काय बोलायचं कळत नव्हतं. चोरी पकडली गेली होती. ती त्याच्याकडे आली म्हणजे अजून बॉसकडे गेली नाहीये इतकं नक्की होतं. 

"आरती सॉरी चूक झाली."

"चूक?सॉरी? हे या सगळ्याच्या पलीकडे आहे. चूक म्हणजे एखादी एंट्री तू विसरून गेलास तर. पण हे तरी फसवणूक आहे क्लाएंटची. उद्या त्यांना आणि बाकी क्लाएंटला कळलं तर कंपनी बुडीत जाईल. मला तर कळत नाहीये काय करायचं?"

"म्हणजे? हे बघ मी तुला माझा शब्द देतो यापुढे नाही असं होणार. हा क्वार्टर माफ कर प्लिज."

"हा क्वार्टर म्हणजे? या आधी केलं असशील तर? आज केलं म्हणजे कालही केलं असणारच ना? तू हे सॉरी कशाला म्हणतोयस? तुला माहित आहे तुला रिपोर्ट केलं नाही तर माझी नोकरीही जाऊ शकते."

"हो मान्य आहे मला. मी कुठे म्हणतोय उद्या हे असं होईल. प्लिज यावेळी सोडून दे, पुढच्या वेळी असं होणार नाही, मी शब्द देतो तुला."

"हे बघ मी आता काहीच सांगू शकत नाहीये. तू सुटलास असं तर अजिबात समजू नकोस. मला मिटिंग आहेत आता, दुपारी बोलते." असं म्हणून आरती पुन्हा डेस्कवर गेली. 
दुपारी जेवायच्या वेळी मनोज स्वतःच तिला घेऊन कॅंटीनमध्ये गेला. कितीतरी वेळ ती गप्पच होती. शेवटी तिने न राहवून विचारलं,"का असं केलंस? काय गरज काय होती?"

"आता तू गरज म्हणतेस पण त्या क्षणाला फ्रस्टेटेड होतो. वेगवेगळ्या नव्या क्लाएंटशी बोलूनही नवीन बिझनेस येत नव्हता. आता नवीन नाही आला तर निदान जुन्या क्लाएंटचं बिलिंग तरी तेव्हढं राहायला पाहिजे ना? तेही कमीच होत आहे. म्हटलं असतो एखादा  क्वार्टर. पुढच्या क्वार्टरला करू काहीतरी. आता हे क्वार्टर प्रमोशन्स पण आहेत. सगळंच एकदम आलंय. पुढच्या क्वार्टरमध्ये करतो ना काहीतरी. नाही मिळालं काही तर नाही दाखवणार. मला वाटलं नव्हतं इतकं वाढेल प्रकरण. आता मला काही तुला अडकवायचं नव्हतं. बॉसने तुला करायला दिलं रिव्ह्यू तर मी काय करू? तुला योग्य वाटेल ते कर. पण उगाच तुला त्रास नको माझ्यामुळे. " त्याचं बोलणं ऐकून ती जरा शांत झाली. 

"जाऊ दे अमु काय म्हणतेय? कशी आहे?" त्याने विषय  बदलला. 

"ठीक आहे. काल रात्री उशीर झाला तर झोपून गेली होती." तिने सांगितलं. 

"हां जरा जास्तच उशीर झाला माझ्यामुळे. सॉरी. ",मनोज. 

"इट्स ओके. अमितने केलं होतं सर्व. ती झोपली होती. जेवणही त्यानेच वाढलं काल मलाही.", तिने अमितचं कौतुक केलं तसा त्याचा चेहरा थोडा मावळला. 

"चांगलं आहे तुला मदत आहे घरी. मला काही जमत नाही बाबा यातलं." त्याने प्रकरण स्वतःवर ओढवून घेतलं. 

थोडा विचार करून त्याने पुढे तिला विचारलं,"आरती मला एक सांग, काल माझ्या प्रोजेक्टबद्दल काही बोललीस का त्याला तू?"

"हो आधी सांगितलं नव्हतं. पण त्याला माहित होतं तुझा रिव्ह्यू करतेय ते. मी बराच वेळ बसले तेव्हा काय झालं म्हणून विचारलं. त्यामुळे सांगितलं." आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण आपण त्याला का देतोय हे तिला कळत नव्हतं आणि चोरी तिने थोडीच केली होती?

"कशाला सांगितलंस उगाच? तू पण ना?", त्याने विचारलं. 

"अरे पण त्याला सांगणारच ना? रात्री १-२ वाजेपर्यंत बसून काम करत होते तेही टेन्शनमध्ये." ती बोलली. 

"तसं नाही. तुला सांगू का? मला वाटतं तो अजूनही माझ्याकडे शंकेनेच बघतो.", मनोज बोलला. 

"कसली शंका?", ती. 

"कसली म्हणजे? हेच की आपलं अफेअर आहे की काय अशी?",त्याने अडखळत सांगितलं. 
"अरे असं काही नाहीये. उगाच फालतू शंका आणू नकोस." ती बोलली. 

"हे बघ मला माहितेय तो माझ्याकडे कसा पाहतो ते. त्यात तू रात्री माझ्यासोबत इतका उशीर थांब्लीस. "

"हे बघ उगाच फालतू शंका मनात आणू नकोस. मनाने खूप चांगला आहे तो. त्याच्यामुळेच मी आज इतक्या पुढे जाऊ शकलेय." 

"ते असेल गं. पण एका पुरुषाचा स्वभाव तू बदलू शकत नाहीस. निदान या बाबतीत तरी. जाऊ दे तुला नाही कळणार. पण एक सांगू. आपल्या दोघांचं नातं अमित किंवा रुचापेक्षा कितीतरी जुनं आहे. त्यामुळे तो किंवा ती काय म्हणते याने आपल्या नात्यात फरक पडू देत नाही. तूही तो पडू देऊ नकोस. किती वर्ष झाली आपण ओळखतोय एकमेकांना?"

तिने पुन्हा गणित केलं. 

"किती बावळट होतो ना आपण जॉईन झालो तेंव्हा?"तिला आठवून हसू आलं. 

"आता ही नवीन पोरं नोकरीला लागली की मला आपलीच आठवण होते. किती सुखाचे दिवस होते ते...." आरती पुन्हा एकदा भूतकाळात रमली होती. 
फोनवरच्या रिमांईंडरने तिची तंद्री भंगली. 

"चल जाते मी मिटिंग आहे बॉसबरोबर", तिने घाईने जेवण उरकलं आणि मीटिंगला गेली. 
मनोजशी बोलताना पुन्हा एकदा तिला हलकं वाटू लागलं होतं. अर्थात काय करायचं हा प्रश्न अजूनही होताच. 
----------------------------------

बॉससोबत बाकी चर्चा झाल्या पण हा विषय कसा काढायचा तिला कळत नव्हतं. 
शेवटी तिने विचारलं, "सर ते रिव्ह्यू चं काम कधी करू कळत नाहीये. बराच बॅकलॉग राहिलाय माझाच. यावेळी दुसऱ्या कुणाला जमणार नाही का?"

"ओह मला वाटलं तुला असेल वेळ. सॉरी. उलट मागच्या वेळी भेटलो तर मनोजच म्हणाला, बाकी सर्व बिझी आहेत आरतीला आहे थोडा वेळ म्हणून........" 

कितीतरी वेळ मनात अडकलेल्या तिच्या प्रश्नाचं उत्तर बॉसने दिलं होतं. संध्याकाळी ती पुन्हा बॉसकडे जाऊन आली होती, रिपोर्ट करायला. 

मनोजशी ती एकच वाक्य बोलली होती,"तू मला गृहीत धरायला नको होतंस". 

समाप्त. 

विद्या भुतकर. 

by Vidya Bhutkar (noreply@blogger.com) at June 23, 2017 03:42 AM

Global Vegan

Making Almond Milk and Cashew Milk at Home

These days people try to avoid cow's milk . In India, cow's milk contain harmful chemicals and detergents...

You can make almond milk, cashew milk, and rice milk at home. I often make almond milk or cashew milk to make delicious carrot halwa, semia kheer , payasam, and burfis (fudge).

Please visit these websites to know more about delicious milk - cashew milk, almond milk and coconut milk ...

1. http://cookieandkate.com/2013/cashew-milk-recipe/

2. http://www.bonappetit.com/test-kitchen/common-mistakes/article/common-mistakes-nut-milk

3. http://indianhealthyrecipes.com/how-to-make-almond-milk-at-home/

4.  https://sharan-india.org/recipes/rice-milk/


by Kumudha (noreply@blogger.com) at June 23, 2017 12:00 AM

June 22, 2017

कृष्ण उवाच

माळरानातली शांती

शांततेचं दान.

“तुम्हाला सांगायला लाज वाटते परंतु,न सांगून माझ्या पुढच्या विचाराना बळकटी येणार नाही.गेल्या तीन महिन्यात माझा दोनदा गर्भपात झाला. मी अगदी हैराण झाले होते.” इति सुलभा.

मी अपना-बाजार मधे आंबे घेण्यासाठी गेलो होतो.माझ्या अगोदर सुलभा ,माझी शेजारीण,आंब्याची एक पेटी खरीदताना मी पाहिलं.तिनेही मला पाहिलं.

“अगं,तू केव्हा आलीस.?कोकणात गेली होतीस ना? तरी पाचसहा महिने तरी तू दिसली नाहीस.” मी सुलभाला विचारलं.

मला सुलभा म्हणाली,
“असं उभ्या,उभ्या मला तुम्हाला सर्व सांगता येणार नाही.जमेल तेव्हा घरी या.मी तुम्हाला सर्व काही सांगते.पण हो,ही आंब्याची पेटी संपण्यापूर्वी या.”

मी सुलभाच्या घरी गेलो तेव्हा पिकलेल्या आंब्यांचा वास येत होता.पिकलेल्या आंब्यांचा सुगंध कुणी लपवू शकत नाही.
मी सुलभाला म्हणालो,
“आंबे अजून संपलेले दिसत नाहीत.”

हसत हसत मला सुलभा म्हणाली,
“मला अजून तुमची ती कविता आठवते”.

“लपविलास तू हापूस आंबा
सुगंध त्याचा छपेल का
बाठा चोखून खपेल का?

जवळ फळे पण दूर ते सूरे
दात शीवशीवे जीभ सरसरे
लपविलेस तू जाणूनी सारे
रंग फळाचा छपेल का?

क्षणात बघणे,क्षणात लाजणे
मनात हवे पण,दिखावा नसणे
ही खाण्याची खास लक्षणे
नाही म्हणाया जमेल का?

पुरे बहाणे,आतूर होणे
मित्रा,तुझिया मनी खाणे
मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?

माझी ही कविता सुलभाने घळघळ मला वाचून दाखवली.तिने एक वही काढली आणि त्यात ही कविता लिहिलेली होती.मलाही त्याचा अचंबा वाटला.

मी सुलभाला म्हणालो,
“आणखी काय म्हणतेस.कोकणात दिवस कसे गेले ? मुळात तू अचानक कोकणात कशासाठी गेलीस? आणि एवढा लांब मुक्काम का केलास?”

“सांगते,सांगते सर्व सांगते पण त्यापुर्वी मला तुम्हाला प्रस्तावना द्यावी लागेल.
त्याचं असं झालं,अलीकडे मला ह्या शहरातल्या अशांततेचा फार कंटाळा आला होता.
शांत वातावरणाची ताकद मला विशेष भावते.सकाळी उठल्यावर आपल्याबरोबर आपलं सभोवतालचं जगही जेव्हा उठतं तेव्हा आजुबाजूला पाहिल्यावर असं दिसतं की हे सगळं जग गडबड गोंधळाच्या जाळ्यात अडकून बसलं आहे.सगळीकडे कानठळ्या बसण्या इतक्या गाण्याच्या गर्जना,गाड्यांचे अवास्तव वाजणारे भोंगे,विक्रीत्याकडून वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्यांच्या शिर्षकांचे मोठ्यांदा ओरडून सांगीतले जाणारे मथळे,एक ना दोन.

असा सगळा आवाजाचा गोंधळ आजुबाजूला असताना,आपण स्वतःलाच स्वतःपासून दडवून ठेवतो.आपल्या अंगात असलेले पैलू,आपल्या कमतरता,आपल्याला वाटणार्‍या भीतीचे गुढ,आपल्या मनात येणारा डळमळीत दिखावा ह्या सर्व गोष्टी दबल्या जातात.

अलीकडे तर मला शांततेची आवश्यकता एव्हडी जरूरीची वाटायला लागली की मी तिच्यासाठी भारावून गेले होते.आणि त्याचं कारणही तसंच होतं.तुम्हाला सांगायला लाज वाटते परंतु,न सांगून माझ्या पुढच्या विचाराना बळकटी येणार नाही.गेल्या तीन महिन्यात माझा दोनदा गर्भपात झाला. मी अगदी हैराण झाले.
शेवटी थोडे दिवस कोकणात माहेरी जाऊन रहाण्याचा माझा विचार पक्का ठरला.
कोकणात,माझ्या माहेरी इतकं शांत वातावरण आहे की,विचारूं नका.माळावर आमचं एक खोपट आहे. आणि खरच तिकडच्या वातावरणात,मला माझ्या वैषम्याचं प्रयोजन काय असावं ते नक्कीच कळून चुकलं.

फार पूर्वी मला शांततेच्या प्राधान्याची एव्हडी जरूरी भासली नव्हती.रेडियोवरची गाणी मोठमोठ्याने ऐकण्याची मला सवय होती.रेडियोचा व्हाल्युम वाढला नसला तर मी माझ्या ओळखिच्याकडून त्यात दुरूस्थी करून घ्यायची.पण एक मात्र खरं की,मला एकटं रहायला आवडायचं.विशेष करून मी काहीतरी लिहित असेन तेव्हा एकटेपणाची जरूरी भासायची.पण अलीकडे मात्र एखादा खाणकरी, सोन्याच्या खाणीत सोनं हुडकत असतो अगदी तसंच मला शांतता हुडकावी असं वाटायला लागलं होतं.

शांती माझं बहुमुल्य रत्न झालं होतं.आणि बरेच वेळा ही शांती हा एक आवाक्याबाहेरचा जिन्नस वाटायला लागला होता.दुसर्‍या अर्थाने सांगायचं झाल्यास,ही शांती जणू माझ्या जबाबदार्‍यांचा डोंगराखाली दबून पिचून गेल्यासारखी झाली होती.त्याच्या भाराखाली हलायलाही मागत नव्हती.

एक वेळ अशी आली की माझं मलाच समजेनासारखं झालं.
माझ्या मुलांना माझी जरूरी होती.माझ्या विद्यार्थ्याना नवीन शिकायची जरूरी होती.माझ्या नवर्‍याला माझ्या सहवासाची जरूरी होती.फोनची घंटा वाजायची,दारावरची बेल वाजायची,कुणाला तरी माझ्याशी बोलण्याची आवश्यक्यता वाटू लागली.लोक मला जरासुद्धा मोकळीक द्यायला तयार नव्हते.
ती मोकळीक मिळवण्यामागे मी लागले.अगदी जेवणाच्या पंगतीतून उठून,कपड्याच्या घड्या करण्याच्या कामातून दूर जाऊन मी एकांत पाहू लागली.
बाल्कनीत असलेल्या झोपाळ्यावर जाऊन मी एकटीच बसायचे.अशावेळी शांत वातावरण मिळायचं पण त्यात नाद नसायचा.

सुरवातीला घरातल्यांची कुरबुर चालू व्हायची.
“एकत्र बसून ती जेवत का नाही.?”
“ह्यावेळी झोपाळ्यावर जाऊन बसण्याऐवजी ती उरलेलं जेवण उरकून का टाकत नाही?”

अशावेळी आमचा कोकणातला झोपाळा मला आठ्वयाचा.
कोकणातल्या आमच्या पडवीत टांगलेल्या झोपळ्यावर बसल्यावर,बाहेरच्या मोगर्‍याच्या वेलीवर किंवा पारिजातकाच्या झाडावर जमलेले पक्षी खूप किलबील करताना बरं वाटायचं,पावसाचा अनमान करून बेडूक डरांव डरांव करताना आवाज यायचा,आणि वार्‍याच्या झोतीबरोबर पिंपळाच्या झाडाची पानं सळसळायची. त्यावेळी खरंच वाटायचं की,शांती आणि नादाची जवळीक असायला हवी.किंबहुना नादा-विना शांती खरी नाही. विशुद्धतेमधे नादाचं मिश्रण झालेलं वातावरण माझ्या भोवती एक प्रकारची नैसर्गिक सामसुम निर्माण करायचं. एक प्रकारची स्थिरता माझ्या अंतरात निर्माण व्हायची.काय कळायचं नाही.पण एक प्रकारचं संतुलन निर्माण व्हायचं.माझ्या लहानपणीची स्वप्न किंवा काही उद्देश असतील त्याबद्दलचे विचारही संपुष्टात आल्या सारखं वाटायचं.आणि माझ्या ह्र्दयाला घेरून ठेवणार्‍या दुःखालाही मी सुरुंग दिल्या सारखं वाटायचं.कधी कधी तर मला असं वाटायचं की ह्या विश्वानेच मला उलटं-पुलटं केलंय आणि ते मला खदखदून हलवत आहे की,जेणे करून खाली काही पडणार आहे ते मी पहावं.

एका रात्री तर गंम्मत झाली.आमच्या घरामागच्या माळरानात मी फेरफटका मारावा म्हणून गेले.आमच्या माळरानात अनेक प्रकारची झाडं आहेत.फणसाची,गावठी आंब्याची,जांभळाची अशी अनेक उंचच उंच झाडं. करवंदाची झुडपं,काजुची खुर्टी झाडं.शिवाय पूर्वजांच्या काळापासून मोठी झालेली वडाची आणि पिंपळाची मोठमोठ्ठाली झाडं आहेत.वडाच्या पारंब्या झाडाच्या चारही बाजूनी लोंबत असतात.एखादी वार्‍याची झुळूक आली तर पिंपळाची पानं जोरजोराने सळसळत असतात. बरेचवेळा आमच्या माळरानात बरेच लोक वावरत असतात त्यामुळे आजुबाजूला जाग असते. पण कधी कधी अगदी सन्नाटा म्हणतात तसं असतं.अशावेळी स्मशान-शांतता असते असं वर्णन केल्यास काही चुकीचं होणार नाही.

माझा माळरानांतला हा फेरफटका अशाच सन्नाटाच्यावेळी झाला असावा.मला अजून आठवतं, माझ्याच ह्रुदयाचे ठोके मला ऐकू येऊ लागले.माझ्या नाडीचे ठोके मला माझ्या कानात ऐकू येऊ लागले.मला जीवनातली अदभुतता ध्यानात येऊ लागली.प्रत्येकाचा जीवनातली,अगदी, माझ्या स्वतःच्या जीवनातलीपण.माझं स्वतःच जीवन संपुष्टात येणार की काय हे त्यावेळी महत्वाचं नव्हतं.कारण माझ्या मनातल्या कल्पना,माझी स्वप्नं,माझ्या निवडी ह्या सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणाखाली होत्या.”

“मग तू परत शहरात तुझ्या सासरी केव्हा यायचं ठरवलंस?”
कुतूहल म्हणून सुलभाला मी विचारलं.

“जेव्हा माझ्या लक्षात आलं की,मला मिळालेली ही शांतता,जगातल्या कोलाहलापासून मला सुरक्षीत ठेवायला समर्थ झाली आहे,तेव्हाच मी माझ्या सासरी यायचं ठरवलं.आणि आता इकडे आल्यापासून माझ्या मुलांना वाटणारी माझी जरूरी,माझ्या विद्यार्थ्याना नवीन शिकायची जरूरी,माझ्या नवर्‍याला माझ्या सहवासाची जरूरी,फोनची घंटा वाजाली तरी,दारावरची बेल वाजली तरी,कुणाला तरी माझ्याशी बोलण्याची आवश्यक्यता वाटू लागली तरी आता मला हवीतशी मोकळीक मिळत आहे असं भासू लागलं. शांतीचा खजिनाच माझ्याजवळ आहे असं मला भासू लागलं.माझी सोन्याची खाण मला मिळत आहे, त्यासाठी मी दोन हात पसरून तिचं स्वागत करीत आहे,मला हव्या असलेल्या शांतीचं दान मला मिळत आहे,असं मला वाटू लागलं.”

“तू अपनाबाजारात येऊन आंबे खरेदिला आलीस,ते लक्षात येऊन आता मला कळलं की,तुला झालेले शारिरीक त्रास,तू सहज पेलण्यास समर्थ होतीस पण मानसीक त्रास मात्र तुला कोकणात जाऊनच दूर करता आले.निसर्गाशी सानिध्य ठेऊन,पक्षा-प्राण्यांचे उद्भवणारे नैसर्गीक नाद हे तुला शहरातल्या गोंगाटापेक्षा कितीतरी आल्हादायक वाटले. ह्यातच गोंगाट आणि शांततेमधला नाद ह्या मधला फरक निक्षून लक्षात येतो.निसर्गाने दिलेलं शांततेचं दान हे खर्‍या अर्थाने परिपुर्ण आहे यात शंकाच नाही.”
मी सुलभाला माझा विचार सांगीतला.

दोन हापूसचे आंबे कापून माझ्या समोर ठेवताना सुलभा पुटपूटली,

“मित्रहि जाणे,मी पण जाणे
आंबा छपविणे सुचेल का?”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होजे कॅलिफोरनीया)


by shrikrishnasamant at June 22, 2017 06:29 PM

इतिहासातील सत्याच्या मागावर…

गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज..

अपरिचित इतिहास भाग १४ : गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन अनेक विशेषणांनी केले जाते, त्यातीलच एक म्हणजे “गोब्राह्मणप्रतिपालक”. शिवाजी महाराजांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक म्हणून अनेक समकालीन उत्तरकालीन साधनांमध्ये आला आहे. आज आपण या video मधून हे उल्लेख ससंदर्भ पाहणार आहोत. हा video पाहण्यासाठी खालील लिंक वर click करा. https://youtu.be/BJED7qEnnnA आमचा channel subscribe करण्यासाठी खालील […]

by उमेश जोशी at June 22, 2017 02:44 PM

मला काय वाटते !

मडगांव


या आठवड्यात मडगांवला गेलो होतो. जुने टुमदार कौलारू बंगले. पोर्तुगीजांच्या काळातल्या सरकारी इमारती.  सर्वत्र नारळाची झाडे, गर्द झाडी, रिक्षामुक्त रस्ते वगैरे पाहून थक्क झालो. किती बघू किती नको असे झाले होते. पण पावसामूळे फार काही हिंडता आले नाही.


तेथली परिस्थिती म्हणे अशी कि प्रत्येकाकडे छोटा जमिनीचा तुकडा असतोच असतो. त्यातून काही कमाई होते. पगार म्हणजे वरकमाई. नोकरवर्गात महिलांचे प्रमाण अधिक. पुरुषवर्ग निवांत व व्यसनी. अजून इतर शहरांत रात्रीच्या वेळी दिसणारी लगबग येथे दिसत नाही. हा प्रदेश अजूनही निवांत आहे. नोकरी शोधायला बाहेरचे लोक येथे यायला लागले आहेत. विशेषत: निम्न दर्जाची कामे स्थानिक रहिवासी करत नाहीत. सगळे जमिनदार आहेत नां? किरिस्ताव लोक तर आपण अजून पोर्तुगालहून आलेले राज्यकर्ते आहोत अशाच आविर्भावात. एकूण आदरातिथ्यात गोवा कमीच पडतो असे माझे मत झाले हे खरेच. नुसत्या अद्भुत निसर्गसौंदर्याच्या आधारे किती दिवस काढणार असा प्रश्न मनात आल्याखेरीज राह्यला नाही.

ब्लॉग सुरू करून दहा वर्षे झालीदुसऱ्यांचे ब्लॉग मी क्वचितच वाचतो मग दुसऱ्यांनी माझा ब्लॉग वाचावा ही अपेक्षा कां बरं ठेवावीतर दहाव्या वाढदिवसाला ब्लॉगची संख्या वाढावी ही उम्मीद बाळगुन आता लिहायला बसलो.

आपण कसे बरोबर आहोत याची काळजी प्रत्येक व्यक्तीला असतेच असतेप्रत्येक क्रियेमागे चांगली प्रतिक्रिया मिळावी अशी इच्छामग ब्लॉग लिहिताना काळजी घ्यावी लागतेचपण गेले वर्षभर एकही प्रतिक्रिया मिळाली नाही याला कांय म्हणावेअसो.

by बहिर्जी नाईक (noreply@blogger.com) at June 22, 2017 11:02 AM

माझिया मना जरा सांग ना

मनाचे खेळ - भाग १

कॉन्फरन्स रूममधून जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता. आरती आणि मनोज सध्या तिच्या टीमसाठी काही जणांचे इंटरव्यू घेत होते.

ती बोलत होती,"'अरे मॅगी करता येतं का?' हा काय प्रश्न आहे का कॅन्डीडेटला विचारायचा?".

"अगं पण तो बघ की? म्हणे माझा व्हिसा आहे तर ऑनसाईट कधी जायला मिळेल? इथे नोकरीचा पत्ता नाही अजून आणि डायरेकट ऑनसाईट? मग म्हटलं विचारावं तिथे जाऊन जेवण बनवता येईल की नाही ते. बरोबर ना? निदान सर्व्हायव्हल स्किल्स तरी पाहिजेत का नको?", मनोज. 

"बिचारा किती विचार करत होता काय सांगायचं म्हणून. मग एनीवे हा पण नको का?", आरतीने विचारलं. 

"हो कटाप. बघू पुढचं कोण आहे?", मनोजचा निर्णय झाला होता. 

"नेहा नाव आहे. ७-८ वर्षाच्या अनुभव आहे असं लिहिलंय.",आरती. 

"वा चला. नेहा म्हणजे कशी एकदम सिन्सियर वाटते.", मनोज नाव ऐकून खुश झाला होता. 

"हो का? मुली म्हटलं की म्हणणारच तू. त्या पोराला इतका पिडलास. आता या मुलीला न विचारताच घेशील. बरोबर ना?", तिने विचारलं. 

"हे बघ आरती, तुला खरं सांगतो. तुम्ही सगळ्या मुली ना खरंच सिन्सियर असता कामामध्ये. आता तूच बघ ना? किती सिरियसली काम करतेस? म्हणजे निदान माझ्यापेक्षा तरी जास्तच.", मनोजने हे मात्र याच्या आधीही तिला अनेकदा सांगितलं होतं. आणि खरंच त्याच्या प्रोजेक्टमध्ये बाकीच्या तुलनेत मुली जास्त होत्याही. 

"काय करणार? करावं लागतं बाबा. आम्हाला रात्री बॉस बरोबर पार्ट्याना जाणं जमत नाही ना? मग त्याची भरपाई अशी करावी लागते.", तिची दुखरी नस होती ती. 

"हे बघ आता तू टोमणे मारू नकोस हां.",मनोज बोलला. 

"टोमणा काय? खरंच आहे की नाही? मीच नाही, मॅनेजमेंट मध्ये यायचं म्हटलं की आम्हाला जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतात.",ती. 

"ह्म्म्म मी काय करू सांग मग? उलट मी तर तयार असतो मुलींना प्रोजेक्ट मध्ये घ्यायला. एकदम व्यवस्थित काम करतात. उलट ती पोरं माझ्यासारखी कामचुकार असतात.", त्याने हार मानली. 

"जाऊ दे. चल नेहा बघू कशी आहे ते." म्हणत आरतीने तिला फोन लावला.

इंटरव्यू संपले. दोन चार कँडिडेट निवडून त्यांनी आजचं काम उरकलं होतं. ते बाहेर पडताना पाहून आजूबाजूच्या दोन-चार लोकांनी खुसपूस केली होतीच.

     आरती आणि मनोज याच कंपनीत गेले १७-१८ वर्षे काम करत होते. दोघे एकाच वेळी कंपनीत  नोकरीला लागले होते. इतक्या वर्षात दोघेही वेगवेगळ्या नात्यातून, अनुभवातून आणि भावनिक गुंतवणुकीतून गेले होते. सुरुवातीला मैत्री, मग प्रेम, ब्रेक-अप, राग, द्वेष आणि दोघांची लग्नं (आपापल्या पार्टनरशी) अशा अनेक तुकड्यातून ते फिरून आले होते. आता आयुष्याच्या या टप्प्यावर झालं ते सर्व मागे टाकून जवळचे मित्र आणि ऑफिसमध्ये सिनियर म्हणून वागू शकत होते. अर्थात या सगळ्याचा इतिहास लोकांना सांगायची, स्पष्टीकरण द्यायची गरजही त्यांना वाटत नव्हती. नोकरीत ठराविक एका पदावर पोचल्यावर त्यांना एकटेपण जाणवत होतं. त्यात एकमेकांची सोबत कामी येत होती. अगदी दुपारी जेवायलाही दोघेच सोबत असत.
       त्यादिवशी दुपारीही दोघे जेवायला बसले अन त्यांचं बोलणं सुरु झालं.

"काय गं डबा कुठे आहे? " त्याने विचारलं.

"रात्री खूप वेळ गेला कामात मग बाहेरच जेवलो आम्ही. त्यामुळे आजचा सकाळचा डबाही नाहीच. तुझं बरंय रे. बायको अगदी चार कप्प्यांचा डबा भरून देते."

"ह्म्म्म म्हणूनच हे पोट असं सुटलंय."

"पण काय रे? जरा मदत करत जा की बायकोला? किती वर्ष असा लहान पोरासारखा सांभाळणार बायको तुला?"

"हे बघ आता उगाच परत तेच लेक्चर नको देऊस. माहितेय तुझा नवरा खूप मदत करतो ते."

"हो, करतो बिचारा. म्हणून तर आज इतकं सगळं करू शकतेय. नाहीतर बसले असते घरी....."
त्याने वर बघून वाक्य पूर्ण केलं,"माझ्या बायकोसारखी. बरोबर ना?"

"हे बघ आता उगाच तू माझ्या बोलण्याचा अर्थ काढत बसू नकोस. पण तुलाही माहितेय की एकट्याच्या जीवावर सर्व जमत नाही. दोघांनी केलं तरच होतं करियर, निदान बायकांचं तरी. जाऊ दे ना. तू जेव. बघ उलट नशीब समज मी तुला नाही म्हटलं. नाहीतर आयुष्यभर ऐकावं लागलं असतं माझं आणि हे कँटीनचं जेवण. "
त्यावर मनोज कसंबसं हसला. कितीतरी वेळा बोलणं या मुद्द्यावर येऊन बंद पडायचं. 

पुढचे पाच मिनिट शांतता होती. एकदम आठवून मनोज म्हणाला,"ते राजीवने क्वार्टरली रिपोर्ट रिव्ह्यू करायला सांगितले आहेत. संध्याकाळी बसशील का जरा वेळ?"

"हां माझे त्यांनी त्या रेड्डीला दिले आहेत. तो अजून चुका काढत बसेल. बरंय तुझं, तू सुटतोस नेहमीच."

"म्हणजे? मी काय चुका करतो का? तुला सांभाळाव्या लागतात ते?"

"तसं नाही, पण फरक पडतो ना? नाहीतर एक काम कर तू माझा तपास, तुझा रेड्डीला दे." आरतीने आयडिया दिली. 

"नको बाबा तो रेड्डी. नुसते व्याप लावतो मागे. माणसानं किती चिकट असावं? जरा स्पेलिंग चुकलं तरी बदल म्हणतो. आकडेवारी चार पैशानी चुकली तर फाशीच चढवेल तो.", मनोजला रेड्डी नको होता. 

संध्याकाळी दोघेही मग कामं उरकून रिपोर्ट बघायला बसले. अगदी कॅल्क्युलेटर घेऊन गहन चर्चा सुरु झाली. नेहमीप्रमाणे लोकांनी 'यांचं चालू दे' म्हणून निरोप घेतलाच. मनोज बराच वेळ तिला समजावत होता काय प्रोजेक्ट होते, किती लोक, त्यांचे कामाचे तास, इ सर्व.  पण काहीतरी गडबड वाटत होती. तो कितीही समजावून सांगत असला तरी ताळमेळ लागत नव्हता. 

"अरे तो नवीन आलेला मुलगा, रवी, तो सुट्टीवर होता ना दोन महिने? आणि ती प्रेग्नन्ट बाई पण? काय यांची नावं मला आठवत नाहीयेत पटकन. पण त्यांच्या सुट्ट्या दिसत नाहीयेत यात?" आरतीने विचारलं. 

मनोजने अशीच टोलवाटोलवीची उत्तरं दिली. तिने मग नाद सोडून दिला. 

ती म्हणाली,"एक काम करूया का? मी घरी जाऊन बघू का? उशीर पण झालाय."

"नंतर कशाला? आताच बघ ना? जाऊ उरकून. मला पण उद्या सकाळी मेल करावा लागेल. तू आताच अप्रूव्ह करून टाक ना?", मनोजला जरा जास्तच घाई होती. पण जास्त बोललो तर आरती अजूनच चिडेल हे त्याला माहित होतं. तिच्या कामात कणभरही चूक चालायची नाही तिला. 

तिने सर्व फाईल्स मेल करून घेतल्या आणि त्याला 'बाय' म्हणून ती घरी निघाली होती. कितीतरी वेळ गाडी चालवण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. मनोजच्या रिपोर्टमध्ये तिला काहीतरी मोठ्ठा घोळ दिसत होता. आता हे कसं, कुणाला सांगायचं ते तिला कळत नव्हतं. 

क्रमश: 

विद्या भुतकर. 


by Vidya Bhutkar (noreply@blogger.com) at June 22, 2017 04:32 AM

TransLiteral - Recently Updated Pages

मालतीमाधवम् - दशमोऽङ्कः ।

एतद् भवभूतिना लिखितं कल्पनारम्यनाटकं वर्तते।

June 22, 2017 02:15 AM

मालतीमाधवम् - नवमोऽङ्कः ।

एतद् भवभूतिना लिखितं कल्पनारम्यनाटकं वर्तते।

June 22, 2017 02:14 AM

मालतीमाधवम् - अष्टमोऽङ्कः ।

एतद् भवभूतिना लिखितं कल्पनारम्यनाटकं वर्तते।

June 22, 2017 02:14 AM

मालतीमाधवम् - सप्तमोऽङ्कः ।

एतद् भवभूतिना लिखितं कल्पनारम्यनाटकं वर्तते।

June 22, 2017 02:13 AM

June 21, 2017

Global Vegan

Vegan Teenagers

Kids are smart. Today, thousands of teenagers in United States, Canada, England, Denmark, Ireland and many other countries are going VEGAN to protect our beautiful Earth. Kids are also going vegan after seeing the horrific condition of  chickens, goats, cows and pigs in animal industry.

Teen Vegan Network is a social network where teenagers can discuss everything from vegan lifestyle to global warming and nutritious vegan dishes to animal rights. Teen Vegan Network also conducts summer camps.

Here are some interesting links - Teen Vegan Network, reasons teenagers are going vegan  and delicious recipes...

http://www.independent.co.uk/life-style/food-and-drink/teen-vegan-network-no-meat-dairy-products-before-20-social-media-network-summer-camp-vegetarians-a7639916.html

https://www.plantbasednews.org/post/the-top-3-reasons-teens-are-going-vegan

https://www.youtube.com/channel/UCRF4CvSqif8X4EW1Zquiw7w

 https://www.theguardian.com/lifeandstyle/2016/may/27/the-rise-of-vegan-teenagers-more-people-are-into-it-because-of-instagram


by Kumudha (noreply@blogger.com) at June 21, 2017 09:21 PM

इतिहासातील सत्याच्या मागावर…

गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…!!!

शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ या बिरुदावरून कायमच वाद उत्पन्न झालेले दिसतात. अर्थात, हे वाद एकतर जातीयवादी नाहीतर राजकारणी केवळ त्यांच्या फायद्यासाठी उकरून काढत असतात हे उघड आहे. पण यामुळे, सर्वसामान्य माणसाला, ज्याला इतिहासात नेमकं काय दडलंय हे माहित नसतं तो अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणखी संभ्रमित होतो. याकरताच, शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालना’चे समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे काय आहेत […]

by उमेश जोशी at June 21, 2017 03:57 PM

बाष्कळ बडबड

दुपार‌च्या बोर मिटींग‌म‌ध‌ले बोर‌ पोस्ट

गृहशोभिकासारखे एखादे व्यवसायशोभक किंवा व्यवसायशोभेश असे मासिक असते तर मी त्यात खालील सदर चालवले असते.

भूभूचा सल्ला - आपले रेटींग हाय्येस्ट ठेवून काम मात्र कमी करण्यासाठी काही टिप्स. (बर्‍याच अनप्रोफेशनल आहेत)

१. ईमेल - 
१.१ आपल्या साहेबांपासून वरच्या चेनमधील प्रत्येकाच्या अतिफालतू मेलला सुद्धा तात्काळ उत्तर द्यावे. लगेच उत्तर तयार नसले तरी, हं, बघतो मी काय करता येईल ते, मार्ग काढू आपण काहीतरी असे उत्तर द्यावे. पुढचं पुढं. 
१.२ आपल्या पिअर लेव्हलच्या लोकांच्या मेलला एक रिमांयडर आल्याशिवाय उत्तर देवूच नये - अगदीच रिमांयडर आले तर उत्तर लिहिताना, शंभरदा सॉरी म्हणावे आणि मग उत्तर द्यावे, इतके आर्जव आणि करुण भाव पाहीजे की रिमांयडर पाठवणार्‍याला अपराधी वाटावे.
१.३ आपल्या खालच्या लोकांच्या मेलला आयुष्यात कधी उत्तर देवू नये. (अपवाद सुट्टी मंजूर करणे, आणि अगदीच ज्याच्याशिवाय एखाद्याचे पूर्ण काम अडेल असे मेल )
१.२ आणि १.३ चा फायदा असा की, त्यातल्या निम्म्या मेलचे रिमांयडर येत नाही. लगेच उत्तर आले नाही म्हणजे लोकांना वाटते याला माहित नसेल, हा बिझी असेल. कधीकधी लोक मेल पाठवयची घाई करतात, मेल पाठवल्यावर त्यांचे त्यांना उत्तर मिळाले असते. कधी त्यांनी पण आपलं एक चेकबॉक्स टीक केल्यासारखं आपल्याला मेल टाकला असतो. थोडक्यात अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर पहिला फोन कधीच घ्यायचा नाही तसे. खरंच गरज असेल तर करती दुसरा फोन.
खूप काम कमी होते. आणि एक म्हणजे कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला कितीही उद्धट प्रश्न विचारले तरी ईमेलमधे अतिशांत रहावे. ही एक गोष्ट मला आयुष्यात जबरदस्त जमली आहे. उपहास वगैरे वापरू नये, खटासी महाखट तर सोडाच. समोरच्याने शिव्या घातल्यातर, मी समजू शकतो असे का म्हणतो आहेस तू, आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतोय/केला, महाप्रचंड क्षमा करा. परत तेच - समोरचा शांत होतो आणि वरिष्ठ काय समजूतदारपणा दाखवला म्हणून कौतुक करतात. 

२. चॅट/मॉक/आयएम/मेसेजिंग - तुम्ही काय म्हणता ते, मूळ चॅटींग
ईमेलसारखेच आहे याचे पण. साहेबलोकांच्या हायला लगेच हाय. बाकी लोकांच्या बाबतीत एक महत्त्वाचे म्हणजे, त्यांना चॅटवर उत्तर द्यायचे पण जमाना झाल्यावर, आणि जमले तर बरेचदा ते अवे झाल्यावर. पन्नास टक्के वेळेला त्यांचा काय रिस्पॉन्स येत नाही परत. शिवाय बरेचदा आता जरा मिटिंगला जायचे आहे, व्हाय डोन्ट यू सेंड मी अ मेल अबाउट धिस असे म्हणावे आणि मग ईमेलवाला पाथ घ्या.

३. मिटींग्ज
मगाससारखेच. 
३.१ वरिष्ठांची प्रत्येक मिटींग ॲक्सेप्ट करा. रात्रीबेरात्रीपण करा गरज पडल्यास. दुसर्‍यादिवशी उशीरा जावा वाटल्यास.
३.२ आपल्या पिअरच्या आणि खालच्यांची प्रत्येक मिटींग एकतर डिक्लाईन किंवा टेन्टेटीव स्वीकारा. ॲक्सेप्ट नाहीच, काहीही होवो. जायचे तर जावा, पण एन्व्हाईट टेन्टेटीवच स्वीकारा.
हे थोडेसे जॉर्ज कॅस्टॅन्झाटाईप आहे, पण भारी ईफेक्ट येतो याने. एकतर पिअर आणि खालील जनतेकडून अगदी गरज असेल तरच मिटींग इन्व्हाईट येते, आणि वरिष्ठ प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टीसाठी बोलवायला लागतात. याला कोणी हांजी हांजी करणे असेही म्हणू शकते पण असे केल्याने ॲक्च्युअलमधे फिजीकली हांजी हांजी न करता हांजी हांजी ईफेक्टचा लाभ मिळतो.


४. नेहमीचे काम, कोड डिलीव्हरी, टेस्टींग, एस्टीमेटस वगैरे
कोडींग, एस्टीमेट्स यात काहीही तडजोड करू नका. एस्टीमेट् कमी करायचे नाही म्हणजे नाहीच, काय वाट्टेल ते होवो. १ व २ मुळे आपली इमेज खूपच रिजनेबल माणूस आहे अशी झाली असते त्यामुळे शक्यतो काही अडचण येत नाही. पण एखादा अगदीच अडला व म्हणला हे एस्टीमेट्स खूप जास्त आहेत तर हात वर करावेत, माझ्याकडून पाहिजे तर हे असे, रिस्क घेणारी लोकं तशीही नोकरीत कमी असतात उगाच एखाद्याच्या एस्टीमेस्ट्सच्यापेक्षा कमीत काम पूर्ण करायचे आव्हान शक्यतो कोणी स्वीकारायचे नाही. अगदीच कोणी माईकालाल निघाला असा तर त्याला बिन्धास्त करू द्यावे, पूर्ण सहकार्यही करावे. वेळेच्या आधी गोष्टी होतच नसतात, अधेमधे काहीतरी शंभर नवीन सिनारिओ लफडी येतात, तेपण नीट करावे. सर्वच्य सर्व कोपर्‍याकोपर्‍यातले सिनारिओ रोज या माईकालालला सांगावे, हेपण हॅंडल कर, तेपण कर, मग मधेच परफॉर्मन्स रन्स कर वगैरे सगळे मेलवर नम्रपणे सुचवावे. व सगळे सुचवताता, अपटू यु हां, मी आपलं सांगितलं असं ॲटीट्यूड असावं. शेवट एकतर आपण दिलेल्या एस्टीमेट्च्या आसपासच होतं ते काम, माईकालालपण नरमतो तोवर.

४. लष्कराच्या भाकर्‍या
हे महामहत्वाचे. बर्‍याचदा अशी संधी चालून येते की, तुम्हाला एखाद्या कामाची पूर्ण जबाबदारी नसते पण केवळ सल्ला मागितला जातो. अश्या सुसंधी सोडू नका. शंभर उपाय सुचवा. एखादातरी चालतोच. फुकटचं कौतुक, शिवाय तुम्ही काही कोणांच क्रेडिट घेत नाही आहात, त्यांनीच तुम्हाला सल्ला मागितला होता.

असलं सगळं दहा-पंधरा वर्ष नोकरी झाल्यावर अंगवळणी पडतं. मनातल्या मनात असे अल्गोरिदम बनतात, बारक्या मुलांची मनं अशी नसतात. 

by Yawning Dog (noreply@blogger.com) at June 21, 2017 10:45 AM

June 20, 2017

नोंदी सिद्धारामच्या...

योग आणि बौद्ध धम्म - साम्यस्थळे आणि वेगळेपण


डेव्हिड फ्राॅली,

विविध धर्मांचे साक्षेपी अभ्यासक. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरव केला.

योग आणि बौद्ध धम्म या प्राचीन भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीतून विकसित झालेल्या भगिनी परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांमध्ये अनेक संज्ञा एकसारख्या आहेत. अनेक तत्त्वं आणि उपासना एकसारख्या आहेत. यामुळेच माझ्यासारख्या पाश्चात्त्य देशात जन्म झालेल्या माणसाला सुरुवातीच्या काळात तरी योग आणि बौद्ध धम्माची शिकवण एकसारखी वाटते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

वास्तविक पाहता या दोन्ही परंपरांमध्ये फरक नसल्यामुळे त्यातील शिकवण आणि साधना यांचा आम्ही एकत्र अभ्यास करू शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या या दोन्ही पद्धतींमध्ये अस्तित्वात असलेल्या वेगळेपणामुळे त्यांना स्वतंत्र परंपरा म्हणून वेगळे ठेवले आहे. परंतु आमच्यासारख्या पाश्चिमात्यांच्या दृष्टीने या दोन्ही परंपरांत वेगळेपणापेक्षा समानताच अधिक आहे किंवा या दोन्हींपैकी एका परंपरेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची समजूत अशी होऊ शकते की, त्या परंपरेचा दुसऱ्यावर प्रभाव पडला आहे.
बौद्ध धम्माचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीस योगामध्ये इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते की योगावर बुद्ध धम्माचा मोठा प्रभाव आहे. योगाचे अध्ययन करणाऱ्याला बौद्ध धम्मात इतकी समानता आढळून येईल की, त्याला वाटू शकते बुद्ध धम्मावर योगशास्त्राचा अमिट प्रभाव आहे.
तथापि, या दोन महान आध्यात्मिक परंपरांतील समानता शोधण्याची जिज्ञासा फक्त पश्चिमेपुरती मर्यादित नाही. पश्चिमेकडे योगशास्त्र सर्वप्रथम आणण्याचे श्रेय महान योगी स्वामी विवेकानंद यांना जाते. ते वेदांती होते. त्यांनी बौद्ध महायान ग्रंथावर भाष्य केले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाची प्रमुख तत्त्वे आणि वेदांत तत्त्वज्ञान हातात हात घालून जातात, हे त्यांनी पुरेसे स्पष्ट करून सांगितले आहे. अलीकडच्या काळात आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्यासह तिबेटी निर्वासित मोठ्या प्रमाणात भारतात आले. त्यानंतर या दोन्ही परंपरांमध्ये सुसंवाद होऊन परस्परांविषयी आदरभावना वाढीस लागल्याचे दिसते. तिबेटी बौद्ध अनेकदा हिंदूंच्या धार्मिक संमेलनांमध्ये सहभागी होताना दिसतात आणि सर्व प्रकारच्या चर्चा, विचारविनिमय यामध्येही भाग घेतात.

अलीकडच्या काळातील संदर्भ घेऊन दोन परंपरा जोडणे हा माझा उद्देश नाही. हिंदू-बौद्ध एकत्रीकरणाची अनेक उदाहरणे इतिहासात दिसून येतात. बुद्ध स्वत: हिंदू धर्मात जन्मले होते आणि काही विद्वानांनी असा दावा केला आहे की, गौतम बुद्ध यांच्या महानिर्वाणानंतर अनेक वर्षांपर्यंत हिंदू धर्मापेक्षा वेगळा धर्म म्हणून बुद्ध धम्म अस्तित्वात नव्हता. मध्ययुगीन काळात इंडोनेशियामध्ये शिव-बुद्धांची उपासना अस्तित्वात होती. अनेक तांत्रिक योगींना हे सांगणे अवघड आहे की, ते हिंदू आहेत की बौद्ध. मध्ययुगीन काळात हिंदूंनी विष्णूचे अवतार म्हणून बुद्ध स्वीकारले आणि बहुतेक हिंदू अजूनही मानतात की, आपण बुद्ध-अवतार युगात आहोत. बहुतांश हिंदू गौतम बुद्धांची उपासना करत नसले तरी गौतम बुद्ध हे महान ऋषी असल्याची त्यांची श्रद्धा आहे.

असे असले तरी समानतेची सूत्रे बाजूला ठेवल्यास दोन्ही परंपरांमध्ये काही मतभेद आहेत, हे आपण नाकारू शकत नाही. मतभेद आणि वादविवाद यामुळेच या दोन्ही परंपरा आजवर पूर्णपणे एकजूट होऊ शकल्या नाहीत. दोन्ही परंपरांतील काही प्रथा आणि इतर बाबी आजपर्यंत वेगळ्या चालत आल्या आहेत. सामान्यतः हिंदू योग परंपरेने गौतम बुद्धांची वेदांतिक प्रकाशात पुनर्मांडणी केली आणि बुद्धांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धर्माने मात्र आपले वेगळेपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे दिसते. वैदिक आस्तिकता आणि स्व:च्या उच्च स्वरूपाला असलेली वैदिक मान्यता या दोन्ही बाबींशी असलेली असहमती बौद्ध परंपरेने जपली आहे.
बहुतेक हिंदू आणि बौद्ध गुरूंनी (यामध्ये विविध योग संस्था चालवणारे हिंदू आणि तिबेटी बौद्धही आले) आपल्या शिकवणीमध्ये विवेकभाव आणणे आवश्यक आहे. विशेषत: साधना आणि अंतर्दृष्टी याचा सूक्ष्म स्तरावर विचार करताना. योगविषयक ग्रंथांमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बौद्ध मताचे खंडन केल्याचे दिसते आणि बौद्ध ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी योग आणि वेदांत मताचे खंडन केल्याचे दिसते. म्हणूनच आपण या दोन परंपरांतील साम्यस्थळांचा गौरव करताना त्यांतील मतभेदांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

योग परंपरा
शास्त्रीय योग प्रणालीचा विचार करता ही प्रणाली ऋषी पतंजली यांनी योगसूत्रांद्वारे मांडली. पतंजली ऋषींनी मांडलेली प्रणाली ही मोठ्या वैदिक परंपरेचा केवळ एक भाग होता. ऋषी पतंजली यांच्याकडे योग परंपरेचे संस्थापक म्हणून कधीही पाहिले गेले नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. योगशास्त्राचे संकलक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. आधीपासून चालत आलेल्या परंपरेचा आधार घेत त्यांनी अष्टांगयोगाचा मार्ग सांगितला. यामध्ये नैतिक शिस्त (यम आणि नियम), आसन, श्वसनाद्वारे प्राणशक्तीचे नियमन (प्राणायाम), इंद्रियांचा निग्रह (प्रत्याहार), एकाग्रता (धारणा), ध्यान आणि समाधी यांचा समावेश होतो.
योगाकडे पाहण्याचा हा आठ आयाम असलेला दृष्टिकोन बहुतेक हिंदू विचाराच्या संस्थांमध्ये स्वाभाविकपणे दिसून येतो. पुराणे, महाभारत आणि उपनिषद आदी पतंजलीपूर्व साहित्यात योगासंबंधीची ही मूलभूत चर्चा दिसून येते. योग परंपरेचा उगम हिरण्यगर्भापासून झाला असे मानले जाते. हिरण्यगर्भ हा विश्वातील सृजनशील आणि उत्क्रांती शक्तीचे प्रतीक आहे.
ऋग्वेदामध्ये योगाचा शोध घेतला जाऊ शकतो, जो हिंदूंचा सर्वात प्राचीन ग्रंथ समजला जातो. या ग्रंथामध्ये मनाचा संयम आणि सत्याकडे घेऊन जाणाऱ्या अंतर्ज्ञानाबद्दल वर्णन आले आहे. योगाच्या सुरुवातीच्या महान गुरूंमध्ये वशिष्ठ, याज्ञवल्क आदी महान वैदिक ऋषींचा समावेश होतो. भगवान श्रीकृष्ण हे सर्वात महान योगी होते. म्हणूनच त्यांना योगेश्वर असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेल्या भगवद््गीतेला योगशास्त्रही म्हटले जाते. हिंदू देवतांपैकी भगवान शिव यांना आदियोगी म्हटले जाते. म्हणूनच शास्त्रीय योग आणि बौद्ध धम्म यांची तुलना करताना सामान्यपणे बौद्ध आणि हिंदू मत (त्यातही विशेषकरून हिंदू धर्मातील योग आणि वेदांताचा भाग) यांची तुलना करावी लागते.
काही लोक, विशेषतः पश्चिमेमध्ये, असा दावा केला जातो की, "योग हिंदू किंवा वैदिक नसून एक स्वतंत्र किंवा अधिक सार्वभौमिक परंपरा आहे. ते दाखवतात की हिंदू शब्द योगसूत्रांत दिसत नाही आणि योगसूत्रांचा हिंदुत्वाच्या मूलभूत उपासनापद्धतींशीही काही संबंध नाही.’ वरवरचे वाचन करणाऱ्यांना असेच दिसते. योगसूत्रे ही हिंदू आणि वैदिक तत्त्वज्ञानाच्या तांत्रिक संज्ञांसह प्रचलित आहेत. ग्रंथांमध्ये या संज्ञांचे विस्तृत आणि तपशीलवार विवरण आढळून येते. 

योगशास्त्र हे वेद, भगवद््गीता आणि उपनिषद यांचा अधिकार स्वीकार करणाऱ्या वैदिक तत्त्वज्ञानाच्या सहा दर्शनांतील एक आहे. या परंपरेतील भाष्यकारांनी हे ठळकणे पुढे आणले आहे. बृहद योग याज्ञवल्क्य स्मृती हा प्रारंभिक योगशास्त्रावरील एक महान ग्रंथ आहे. यामध्ये आसन आणि प्राणायाम साधनेसह वैदिक मंत्र आणि उपासना याविषयीचे वर्णन आहे. अनेक संख्येने असलेल्या योग उपनिषदांमध्येही असेच वर्णन आहे. एखाद्याने या महान परंपरेला दूर सारून योग सूत्रांचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर तो मार्ग चुकणार हे निश्चित आहे. कारण योगसूत्र हे केवळ सूत्र रूपात आहेत. सूत्र म्हणजे अतिशय छोटी वाक्ये आहेत. बहुतेक वेळा अर्धवट भासणारी ही वाक्ये विस्तृत भाष्याशिवाय जवळजवळ अर्थहीन ठरतात किंवा त्या सूत्रांतून अनेक अर्थ निघू शकतात. त्यामुळे एखाद्याला योग सूत्र आणि योग परंपरेचा अभ्यास करायचा असेल तर त्याने केवळ त्या विषयावर आधुनिक काळात व्यक्त होणाऱ्या मतांचा विचार करून चालणार नाही. संबंधित सूत्राचा विचार अधिकृत ग्रंथ, भाष्य आदींचा आधार घेतच करावा लागेल.
पश्चिमेकडील योग शिक्षकांसह अनेकजण म्हणतात की योग हा धर्म नाही. हा मुद्दा विचार करण्यासारखा असला तरी यातून प्रामुख्याने दिशाभूल करण्याचाच अधिक प्रयत्न असतो. योग हा ईश्वर किंवा तारणकर्त्याकडे जाण्याचा आम्ही सांगतो तोच एकमेव मार्ग खरा आहे. अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही धार्मिक शिकवणीचा भाग नाही. भारतातील योग शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांनी औपचारिकरीत्या हिंदू धर्म स्वीकारला पाहिजे यासाठी कधीच आग्रह करत नाहीत, हे खरेच आहे. असे असले तरी योग हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि हिंदू धर्माच्या सर्व पैलूंशी आणि भारतीय संस्कृतीशी तो जोडलेला आहे. योग हा आत्मा, ईश्वर आणि अमरत्वाचे स्वरूप उलगडून दाखवतो, जे संपूर्ण जगभरातील धर्मांचे प्रमुख विषय आहेत. योग हा केवळ व्यायाम किंवा आरोग्याशी संबंधित नसून  धर्म (रिलीजन या अर्थाने नव्हे) हा त्याचा मुख्य विषय आहे. योग हा प्रामुख्याने धर्माच्या आध्यात्मिक बाबींशी निगडित असला तरी तो उपासनापद्धतींशी संबंधित किंवा संस्थात्मक स्वरूपाचा नाही.
स्वैर अनुवाद : सिद्धाराम
साभार : विवेक विचार । जून २०१७
vivekvichar.vkendra.org

by siddharam Bhairappa patil (noreply@blogger.com) at June 20, 2017 08:06 PM

Holy Cow! Vegan Recipes

Kashmiri Dum Aloo

Dum Aloo is a spicy potato curry from Kashmir, one of the world’s most naturally beautiful but also extremely turbulent regions. This recipe is usually made with yogurt, but for my vegan...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

by Vaishali at June 20, 2017 01:00 PM

देवा तुझ्या द्वारी आलो

डीडीच्या दुनियेत

कोण म्हणते मुस्लिम गाय खातात?

फिरोझ बख्त अहमद हे ज्येष्ठ स्तंभलेखक असून ते मौलाना आझाद यांचे नातू आहेत. सध्या देशात जे गायपुराण चालू आहे त्यावर ‘पंजाब केसरी’ वृत्तपत्रात त्यांचा लेख गेल्या शनिवारी प्रसिद्ध झाला. तो […]

by देविदास देशपांडे at June 20, 2017 03:18 AM

June 19, 2017

माझिया मना जरा सांग ना

ऑप्शन्स

मध्ये मी एक लेख वाचला होता 'ऑप्शन्स' असण्याच्या परिणामांवर. त्यात असा एक प्रयोग केला होता की एका दुकानात ३ च प्रकारची आईस्क्रीम मिळतात आणि दुसऱ्या दुकानात खूप, समजा २० वगैरे. तर ३ प्रकार असणाऱ्या दुकानातून बाहेर आलेल्या लोकांना त्यांनी जे काही निवडलं होतं ते ते आईस्क्रीम त्यांना आवडलं होतं. मात्र जिथे जास्त प्रकार होते तिथल्या दुकानातून बाहेर आलेल्या लोकांपैकी अनेक जणांना आपण निवडलेलं आईस्क्रीम तितकं आवडलं नाही किंवा आपण दुसरा कुठला तरी प्रकार घ्यायला हवा होता असं त्यांना वाटलं. एकूण निष्कर्ष काय तर जितके ऑप्शन्स जास्त तितकं समाधान कमी. 
       इथे मुलांच्या शाळेत युनिफॉर्म नसतो. त्यामुळे रोज सकाळी उठून 'काय कपडे घालायचे हा प्रश्न असतो. लहानपणी कसं चारच कपड्यातला त्यातल्या त्यात चांगला ड्रेस घातला की झालं. आता मात्र मुलांना इतके पर्याय असतात आणि त्यातून होणारे वादही जास्त. त्यासाठी भारतात सर्व शाळांना असणाऱ्या युनिफॉर्मचा मला खूप आदर वाटतो. इथल्या भरमसाठ कपडे असणाऱ्या मुलांपेक्षा ती मुलं आणि त्यांचे आई-वडील बरेच आनंदात असतील. आम्ही तरी होतो. 
    तीच गोष्ट घरातल्या वस्तूंचीही. आजकाल जितक्या बेडरूम्स, रूम्स असतील तितक्या कमीच पडतात. प्रत्येकाला ज्याची त्याची प्रायव्हसी आणि शांतता हवी असते. अगदी आईवडिलांनाही. मग मुलांना त्यांचे आयपॅड आणि आपले लॅपटॉप किंवा फोन्स असं वाटून घेतलं जातं. पुढे जाऊन मुलांना प्रत्येकाला एकेक आयपॅड किंवा एकाला ते तर दुसऱ्याला टीव्ही असेही वाटून घेतलं जातं. का? तर प्रत्येकाला आपल्या आवडीचं बघायचं असतं किंवा गेम्स हवे असतात. आता हे सगळं होतं कारण 'पर्याय' किंवा 'ऑप्शन्स' असतात म्हणून. आणि वादही होतात कारण प्रत्येकाला निवडण्यासाठी पर्याय असतात म्हणून. नाहीतर घरातल्या एकाच टीव्ही वर एकाच चॅनेल वर येणारा एकच कार्यक्रम बघूनही आख्ख घर खुश होतंच की? 
       तर सध्या आमच्याकडे असाच एक गहन प्रश्न पडलेला आहे. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे आणि त्याचसोबत आईस्क्रीम खाणंही वाढलं आहे. पूर्वी दोन्ही मुलं एकच आईस्क्रीम घेतलं की अर्धं अर्धं खात. आणि आम्हा दोघांचं एक. पण आजकाल दोघेही आपल्या आवडीनुसारच आईस्क्रीम घ्यायचा हट्ट करतात. एकतर प्रत्येक मुलाचं वेगळं घेतलं की हे भरमसाठ येतं कितीही लहान कप घेतला तरी. शिवाय त्यातून इतकी साखर पोटात जाते ते वेगळेच. शिवाय नुसत्या आईस्क्रीमसाठी इतके पैसे घालवायचे नको वाटते. यासर्वांवर काय उपाय करायचा हा प्रश्न मला पडलेला. 
      शनिवारी रात्री मुलांनी हट्ट केला तेंव्हा माझी तरी इच्छा नव्हतीच इतक्या उशिरा त्यांनी गॉड खावं अशी. शेवटी एका अटीवर मी हो म्हणाले. म्हटलं, तुम्ही दोघांनी मिळून एक फ्लेवर घ्यायचा आणि शेअर करायचा तरच मी नेईन. सुरुवातीला आरडाओरडा झालाच. मीही ऐकत नव्हते. शेवटी गाडीतच चर्चा सुरु झाली. कुठला फ्लेव्हर घेतला पाहिजे. दोघेही आपल्याच आवडत्या आईस्क्रीमचा हट्ट करत होते. मधेच त्यांनी गॉड बोलून एकमेकांना दुसरा फ्लेव्हर कसा चांगला आहे हे समजावलं. पण मार्ग काही निघत नव्हता. शेवटी सान्वीने सांगितलं तिथे जाऊन आपण बघू आणि ठरवू. 
       दुकानात जाऊन बरीच चर्चा करून मुलाच्या आवडीचं आईस्क्रीम आणि मुलीच्या आवडीचे टॉपिंग त्यावर घेतले. हे तिला आवडलं नाहीच. आम्हा दोघांसाठी मी एक निवडलं होतं. ती नाराज होऊन बसली होती. पण एकदा विकत घेतल्यावर तिच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर आमचं किंवा स्वनिकचं. तिने दोनीही चव घेऊन पाहिले आणि शेवटी माझ्यातलं अर्ध घेण्याचं ठरवलं. अर्थात तिला ते आवडलंच. पुढच्या वेळी तिच्या आवडीचं आईस्क्रीम घ्यायचं हेही आमचं ठरलं. एकूण काय शेवट गोड झाला. पण त्या इतक्याशा आईस्क्रीम साठी इतकं मोठं नाटक. संदीप म्हणालाही,"किती जीव घेतेस पोरांचा.". पण त्यालाही दिसत होतं दोघे कशी चर्चा करत आहेत आणि अर्थात बिल कमी आलं हेही. :) 
        कधी वाटतं करू द्यावं त्यांना मनासारखं. अगदी माझाही त्रास कमीच होईल. पण या अशा छोट्या गोष्टीतूनही ते शिकत असतातच. आणि त्या केल्याचं पाहिजेत असं मला वाटतं. अनेकदा टीव्ही पाहतानाही दोघांना न भांडता एकच गोष्ट बघायला लावतो, अगदी बाकी पर्याय असतानाही. कारण समोर पर्याय असले तरी थोडं समजून घेऊन, वाटून घ्यायला शिकण जास्त महत्वाचं आहे. नाही का? नाहीतर उद्या त्यांना एकमेकांसाठीही पर्याय मिळून जातील. 

विद्या भुतकर. 
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

by Vidya Bhutkar (noreply@blogger.com) at June 19, 2017 03:14 AM

June 18, 2017

आपुला संवाद आपणासी

खरेच का हे!

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारताना अनिलांच्या या कवितेची आठवण निघाली. तिला नक्की शब्द आठवत नव्हते, आणि मला कुठेतरी लिहून ठेवलेली आठवत होती. म्हणून ही नोंद! त्या निमित्तानं, ही कविता प्रेमकविता आहे की भक्‍तिकविता किंवा विराणी असावी, अशी चर्चा झालेली आठवली...

तुझ्या पथावर तुझ्या पदांच्या
पायखुणांच्या शेजारी मम
पायखुणा या उमटत जाती
खरेच का हे?

मातीमधल्या मुशाफिरीतून
हात तुझा तो ईश्वरतेचा
चुरतो माझ्या मलीन हाती
खरेच का हे?

खरेच का हे बरेही का हे
दोन जगांचे तोडून कुंपण
गंधक तेज़ाबासम आपण
जळू पहावे?

आणि भयानक दहन टाळण्या
जवळपणातही दूर राहुनी
स्फोटाच्या या सरहद्दीवर
सदा रहावे?

-कुसुमाग्रज 

by Sumedha (noreply@blogger.com) at June 18, 2017 06:28 PM

Truth Only

मातोश्रीगडाची लढाई

हिंदूस्थानच्या (अखंड नव्हे) दौ-यावर निघालेला अफझल खान तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर येणार अशी वार्ता माध्यमातून प्रकट जाहली होती. स्वराज्यावरील हे सर्वात मोठं संकट. २०१४ पासून हा अफझल्या आणि त्याच्या फौजांनी समस्त सैनिकांच्या जीवाला घोर लावला आहे. महाराष्ट्र मुलखात २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदा, नगर पालिका निवडणुकांमध्ये या फौजांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. इतकंच काय तर या वर्षी आधूनिक स्वराज्याची राजधानी बालेकिल्ला मुंबई नगरीतही या फौजांनी ८२ मोहरा (नगरसेवक) जिंकल्या होत्या.
१९६६ पासून मुंबई इलाक्यात श्रीमान शिवसेनाप्रमुखांची डरकाळी सर्वांच्या परिचयाची होती. १९९० नंतर ही डरकाळी महाराष्ट्रात पसरली. १९९५ मध्ये राज्यात पुन्हा शिवशाही आली होती. अखंड हिंदस्थानात कट्टर हिंदूत्ववादी नेते अशी त्यांची ओळख होती. त्या काळात अफझल खानाचे पूर्वज मातोश्री गडावर मांजरीसारखे दबकत जाऊन मुजरा ठोकायचे. मात्र म्हणतात ना प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो. अगदी तसं झालं. दिवस नाही त्यांची वर्ष आली. मातोश्रीगडासमोर माना झुकवणारे आता ललका-या द्यायला लागले.
तीन दिवसांच्या दौ-यात अफझल त्याच्या दौ-याच्या तिस-या दिवशी मातोश्री गडावर येणार असल्याची वार्ता ब्रेकींग न्यूजच्या दवंडीतून पिटली गेली. मातोश्रीगडावर लागलीच सरदारांची बैठक झाली. कलानगरच्या पायथ्याशी मोठा शामियाना उभारावा, अशी कल्पना सूचवण्यात आली. पण ती मान्य झाली नाही. नाही तर सगळ्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या शामियान्याची आठवण झाली असती. असो. मातोश्रीगडावरच भेटण्याचा कार्यक्रम ठरला. दोन्ही बाजूंकडून प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील असं ठरलं. त्यातील एक जण शामियान्याबाहेर थांबेल आणि इतर दूर राहतील असं ठरलं. त्यानुसार अफझल फौजेतल्या प्रदेशाध्यक्षाला मुख्य बैठकीत नेलं गेलं नाही. या महाराष्ट्र इलाक्याचा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफझलसोबत बैठकीला गेला. मातोश्रीगडाचे उद्धवराजे आणि बालराजे यांच्या सोबत अफझलची एक तास खलबतं झाली. दिल्लीच्या तख्तावर कोणाची निवड करावी,यावर खलबतं झाली. या काळात स्वबळ, खिशातील राजीनामे हे विषय चर्चेला येणार नाहीत याची आधीच बोलणी झाली होती. त्यामुळं वाघनखं आणि बिचवा बाहेर निघाले नाही. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी वाघनखं, बिचवा बाहेर निघतील. तो पर्यंत स्वराज्यावरील संकट दूर झालं आहे.

by santosh gore (noreply@blogger.com) at June 18, 2017 06:19 PM

अमृतमंथन

निद्रिस्त परी (ले० डॉ० सरोजा भाटे, अंतर्नाद जून २०१७)

संस्कृत भाषेची महती आणि भविष्यासाठी तिची उपयुक्तता सांगणारा विशेष लेख. भाषा, वाङ्‍मय आणि संस्कृती या तीन घटकांना मिळून संस्कृत हे नाव आहे, हे आधी लक्षात घ्यायला हवे. संस्कृतचे आगळेपण या तिन्ही रूपांत आहे. संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये ह्या तीन घटकांच्या अनुषंगाने उलगडून दाखवीत तिचे कालातीत महत्व सांगताहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्कृत विदुषी सरोजा भाटे.

by अमृतयात्री at June 18, 2017 04:15 PM

June 17, 2017

काय वाटेल ते……..

लग्न करायंचय? मग हे वाचा..

काल एक मेसेज आला, की आता मुलगी पहायला जायचंय तेंव्हा काय बोलावं तिच्याशी हेच कळत नाही. अर्ध्या तासात काय काय बोलणार? आणि तिच्याबरोबर आपले लग्नानंतर पटेल की नाही हे कसे काय समजणार? खुप कन्फ्युज झालोय म्हणाला तो. पुर्वीच्या काळी बरं … Continue reading

by महेंद्र at June 17, 2017 06:45 PM

साधं सुधं!!

अजातशत्रू, अष्टपैलू व्यक्तिमत्व - उज्ज्वल !व्यक्ती आणि वल्ली श्रुंखलेतील हे तिसरं पुष्प ! दुसऱ्या आणि तिसऱ्या पुष्पांमध्ये  बराच कालावधी गेला ह्याला विविध कारणं आहेत. आज ज्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंचं वर्णन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे तो प्रयत्न कितपत झेपणार ह्याविषयी असलेली साशंकता हे ह्यातील मुख्य कारण! फारशी पुर्वतयारी न केल्यानं पहिल्या दोन व्यक्तिमत्वांवर सुद्धा काहीसा अन्याय झाला आहे त्या चुकीची दुरुस्ती भविष्यात केव्हातरी!

आजचं व्यक्तिमत्व आहे श्री. उज्ज्वल म्हात्रे.  एखादी व्यक्ती प्रसिद्ध होण्यामागं त्या व्यक्तीचं व्यावसायिक यश, सामाजिक कार्य, मनमिळाऊपणा , उमदं व्यक्तिमत्व, कुटुंबवत्सल वृत्ती, एखाद्या व्यक्तीच्या मदतीसाठी सर्वस्व झोकुन देण्याची वृत्ती असे गुण कारणीभूत असतात. बऱ्याच वेळा एक व्यक्ती एक गुण असा आपणास अनुभव येतो. पण उज्ज्वल ह्यांच्या बाबतीत मात्र हे सर्व गुण एकत्र सामावलेले दिसुन येतात. 

ह्या ब्लॉगपोस्ट मध्ये उज्ज्वल ह्यांना संबोधित करताना आदरार्थी एकवचन वापरावं की त्यांचा उल्लेख एकेरी करावा ह्याबाबतीत मोठा द्विधा प्रसंग निर्माण झाला आहे. परंतु उज्ज्वल ह्याचा स्वभाव लक्षात घेता मी त्याला एकेरी संबोधण्याचं स्वातंत्र्य घेत आहे.   

सामाजिक कार्य 

वसईत विविध सामाजिक स्तरांवर उज्ज्वल कार्यरत असतो. स्वतः जरी अंधेरीला राहत असला तरी तो बहुतांशी सर्व कार्यक्रमांसाठी जातीनं वसईला हजर राहतो. सुरुची बाग समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता मोहीम असो, डिजिटल इंडिया मोहिमेच्या निमित्तानं वसईतील कोळीवाड्यातील कोळी बांधवाना कॅशलेस व्यवहाराचं प्रशिक्षण असो किंवा वसईतील आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना सोशल नेटवर्किंगचं माहात्म्य सांगण्याचं व्यासपीठ असो ह्या सर्वांमध्ये त्याचा सारख्याच उत्साहानं सहभाग असतो. 

डिजिटल इंडिया मोहिमेच्या निमित्तानं त्यानं आपल्या कंपनीतील बराचसा व्यवसाय स्थानिक उभरत्या उद्योजकांना देऊन एक नेक उदाहरण सर्वांसमोर ठेवलं.  

वसईच्या सामाजिक जीवनातील तीन महारथी पहा इथं एकत्र आले आहेत त्या समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतामोहिमेनिमित्त ! 

सामाजिक कार्य करून झाल्यानंतर नक्कीच ह्या माशाचा आस्वाद घेण्याइतकी रसिकवृत्ती उज्ज्वल बाळगुन आहे.  
डिजिटल माध्यमातुन कोळीणीला पेमेंट करताना तिच्याशी माशाच्या भावाविषयी घासाघीस कशी करायची ह्या विषयी मित्रमंडळींना  मार्गदर्शन करण्यासाठी उज्ज्वल एका व्हाट्सअँप ग्रुपची स्थापना करणार असं मी ऐकून आहे.

व्यासपीठावर आपलं ज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीनं उज्ज्वल मांडतो आणि त्यामुळं त्याला वसईतील कार्यक्रमांत आग्रहाचं बोलावणं असतं. म्हणतात ना की एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळू नये! उज्ज्वलनं केलेली अनेक सत्कार्य अनामिक राहण्याच्या त्याच्या निर्णयाचा आदर म्हणून मी इथं उद्धृत करत नाही. 

आपल्या भोवताली असलेल्या आपल्या मित्रमंडळींच्या अज्ञानाविषयी उज्ज्वलला बरीच तळमळ आहे. त्यामुळं तो त्यांना अधुनमधून जीवनविषयक सल्ले देत असतो. परंतु ही अज्ञानी बाळे ज्ञान मिळविण्याच्या अमुल्य संधीचा वापर न करता उज्ज्वलला बाबाजी म्हणून संबोधितात. परंतु हताश न होता उज्ज्वल आपलं ज्ञानवाटपाचं कार्य व्हाट्सअँपवर अखंडपणे चालू ठेवतो. 


उमदं व्यक्तिमत्व 

हॉलिवूड, बॉलिवूड आणि मराठी चित्रपट ह्या तिन्ही सिनेउद्योगात लीलया सामावुन जाण्यासारखं व्यक्तिमत्व उज्ज्वलला लाभलं आहे. 

हॉलिवूडमधील नायकासाठी  फिट होणारे त्याचे हे फोटो ! 

बॉलीवूडमधील नायकासाठी फिट होणारा त्याचा हा फोटो!आणि हा खास मराठमोळा उज्ज्वल! बहुदा ह्यातील कोणत्या व्यवसायाची निवड करावी ह्याविषयी खात्री न झाल्यानं उज्ज्वल चित्रपटव्यवसायापासून दूर राहिला असावा आणि त्यामुळं चित्रपटसृष्टी एका देखण्या अभिनेत्याला मुकली. 

कुटुंबवत्सल वृत्ती

व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीनं पुढाकार घेणारा उज्ज्वल तितकाच कुटुंबवत्सल आहे. आपल्या बिझी कार्यभारातून कुटुंबासाठी वेळ काढण्यासाठी तो तितकाच आग्रही असतो. 
मध्यंतरी त्याच्या मुलानं आपल्या पित्याविषयी आपल्या भावना खालील शब्दांत व्यक्त केल्या. I keep coming back to one thought. Never will you meet a man who more faithfully lived his values.

My father is a teacher of all things. His method is simple and "street forward". He teaches by example. 

At any age, when faced with an ethical dilemma, after reflection, study, or even rationalization, I find myself coming back to one simple question. What would Dad do? His character is the foundation of my concise.

My father is strong in body, in spirit, and in commitment. My father never let another man down. He fulfills every obligation he ever undertakes. His word is his bond.


परवाच दहावीचा निकाल लागला त्यात उज्ज्वलचा भाऊ प्रीतम म्हात्रे ह्याच्या मुलानं म्हणजेच पौरसनं ९८.८०% टक्के मिळवुन संपुर्ण वसई तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याबद्दल पौरस, त्याचे मातापिता, उज्ज्वल  आणि संपुर्ण म्हात्रे परिवाराचं मनःपुर्वक अभिनंदन !

व्यावसायिक यश उज्ज्वल हा ओरिएंट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेच्या डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत आहे. ह्या कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीचा देशभर आणि जगभर खप वाढविण्यासाठी तो आणि त्याची सेल्स टीम सतत झटत असते. गेल्या पंचवीस वर्षात ह्या कंपनीला काही मोठी, बहुमान्य अशी अनेक डील्स जिंकून देण्यात उज्ज्वलने मोठा वाटा उचलला आहे. कंपनीचे धोरणआखणी, व्यवस्थापनीय सल्लागार ह्या बाबतीत उज्ज्वलने  गेल्या २२+ वर्षांत आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या कामानिमित्त त्याने चाळीसहुन अधिक देशांचा प्रवास केला आहे. इतके सर्व देश पाहिल्यावर उज्ज्वल जेव्हा "गड्या आपला देशच बरा!" असं मोठ्या अभिमानानं म्हणतो त्यावेळी त्याच्या ह्या म्हणण्याला नक्कीच वजन असतं.   

ओरिएंट टेक्नॉलॉजी ही एक आपल्या कर्मचारी वर्गाच्या हितासाठी झटणारी कंपनी आहे. ह्या कंपनीनं आपल्या कर्मचारीवर्गाला वेळोवेळी प्रशिक्षण देऊन त्यांना बदलत्या काळासोबत आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाचं बाळकडू दिलं आहे. ह्या कंपनीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी उज्ज्वल स्वतः कंबर कसुन जोमानं मेहनत घेतो.  

उज्ज्वलनं पंचवीस वर्षांपूर्वी जी दूरदृष्टी दाखवली ती अत्यंत कौतुकास्पद आहे. ज्या काळात बहुतांशी मध्यमवर्ग नोकरीच्या मागे धावत असे त्याकाळात त्यानं संगणकीय क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा दूरगामी निर्णय घेतला आणि तो आपली बुद्धी आणि मेहनत ह्याच्या जोरावर यशस्वी करुन दाखवला. आपण मोठ्या मेहनतीनं मिळविलेल्या स्थानाचा वापर करत त्यानं अनेक होतकरू मध्यमवर्गीय मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.  


क्रिकेट  

आम्ही शाळेत माजी विद्यार्थ्यांची स्पर्धा NPL (New English School Premier League) आयोजित करत असतो. ह्या आयोजनाच्या वेळी उज्ज्वलचा खूप आधार असतो. उज्ज्वल स्वतः एक जबरदस्त फलंदाज आहे. २०१२ साली NPL सुरु होण्याआधी १९८३, ८५ आणि ८८ ह्या तीन बॅचनी काही ओव्हरआर्म सामन्यांचे आयोजन केलं होतं. ८३ विरुद्ध ८८ ह्या सामन्यात त्यानं आघाडीला फलंदाजीला जाऊन जबरदस्त आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केलं होतं. परंतु बाकीच्या ८३ च्या सहकाऱ्यांनी साथ न दिल्यानं त्याचा संघ सामना हरला. त्यानंतर मात्र त्यानं प्रत्येक सामन्यात ८८ ला पराभूत केलं आहे. बाकी सर्व संघांशी जोमानं खेळणारा ८८ चा संघ ८३चे अमोल आणि उज्ज्वल सामोरे आले की गडबडून जातो हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. पुढील वर्षी तुझ्या बाबांच्या संघाला थोडीफार संधी देऊ हे त्यानं सोहमला ह्या NPLच्या वेळी दिलेलं आश्वासन तो कितपत पाळतो हे पाहुयात! 

उज्ज्वलच्या क्रिकेटकौशल्याची वर्णनं करताना आम्ही सर्वजण आपल्या मराठी भाषेतील कौशल्य पणाला लावतो! ही पहा घारीसारखी तीक्ष्ण नजर!२०१७ च्या NPL मधला त्यानं चित्त्याची धाव घेऊन केलेला धावबाद हा NPL
च्या इतिहासात १००० वर्षे संस्मरणात राहील ह्यावर सर्वांचं एकमत आहे. 

यंदाच्या NPL स्पर्धेच्या विजेत्या १९८३ संघासोबत उज्ज्वलचा हा फोटो ! 
मनमिळाऊ व्यक्तिमत्व  

उज्ज्वलला जो कोणी भेटतो तो त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचं सदैव गुणगान करत राहतो. कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही सामाजिक / आर्थिक स्थरातील लोकांशी उज्ज्वल सारख्याच मोकळेपणानं मिसळू शकतो. कोणत्याही विषयावर एखादं Engaging Conversation (गुंगवून ठेवणारं संभाषण) करण्यात फार मोजकी लोक उज्ज्वलचा हात धरू शकतील. 

अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तो माझ्यासोबत जे. पी. मॉर्गनच्या व्यवसायाविषयी सहजपणं तासनतास बोलू शकतो पण सामाजिक माध्यमात कंपनीविषयी काही बोलायचं नाही ही ढाल पुढे करून मी माझं सव्वा लाखाची झाकली मूठ तशीच ठेवतो. त्याचप्रमाणं दरवर्षी NPL निमित्तानं त्याची आणि माझ्या मुलाची सोहमची मैत्री द्विगुणित होत चालली आहे. सोहमला असलेलं गाड्याचं आकर्षण लक्षात घेऊन तो त्याच्याशी सुद्धा पाच दहा मिनिटं गप्पा मारण्यात व्यतीत करतो. 

एखाद्याला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत उज्ज्वल पाळतो हे मी ऐकून होतो. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला मी घरी काही मित्रांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं त्यावेळी आला. केवळ मला दिलेला शब्द पाळण्यासाठी तो अंधेरीहून रात्री १० वाजता आला आणि केवळ १० मिनिटं आमच्यासोबत घालवुन पुन्हा आपल्या कामासाठी निघून गेला.   

इतक्या व्यग्र वेळापत्रकात सुद्धा उज्ज्वलची विनोदबुद्धी कार्यरत असते. सोशल मीडियावर कोणी अगदी गंभीर उपदेश करणारा मेसेज वगैरे टाकला असेल तर वरवर निरागस वाटणारा पण खरंतर मिश्किल असणारा प्रश्न विचारण्यात उज्ज्वलचा हातखंडा आहे. म्हात्रे कुटुंब विरुद्ध पाटील कुटुंब वगैरे काल्पनिक लढे निर्माण करुन मला तो शाब्दिक लढ्यासाठी प्रवृत्त करत असतो.  

त्याच्याविषयीच्या ह्या काही परिचितांच्या /  मित्रगणांच्या प्रतिक्रिया 

१> He is very nice person at heart and easy to get along with, easily approachable, down to earth. So many Good qualities he has..

२> Energetic; any time ready for any work for others. 

३> उज्ज्वल जितक्या सहजरित्या लवकर लोकांशी मिक्स होतो ते अत्यंत कौतुकास्पद आहे. 

४> उज्ज्वल आणि माझी ओळख फक्त तीन चार वर्षांपुर्वी शाळेत झाली पण त्याच्याशी बोलताना असं कधी जाणवलं नाही की आताच ओळख झालीय! असं वाटत राहतं की कित्येक वर्षांपासुन आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. 

बाकी लिहिण्यासारखं अजुन बरंच आहे उज्ज्वलविषयी ! मला पामराला जितकं जमलं तितकं लिहिलं! मित्र उज्ज्वल सर्वांच्या चुकांना मोठ्या मनानं माफ करतो ह्याविषयी मी निःशंक आहे! 

by Aditya Patil (noreply@blogger.com) at June 17, 2017 03:07 PM

June 16, 2017

Holy Cow! Vegan Recipes

Creamy Vegan Orzo Risotto with Brussels Sprouts

This creamy vegan Orzo Risotto with Brussels Sprouts is an easy and quick weeknight dinner recipe. Use my Best Vegan White Pasta Sauce as the base, toss some sliced Brussels sprouts on a sheet pan,...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

by Vaishali at June 16, 2017 01:00 PM

साधं सुधं!!

विक्रम आणि वेताळ


दिवसभराच्या कामानं थकला भागला अजेय एकदाचा आपल्या कारमध्ये विसावला. ड्रायव्हरनं गाडी सुरु केली. आता तासभर निवांत मिळेल म्हणुन अजेय सुखावला. 

"जिंकलास का आजचा तुझा लढा ?" अचानक आवाज आला. क्षणभर अजेयनं दचकुन ड्रायव्हरकडे दचकुन पाहिलं. तो बिचारा ट्रॅफिकमधुन आपला मार्ग काढण्याच्या खटाटोपात गढला होता. 

"कोण बोलतंय ?" अजेय पुटपुटला. 

"कोण बोलतंय हे महत्वाचं नाही! काय बोलतोय हे महत्वाचं आहे !" तो आवाज म्हणाला. 

"ओ. के.  - आजचा लढा म्हणजे नक्की काय?" अजेय म्हणाला. ह्या सर्व प्रकाराचा ड्रायव्हरला सुगावा लागता कामा नये ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे हे त्याचं अंतर्मन त्याला बजावत होतं. 

"तुझी मासिक, वार्षिक ध्येयं (टार्गेट) पुर्ण करण्याच्या दृष्टीनं आजच्या दिवसात जे काही करता येणं शक्य होतं ते सर्व काही केलंस का? " आवाज वदला. 

हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही हे अजेय एव्हाना समजुन चुकला होता. 

"हो ना,  आज एका मोठ्या संभाव्य क्लायंटला जबरदस्त प्रेझेन्टेशन देऊन आलोय मी. तो बहुतेक २५ कोटीची ऑर्डर देईल आम्हांला! वर्षाचं ५०% टक्के टार्गेट एका झटक्यात पुर्ण करीन मी!" अजेय आत्मविश्वासानं म्हणाला. 

"मग तु आज पुर्ण समाधानी असशील ना !" आवाजाचा प्रत्येक प्रश्न अधिकाधिक आपल्या मनःशांतीच्या भंगाच्या दिशेनं जातोय हे अजेयला जाणवत होतं. 

त्या प्रेझेन्टेशन मध्ये केलेले आपल्या प्रॉडक्टविषयीचे दावे किती पोकळ आहेत, हे प्रेझेन्टेशन सादर करण्याची संधी आपल्यालाच मिळावी म्हणुन जगन्नाथला आपण कसं डावललं हे अजेयला आठवलं. तो गप्पच बसला. 

"हं.. जगन्नाथ तुझा खास मित्र ना !  अजेय गप्प असला तरी त्याच्या मनातील विचार त्या आवाजानं ओळखले होते. 

"पण माझ्या करियरसाठी हे आवश्यक होतं आणि जगन्नाथनं सुद्धा असले प्रकार आधी माझ्या बाबतीत केले आहेत!" अजेय म्हणाला. 

"ओ. के. तुझ्या करियरमधली तुझी नक्की ध्येये कोणती?" अजेयचा बचावात्मक पवित्रा पाहुन विषय बदलण्यासाठी आवाज म्हणाला. 

एक तासभर निवांत घालविण्याचे आपले सर्व मनसुबे धुळीस मिळाले आहेत हे मनातल्या मनात अजेयने स्वीकारलं होतं. 

"ध्येये म्हणजे उच्चपद, पैसा " मनातल्या मनात अजेय म्हणाला ते आवाजाला आपण काय विचार करतोय हे समजतंय ह्याची जाणीव ठेवुनच!

"पाच वर्षापूर्वी तुझं सध्याचं पद, सध्याचा पगार हे तुझं ध्येय होतं नाही का अजेय!" आवाजानं शांतपणे विचारलं. 

"पण सतत वर जात राहणं हा इथला नियमच नाही का? जो थांबला तो संपला!" अजेयने कुरकुर सुरु केली. 

"नियम बनवला कोणी? आणि त्याला अपवाद तुला दिसत नाहीत का?" आवाज शांतपणे म्हणाला. 

अजेयकडं उत्तर नव्हतं तो क्षणभर शांत बसला. 

"आणि अजेय तू ह्या दुनियेचे सर्व नियम पाळतोयस आणि लौकिकार्थानं तु यशस्वी सुद्धा आहेस! पण तू समाधानी आहेस का? आवाज म्हणाला. 

"बस कर तुझं हे व्याख्यान ! मी समाधानी नसलो तरी बहुतांशी दुनियेच्या सोबत मुख्य प्रवाहात आहे ही भावना मला सुखावते. मी माझ्या मुलांना महागड्या शाळेत प्रवेश देऊ शकतो, त्यांचे बरेचसे आग्रह पुरवू शकतो! " अजेयच्या संतापाचा उद्रेक झाला. 

"गावाकडं जाऊन शांत शेती करावी असं मला आणि माझ्यासारख्या माझ्या अनेक मित्रांना वाटतं. पण पुढील पिढीचे अनेक पर्याय माझ्या असल्या निर्णयानं कायमचे बंद होतील हे भय मला वाटतंय ! आणि केवळ हे घडू नये म्हणुन ह्या जीवघेण्या शर्यतीत मनाविरुद्ध धावतोय! " अजेयचा उद्रेक सुरूच होता. 

"तुझ्यासारखे प्रवचन देणारे अनेक असतील, तुम्ही देखील पुर्ण सुखी आहात काय? आम्ही उपभोगणाऱ्या  भौतिक सुखांची तुम्हांला कधीच आस नव्हती काय हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता काय? "

"हा केवळ माझा संघर्ष नाही तर ह्या युगात जन्माला आलेल्या आणि सारासार विवेकबुद्धी असलेल्या प्रत्येकाचा हा संघर्ष आहे! " अजेयचं कडाडणं सुरूच होतं.  

आवाजही संभ्रमात पडला होता. अजेयाच्या बोलण्यात त्यालाही तथ्य वाटत होतं. 

"साहेब उद्या सकाळी किती वाजता येऊ?" ड्रायव्हर विचारत होता. अजेय पुन्हा एकदा नेहमीच्या विश्वात परतला होता. 
पत्नीनं घराचं दार उघडलं होतं. छोटा अखिल टीव्हीवर मालिका पाहत होता. वेताळाच्या प्रश्नानं निरुत्तर झालेल्या विक्रमाला एकटं सोडून विजयी मुद्रेनं उडून जाणाऱ्या वेताळाचा आवाज त्याला काहीसा परिचित वाटला. 

by Aditya Patil (noreply@blogger.com) at June 16, 2017 04:06 AM

June 15, 2017

कृष्ण उवाच

काडीमोड आणि प्रेम

सौजन्य सहजासहजी घडत नाही.

मंगला आपल्या जीवनात; स्वातंत्र्य,कायद्याचं पालन,देवाचं महात्म्य आणि धर्माचं पालन ह्या गोष्टीवर विश्वास ठेवते आणि ह्याचमुळे देवाशी दुवा सापडला जातो अशी ती श्रद्धा ठेवते.

मंगला,माझी मोठी पुतणी,म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मोठी मुलगी.मंगला जात्याच हुषार आहे.शाळेत तिचा नेहमीच पहिला नंबर यायचा.कॉलेजात तेच.अगदी चांगले मार्क्स घेऊन ती इंग्लीश घेऊन M.A.झाली.पुढे phd करण्याचा तिचा विचार होता.पण अमेरिकेत जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं असा तिचा विचार झाला.आणि तो
सफल झाला.एका युनिव्हरसिटीत नोकरी करीत असताना तिचा एका गोर्‍या सहकार्‍याशी विवाह झाला.सुरवातीला बरं चाललं होतं.पण नंतर सातएक वर्षांनी त्यांचा काडीमोड झाला.काही दिवस वाट बघून मंगला भारतात परत आली.
मुंबई युनिव्हरसिटीत तिने नोकरी केली.फावल्या वेळात ती बरंच लेखन करायची.
अलीकडे मंगला,एका न्युझ-पेपर मधे लिहीत असायची.आता ती निवृत्त होऊन फ्री-लान्स लेखन करते.

” स्वातंत्र्यावर माझी श्रद्धा आहे.मला वाटतं,सर्व जगाच्या स्वास्थ्यासाठी,प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनात येईल ते त्याला बोलता आलं पाहिजे,क्षमता असेल ते करता आलं पाहिजे,कारण प्रत्येक माणसाला आयुष्य काय आहे हे समजण्यासाठी,त्याच्याकडून अनन्य असा हातभार लावला गेला पाहिजे. कारण तो स्वतःच आगळा असतो.त्याचं
शारिरीक, मानसिक रूप आगळं असतं.त्यामुळे त्याला स्वतःला जे काही सांगायचं असेल ते अन्य उद्भव-स्थानातून शिकता येणं शक्य नसतं.”

मंगला आणि माझी बरेच दिवसानी भेट झाली होती.ती मला भेटायला माझ्या घरी आली होती.
“सध्या तू कोणत्या विषयावर लेखन करतेस?”
ह्या माझ्या प्रश्नावर तिची त्या लेखन विषयाची वरील प्रस्तावना होती.
तिच्या ह्या प्रस्तावनेतून माझ्या चटकन एक लक्षात आलं की,त्या गोर्‍या सहकार्‍याशी लग्न करून तिच्या स्वातंत्र्यावर झालेल्या आक्रमणाचे हे पडसाद तर नसतील ना?
कारण अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात सुद्धा स्वातंत्र्यावर गळचेपी होत असते.आणि विशेष करून स्त्री समाज ह्यातून मोकळा नाही.तिकडच्या निरनीराळ्या बातम्यातून हे समजायला कठीण होत नाही.अमेरिकेत काडीमोडाचे प्रमाण बरंच आहे.

मंगला मला पुढे सांगू लागली,
“माझ्या कुटूंबाबरोबरची मी एक स्त्री म्हणून वर जे मी बोलले ते मला मान्यच करावं लागेल.पण जरी मी जे वरती म्हणाले,त्यामुळे जीवन सुखकर जातं असं काही माझ्या पहाण्यात येत नाही.परंतु,ते सुखकर करायला एखाद्याला संपूर्ण मोकळीक दिली जाते अशातला भाग मुळीच नाही.म्हणूनच मला काय म्हणायचं आहे की,जर का एखाद्याला
हवं ते बोलायला आणि करायला मुभा मिळाली तर एक वेळ अशीपण येते की,दुसर्‍या कुणाच्या बोलण्याच्या आणि करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते.”

मला वाटलं ती म्हणते त्या मुद्द्यावर मला थोडा प्रकाश टाकता येईल.म्हणून मी तिला लगेचच म्हणालो,
“म्हणूनच,हे उघड दिसतं की,एखाद्याच्या जीवनातली मुख्य समस्या अशी होऊ शकते की, प्रतिस्पर्धात्मक स्वातंत्र्याचा समतोल संभाळणं एखाद्याला कठीण होण्याचा संभव होऊ शकतो. अगदी नाजुक अशी क्रमवार येणारी आकलंनं ह्यात सामिल होऊ पहातात.आणि ती आकलंनं तुम्हाला थांबवता येत नाहीत.
अशी आकलनं सामिल करून घेण्याचं तत्व स्वतःच्या जीवनात प्रथम लागू करावं लागेल.आणि हे करण्यासाठी ज्या गोष्टीचं पटकन अनुमान करता येईल ती गोष्ट म्हणजे प्रेम.पण प्रेमाचा परिणामकारक उपयोग करायचा झाल्यास त्याला बरीचशी कल्पकता असावी लागते.”
माझं हे बोलणं ऐकून,मंगला बरीच सद्गदीत झाल्यासारखी दिसली.माझं म्हणणं बरचसं तिला पटलं असं मला दिसलं.

“तुमचं म्हणणं पूर्ण खरं आहे”
असं म्हणून मंगला मला पुढे म्हणाली,
“आणि हेच तत्व सामाजिक संबंधात वापरायचं झाल्यास,पटकन अनुमान करता येईल ते म्हणजे कायद्याचं पालन करणं. तसंच परस्परातील बंधंनांचा मान राखण्याचं भान असणं आवश्यक आहे.आणि जर का हे असफल होत आहे असं दिसून आलं तर, कायद्याच्या व्यवस्थेतेने,ज्यावर पुर्ण विश्वास असणं आवश्यक आहे, त्या व्यवस्थेने,
हस्तक्षेप करणं आवश्यक आहे.”

हे मंगलाचं भाष्य ऐकून मला समजायला वेळ लागला नाही की,मी म्हणालो तसा प्रेमाचा प्रयोग तिच्याकडून झाला असावा.पण शेवटी त्याचा काही उपयोग न झाल्याने तिला कायद्याच्या व्यवस्थेकडे नाईलाजाने वळावं लागलं असावं.आणि कदाचीत तिच्यावर शारिरीक अत्याचाराच्या प्रसंग झाल्याचंही नाकारता येत नाही,त्यामुळे पुढील
चर्चेच्या ओघात ती जे बोलत होती त्याला जास्त सबळता येते.

“खरंच मी तुम्हाला प्रांजाळपणे सांगते,मी ज्यावेळी तरूण होते तेव्हा,प्रेमात येणार्‍या अडचणी आणि कायद्याचं महत्व मला कधीच कळलं नव्हतं.मी एका बंडखोर जगात वाढत होते,वावरत होते.खर्‍या अर्थाने मी जणू विद्रोही होते.त्यावेळचे माझे विचार असे होते की,माणूस मुळात सत्त्वशील असतो.आणि माणसा-माणसातले संबंध चांगलेच
असणार असं मला वाटायचं.मला कायदा हा एक धसमुसळं संघटन आहे आणि ते संघटन असं आहे की ते माणसांशी निष्ठूरपणे वागतं.असं मला वाटायचं. जास्त करून गरिबांशी आणि स्त्रीयांशी हा प्रकार होतो कारण ते विरोध करतात. आणि त्यावेळी मला असही वाटायचं की, एकदाची गरिबी हटली गेली की, हा विरोध आपोआपच कमी होत जाणार.तसंच मला असंही वाटायचं की ह्यातून खात्रीपूर्वक सांगता येईल की,मनुष्य स्वभाव कालांतराने एकदम परिपूर्ण होईल.अशा तर्‍हेची भाबडी कल्पना उराशी बाळगून मी मोठी झाले.”

मी मंगलेला म्हणालो,
“तुझे विचार अगदी स्त्री-सुलभ आहेत.शिवाय एखादा गरीब म्हणा,किंवा एखादी तुझ्यासारखी स्त्री म्हणा,तुमचा विरोध नाममात्र असतो”.
माझं हे ऐकून मंगला थोडी विचारात पडल्यासारखी दिसली.

मी तिला म्हणालो,
“बोल तू.तुझा अनुभव मला ऐकायला आवडेल.”

जरासाही विलंब न लावता मंगला मला म्हणाली,
“माझ्यापेक्षा तुम्ही मोठे आहात.तुमचे अनुभव नक्कीच दांडगे असणार.पण मला आठवलं म्ह्णून मी तुम्हाला सांगते,
मी त्यावेळी अकराएक वर्षींची असेन.मला हिंदू-मुसलमाना मधल्या मुंबईतल्या दंगली आठवतात.मला आठवतं माझ्या बाबांचे एक मित्र त्यांना भेटायला आले होते.आणि ते वर्णन करून सांगत होते की सोडावॉटरच्या बाटल्या फेकून एकमेक आपली डोकीं कसे फोडत होते.तसंच मला त्यावेळचं आठवतं,माझ्या मनात त्यावेळी विचार येत होते
की,मला ह्या घटना विसरून चालणार नाही.मी ज्यावेळी वयस्कर होईन त्यावेळी ह्या घटनांचं वर्णन लोक ऐकायला आतुर असतील.ह्या असल्या घटना तोपर्यंत नामशेष झाल्या असतील असं ही मला त्यावेळी वाटायचं.”

मी मंगलेला म्हणालो,
“किती भाबडी आहेस तू?.अगं,तू विचार कर तुला आणि तुझ्या पिढीत असलेल्या लोकांना केवढा धक्का बसत असेल की, अलीकडे तर असल्या घटना सर्व जगात अजून होत आहेत शिवाय त्यावेळच्या घटना आजच्या मानाने अगदीच नगण्य़ असाव्यात की ज्या पद्धतीत अलीकडे लाखो लोक भोगत आहेत.”

मंगला म्हणाली,
माणसंच, ह्या अशा दहशदी, माणसावर लादत असतात.मला निक्षून समजलंय की, ज्या काही चांगल्या समजल्या जाणार्‍या गोष्टी ह्या जगात घडत असतात त्या अशाच घडत नाहीत.त्या घडविण्यासाठी त्या निर्माण कराव्या लागतात, त्याची देखभाल करावी लागते आणि त्यासाठी प्रेमळपणाचे परिश्रम घ्यावे लागतात आणि कायद्याने त्यांची
अंमलबजावणी करावी लागते.परंतु,प्रेमळपणा साधायचा कसा,ज्याठिकाणी निर्दयपणा एव्हडा बोकाळलेला आहे?आणि कायदासुद्धा भ्रष्टाचारापासून कसा जोपासायचा जिथे भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे.?कारण भ्रष्टाचार हा माणसाच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे.

देवभोळी मंगला पुढे म्हणते,
“जशी मी जास्त जास्त वयस्कर होत राहिली आहे,आणि माझ्या आयुष्यातला अनुभव वाढत आहे, तशी माझी देवावरची श्रद्धा जास्त द्रुढ होत चालली आहे.धर्म अशा तंत्राचा प्रस्ताव ठेवीत आहे की,इश्वराकडे दुवा साधण्याचा मार्ग ह्यातून सापडेल.पण हे तंत्र मला अंमळ कठीण वाटत आहे.”

मी मंगलेला म्हणालो,
“तुझे विचार खरोखरच प्रेरणादायी आहेत.तुझं लेखन ह्याच मार्गाने केलं गेलं तर नक्कीच वाचकावर चांगले परिणाम होत रहातील.”

अखेरीस मंगला मला म्हणाली,
“मी जसं तुमच्याबरोबर आता चर्चा करीतेय, तसं माझं लेखनपण चालूच असतं.
त्यामुळे सत्याकडे जाण्याचा मार्ग मी शोधीत असते.देवावरची श्रद्धा माझ्या मनाच्या कोपर्‍यात मी लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.त्यामुळे ह्या गोष्टीला थोडीतरी किंमत राहिल.हे तितकं सोपं नाही.खरंच बंडखोर होण्याइतकं खचितच सोपं नाही.पण माझ्या मनात अशी एक भन्नाड कल्पना येऊन जाते की जर का मला सुलभ
आयुष्याची प्रतिक्षा असेल तर मी खरोखर दुसर्‍या कुठल्यातरी विश्वात जन्माला यायला हवं होतं.”

मंगला गेल्यानंतर माझ्या मनात विचार आला की,बिचारीच्या मनावर तिचा काडीमोड झाल्याचा प्रभाव खूपच खोलपर्यंत पोहोचला आहे.एक भारतीय स्त्री म्हणून तिने तो होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले असावेत प्रेमाचा आसरा घेण्याचा प्रयत्न निश्चीत केला असावा.अमेरिकन स्त्रीया एव्हडी फिकीर करीत नाहीत.”हा” नाहीतर “तो” अशी त्यांच्या मनाची ठेवण असते.पण तसं व्हायला मी अमेरिकन स्त्रीला उघड दोष देत नाही.कारण ती पण एक स्त्री आहे.परंतु,अमेरिकेतले संस्कार भारतीय संस्कारापेक्षा वेगळे आहेत यात शंकाच नाही.अर्थात काडीमोड झाल्यावर त्यांनाही दुःख झाल्याशिवाय रहात नाही म्हणा.
थोडे भारतीय परिस्थितीतले संस्कार आणि थोडे अमेरिकन वातावरणातले संस्कार ह्या कात्रीत बिचारी मंगला अडकली गेली.पण तशाही परिस्थितीत तिने आपले विचार प्रगल्भ ठेवून माझ्याशी चर्चाकरून मला माझ्या ह्या वयातही बहुश्रूत केलं हे मान्य केल्याशिवाय मला गत्यंतर नाही.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)


by shrikrishnasamant at June 15, 2017 10:07 PM

स्मृति

H 4 Dependent visa (4)

आमच्या अपार्टमेंटच्या घरासमोर जे तळे होते तिथे माझ्यासारखीच काहीजण बदकांना ब्रेड खायला देण्यासाठी येत असत. लायब्ररीतले काम सोडून दिल्यानंतर आता पुढे काय? याचे विचारचक्र माझ्या डोक्यात सुरू झाले. क्लेम्सनला असताना चर्चमध्ये काम मिळाले तसे इथेही मिळू शकेल का? किंवा इथे जवळपासच्या चालण्याच्या अंतरावर डे-केअर किती आहेत? हे गुगलशोध करून शोधून काढले. त्यात चालण्याच्या अंतरावर एक डे-केअर आणि एक चर्च सापडले. ही दोन्ही स्थळे मी जेव्हा चालायचे तेव्हा मला माहिती होतीच पण आता नोकरीच्या निमित्ताने तिथे गेले, विचारले की इथे वेकन्सीज आहेत का? माझ्याकडे ग्रीन कार्ड आहे त्यामुळे मी कायद्याने नोकरी करू शकते हे त्यांना सांगितले. शिवाय थोडाफार अनुभव आहे आणि त्या अनुभवांची रेको लेटर्स पण आहेत हेही सांगितले. ही रेको लेटर्स घेऊन ठेव असे माझ्या बरोबर क्लेम्सन मध्ये काम करणाऱ्या रेणुकानेच मला सुचवले होते. चर्चमध्ये आणि डे-केअर मध्ये हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी मला अर्ज दिला तो मी तिथल्या तिथे भरून दिला. अर्ज भरून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही तुला कळवू. सध्या तरी आमच्या इथे कोणत्याही व्हेकन्सीज नाहीत. लायब्ररीच्या अनुभवानंतर मी शहाणी झाले होते. कोणत्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत आणि मुलाखतीसाठी बोलावणे येईल अशी वाटही बघायची नाही.
एकदा तळ्यावर चक्कर मारत असताना तिथे एक बाई मला दिसली. ती आमच्या अपार्टमेंटच्या जवळच्या घरातून बदकांना ब्रेड घालायला यायची. तिच्या कारचा आकार पण जरा विचित्रच होता. तिने माझी व मी तिची चौकशी केली. ती म्हणाली "मी आधी न्युयॉर्कला रहायचे. पण आता इथे रहायला आले आहे. ती चर्चमध्ये जाते असे सांगितल्यावर मि तिला लगेचच कामाविषयी विचारले.. तर ती म्हणाली की नोकरी नाही पण चर्च मध्ये तू माझ्याबरोबर दर बुधवारी voluntary work करायला येऊ शकतेस. तु बुधवारी ये. तिथले काम बघ. तुला आवडले तर तू माझ्याबरोबर ये. मी तुला दर बुधवारी आणायला व सोडायला येत जाईन. मि इथेच राहते तुझ्या अपार्टमेंटच्या जवळच. मी तिच्याबरोबर बुधवारी गेले . तिथल्या चर्च मध्ये "अन्नवाटप" करतात ते कळाले. गरीबांसाठी चर्चमध्ये दररोज लागणारी ग्रोसरी घेऊन ठेवतात व त्याचे वाटप करतात. चर्चमध्ये एका मोठ्या खोलीत रॅक लावलेले असतात तिथे सर्व प्रकारची ग्रोसरी ठेवलेली असते. मधोमध टेबले असतात. त्या टेबलाभोवती आम्ही ओळीने उभे रहायचो. घरातून येताना कॅरी बॅग्ज आणायला सांगायचे. आपल्या घरी ग्रोसरी आणल्यावर बऱ्याच कॅरी बॅग्ज आमच्याकडे जमा झालेल्या असतात त्या घेऊन जायचे. तिथे गेल्यावर सर्वांनी आणलेल्या कॅरी बॅग्ज चेक करायचो. त्यातल्या खूप फाटलेल्या असतील त्या फेकून द्यायचो. व बाकीच्या चुरगळलेल्या बॅगा हाताने सरळ करून एकावर एक ठेवायचो म्हणजे माणसे ग्रोसरी घ्यायला आली की पटापट त्यांना हवे असलेले सामान भरून द्यायचो. दर बुधवारी सकाळी ९ ते १२ हे काम चालायचे. काही वेळा माणसे उशिराने येत. काही वेळा ९ लाच हजर राहत. दर बुधवारी मी कामाला जायला लागले खरी पण हे काम मला जास्त आवडले नाही. ८ ते १० बुधवारच गेले असेन. नोकरीचा विषय मी माझ्या डोक्यातून पूर्णपणे काढून टाकला.

विचार करता करता सुचले घरबसल्या काही ऑनलाईन शिकता येईल का? म्हणून नेहमीप्रमाणेच गुगलशोध केला तर त्यात मला काही कोर्सेस सापडले. हे कोर्सेस दीड ते दोन,, किंवा काही ३ ते ४ महिन्यांचे होते.
या सर्व कोर्सेस ची फी ८० ते १०० डॉलर्स अशी होती. यातले ३ कोर्सेस मी एकही डॉलर न भरता पूर्ण केले. कसे ते लवकरच लिहिन. या ऑनलाईनच्या कोर्सेस नंतर मात्र ओळीने जे काही घडत गेले ते खूप आनंद देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे होते !! माझ्या शिक्षणाचा काळ येऊन ठेपला होता.

by rohinivinayak (noreply@blogger.com) at June 15, 2017 09:51 PM

इतिहासातील सत्याच्या मागावर…

दुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर

दुर्गपंडीत श्री. प्र. के. घाणेकर यांनी दुर्ग साहित्याचा आढावा या विषयावर विलेपार्ले येथे दिलेले हे उत्तम व्याख्यान. दुर्ग प्रेमींसाठी तसेच दुर्ग, इतिहास अभ्यासक यांच्याकरिता अतिशय माहितीपूर्ण असे हे व्याख्यान ..!! https://youtu.be/-W6emSdqMYE आमचा channel subscribe करण्यासाठी खालील link वर click करा. https://www.youtube.com/channel/UCLTxpUgKms5Yxi-LcOOxTdg Filed under: दृक-श्राव्य

by उमेश जोशी at June 15, 2017 02:35 PM

मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

एका वेड्याची रोजनिशी.

A_madmans_diary_work_by_lu_xun

एका वेड्याची रोजनिशी.

ऑक्टोबर ३

आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले.

खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता. मला तो नेहमीच म्हणायचा, “हे बघ मित्रा तुझे डोकं जरा तपासून घे. मला वाटतं त्यात काहीतरी बिघाड झालाय. तू नेहमीच कुठल्यातरी भुताने पछाडल्यासारखा गडबडीत असतोस. शिवाय तुला एखाद्या प्रकरणाचा संक्षिप्त अहवाल दे म्हटले तर तू त्यात इतका गोंधळ घालून ठेवतोस की परमेश्वराच्या बापालाही त्यातून काही समजणार नाही याची मला खात्री आहे. पत्रावर तू कधी समास सोडत नाहीस ना तारीख किंवा क्रमांक.” नालायक लंबू साला. त्याला माझा हेवा वाटतो हेच खरं मी मोठ्या साहेबाच्या केबिनमधे बसतो ना ! शिवाय मी त्यांची पेनं दुरुस्त करून देतो म्हणून त्यांची मर्जी आहे माझ्यावर ! थोडक्यात काय मी ऑफिसला गेलोच नसतो. पण जरा उचल घ्यायची होती म्हणून गेलो.

आमचा साहेब म्हणजे एक हलकट माणूस आहे. त्याच्याकडून पगारापोटी उचल घ्यायची म्हणजे त्याचा चेहरा आकाश कोसळल्यासारखा होतो. जणू काय साल्याच्या खिशातूनच पैसे देतोय. कितीही विनंत्या करा, पाया पडा, अडचणींचा पाढा वाचा पण याला दया येईल तर शपथ. ऑफिसमधे शूर असणारा हा साहेब घरी मात्र बायकोच्या आणि स्वयंपाकीणीच्या ताटाखालचे मांजर आहे. सार्‍या जगाला माहीत आहे.

बँकेत आमच्या खात्यात काम करण्यात काय अर्थ आहे हे मला अजून उमगलेले नाही. आमच्या खात्यात हिरवळच नाही. कायदा विभागाची गोष्ट वेगळी आहे. तेथे एका कोपर्‍यात एक अजागळ माणूस एका डुगडुगणार्‍या टेबलावर सतत काहीतरी खरडत असतो. समोर खरकटा कॉफीचा मग असतो. इतका घाण की त्यांच्यावर मला नेहमीच थुंकावेसे वाटते. पण साल्याचे फार्महाउस बघा एकदा ! कमी किमतीची भेटवस्तू स्वीकारणे तो कमीपणाचे समजतो. “ हे बाहेर कोणाला तरी द्या असे स्पष्टच सांगतो तो.” दहा हजाराच्या खाली तो कुठलीही भेट स्वीकारत नाही. पण दिसायला कसा अगदी साधा भोळा आहे. बोलणेही अगदी मृदू. मला पेन मागतानाही इतक्या अदबीने मागतो. पण कर्जदाराचे पाय त्याच्या समोर थरथर कापतात हे मी स्वत: पाहिलेय.

आमच्या ऑफिसमधे सगळे कसे व्यवस्थित असते. इतर सरकारी खात्यांच्या कार्यालयांसारखा ढिसाळ कारभार नसतो. टेबले, खुर्च्या अगदी व्यवस्थित चकचकीत असतात. आणि खरंच असे वातावरण नसते तर मी केव्हाच राजीनामा साहेबाच्या तोंडावर फेकला असता.

मी माझा जुना शर्ट चढवला व छत्री घेऊन रस्त्यावर आलो. पावसाची रिपरिप चालू होती. रस्त्यावर गर्दी नव्हती. काही बायका डोक्यावर पदर घेऊन रस्ता पार करायचा प्रयत्न करीत होत्या. थोड्याफार छत्र्या ही दिसत होत्या. ऑफिसला जाणार्‍यांची गडबड दिसत नव्हती.तेवढ्यात मला एक ऑफिसला जाणारा माणूस दिसला. मी मनात म्हटले, “ पुढे चालणार्‍या तरुणीच्या नितंबामागे धावणारा तू…. इतरांसारखाच आहेस. स्त्रिलंपट !

बाबांच्या आश्रमातही बायकांच्या मागे लागतात असे माझ्या कानावर आले आहेकाय खरं काय खोटं काय माहीत..! मी असा विचारात बुडलेला असतानाच मी एक कार एका दुकानासमोर थांबलेली पाहिली. मी ती लगेचच ओळखली. बँकेच्या डायरेक्टरची कार आणि ‘त्यातून उतरणारी ती मुलगी त्याची मुलगी असणार.’ मी मनाशी म्हटले.

मी कारण नसताना एका खांबाआड लपलो. ड्रायव्हरने दार उघडले आणि पिंजर्‍यातून एखादी चिमणी चिवचिवत बाहेर पडावी तशी ती डोळ्यांच्या पापण्या फडफडवत, चिवचिवत बाहेर पडली. ती चालताना मोहकपणे डावीकडे, उजवीकडे मान वेळावत पहात होतीतिला पाहताना माझ्यावर एखादी वीज पडावी अशी माझी अवस्था झाली. खलास झालो मीपण आश्रमातील बाबांची एक शिष्या मला याहूनही सुंदर भासायची हे खरं

पण या असल्या हवेत ही बाहेर काय करतेय? आणि ते म्हणतात सुंदर मुली आपल्या चेहर्‍याची काळजी घेतातम्हणजे जाहिरातीत तरी असेच दाखवतात..

तिने अर्थातच मला ओळखले नाही. मी छत्री समोर करून स्वत:ला त्यामागे लपवले पण तेही मला जास्त वेळ करता येईना कारण छत्रीला भोके पडली होती. सध्या किती मस्त रंगीबेरंगी छत्र्या असतात नाहीतर माझीकळकट्ट !

तिच्या छोट्या कुत्र्याला ती आत घेऊन जाऊ शकत नसल्यामुळे तो बाहेरच राहिला. मला हा कुत्रा माहीत आहे. त्याचे नाव मन्या. बहुतेक मनोहरवरून ठेवले असावे नाव. तेवढ्यात मला आवाज ऐकू आला, “मन्या कसा आहेस?” मी चमकून इकडे तिकडे पाहिले. कोण बोलले ते? दोन बायका एका छत्रीतून चालल्या होत्या. त्यातील एक म्हातारी होती तर एक तरुण. त्यांनी मला पार केले, तेवढ्यात मला परत तोच आवाज ऐकू आला, “ लाज वाटायला पाहिजे तुला मन्या.” कोण बोलतय ते.. तेवढ्यात मन्या मला त्या स्त्रियांच्या कुत्रीच्या मागे हुंगत चाललेला मला दिसला. अरे देवामला चढलेली तर नाही ना? दारु प्यायल्यावर हे असे भास मला नेहमीच होतात.

नाही.. चुकती आहेस तू मने..” मन्याने उत्तर दिलेले मला स्पष्ट ऐकू आले. “ मी भो..भो.. गुर्रखूप आजारी होतो.” असामान्य कुत्रा ! त्याला मनुष्यप्राण्यासारखे बोलताना पाहून खरं सांगतो मी अवाकच झालो. पण जरा विचार केल्यावर मला बसलेला धक्का ओसरला. जगात अशी अनेक आश्‍चर्य आहेत. मधे मी इंग्लंडमधे डॉल्फिन पाण्याबाहेर डोकं काढून कुठल्यातरी भाषेत एकमेकांशी संवाद साधतात असे ऐकले होते. ती भाषा अजून शास्त्रज्ञांना उलगडली नाही. मधे तर असेही वाचले होते की टिंबक्टूमधे दोन गायी दुकानात शिरल्या आणि त्यांनी चहाची पावडर मागितली. हे जाऊ देत. पुढे मन्या काय म्हणाला ते विशेष होते, “मने, मी मधे तुला एक पत्र लिहिले होते. टॉमीने दिले नाही का तुला?”

बाबांच्या आश्रमात प्राण्यांची भाषा समजणारे व त्याच्या आधाराने भविष्य वर्तवणारे काहीजण आहेत पण हे म्हणजे फार म्हणजे फारच भारी होते. पत्र लिहिणारा कुत्रा मला जर कोणी दाखवला तर मी माझा एका महिन्याचा पगार हारीन. गेले काही दिवस फक्त मलाच अशी विद्या प्राप्त झाली आहे. मला जे ऐकू येते ते इतरांना येत नाही याची मला खात्री आहे. केव्हापासून बाबा मला बँक सोडून आश्रमात ये म्हणून आग्रह करत आहेत पण मला बँक सोडवत नाही. कारण एकच, आश्रमाबद्दल माझ्या कानावर कधी कधी विचित्र गोष्टी पडतात.

मी विचार केला या कुत्र्याच्या मागे जाऊन याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. मी छत्री उघडली व त्या दोन बायकांच्या मागे मागे गेलो. टिळक रस्त्यावरून उजवीकडे वळल्या व कॉजवेपाशी एका मोठ्या वाड्यासमोर थांबल्या. हा वाडा मला माहीत आहे. हा पेशव्यांचे सरदार साठे यांचा वाडा. या वाड्याचा मालक अमानवी श्रीमंत आहे. त्याच्या गाड्या, त्याच्याकडे झडणार्‍या मेजवान्या, त्याचे स्वयंपाकी, त्याचा जेवणाचा हॉल….हे सगळे विषय चवीने चघळले जातात त्या गल्लीत. आमच्या बँकेतील काही अधिकारी तर येथे रोज संध्याकाळी पडलेले असतात म्हणेहा साठे बाबांचा शिष्य आहे म्हणे अर्थातच मी त्याचा कधीच फायदा घेतला नाही. मला पटतच नाही ते. माझा एक मित्र तेथे नियमित सतार वाजवायला जातोत्यामुळे मला त्या वाड्याची बरीच माहिती आहे.

त्या बायका वाड्यात दुसर्‍या मजल्यावर गेल्या. ठीक आहे मी कुठल्या घरात त्या गेल्या हे नीट पाहून ठेवले. ‘नंतर याचा छडा लावता येईल’ मी मनात म्हटले.

ऑक्टोबर ४

आज बुधवार. नेहमीप्रमाणे मी आज बँकेत गेलो. मी आज जरा लवकरच आलो. मला पेनं जमवायचा आणि दुरुस्त करण्याचा छंद आहे. लवकर आल्यावर मी खिशातून एक पेन काढले व ते बाथरूममधे जाऊन पाण्याखाली धरले व पाणी पुसण्यासाठी फडकं शोधू लागलो.

आमचा डायरेक्टर एक बुद्धिमान माणूस आहे. त्याची खोली पुस्तकांनी भरुन गेली आहे. ती जाडजूड अवघड विषयांवरची पुस्तके पाहूनच माझ्या सारख्या माणसाची छाती दडपून जाते. त्यात काही जर्मन व संस्कृत पुस्तकेही आहेत. त्याच्या चेहर्‍याकडे पहा जरा….त्याच्या डोळ्यात विद्वत्तेची झाक दिसली नाही तर माझे नावत्याच्या तोंडातून आजवर मी एकही फालतू शब्द बाहेर पडताना ऐकलेला नाही. फक्त जेव्हा तो माझ्या हातात एखादी फाईल देतो तेव्हा मात्र तो “ काय विचित्र हवा पडली आहे आज” हे वाक्य न विसरता उच्चारतो. याचा अर्थ मला अजून समजायचा आहे.

पण तो आमच्या कॅटलक्‍लासमधे मोडत नाही हेच खरं. मला माहीत आहे मी त्याला आवडतो.. आता त्याच्या मुलीलाही तसे वाटले तरकाय मूर्खपणा लावलाय..त्यावर न बोललेलं बरं. मीही काही बंगाली लेखकांची पुस्तके वाचली आहेत. किती बावळट असतात हे बंगाली. यांचा एकदा मला समाचार घेतलाच पाहिजे. मी एका कानडी लेखकाने केलेले चेंडूचे वर्णन वाचले आहे. फारच मस्त लिहिलय त्याने.

तेवढ्यात माझ्या लक्षात आले की डायरेक्टरसाहेब अजून ऑफिसमधे आलेले नाहीत. साडेबारा वाजले. मी त्यांची वाट पहात बसलो आणि साधारणतः: दीड वाजता कुठलेही पेन वर्णन करू शकणार नाही अशी घटना घडली. दार उघडले. मला वाटले साहेबच आले असणार. मी हातातील कागद घेऊन ताडकन खुर्चीतून उठलो. तेवढ्यात उघड्या दारातून ती आत आली. हो तीच ! अरे देवाकाय सुंदर साडी नेसली होती तिने. चंदनी रंगाच्या तिच्या साडीला चंदनाचा वास येत होता. सुंदर अतिसुंदर !

तिने मला अभिवादन केले. “ बाबा अजून आले नाहीत का ?” तिचा आवाज मला एखाद्या स्वर्गीय कोकिळेसारखा भासला मला. स्वर्गीय कोकिळा… “ हे सुंदरी माझ्यावर असे नजरेचे वार करू नकोस. मला मारायचेच असेल तर तुझ्या सुकुमार हातांनीच मला खतम कर” असे मला म्हणावेसे वाटले पण प्रत्यक्षात मी म्हणालो, “ नाही ते अजून आलेले नाहीत.

तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला व पुस्तकांवर नजर फिरवली. तेवढ्यात तिचा रुमाल खाली गुळगुळीत फरशीवर पडला, का टाकला कोणास ठाऊक. मी तो उचलण्यासाठी पुढे गेलो पण घसरून नाकावर आपटलो. मी कसाबसा तो हातरूमाल उचलला. त्याच्या स्पर्शानेच माझ्या अंगावर रोमांच उठले. तिने माझे आभार मानले. माझ्याकडे पाहून ती इतकी गोड हसली की तिचे मधाळ ओठ तिच्या हास्यात विरघळले जणू. मग ती बाहेर गेली. मी स्वप्नवत अवस्थेत तेथेच एक तासभर बसलो. तेवढ्यात एका झाडूवाल्याने आत येऊन मला माझ्या तंद्रीतून जागे केले. नालायक कुठचा…‘ बुआ, साहेब बाहेर पडलेत आता तुम्ही घरी जाऊ शकता…”

मला ही आगाऊ मंडळी अगदी सहन होत नाहीत. एकदा तर एका बसमधे एकाने मला त्याच्या कळकट्ट हाताने मला तंबाखू मळून खाण्याचा आग्रह केला होता. आता त्याला कसे सांगू मी बँकेत एक अधिकारी आहे आणि घरंदाज आहे. आम्ही घरंदाज आहोत असे आमचे बाबा म्हणतात. मधे एकदा पोलीस आश्रमात आले होते, तेव्हाही तो पोलीस असेच म्हणाला होता, ‘ तुमच्यासारख्या घरंदाज माणसांकडून ही अपेक्षा नव्हती.” आता पोलीस म्हणाला म्हणजे आमचे घराणे घरंदाज असणारचनाही का? त्याला चांगलेच खडसावेसे वाटले मला..

पण त्यावेळी मात्र मी छत्री घेऊन डायरेक्टरच्या घराकडे घाईघाईने मोर्चा वळवला. तेथे बराच वेळ ती बाहेर येईल म्हणून वाट पाहिली. नंतर घरी येऊन पलंगावर बराच वेळ पडून राहिलो. एकदम उठलो आणि एक कविता खरडली.

तुला पाहिले
जन्माची ओळख पटली
माझ्या अस्तित्वालाच अर्थ उरला नाही
कसे जगू तुझ्याशिवाय प्रिये..

नंतर आठवले की ती कविता एका प्रसिद्ध कवीच्या कवितेची भ्रष्ट नक्कल आहे. फाडून टाकली.

संध्याकाळी मी परत एकदा डायरेक्टरच्या घरावर एक चक्कर मारली. ती बाहेर येईल या आशेने मी तेथे बराच वेळ रेंगाळलो. मला फक्त तिला एकदाच पहायचे होते. पण ती काही बाहेर आली नाही.

६ नोव्हेंबर

आमच्या हेडक्‍लार्कचे डोकं फिरलंय. मी ऑफिसमधे गेल्यागेल्या शिपायाने त्याचा मला बोलावले आहे हा निरोप दिला. मी टाकोटाक त्याच्या केबिनमधे गेलो. गेल्यागेल्या त्याने मला फैलावर घेतले, “ तुला वेड लागलंय का? नाही तुझ्या डोक्यात महमदी कल्पनांची कारंजी थुईथुई उडायला लागली आहेत म्हणून विचारतोय.”

नाही..का काय झालं?”

तुझ्या वयाचा तरी विचार कर आणि मग त्या मुलीच्या मागे लाग. तुला काय वाटले मला काही कळत नाही? ती कुठे आणि तू कुठे? तू एक फडतूस कारकुनही नाहीस. एक मोठे शून्य आहेस तू. आणि ते सुद्धा असले की ज्याने कुठल्याही आकड्यांची किंमत वाढणार नाही. तुझी एक दमडीची किंमत नाही. एकदा जरा आरशात पहा म्हणजे कळेल. व्यंगचित्रात सुद्धा चेहरे बरे दाखवतात असा तुझा चेहरा. तुझ्या डोक्यात असले विचार येतात तरी कुठून?”

नरकात खितपत पडोत त्याची पितरे आणि तो ! त्याचा स्वत:चा चेहरा डोस चिकटवलेल्या औषधाच्या बाटली सारखा दिसतो कारण बावळट त्याचे कुरळे केस मागे वळवतो तर कधी कपाळावर ओढतो. स्वत:ला फार हुशार समजतो साला. तो माझ्यावर का डूख धरून आहे हे मला चांगलेच माहीत आहे. डायरेक्टरची माझ्यावर मर्जी बसली आहे म्हणून जळतो माझ्यावर. बाकी काही नाही. पण मी कशाला त्याची पर्वा करू ? या हेडक्लार्क नावाच्या जनावराला एवढे महत्त्व का द्यायचे? गळ्यात सोन्याची साखळी आहे म्हणून, का चमकणारे बूट घालतो म्हणून. का चांगले टाय घालतो म्हणून ? अरे मी पण काही एखाद्या फडतूस हेडक्लार्कचा मुलगा नाही. माझे घर पाहिले नाहीस अजून. महाल आहे महाल. अर्थात माझ्या बापाचा आहे पण मी तेथेच राहतो ना. थोडे दिवस थांब. माझे वय आत्ताशी बेचाळीस आहे. मी नाही तुला मागे टाकले तर माझे नाव नाही सांगणार. मीही गळ्यात सोन्याची साखळी अडकवीन, महागडे कपडे घालेन व पायात चमकणारे बूट घालेन.

पण माझ्याकडे पैसे नाहीत. काय करू ? बापाकडे रग्गड पैसा आहे पण मला हात लावून देत नाही. म्हणे मी काही करत नाही. बँकेतील नोकरी टिकवली तरी खूप आहे. काय करायची आहे असली नोकरी ? पण आश्रमात नको जायला. भीती वाटते मला आश्रमाची. असो

थोडक्यात पैसे नाहीत

८ नोव्हेंबर

आज दस्तूरमधे इंग्लिश नाटकाला गेलो होतो. रशियन लेखकाचे हाउस ऑफ फूल्स हे कोणीतरी इंग्रजीमधे रुपांतर करून सादर केले होते. बरेच नट पारशी होते. कित्येक दिवसांनी पोट धरून हसलो. नाटक विनोदी आणि बोचरे आहे. मधून मधून गाणीही आहेत. व्यापारी कसे फसवतात, त्यांची मुले कशी व्यभिचारी आहेत व सभ्य माणसांबरोबर कशी उद्धट वागतात याचे चांगले चित्र उभे केले आहे. अर्थात व्यापाऱ्यांना काय नावे ठेवायची म्हणा ! आमचा बापही हेच करतो. व्यापारी मालात, पैशात फसवतात तर आमचा बाप शिष्यांच्या आत्म्यांना फसवून त्यांचे पैसे काढून घेतो. नुकतेच ऐकले की आमच्या बापाने सर्व शिष्यांना मठाची नवी इमारत बांधण्यासाठी पगाराच्या दोन टक्के रक्कम देणगी द्यावी असे आवाहन केले आहे. आणि ते मूर्ख लोक देतील याची मला खात्री आहे. आणि माझ्याकडे साधे नाटक पहायला पैसे नाहीत. बापाची जागा मिळाली तर मी रोज मठात नाटके लावेन आणि सगळ्यांना फुकट दाखवेन. पण बाप मेल्याशिवाय त्याची जागा मिळणार नाही आणि नंतरही त्याच्या शिष्यांनी दिली तर मिळणार. काहीतरी केले पाहिजेकाहीतरी शक्कल लढवायला पाहिजे

गंमत म्हणजे नाटकात टीकाकारांवर बोचरी टीका केली आहेम्हणे लेखकांच्या फक्त चुकाच काढतात. इतक्या की लेखकांना जनतेपुढे पदर पसरून रक्षणाची भीक मागावी लागतेअसे काहीतरी लिहिले होते त्यात. ही नवनाट्य चळवळीतील मंडळी कमाल लिहितात बुआ. मला त्यांची नाटके फार आवडतात. सहजा सहजी मी ती चुकवित नाही अर्थात खिशात पैसे असले तर. बँकेतील माझे सहाध्यायी अडाणी आहेत. खर्डेघाशी शिवाय त्यांना काहीही येत न आणि तिकीट काढून तर मुळीच नाही. कोणी फुकट तिकिटे ओंजळीत टाकली तर हे जाणार

एका नटीने एक गाणे फारच सुंदर सादर केले. मला तर तिची आठवण झाली

९ नोव्हेंबर.

आज सकाळीच आठ वाजता ऑफिसमधे गेलो. हेडक्लार्कने मी लवकर आलो होतो तरीही माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. मी पण तो या जगात नसल्यासारखा ऑफिसमधे वावरलो. मी कागदपत्रे वाचली आणि सगळी नीट संगतवार लावून ठेवली. चार वाजता मी बँक सोडली आणि मुद्दाम वाट वाकडी करून डायरेक्टरच्या घरावरून गेलो. पण तेथे कोणीच दिसले नाही. रात्रीच्या जेवणानंतर झोप न आल्यामुळे बराच वेळ बिछान्यात तळमळत पडलो.

११ नोव्हेंबर

आज डायरेक्टर साहेबांच्या केबिनमधे बसून त्यांची भारी पार्करची जुनी पेनं दुरुस्त करून दिली. सगळे हँडक्राफ्टेड होती. त्यात आमच्या बाईसाहेबांचेही एक होते. ते जरा जास्त काळजीपूर्वक हाताळले. या सगळ्यात बराच वेळ चांगला गेला.

आमच्या साहेबांना त्यांच्या टेबलावर अशी भारी पेनं ठेवायला फार आवडते. त्यांची बुद्धिमत्ता फार कुशाग्र आहे. ते नेहमीच शांत असतात पण ऑफिसमधील अगदी किरकोळ बाबी सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. आमचा बापही बँकेत कारकून होता. पण स्वामी झाल्यापासून त्यांचे पेन सुटले. पुस्तके तर ते कधीच वाचत नव्हते. आमचा बाप म्हणजे अत्यंत सामान्य बुद्धिमत्तेचा माणूसबँकेतील कारकुनी सोडून अध्यात्मात पडला आणि गडगंज पैसा मिळवला. मला त्याचा आणि त्यांच्या शिष्यांचा तो ढोंगीपणा मुळीच आवडत नाही. आई गेल्यावर तर काय आमचा बाप आश्रमात रहायला गेला. तेथे काय रंगढंग उधळले असतील त्याने त्याला माहीत आणि त्याच्या देवाला माहीत. पण आमच्या डायरेक्टर साहेबांचे तसं नाही. त्याच्या डोक्यात डोकावून पहायला आवडेल मला. म्हणजे एवढी बुद्धी असते म्हणजे मेंदूत नक्की काय वेगळे असते हे कळेल. कापावा का त्याच मेंदू एकदा? मला एकदा त्यांच्या मित्रमंडळीत मिसळायचे आहे. कसल्या गप्पा मारतात हे पहायचे आहे कित्येकदा त्यांना विचारावे असे मला फार वाटते पण ते समोर आले की माझी जीभ घशातच अडकते

साहेबांच्या घरी अनेक वेळा जाणे झाले पण ती मात्र कधीच भेटली नाही. बहुतेक ती नसतानाच ते मला बोलावत असावेतनाही पण ते असे मुद्दाम नाही करणार . उमदा माणूस आहे. त्यांच्या घरात एक जादा खोली आहे आणि त्या खोलीमागे एक खोली आहे जिचा विचार केला तरी माझ्या छातीतील धडधड वाढते. आरसेमहालच आहे तो. मांडणीत उंची काचेचे सामान सुबकपणे मांडून ठेवलं आहे. पण मला महाराणींच्या कपडे बदलण्याच्या खोलीत खरा रस आहे. तेथे अनेक प्रकारची अत्तरं मांडून ठेवलेली मला पहायची आहेत. श्वास घ्यायलाही भीती वाटते अशी सुगंधी अत्तरेपण गप्प बस जरा

आज एक भन्नाट कल्पना डोक्यात आली. त्या दोन कुत्र्यांचे संभाषण मला आठवले. ‘चला बरं झालं. आता काय करायचंय हे स्पष्ट झालं’ मी मनाशी म्हटले. त्या दोन मूर्ख कुत्र्यांचा पत्रव्यवहार काहीतरी करून वाचण्यासाठी मिळवायला पाहिजे. कदाचित त्यात मला माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सापडतील. आमचा बापही असेच म्हणतो, ‘माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. पैसे फेका उत्तरे मिळवा.पण ही कुत्री मला जास्त प्रामाणिक वाटतात. तीच बरी

मी यापूर्वीच एकदा मन्याला एकांतात गाठले होते. ‘हे बघ मन्या आपल्याशिवाय आता येथे कोणी नाही. मी दरवाजाही बंद करून घेतो म्हणजे तुला कसलीही भीती नको. मला तुझ्या मालकिणीची सगळी माहिती दे ! मी कोणालाही सांगणार नाही.” पण त्या बदमाष कुत्र्याने शेपूट पायात घातली. मागे सरकून त्याने आपले अंग गदागदा हलवले आणि काही ऐकलेच नाही अशा अविर्भावात बाहेरचा रस्ता पकडला.

फार पूर्वीपासूनच माझे मत आहे की कुत्री माणसांपेक्षा खूपच हुशार असतात. ते बोलू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे ते हे रहस्य उघड करत नाहीत. त्यांचे सगळीकडे अगदी बारीक लक्ष असते. त्यांच्या तिखट नजरेतून काहीच सुटत नाही. उद्या काहीही झाले तरी मला नव्यापुलाजवळ मनीच्या घरी गेलेच पाहिजे. आणि जर असेल नशिबात तर मन्याने मनीला लिहिलेली सगळी पत्रे मिळतील…..

१२ नोव्हेंबर

आज दुपारी दोन वाजता मी काहीतरी करून मनीची गाठ घेण्यासाठी निघालो. मला तिला काही प्रश्न विचारायचे होते. त्या कॉजवेच्या भागातील हवेचा एक प्रकारचा दर्प मला मुळीच आवडत नाही. बहुतेक गटाराचा असावा. शिवाय प्रत्येक घरातून पेटलेल्या चुलींमुळे सगळी कडे नुसता धूर भरून राहिला होता. अगदी जीव घुसमटून टाकणारा धूर.

मी दुसर्‍या मजल्यावर गेलो व बेलचे बटण दाबले. एका सुंदर पण चेहर्‍यावर ठिपके असलेल्या तरुणीने दार उघडले. “कोण हवंय?”

मला तुमच्या कुत्र्याशी जरा बोलायचंय.”

फारच साधी मुलगी होती ती. तिचा कुत्रा जोरजोरात भुंकत पळत तेथे आला. मला त्याला पकडायचे होते पण त्या नालायक कुत्रीने माझे नाक तिच्या दातात पकडले. तेवढ्यात मला कोपर्‍यात तिची झोपण्याची टोकरी दिसली. ‘हंऽऽ मला हेच पाहिजे होतं’. मी पळत तेथे गेलो. ती पालथी केली. व कागदाच्या तुकड्यांचा एक गठ्ठा बाहेर काढला. त्या कुत्रीने हे पाहिल्याबरोबर माझ्या पोटरीचा चावा घेतला. मी केलेली चोरी पहाताच ती माझ्याकडे हिंस्रपणे बघत गुरगुरली. पण माझे काम झाले होते. मी तिला म्हटले, “ त्याची आता जरुरी नाहीबाय ! बाय !”

हा सगळा प्रकार पाहून त्या मुलीला मी वेडा असल्याची खात्री पटली असणार. ती घाबरली.

मी घरी पोहोचल्यावर मला वाटले लगेचच दिवसाउजेडी ती पत्रं वाचायला बसावं कारण रात्री मला नीट दिसत नाही पण मोलकरणीने फरशी पुसायला घेतली होती. यांना हा नसता उद्योग नको त्यावेळी करायला कोण सांगतं कोण जाणे. चडफडत मी मग जरा चक्कर मारायला गेलो. चालता चालता काय घडले त्यावर विचार करू लागलो. आता मला त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी जाता येईल. कुत्री ही अत्यंत हुशार असतात. त्यांना राजकारणातले सगळे कळते. या पत्रात माल जी माहिती हवी आहे ती सगळी मिळणार याची मला खात्री आहे. विशेषतः: डायरेक्टर साहेबांच्या स्वभावाबद्दल व त्यांच्या नातेवाईकांबद्दल. शिवाय या पत्रांतून तिच्याबद्दल….. गप्प बसायला काय घेशील?

१३ नोव्हेंबर.

आता बघू. पत्रातील अक्षर तसे वाचता येतंय पण जरा कुरतडल्यासारखं दिसतंय….

प्रियतमे मने,

तुझ्या या अत्यंत सामान्य, फालतू नावाची मला सवय होणे कठीणच आहे. त्यांना तुझ्यासाठी दुसरे चांगले नाव सुचले नाही का? मनीशीऽऽऽऽ किती बंडल आणि अतिसामान्य नाव. पण त्याच्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आपण एकमेकांना पत्रं लिहिण्याचा निर्णय घेतला ते एका अर्थाने छानच झालं असे म्हणायला हवे.

(पत्र तसे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर लिहिलंय. आमचा हेडक्‍लार्कही एवढे अचूक लिहू शकत नाही. लेकाचा विद्यापीठात होता म्हणे.)

आपल्या भावना, विचार आणि मतांची देवाणघेवाण करणे. मला वाटते या जगातील सगळ्यात निर्भेळ आनंद देणारी ही गोष्ट असावी.

(हंऽऽऽऽ हे वाक्य कुठल्यातरी पुस्तकातील चोरलेले आहे हे निश्‍चित. कुठल्या ते आता आठवत नाही.)

जरी मी आमच्या घराचा दरवाजा एकट्याने ओलांडलेला नाही तर मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. किती आनंदात आयुष्य चालले आहे माझे. माझी मालकीण, जिला तिचे वडील नूतन अशी हाक मारतात, ती माझ्या प्रेमातच पडली आहे.

( अरे लबाडा…..पण गप्प रहा….)

तिचे वडीलही मला कधी कधी प्रेमाने कुरवाळतात. मी ताज्या दुधाचा चहा आणि क्रीमची बिस्किटे खातो. होय लाडके मला तुला सांगण्यास बिलकुल लाज वाटत नाही की मला ती किचनमधे टाकून दिलेली हाडे मुळीच आवडत नाहीत. मी फक्त हाडांमध्ये मगज असलेली तित्तरची हाडे चघळतो. रिकामी हाडे मला बिलकुल आवडत नाहीत. पण मला सगळ्यात तिरस्कार कशाचा वाटत असेल तर माणसांच्या कुत्र्यांना उष्टे खायला घालण्याच्या सवयीचा. घाणेरडे…. अर्थात कधी कधी आपल्या भिडस्त स्वभावामुळे आपण ते खातो

( हा काय बावळटपणा लावलायदुसरे काही लिहायला मिळाले नाही वाटतं यांना. पुढच्या पानावर कदाचित काहीतरी मिळेल…)

येथे काय चालते हे मी तुला सांगतो. आमच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे नूतन ज्याला बाबा म्हणून हाका मारते तो. फारच विचित्र माणूस आहे.

( आमच्या बापाइतका निश्‍चितच नसणार. पण बघुया काय विचित्रपणा करतो तोपण आता निश्‍चितच काहीतरी गवसणार. मी म्हटले नाही, त्यांचे सगळीकडे बारीक लक्ष असते आणि हे कुत्रे पक्के राजकारणी असतात..

…. विचित्र माणूस. बहुतेक वेळा तो शांत असतो. क्वचितच बोलतो. पण मागच्या आठवड्यात तो एक कागद हातात घेऊन स्वत:शीच बडबडत होता, ‘मिळेल का मला तेमिळेल का…?” दुसरा हात त्याने आकाशात पसरला होता. एकदा तर माझ्याकडे वळून ते म्हणाले, “ मन्या तुला काय वाटते. मिळेल का मला?ते काय म्हणत आहेत यातील एकही शब्द मला कळला नाही. मी त्यांच्या बुटाला शेपटी घासली व तेथून निघून गेलो. पुढच्याच आठवड्यात सकाळी बँकेचे अनेक कर्मचारी, अधिकारी आमच्या घरी आले. त्यांनी सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर जेवणे अगदी हसतखेळत झाली. मला चांगलं आठवतंय.

( हंऽऽ म्हणजे ते फारच महत्त्वाकांक्षी दिसतात..लक्षात ठेवले पाहिजे. माझी खरी महत्त्वाकांक्षा बाबांची जागा घ्यायची ही आहे पण बाबा आश्रमात पाऊल टाकून देत नाहीत. विचारले तर ‘शहाणा आहेस’ असे उत्तर देऊन गप्प करतात.)

माफ कर प्रिये..मी आता पत्र पुरे करतो…..(..….) उद्याच मी हे पत्र पूर्ण करेन वचन देतो तुला

सांगितल्याप्रमाणे लाडके मी परत पत्र लिहायला घेतोय. आज माझी मालकीण नूतन..

( हंऽऽऽ बघुया आता काय लिहितोय तो नूतनबद्दल..)

फारच उल्हसित दिसत होती. आज ती कँपात एका डिस्कोथेकमधे नाचायला गेली होती. ती नसताना त्यामुळेच मला शक्य झालंय. तिला नाचायला फार आवडते. पण तिला चांगले कपडे घालण्याचा फार कंटाळा येतो. नाचून एवढा कसला आनंद मिळतो हे मला अजून उमजलेले नाही. कधी कधी ती रात्री जाऊन पहाटे गुपचूप घरी येते. त्यावेळी मात्र मला गप्प रहावे लागते. तिच्या मलूल चेहर्‍याकडे पाहून मी सहज सांगू शकतो की तिने रात्रभर काही खाल्लेले नाही. मी तर असे न खाता राहूच शकत नाही. मला जर कोंबडी मिळाली नाही तर माझं काय होईल ते सांगता येत नाही. अंडी ठीक आहेत पण गाजरं, ढोबळी मिरची माझ्या अन्नात मला मुळीच चालत नाहीत

(लिहिण्याची पद्धत फारच आगळीवेगळी आहे. कोणी माणसाने लिहिले नसणार हे लगेचच लक्षात येते. सुरवात तर फारच छान केली आहे पण नंतर मात्र वळणावर गेलेमी दुसरे पत्र वाचायला घेतो. यावर तारीख नाही.) (आमचे वडीलही महाराज होण्यापूर्वी आईला पत्रे लिहायचे म्हणे. नंतरही ते पत्र लिहायचे पण त्यांच्या लाडक्या शिष्येला. एक विधवा होती ती. होतीच म्हणायला पाहिजे. कारण आता ती या जगात नाही. तिचा संशयास्पद मृत्यू झाला म्हणे. त्यानंतर बहुधा आमच्या बापाने पत्रं लिहिण्याचे बंद केले ते केलेच..)

.. लाडके वसंत ऋतूचं आगमन किती आल्हाददायक असते नाही? कोणाची तरी आस लागल्यासारखे माझे हृद्य तडफडते आहे. माझ्या कानात काहीतरी गुंजन करतंय आणि मी कित्येक वेळा एका पायावर उभा राहून दाराकडे टक लावून बघत बसतो. तुला सांगायला हरकत नाही, माझे चाहते भरपूर आहे. मी बर्‍याच वेळा खिडकीत बसून ते जा ये करत असताना त्यांच्याकडे पहात बसतो. तुला सांगतो परमेश्वराने काय काय नमुने जन्माला घातले आहेत….! काही बावळट, पाळलेले कुत्रे, चेहर्‍यावरची माशी हालणार नाहीत असे कुत्रे रस्त्यावर एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसारखं चालत असतात. त्यांना वाटत असते की सार्‍या जगाचे डोळे त्यांच्यावरच खिळलेले आहेत. त्यांच्याकडे तर मी ढुंकूनही पहात नाही. काय पण एकेक नमुने पहायला मिळतात

आणि समोरच्या खिडकीत एका अक्राळविक्राळ बुलडॉग असतो. एवढा मोठा की बस्स.. जर तो मागच्या पायावर उभा राहिला तर नूतनच्या वडिलांपेक्षाही कदाचित उंच होईलअर्थात त्याला मागच्या पायावर उभे रहाता येईल की नाही ही शंकाच आहे. हा ठोंब्या अत्यंत निर्लज्ज आहे. मी त्याच्यावर गुरकावतो पण त्याला त्याचे काहीही वाटत नाही. त्याने त्याच्या कपाळावर आठ्या घातल्या तरी हरकत नाही पण तो माझ्याकडे सरळसरळ दुर्लक्ष करतो. मी जर थोडा भुंकलो तर तो जीभ बाहेर काढतो, कान पाडतो आणि परत खिडकीबाहेर नजर लावतो. रानटी ! पण लाडके मला काहीजण आवडतात बरका. तो शेजारच्या कुंपणात सरपटत शिरणारा कुत्रा मला खूपच आवडतो. त्याचे नाक किती सरळ आणि सुंदर आहेत्याचे नावही मस्त आहेजॉनी ..कुठल्याशा सिनेमावरून ठेवले आहे म्हणे.

( काय साला फालतूपणा चालवलाय यांनी. कशाला कागद काळे करतात कोणास ठाऊक. मला माणसांबद्दल सांगा रे. माणसांबद्दल. त्याने माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल. दिशा मिळेल. जाऊ देत . मी दुसरे पत्रच वाचतो…)

(आमचा बाप तर कागद काळे करायच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या आवाजात जादू आहे म्हणे. स्वत: वेडा आहे पण दुसर्‍याला वेड लावतो. शिवाय लिहिले म्हणजे पुरावा मागे राहतो. अक्कल उघडी पडते….)

नूतन टेबलावर बसून काहीतरी भरतकाम करीत होती. आमची नूतन घर कामातही तरबेज आहे बरं का…! मी नेहमीप्रमाणे खिडकीबाहेर पहात टवाळक्या करत होतो. तेवढ्यात घरचा नोकर आला व म्हणाला, “साहेब आले आहेत..”

त्यांना घेऊन ये इथे…” “ मन्या, मन्या,कोण आहेत ते माहिती आहे का? ते गोरेपान गृहस्थ मोठे सरकारी अधिकारी आहेत. आणि काय त्याचे डोळे आहेत..निळेशार.. आणि मुख्य म्हणजे गारगोटी सारखे निर्जीव नाहीत तर तेजस्वी…”

नूतन पळतच तिच्या खोलीत गेली. पुढच्याच क्षणी एक उमदा तरुण आत आला. त्याने आरशात पाहून आपल्या केसांवरून हात फिरवला. खोलीवर नजर फिरवून तो तसाच उभा राहिला. मी तोंड फिरवून माझी जागा घेतली. तेवढ्यात नूतन आत आली. त्याच्याकडे बघून ती गोड हसली.

मी माझे लक्ष नाही असे भासवत खिडकीबाहेर पहात राहिलो. पण माझे कान त्यांच्या बोलण्याकडेच होते. लाडके एवढे कंटाळवाणे संभाषण मी माझ्या आयुष्यात ऐकले नसेल. काल नाचताना कोणाला जास्त झाली होती, कोणाला नाचता येत नाही, कोण नुसतेच जागेवरच जॉगींग केल्यासारखे नाचतात. कोण कसा दिसत होता आणि कोण कशी जास्त नटून आली होतीकोण एक लिना म्हणे तिचे डोळे निळे आहेत पण प्रत्यक्षात ते हिरवट आहेत….

मला कळत नाही तिला या माणसाविषयी एवढे काय प्रेम वाटते.. तो आला की अगदी खूष असते.

( काहीतरी चुकतेय इथे. या माणसाने तिला गटवणे अशक्यप्राय गोष्ट आहे. बघू पुढे काय आहे…)

हा माणूस दिसल्यावर जर तिला हसू फुटू शकते तर तिच्या वडिलांच्या केबिनमधे बसणार्‍या माणसाला पाहिल्यावरही तिला हसू फुटत असेल. तो तर अगदी कासवासारखा दिसतो..

(कोणाबद्दल बोलतोय तो?)

त्याचे नाव जरा विचित्र आहे आणि तो सारखा पेनं दुरुस्त करत असतो. त्याचे केस वाळलेल्या गवताच्या पेंडीसारखे आहेत. तिचे बाबा त्याला नोकर येणार नसला की घरी बोलवतात. त्याला पाहिले की नूतनला हसूच आवरत नाही.

(खोटारडा! हलकट!मला माहिती आहे तू एक नंबरचा खोटारडा आहेस. मला माहीत आहे माझ्यावर जळतो तू. आणि शिवाय तो हेडक्‍लार्कही तुला सामील आहे. तो तर माझा द्वेष करतो. तो माझ्याविरुद्ध कट कारस्थाने करतोअजून एक पत्र वाचले पाहिजे म्हणजे खरे काय ते कळेल.)

(बाबांनी आईला लिहिलेले एक पत्र मला पडताळात सापडले होते. गरीब बिचारी माझी आई. बाबांनी नुसत्या शिव्याच घातल्या होत्या तिला. पत्रावरची शाई अश्रूंनी पुसट झाली होती. काय झाले असेल बिचारीचे. फार सुंदर होती म्हणे ती. बाबा मात्र अगदीच कुरूप. मी बाबांवर गेलोय की काय? तिच्यावर पाळत ठेवायला बापाने खास माणसांची नेमणूक केली होती.)

प्रिय मने, मला माफ कर अगं बरेच दिवस तुला लिहायला वेळच मिळाला नाही. सध्या मी स्वप्नात तरंगतोय. कोणीतरी लिहिलेले आहे ना, प्रेम म्हणजे पुनर्जन्मच ! शिवाय घरात मोठी धामधूम चालू आहे. तो आता सारखा घरी येतो. नूतनचे वडीलही सध्या आनंदात आहेत. फरशी पुसणार्‍या बाईंना स्वत:शीच बडबडण्याची सवय आहे. त्यांच्या बडबडीतून मला कळले की लवकरच नूतनचे लग्न होणार आहे.

( मला पुढे वाचवले नाही.)

हे सगळे मोठ्या हुद्द्यांवरच्या लोकांसाठी आहे. तिला योग्य वर मिळावा अशी कोणाची इच्छा नाही. सगळा पैशाचा खेळ. मीही इंदूरचा राजा असतो तर तिला मागणी घातली असती. मग या सगळ्या लोकांची तडफड पहायला मजा आली असती. ते दोघे तर त्यांच्यावर थुंकण्याच्या लायकीचे पण नाहीत. पण काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्या मूर्ख कुत्र्याच्या पत्रांचे फाडून फाडून हजार तुकडे केले व कचरा पेटीत टाकले

३ डिसेंबर.

हे लग्न होणे शक्यच नाही. ही अफवाच असणार. तो एक मोठा सरकारी अधिकारी असला म्हणजे माझ्यापेक्षा काय वेगळे आहे त्याच्याकडे? या अडाणी समाजात त्याला मान आहे एवढेच. तसा तर तो माझ्या बापालाही आहे आणि त्याच्यानंतर मलाही मिळणार आहे अर्थात मी ती जागा मिळवली तर. पण त्यासाठी काय करावे लागणार आहे याची मला कल्पना नाहीठीक आहे कळेल पुढे केव्हातरी. त्याचा हुद्दा त्याला कपाळात तिसरा डोळा देत नाही ना त्याचे नाक सोन्याचे आहे. इतरांसारखेच नाक आहे त्याला. त्या नाकातून तो जेवत नाही ना खोकत. इतरांसारखा किंवा माझ्यासारखा फक्त शिंकतोच ना? मला या रहस्याचा भेद करायलाच पाहिजे. दोन माणसात हा फरक कशामुळे पडतो हे शोधायला पाहिजे.. मी फक्त एक साधा कारकून का झालो

कदाचित मी इंदूरचा राजा असेनही फक्त एखाद्या कारकुनासारखा दिसत असेन. कदाचित मलाच मी कोण आहे हे माहीत नसेल. इतिहासात अशा कितीतरी घटना आहेत ज्यात एखादा भिकारी एकदम संस्थानिक निघतो किंवा एखादा कामगार श्रीमंत व्यापार्‍याचा हरवलेला मुलगा निघतो. आपले सिनेमे तर अशा गोष्टींनी खच्चून भरले आहेत. जेथे धूर आहे तेथे खाली काहीतरी पेटलेले असतेच असे म्हणतात. समजा उद्या मी एकदम इंदूरी पागोट्यात व हिर्‍यांचा शिरपेच घालून अवतरलो तर ती काय म्हणेल? ओवाळेल का मला? तिचे वडील, आमचे डायरेक्टर साहेब काय म्हणतील? ते महत्त्वाकांक्षी आहेत, लॉजचे सदस्य आहेत. निश्‍चितच ते फ्रीमॅसन आहेत. मी शोधून काढलं आहे. त्यांनी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी मला ते माहीत आहे. माझ्यासाठी फारच सोपे होते ते. आमचा बापही एका लॉजचा सदस्य आहे नामाझा बाप व हा दोघेही प्रथम भेटणार्‍या माणसाशी हस्तांदोलन करताना फक्त पहिली दोन बोटे पुढे करतात. मी पाहिलंय ना.. मी एखादा संस्थानिक नाही होऊ शकणार का? बाबांना सांगितले तर ? ते परमेश्वराचे एजंट आहेत असे म्हणतात. किंवा कमीतकमी बँकेचा मॅनेजर तरी? मी एक कारकून का आहे? त्यापेक्षा जास्त काहीतरी का नाही?…

५ डिसेंबर

आज सगळी सकाळ वर्तमानपत्रे वाचण्यात घालविली. इंदूरला विचित्र गोष्टी घडत आहेत. मला काही सगळ्या समजल्या नाहीत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्या संस्थानाची गादी रिकामी आहे. गादीचा वारस शोधण्यात कारभाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय कारण दंगे सुरू झाले आहेत.

हे सगळे मला विचित्र वाटतंय. गादी रिकामी कशी काय राहू शकते? काही लोक म्हणतात की त्या गादीवर एक स्त्री बसणार आहे. एक स्त्री कशी काय गादीवर बसू शकते? अशक्य ! फक्त राजाच गादीवर बसू शकतो. ते म्हणतात की तेथे राजाच नाही पण ते कसे शक्य आहे संस्थानाला राजा नाही असे कसे होईल? राजा असेल पण कुठेतरी लपला असेल. तो तेथेच असेल पण कदाचित अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे, किंवा राजकीय अस्थिरतेमुळे किंवा दुसर्‍या मंत्र्यांच्या कटकारस्थानांमुळे त्याने सध्या लपण्याचे ठरवले असेलकाय माहीतकदाचित इतरही कारणेही असतील.

८ डिसेंबर.

मी बँकेत जाणारच होतो पण विचारपूर्वक गेलो नाही. मी सतत त्या इंदूरच्या भानगडीबद्दल विचार करीत होतो. एखादी स्त्री कशी काय राज्य करू शकते हा विचार काही माझ्या मनातून जात नव्हता. याला सरकारने परवानगीच दिली नाही पाहिजे. बाकीचे संस्थानिक काय करताएत? इतर संस्थानिकांमधेही खळबळ माजली आहे. ग्वाल्हेरमधे ही बंडाळी माजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत असे म्हणतात. या सगळ्या बातम्यांनी मी हादरून गेलो. स्वयंपाक करणार्‍या बाईंनीही हे ओळखलंय.

साहेब आज तुमचे कशातच लक्ष नाही.” खरं होतं तिचे. लक्ष नसल्यामुळे मी दोन काचेची भांडी जमिनीवर फेकली.

रात्रीच्या जेवणानंतर मला थोडा अशक्तपणा वाटल्यामुळे ऑफिसचे घरी आणलेले काम करायचा मूडच नव्हता. मी तसाच गादीवर तळमळत पडून राहिलोअर्थात मनात सारखा इंदूरचे विचार येतच होते

आमच्या आश्रमाच्या गादीचा विचार करण्यात तसा अर्थ नव्हता. बाबा अजूनही मला त्या लायक समजत नव्हते. मनाला गोंधळात टाकणारे सर्व ग्रंथ मी वाचून काढले. त्याने मी अजूनच गोंधळात पडलो. बाबांना काही विचारले तर ते म्हणतात, “ एवढा घोडा झालास पण अक्कल येत नाही अजून. ते सगळे समजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यावर बडबड करता आली म्हणजे बस्स.. ” मला ते एवढे काही पटत नाही पण वाद टाळण्यासाठी मी आपला गप्प रहातो. पण एक दिवस त्यांचा आणि माझा वाद होणार आहे हे निश्‍चित

४३ एप्रिल..

आजचा दिवस विजय दिवस म्हणूनच साजरा करायला हवा. शेवटी इंदूरच्या गादीचा वारस सापडला. गादीला राजा मिळाला. तो मीच आहे. एखादी वीज पडावी तसे आजच हे माझ्या अचानक लक्षात आले. तसे मला एकदा बाबा मेले आणि मी त्यांची जागा घेतली असेही स्वप्न पडले होते. पण ते स्वप्न होते. हे अगदी सत्यात उतरले आहे.

मला हेच कळत नाही इतकी वर्षे मी स्वत:ला एक कारकून कसा काय समजत होतोमी कारकून आहे ही मूर्खपणाची कल्पना माझ्या डोक्यात कशी काय घुसली कोणास ठाऊक. नशीब यासाठी कोणी मला वेड्यांच्या इस्पितळात टाकले नाही. आता सगळे कसे स्वच्छ झालंय. मला एक कळत नाही हे सगळे पडद्याआड कसे झाकले गेलंय.. मला वाटतंय की लोकांना वाटते की त्यांचा मेंदू हा डोक्यात असतो. पण ते सगळे खोटे आहे. अरबी समुद्रावरून वाहणार्‍या वार्‍यातच मेंदू असतो. तो जेथे जाईल तेथे वास करतो.

आज पहिल्यांदाच मी सावित्रीला मी कोण आहे हे सांगितले. मी जेव्हा तिला सांगितले की आठवा तुकोजी होळकर तुझ्यापुढे उभा आहे तेव्हा तिने कपाळावर हात बडवून घेतला. मरायचीच ती. नैसर्गिकच आहे. राजघराण्यातील माणूस तिने आजवर पाहीलाच नव्हता ना !

मी पहिल्यांदा तिला शांत केले. तिला सांगितले की माझे बूट अस्वच्छ आहेत म्हणून काही मी तिला हत्तीच्या पायी देणार नाही. बायका म्हणजे एक नंबरच्या मूर्ख असतात. भव्यदिव्य गोष्टींमधे त्यांना रसच नसतो. ती घाबरली होती कारण तिला वाटले की सगळे संस्थानिक हे तुळोजीसारखे क्रुर असतात. मी तिला समजावून सांगितले की ते दिवस आता गेलेमी काही आज बँकेत गेलो नाही. कशाला जाऊ ? मुळीच जाणार नाही. त्या न संपणार्‍या कागदांच्या भेंडोळ्यात माला परत अडकून पडायचे नाही

८६ मार्च. दिवस आणि रात्रीमधे केव्हातरी

आज मला बोलाविण्यासाठी बँकेतून शिपाई आला. कारण मी गेले तीन आठवडे बँकेत गेलोच नव्हतो. त्याच वेळी नेमका आश्रमातून बाबांचा एक भगव्या कपड्यातील शिष्यही आला. त्या दोघांची गाठ पडू नये म्हणून मला किती धडपड करावी लागली. त्या भगव्याला मला एक भांडे फेकून मारावे लागले. माझा अवतार पाहून बिचार्‍याने पळ काढला. पण शिपाई चांगला दांगट होता. त्याने मला धरले व निरोप सांगितला. अर्थात माझा त्याला विरोध नव्हताच. मीही गंमत म्हणून बँकेत गेलो.

आमच्या बावळट हेडक्लार्कला वाटले की मी त्याच्या पुढे लोटांगण घालीन व गयावया करत काहीतरी खोटीनाटी कारणे देईन. पण तसे काहीच झाले नाही. मी त्याच्याकडे एक अनोळखी माणूस असल्यासारखे पाहिले. माझ्या नजरेत ना राग होता ना कीव. मग मी शांतपणे माझ्या जागेवर जाऊन बसलो. जणू काही झालेच नव्हते. त्यांची धावपळ पाहण्यासाठी मला शून्यात नजर लावावी लागली. ‘जर तुम्हाला कळले की तुमच्यासमोर कोण बसलंय तर तुमची किती धावपळ उडेल याची तुम्हाला कल्पनाच नाहीहेडक्‍लार्कही माझ्यासमोर लोटांगण घालेल. हो ! जसा हल्ली तो डायरेक्टर साहेबांपुढे घालतो.’

त्यांनी माझ्यासमोर एक कागदांचा गठ्ठा आदळला. मला त्या सगळ्या कागदपत्रांचे सार लिहून काढायचे होते म्हणे. पण मी त्यांना साधा स्पर्शही केला नाही. वाचणे तर दूरच.

थोड्याच वेळात ऑफिसमधे गडबड उडाली. शेवटी डायरेक्टरसाहेब येत आहेत अशी कुजबुजही सुरू झाली. कित्येक कारकुनांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरा टाकल्या. ते येताना त्यांचे लक्ष जाईल अशा हालचाली केल्या पण मी साधा हललो ही नाही. सगळ्यांनी आपले कपडे नीट केले, बटणे तपासली पण मी…. अंऽऽहं. डायरेक्टरची काय एवढी तमा बाळगायची? मी तो आला म्हणून उभे रहायचे? कदापि नाही.. हा कशाचा डायरेक्टर आहे. एखाद्या बाटलीच्या बुचासारखा दिसतो सामान्य बाटलीचं सामान्य बूचया पलीकडे काही नाही. त्यांनी माझ्यासमोर एक कागद सही साठी ठेवल्यावर मला जरा आश्चर्यच वाटले.

त्यांना वाटले मी नेहमीप्रमाणे माझी किरट्या अक्षरातील सही करेनबरोबर आहे त्यांचे. पण मी जेथे वर डायरेक्टरसाहेब सही करतात त्याच जागेवर मोठ्या लफ्फेदार अक्षरात माझी सही ठोकली…. तुळाजी होळकर (सातवा)… त्यानंतर पसरलेला सन्नाटा तुम्ही पहायला हवा होता. मी फक्त माझा हात हवेत झाडला व म्हणालो, ‘मला कुठलाही सभारंभ नकोय.. मग मी बाहेर पडलो व सरळ डायरेक्टर साहेबांच्या घराचा रस्ता पकडला.

ते घरी नव्हतेच. त्यांच्या दरवानाने मला थांबविण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्यावर असा डाफरलो की त्याने लगेचच शरणागती पत्करली.

मी सरळ नूतनच्या ड्रेसिंग रुममधे गेलो. ती आरशासमोर बसली होती. मला पाहताच ती दचकली. तोंडावर हात ठेवून, विस्फारलेल्या डोळ्यांनी ती दोन पावले मागे सरकली. पण ती उगीचच घाबरायला नको म्हणून मी कोण आहे हे तिला सांगितले नाही.

पण मी तिला सांगितले की जगातील सर्व सुखे तिची वाट पहात आहेत. इतकी की ती त्याची कल्पनाच करू शकणार नाही. आपल्या शत्रूंनी कितीही कट कारस्थाने केली तरीही आपले मिलन होणार आहे. एवढेच बोलून मी बाहेर पडलो. किती लबाड असतात या बायका.. आता मला बायका ही काय चीज असते हे चांगलेच कळून चुकले आहे. त्या खरे प्रेम कोणावर करतात हे कोणालाच कळत नाहीए म्हणे. चूक ! मला एकट्यालाच हे कळलं आहे. त्या सैतानावर प्रेम करतात. विनोद बाजूला ठेवला तरी ही ज्ञानी माणसे त्यांची वर्णनं करतात ना ती सगळी खोटी आहेत. तिचे खरे प्रेम हे सैतानावरच असतेअसते म्हणजे असते. संपलं. पुढच्या रांगेत बसलेली एखादी स्त्री मागे वळून एखाद्या पुरुषाकडे पहात असते तेव्हा तुम्हाला असे वाटण्याची शक्यता आहे की त्याच्या रांगड्या रूपाकडे पाहतेय. पण मुळीच नाही. त्या माणसा मागे दडलेल्या सैतानाकडे ती मोठ्या प्रेमाने पहात असते. त्याच्या आडून तो तिच्याकडेच पहात असतो. लक्षात घ्या. शेवटी ती त्याच्याशीच लग्न करते. खरंच त्याच्याशीच लग्न करते.

या सगळ्याच्या मुळाशी महत्त्वाकांक्षा आहे आणि त्याचे कारण आहे जिभेखाली असलेला एक फोड ज्याच्यात एक किडा लपलेला असतो. टाचणीच्या डोक्याच्या आकाराचा. आणि हे सर्व मोमीनपुर्‍यातील त्या न्हाव्याचे काम आहे. त्याच्या मधल्या बायकोबरोबर त्याला जगात इस्लाम धर्माचा प्रसार करायचा असतो. मी असे ऐकतो की माझ्या राज्यात आत्ताच बरीच जनता इस्लामी झाली आहे….

त्याला एकदा आमच्या आश्रमात सोडला पाहिजे. कशी धावपळ होईल आमच्या वडिलांच्या शिष्यगणाची.. विशेषतः भक्तिणींची.. आमच्या बाबांमुळेच इस्लामची स्थापना झाली आहेमाझी खात्री आहे.

आजची तारीख आठवत नाही. नाही तसे नाहीया दिवसाला तारीखच नाही.

आज मी खलिफासारखा वेष बदलून बाजारात फेरफटका मारायला गेलो. मी राजा असल्याचे एकही चिन्ह मी मागे ठेवले नव्हते कारण दरबार भरण्याआधीच जनतेने मला पहावे अशी माझी इच्छा नव्हती. अगोदर दरबारात दर्शन द्यावे आणि मग सामान्य जनतेला असेच मी ठरवले. सामान्य जनतेसमोर एकदम उभे रहायचे मला कमीपणाचे वाटले. काय माहीत जनता कशी प्रतिक्रिया देईल.. आणि शिवाय आत्ता या क्षणी माझ्याकडे होळकरी पगडीही नाही. मी एका नाटकाचे पोषाख पुरविणाऱ्या कंपनीला विचारुन पाहिले पण त्यांच्याकडे इंदूरच्या राजाचे कपडे नव्हते. गाढव लेकाचे..इंग्लडच्या राणीचे होतेकाय म्हणावे यालाअजूनही आमची गुलामी गेली नाहीअर्थात आश्रमातही सगळे परमेश्वराचे गुलाम त्याच्या एजंटच्या पायावर लोटांगण घालतातच की. काय होणार या गुलांमांचे कोणास ठाऊक. मला स्वत:ला या गुलामांचा मालक होण्यास फारच आवडेल. माझ्या भगव्या कपड्यातून मी इंदूरचे कपडे शिवून घेईन. नाहीतरी ते साधेच सुती कपडे आहेत. आश्रमात गादी मिळाल्यावर मखमली लागतील.. पण शिंप्याने ते बिघडवले तर? नको त्यापेक्षा मीच ते गुपचूप घरीच शिवीन. दारे खिडक्या लावून घेईन म्हणजे कोणी बघायला नको. बेतण्यासाठी मलाच कात्री चालवावी लागणार असे दिसते. काही हरकत नाही..

मला तारीख लक्षात नाही. सैतानाने ती नीट लक्षात ठेवली असणार. कपडे आता जवळजवळ तयार झाले आहेत. मी जेव्हा ते परिधान केले तेव्हा सावित्रीच्या तोंडातून एक अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. पण मी आत्ता लगेचच दरबारात दर्शन देणार नाही. दरबारी, मंत्री संत्री अजून आलेले नाहीत. एकट्याने दरबारात जाणे काही ठीक दिसणार नाही. माझे वैभव दिसणार नाही. प्रत्येक तासाला मी त्यांची उत्कंठेने वाट पहातोय.

आश्रमात केव्हा कळवायचे हाही एक प्रश्नच आहे. बाबांची तब्येतही आजकाल ठीक नसते. मधे त्यांची अँजियोग्राफी झाली असे सावित्री सांगत होती…. म्हातारा गचकतोय की काय.. आता इंदूरची गादी मिळाल्यामुळे आश्रमाची मला गरज नाही हे त्यांना सांगावे का? गप्प बस जराशहाणपणा नको

कारभार्‍यांना येण्यास एवढा का बरं उशीर झाला असेल? मला वाटते शिंद्यांनी त्यांना रस्त्यातच पकडले असेल. त्यांचा छळ केला असेल. मी कुठे आहे हे सांगण्यासाठी. आज मी पोस्ट ऑफिसमधे चौकशी करण्यासाठी जाऊन आलो. पण त्यांना कशाचीच कल्पना नव्हती. पोस्टमास्तर म्हणून एक ठोंब्या बसवलाय तिथे.

नाही हो ! माझे डोके खाऊ नका. येथे इंदूरचे कोणीही आलेले नाही. तुम्हाला जर त्यांना तार पाठवायची असेल तर खाइडकी क्र.३ वर जा फॉर्म भरा.”

छे! मी कशाला तार करू ? तारा तर डॉक्टरांचा कंपाऊंडर पाठवतो

३० फेब्रुवारी. इंदूर.

चला ! एकदाचा इंदूरला पोहोचलो म्हणायचा मी. घटना कशा फटाफट घडत गेल्या. इंदूरचे काही कारभारी व आश्रमातील काही कारभारी मला न्यायला आले होते. मी अर्थातच आश्रमातील लोकांना परत पाठवून दिले. नंतर कळाले की ते मला बाबांच्या बाराव्याला न्यायला आले होते. गेले एकदाचे. वेडे कुठले. मला एकट्याला टाकून गेले. मला न्यायला त्यांनी भली मोठी गाडी पाठवली होती व पुढेमागे हत्यारी संरक्षक बसवले होते. हे नेमलेले मला आठवत नव्हते पण गर्दी झाली तर त्यांचा उपयोग होईल. म्हणून मी त्यांना परत पाठवले नाही. आजकाल सगळे रस्ते लोखंडाचे असल्यामुळे सगळीकडे फटकन पोहोचता येते. आम्ही इतक्या वेगाने गेलो की अर्ध्या तासात आम्ही इंदूरच्या वेशीवर पोहोचलो. रम्य आहे हा प्रदेश.

माझ्या किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे. शिंद्यांपासून रक्षण करायचे म्हणजे ही असली तटबंदी पाहिजेच. मी आत पाऊल टाकल्याटाकल्या मला बरेच टक्कल केलेले लोक दिसले. मी लगेचच त्यांना ओळखले. सैनिक असणार ते. नाहीतर अधिकारीही असतील.

मला हाताला धरून घेऊन जाणार्‍या कारभार्‍याने एकदम भयंकर विचित्र गोष्ट केली. त्याने मला एका खोलीत ढकलले आणि म्हणाला, “ इथे गप्प पडून रहा. जर परत इंदूर हा शब्द तरी तोंडातून काढलास तर याद राख. इंदूरलाच पाठवीन तुला कायमचा.” पण मला माहीत आहे ही एक राजाची परीक्षाच असते. सामान्य माणसांची दु:खे राजाला कळावी म्हणून त्यांना तसे काही काळ वागविले जाते असे म्हणतात. मी परत इंदूरचे नाव काढल्यावर मात्र त्याने त्याच्या हातातील दांडुक्याने माझ्या पाठीवर सणसणीत दोन रट्टे हाणले. माझा जीव कळवळला. मला रडू फुटले पण मी ते मोठ्या प्रयासाने आवरले. राजाला असे रडणे शोभत नाही. कदाचित इंदूर मधे शौर्याची अशीच परीक्षा घेत असावेत. ते सगळे गेल्यावर मी माझ्या राज्याच्या कारभाराची माहिती घ्यायची ठरविली. आश्चर्य म्हणजे माझ्या लक्षात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आली. ती म्हणजे इंदूर आणि चीन हे एकच देश आहेत. ही मूर्ख अडाणी जनता त्यांना दोन देश समजते. मी प्रत्येकाला एका कागदावर इंदूर हा शब्द लिहायला सांगणार आहे. त्याला आढळेल की तो चीन असा लिहिला गेलाय.

या सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. मला खरी काळजी उद्याची आहे. उद्या सकाळी पृथ्वी चंद्रावर बसणार आहे आणि त्यावर बाबा. ते आत्तापर्यंत चंद्रावर पोहोचलेही असतील. त्यांना सूक्ष्मात जाऊन कुठल्याही ग्रहावर जाण्याची विद्या प्राप्त आहे नासध्या एका इंग्रजी शास्त्रज्ञाने हे पेपरात छापले आहे पण माझ्या बाबांनी मला केव्हाच सांगितले होते. सध्या इंदूरात लागलेले शोध स्वत:च्या नावावर खपवायचे हा परदेशी शास्त्रज्ञांचा उद्योगच झाला आहे म्हणापण एक सांगतो चंद्र इतका ठिसूळ आणि नाजूक आहे की मला त्याची काळजी वाटते. सध्या चंद्राची दुरुस्ती नेपाळमधे करतात त्यामुळे ती काही व्यवस्थित होत नाही. अत्यंत ढिसाळ काम. ते काम एक राय नावाचा नेपाळी माणूस करतो. हा तर इतका बथ्थड डोक्याचा आहे की बस. त्याने चंद्र दुरुस्त करताना ऑलिव्ह ऑईल आणि मेण वापरल्याने पृथ्वीवर सगळीकडे घाणेरडा वास पसरलाय. सगळ्यांना नाकावर रुमाल घेउन चालावं लागतंय. म्हणून आपल्याला आजकाल आपली नाकं दिसत नाहीत कारण ती सगळी चंद्रावर गेली आहेत

सगळं चित्र स्पष्ट आहे. पृथ्वी एवढी मोठी आहे की जेव्हा ती चंद्रावर बसेल तेव्हा सगळी नाकं चिरडली जातील. मी इतका अस्वस्थ झालो की मी लगेच बूट चढवले व बाहेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांना पृथ्वीला चंद्रावर बसण्यापासून परावृत्त करा हा आदेश द्यायचा होता मला.

मी बाहेर हॉलमधे पाऊल टाकले आणि मला त्या टकल्या पोलिसांनी घेरले. ती खरंच फार बुद्धिमान माणसं होती. मी जेव्हा त्यांना समजाऊन सांगितले, “ लोक होऽऽ आपल्याला चंद्र वाचवायला पाहिजे कारण पृथ्वी त्यावर बसणार आहे.” ते ऐकल्यावर राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे लगेच झटून कामाला लागले. काहीजण तर भिंतीवर चढून चंद्राला खाली घेण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात इंदूरचा पंतप्रधान आला. तो आल्यावर सगळ्यांची पांगापांग झाली. पण राजा असल्यामुळे मला तेथून हलता येईना. आश्‍चर्य म्हणजे त्याने मला परत दांडुक्याने बडवले व परत खोलीत ढकलले. इंदूरच्या मध्ययुगीन प्रथा अजूनही भक्कम आहेत म्हणायच्या

आज मी गोंधळ घातला. माझी वही ते हिसकावून घेत होते. शेवटी पंतप्रधान म्हणाले, “त्या वहिने काय त्रास होतोय तुम्हाला? लिहितोय ना तो त्यात ? लिहू देत..

त्याच वर्षी जानेवारीत पण फेब्रुवारी नंतर येणारा.

हा इंदूर कुठल्या प्रकारचा देश आहे हेच कळत नाही. यांच्या व यांच्या दरबारी परंपरा फारच कर्मठ दिसतात. मला समजतच नाहीत त्या. आज माझ्या डोक्यावरचे सगळे केस काढण्यात आले. मी त्यांना ओरडून ओरडून सांगतोय की मला भिख्खू व्हायचे नाही. पण त्यांनी माझे ऐकलेच नाही. हे कमी होतं की काय म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर बर्फाळ पाण्याची धार धरली. मी आजवर असला अत्याचार सहन केला नव्हता. मला जवळजवळ वेड लागण्याची वेळ आली होती. पण ही परंपरा का पडली याचे उत्तर मला कोणी देऊ शकले नाही. फारच घाणेरडी परंपरा आहे.

मला आश्‍चर्य वाटते ते याचे की या आधीच्या राजांनी या परंपरेचे उच्चाटन कसे नाही केले त्याचे. मला तर असे वाटते आहे की मी एका धर्मवेड्या, अतिरेकी टोळक्यांच्या हातात सापडलो आहे की काय. का इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या हातात सापडलोय ? पण मला हे समजत नाही की राजा या लोकांच्या हातात कसा सापडू शकतो. बहुधा हे सगळे कारस्थान ग्वाल्हेरचे असावे. त्यांना माझी हत्याच करायची आहे. पण शिंदे सरकार, मला माहीत आहे तुम्ही इंग्रजांचे हस्तक आहात. इंग्रज अत्यंत धूर्त आहेत याचा हा अजून एक पुरावासगळ्या जगाला माहिती आहे इंग्रजांनी तपकीर ओढली की ग्वाल्हेरमधे शिंका येतात

तारीख २५

आज पंतप्रधान माझ्या खोलीत आले. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकल्यावर मी खुर्चीखाली लपलो. जेव्हा त्यांना मी दिसलो नाही तेव्हा त्यांनी मला हाका मारण्यास सुरुवात केली. “ कारकुंड्याऽऽ, महाराजऽऽऽ तुळोजी महाराज….. पण मी गप्प बसलो. शेवटच्या हाकेला मी ओ देणार होतो पण मी मनाशी म्हटले, ‘साहेब मला फसवू नका. मी आता तुम्हाला माझ्या डोक्यावर पाणी ओतू देणार नाही.”

पण त्यांनी मला पाहिले होते. हातातील काठीने ढोसून त्यांनी मला बाहेर काढले. तो दंडुका फार लागतो. पण त्याचवेळी लागलेल्या एका शोधाने मला फार वेदना झाल्या नाहीत. ‘प्रत्येक कोंबड्याच्या पंखाखाली त्याचे स्वत:चे एक इंदूर असते.’ तो रागारागाने निघून गेला. जाताना मला शिक्षा करणार अशी धमकी देऊन गेला. मला त्याच्या दुर्बळतेचे हसू आले. कारण मला माहीत आहे तो एक खेळणे आहे इंग्रजांच्या हातातील….

३४ मार्च फेब्रुवारी ३४९

आता हे सहन होत नाही. देवा रे ! माझं काय करणार आहेत ते? का माझ्यावर सारखं बर्फाचं पाणी टाकतात? इतर वेळी ते माझ्याकडे लक्षही देत नाहीत. त्यांना मी दिसत नाही ना माझा आक्रोश ऐकू येतो. ते का माझा छळ करताएत? माझ्या सारख्या अत्यंत फालतू माणसाकडून त्यांना काय पाहिजे आहे तरी काय ? माझ्याकडे तर देण्यासारखे काहीच नाही.. माझे डोके ठणकतेय. इतके की सगळे जग उलथेपालथे होतं आहे की काय असे वाटतंय. मला वाचवा ! मला वाचवा कोणीतरीइथून बाहेर काढा.. माझ्या रथाला घोडे जोडा.. घंटा बडवा, बिगूल वाजवाआणि येथून मला बाहेर काढा. इतक्या दूर दूर घेऊन जा की पुढचे काही दिसणारच नाही.

त्या वेगातही मला आकाशात दूरवर एक तारा चमचम करताना दिसतोय. चंद्रप्रकाशात काळसर झाडे मागे पळताएत. पायाशी निळसर धुके तरंगत वर वर येतंय.. ढगात संगीत ऐकू येतंय. एका बाजूला समुद्र आहे तर एका बाजूला रांगण्याचा किल्ला. त्याच्या पलीकडे मला माझं गाव दिसतंय. ते माझं गावातलं घर तर नाही ? माझी आई खिडकीशी माझी वाट पहात थांबली असेल.

आई ! आईऽऽऽ माझ्यावर दया कर. तुझ्या या दुर्दैवी मुलाला वाचव. तुझा एक अश्रू माझ्या ठणकणार्‍या कपाळावर पडू देत. बघ त्यांनी माझी काय अवस्था करून ठेवली आहे ते.. या अनाथ मुलाला जरा तुझ्या उराशी धर. त्याला जायला दुसरी जागा नाही गं. ते त्याच्या मागे शिकारी कुत्र्यासारखे लागलेत.

आईऽऽऽ आई गंऽऽऽ तुझ्या या वेड्या मुलावर दया करपण तुला हे माहीत आहे का की तुर्कस्तानच्या राजाच्या उजव्या गालावर एक मोठा तीळ आहे….

४३ एप्रिल ३५०

आता मी मस्त आहे. आज आश्रमातील मंडळी मला सोडवायला आली होती. त्यांनी काय जादू केली कोणास ठाऊक. सगळेजण आज माझ्याशी नीट वागले.
आज कसलाही शॉक दिला नाही ना औषध.
मला घ्यायला साठे, जगताप आणि सचिन आणि बरेच लोक आले होते. न्यायला मोठी अलिशान गाडी आणली होती त्यांनी.

आश्रमात गेल्यागेल्या मी अंगावरील कपडे फाडून उघडा नागडा झालो. त्याबरोबर सगळे मला धरायला धावले. साठे सगळ्यांच्या पुढेत्याला पाहिल्या पाहिल्या माझ्या डोक्यात एक सणक उठली. या साठ्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली.. मी मूठ आवळली आणि त्याच्या थोबाडात इतक्या जोरात हाणली की तो कोलमडत मागे जाऊन पडला. त्याच्या अंगावर मी धावून गेलो. आता त्याला लाथेने तुडवावा म्हणून मी पाय उचलला तेवढ्यात त्यांनी तो दोन्ही हाताने धरला व माझ्या पायावर लोटांगण घातले. इतरांना वाटले तो माझा आशीर्वाद मागतोय. मग मीही त्याला आशीर्वाद दिला….

बघा मी म्हणत नव्हतो आपल्या महाराजांचे त्याच्यात काहीतरी आले असणार म्हणून….” साठे म्हणत होतासगळ्यांनी एकच जयजयकार केलामीही त्याला प्रेमाने आलिंगन दिले….

मी आकाशाकडे पाहून वर हात फेकले आणि बाबांना साद घातली,

बाबा बघा झालो की नाही मी शहाणा….. ?”

गोगोल निकोलाय याच्या ‘‘Diaries of a Madman” या कथेवर आधारित.
लेखक : जयंत कुलकर्णी.

या भाषांतराचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत.

 

 


Filed under: कथा

by जयंत at June 15, 2017 01:09 PM

June 14, 2017

Holy Cow! Vegan Recipes

Vegetable Cutlet

A Vegetable Cutlet is a spicy, crunchy, delicious and healthy Indian fritter made with a mish-mash of potatoes, carrots, peas, and green beans. It makes a perfect snack for kids and adults. A...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

by Vaishali at June 14, 2017 04:16 PM

June 13, 2017

माझ्या मना …

सेवानिवृत्ती………………..

मित्रांनो,

मित्रांनो, जस जसी सेवा निवृत्तीची वेळ जवळ येत होती मला त्याची ओढ जाणवत होती. अस वाटायचं कस वाटेल सेवा निवृत्त नन्तर. कल्पना रंगवत तो दिवस आलाच. ३१/०५/२०१७. आणि मी सेवा निवृत्त झालो.आनंदी झालो……

पण आता पुढे काय? हा मोठा प्रश्न समोर येऊन उभा राहिला.

मागच्या  काही दिवसांपासून माझ्या अंतर्मनात  एक   प्रश्न घोळत  आहे. आपण जन्माला येतो. बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्य,प्रोढावस्था, म्हातारपण असे जगत जगत आपला अंत होतो. संपूर्ण आयुष्य झटत राहतो. आणि शेवटी खाली हाती या जगातून निघून जातो. काहीच घेऊन येत नाही व काहीच घेऊन हि जात नाही. मग आपण का आयुष्य भर झटत राहतो. आणि आपल्या पासून या जगाला काय मिळते. फक्त आपण मुल जन्माला घालतो व येतेच सोडून जातो इतकेच. इतकाच हातभार आपण या जगाला लावतो. मग मुळातच देवाने आपणाला म्हणजे मानवाला का जन्माला घटल असेल? काहीच कळत नाही.

ईश्वराने मुळातच हे जग का निर्माण केल असेल? काय हेतू असेल त्याचा हे जग निर्माण करण्यामागे? कोणा कडे असेल का याच उत्तर????????????


Filed under: स्वानुभव

by Ravindra Koshti at June 13, 2017 02:44 PM

आतल्यासहित माणूस

पावसाच्या गोष्टी - २

वर्गामधे गणवेश न घालता बसणे यात कसली भारी गंमत आहे. पावसातच ते शक्य आहे.
एरवी शाळेत जाणं म्हणजे वाटेत इतक्या मैत्रिणींची घरं. आपली त्यांची वेळ जुळली तर आपण तिथून जात असताना त्या भेटणार. मग गप्पा मारत मारत, तुळशीबागेच्या गल्लीतले मांडलेले खजिने बघत बघत शाळेत पोचायचं यात केवढी मज्जा आहे. आख्ख्या दिवसातली धमाल त्या गप्पांच्यात आहे. पण पावसामधे शाळेत जाणं हा वैताग असतो.
पावसाळ्यात खांद्यावर दप्तर आणि वरून रेनकोट असं माकड बनून या गर्दीच्या गल्ल्यांमधून जायचं हे जरा कंटाळवाणेच. बाजीराव रोडवरून गेलं तरी दप्तरावरून रेनकोट घातल्यामुळे रेनकोटला गळ्याजवळ ही मोठी भेग. त्यातून टिप टिप पाणी आतमधे. दप्तरामुळे तो रेनकोट पुढून दुभंगून वर उचलला गेलेला. त्यात बराचसा स्कर्ट भिजलेला.
रस्त्याला साचलेले, समोरच्याच्या फटक फटक चपलांमुळे आपल्यावर उडणारे पाणी आणि चिखल.
हे असं ध्यान शाळेत पोचणार. वर्गातल्या सर्व खिडक्यांची तावदाने मुलींच्या टांगलेल्या रेनकोटसनी भरून जाणार.
सायकलवरून येणार्‍या मुली, बसने छत्री घेऊन येणार्‍या मुली, रिक्षाने येणार्‍या मुली आणि आमच्यासारख्या चालत येणार्‍या मुली सगळ्या भिजलेल्या. मध्यमवर्गीय शाळा त्यामुळे पावसापायी घरून कुणी गाडीने सोडायला येणे वगैरे प्रकार तसे दुर्मिळच. त्यात लक्ष्मी रोड. त्यामुळे पावसातही न भिजता येणार्‍या मुली नाहीतच. कितीही चिकचिक असली तरी पावसात न भिजता असण्याची कल्पनाही तशी नामंजूर करण्यासारखीच.
खूप भिजून गेल्यावर त्या शंभर (किंवा कमीही) वर्ष जुन्या दगडी इमारतीत बसायचे. थंडीने कुडकुडणे अपरिहार्य.
पण कसल्या कस्ल्या प्रॅक्टिसेससाठी थांबणार्‍या बालिकेकडे खेळासाठी शॉर्टस आणि टिशर्ट असणारच. अतिच भिजल्यावर शाळेचा स्कर्ट ब्लाऊज काढून वर्गात शॉर्टस आणि टिशर्ट घालून बसायचं. आख्ख्या पावसाळ्यातला तो गणवेशविरहीत शाळेचा दिवस बालिकेसाठी जाम मजेचा. त्यादिवशी गणवेश न घालूनही वर्तनपत्रिकेवर तारीख नाही पडायची.
पाऊस असा तेव्हापासून आवडतो तिला..

- नी

by Nee Pa (noreply@blogger.com) at June 13, 2017 02:08 PM

" ऐसी अक्षरे मेळवीन !"

​ज्याचा त्याचा पाऊस…

“ए रंग्याsss, शान्या चल की खेळाया. साळेच्या मागल्या बाजूला पावसाच्या पान्याचं लै भारी डबरं झालय. आ पोरं कवाच्यान वाट बगायलीत लेका तुजी? चल लौकर …..”
पुन्हा एकदा साद आली…
“इन्या तिसऱ्यां टायमाला हाका घालीत आलाय आये, जावु का?”
“जाशील रं लेकरा, येवडं काम सपलं की जा म्हनं.”
कपाळावरचा घाम पुसत रंग्याच्या मायनं सांगितलं आणि ती माऊली पुन्हा जोर लावून समोर ठेवलेल्या कुळवाच्या पात्यावर हातोड्याचे ठोके द्यायला लागली. रंग्या एकदा आशाळभूत नजरेने फर्लांगभर अंतरावर असलेल्या शाळेकड़े पाहीले. कदाचित मनातल्या मनात इथून न दिसणारा पण शाळेच्या वास्तुच्या मागे साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या त्या डबऱ्यात रंगलेला सोहळा त्याच्या डोळ्यासमोर तरळुनही गेला असेल. कोण जाणे?
निग्रहाने त्याने मान वळवली. अंगातल्या गंजीफराकाचा लांबलेला भाग वर ओढुन त्याने तोड़ावरचा घाम पुसला , नाक शिंकरलं. नंतर तसंच राहीलेला जिन्नस आत ओढून घेतला. आणि शाळेकडें पाहात आता तिथे आता नसलेल्या सवंगड्याला उद्देशुन जोरात पुकारा केला.
“आलुच रं इन्या, तुमी करा सुरु तवर..”
आणि पुन्हा एकदा सगळी ताकद एकवटत भट्टीचा भाता मारायला सुरुवात केली. समोरची भट्टी पोटात लागलेल्या भुकेच्या आगेसारखी भरारुन पेटलेली. रंग्याचं आपल्या मायच्या चेहऱ्यावर लक्ष गेलं. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर सतत भट्टीच्या आगीसमोर बसून बारीक बारीक फोड़ आलेले होते. डावा हात परवा जगदाळयाच्या नांगराचा फ़ाळ भट्टीतुन बाहेर काढताना होरपळलेला. त्याला तशीच ऐका धडूत्याची चिंधी गुंडाळून त्याच हातातल्या चिमट्याने तिने कुळवाचा फाळ पकडला होता आणि उजव्या हाताने त्यावर हातोड्याचे घाव घालीत होती.
“लै दुकायलय का गं आये?”
तशी मायनें नजर वर उचलली, हाताने हातोड्याचे ठोके चालूच ठेवत ती म्हणाली.
“न्हाय रं, आता नाय दुकत. धाच मिन्ट मार भाता. येवड़ा कुळव झाला की जा म्हनं खेळाया. बाकीचं काम सांच्याला करु म्हनं.”
बोलता बोलता तिने आजुबाजुला नजर फिरवली. चार पाच नागराचे फाळ, तीनेक औती, पराण्या, चाकाला ठोकायच्या काही लोखंडी पट्टया असं बरंच काहीबाही पडलं होतं. पावसाला तर सुरुवात झाली होती. आता पेरण्या सुरु होतील. त्याच्या आधी सगळी औजारं तय्यार व्हायलाच पाहिजेत. ती झाली तर त्येच्या बदल्यात थोडं पैकं मिळतील. 
“रंग्या, यंदाच्याला दिगुकाका पाटलांकडं दोन पायल्या धान बी मागून घ्यायचं ध्यान कर लेकरा. आन बायजाकाकी म्हनलीय, पायलीभर जवार आन मकाबी देते आसं. ”
रंग्याने मान हलवली आणि तो पुन्हा घामेजला होत भाता मारायला लागला. मायनें खोपटाच्या आत फाटक्या चटइवर पडलेल्या , खोकणाऱ्या रंग्याच्या दमेकरी बापाकडें एकदा बघितलं. पारावर बसल्या बसल्या मलाही त्याचं खोकणं स्पष्ट ऐकु येत होतं.
“तुजा बा धड़ असता तर तुजा खेळ सोडून तुला कामाला लावलं नसतं रं पोरा. पर ऐन पावसाच्या तोंडाव त्येचं दुकनं उचल धरल आसं कुणाला म्हायीत हुतं रं. काम घेटलेलं फुरं तर कराला फायजे का नाय? नायतर पेरण्या कश्या हुतील? लै नुस्कानी व्हइल लोकांची. आन आपली बी चूल पेटायला फायजे ना?” 
थोड्या वेळाने तिने ठोके थांबवले. कड़ोसरीचा बटवा काढून त्यातले काही पैसे रंग्याच्या हातावर ठेवले. 
“जा आता खेळाया. आन हे पैकं आसुदेत. खेळुन झालं की भजी खा म्हनं दोस्ताबरुबर, समदे मिळून खावा रे, नायतर एकटाच खाशील मुडद्या.” 
रंग्या हासतच नाक वर ओढत शाळेकडे पळाला. तिथे त्याचे दोस्त वाट बघत होते पहिल्या पावसाच्या पाण्याने केलेल्या डबऱ्यात शिवा शिवी खेळायला. 
“यार विशल्या, आपलं काही खरं नाही य्यार. आपलं आयुष्य हे ई एम आय, ई एम आय करण्यातच जाणार. ते सुद्धा वन बी एचके साठी. टू बी एच के ची फक्त स्वप्नेच पाहायची. साला महागाई केवढी वाढलीय, पगार काही वाढत नाही. बर जॉब चेंज करावा म्हटलं तर रिसेशनमुळे ते सुद्धा शक्य नाही.”
बरोबरचा मित्र नेहमीप्रमाणे नशिबाला शिव्या घालत , करवादत होता. माझं मात्र त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर राहून राहून येत होता, इतक्या लहान वयात नियतीला फाटक्या नशिबाचे ई एम आय भरत पहिल्या पावसाच्या पाण्यात मनसोक्त डूंबणारा रंग्या आणि एकीकडे घरातली चूल कशी पेटणार या काळजीत असताना पोराला दिलेल्या चार-पाच रूपयात येणारी भजी सगळे मिळून खा म्हणून सांगणारी ती अन्नपूर्णा !
© विशाल विजय कुलकर्णी


Filed under: सहज सुचलं म्हणुन....

by अस्सल सोलापुरी at June 13, 2017 09:09 AM

देवा तुझ्या द्वारी आलो

चिंचवडचे गणपती मंदिर

चिंचवडचा श्री मोरया गोसावी.....

मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.
कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातले शाली हे मोरसा गोसावी यांच्‍या आईवडीलांचे मूळ गाव. मोरया यांचे आईवडिल, वामनभट शाळिग्राम आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांचे वैदिक कुटुंब होते. वामनभट त्यांना मूलबाळ न झाल्याने गाव सोडून निघाले. सोबत पार्वतीबाई होत्या. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिरावले. त्यांना कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती यांनी भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्भुत दंतकथा वामनभटांच्या कानी आल्या. ब्रम्हदेवाने तेथे तपश्चर्या केली! त्याच्या कललेल्या कमंडलूतून कऱ्हा नदी उगम पावली! जगताच्या उत्पत्तीचा ब्रम्हदेवाचा मनोरथ तेथे पुरा झाला! मोरयाच्या कृपेने ब्रम्हदेवाला जगताची सृष्टी करता आली! वगैरे वगैरे. त्या कहाण्या ऐकून वामनभटांना वाटले, की मोरया त्यांचेही मनोरथ पूर्ण करेल! त्यांनी अनुष्ठान मांडले. मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पुत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले.
मोरया वाढू लागला. त्याची मुंज झाली. त्याचे वेदाध्ययन झाले. त्याच्यात तपश्चर्येची ऊर्मी जागी झाली. त्याला नयन भारती गोसावी गुरू भेटले. मोरया त्यांच्या प्रेरणेने थेऊरला आला. त्याची तपश्चर्या मुळा-मुठेच्या काठी चिंतामणीजवळ सुरू झाली. मोरयाच्या बेचाळीस दिवसांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणीने मोरयाला दर्शन दिले.
मोरया गोसावी महाराज सिद्धी प्राप्त झाल्यावर मोरगावला परतले. आईवडिलांचा आनंद गगनात मावेना. गावकऱ्यांना मोरया गोसावींचा आधार वाटू लागला. मोरया गोसावी सगळ्यांच्या अडचणी दूर करत. रंजले-गांजले अष्टौप्रहर त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामुळे मोरया गोसावींना पूजेअर्चेला वेळ मिळेना. शेवटी, ते कंटाळून गेले. त्यातच त्यांच्या आईवडिलांचाही अंत झाला. मोरया गोसावींनी मोरगावचा निरोप कोणालाही न कळवता घेतला.
मोरया गोसावींनी पवनेच्या काठी किवजाईच्या देवळात मुक्काम केला. त्यांची साधना थेरगावच्या घनदाट जंगलात सुरू झाली. परंतु तेथेही मोरया गोसावींच्या एकांतात व्यत्यय येत असे. चिंचवडच्या गावकऱ्यांना मोरया गोसावींनी त्यांच्या गावी यावे असे वाटत होते. त्यामुळे गावडे-चिंचवडे, भोईर, वाल्हेकर, रबडे, गपचूप असे सगळेजण मोरया गोसावींकडे गेले आणि त्यांनी मोरया गोसावींना चिंचवडला आणले. मोरया गोसावी रबड्यांनी बांधलेल्या झोपडीत राहू लागले.
मोरया गोसावींचा प्रघात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चिंचवड सोडावे, चतुर्थीपर्यंत मोरगावला जावे, मोरयाची पूजाअर्चा करावी, पंचमीचे पारणे करून परतावे असा होता. मोरया गोसावींच्या मोरगाव वारीत कधी खंड पडला नाही. त्‍यासंदर्भातील एक दंतकथा सांगितली जाते. एकदा कऱ्हेला पूर आला, नदी ओलांडणे मुष्किल झाले, तर मोरया कोळ्याचे रूप घेऊन आला. त्याने मोरया गोसावींना नदीपार नेले. दुसरी दंतकथा अशी - एकदा, मोरया गोसावींना पोचायला उशीर झाला. गुरवांनी देऊळ बंद केले. मोरया गोसावी बाहेर तरटीच्या झाडापाशी बसले, तर मोरया स्वत: बाहेर आला आणि महाराजांना चिंतामणीचे दर्शन झाले! कऱ्हा नदीत स्नानाच्या वेळी भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या मंगलमूर्तीची स्वयंभू मूर्ती आली. मग मासिक वारीऐवजी भाद्रपद, माघ, ज्येष्ठ अशा वाऱ्या चालू झाल्या.
पुढे, चिंचवडजवळच्या ताथवडे गावच्या गोविंदराव कुलकर्ण्यांना दृष्टांत झाला. त्यानुसार त्यांची मुलगी उमा हिच्याबरोबर मोरया गोसावींचे लग्न झाले. थेऊरचा चिंतामणी त्या उभयतांच्या पोटी जन्माला आला. जन्मल्यावर तो रडला नाही. त्याच्या छातीवर शेंदराचा पंजा होता आणि त्याने खेचरी मुद्रा (अष्टांगयोगातील एक मुद्रा) केली होती. मोरया गोसावींना त्या सगळ्या गोष्टींचा अचंबा वाटला नाही. कारण त्या खुणा चिंतामणीने अगोदरच मोरया गोसावींना सांगून ठेवल्या होत्या!
‘न मागे तयाची रमा होय दासी’ असे म्हणतात. मोरया गोसावींना 1616 पासूनच जमिनी इनाम म्हणून मिळू लागल्या होत्या. त्यांना आदिलशहा, निजामशहा, शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्याकडून मोरगाव, कुंभार वळण, चिंचवड, चिंचोली या आणि इतर अनेक ठिकाणच्या जमिनी मिळाल्या. संप्रदाय वाढला, अन्नछत्र-सदावर्त, उत्सव-यात्रा, पूजाअर्चा यांचा पसारा वाढला. मोरया गोसावी वयोमानाप्रमाणे थकले. ते मार्गशीर्ष वद्य षष्ठी(25-01-1657) या दिवशी सकाळीच घाटावरील तयार केलेल्या गुंफेत जाऊन बसले. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर त्यांचे पुत्र थोरल्या चिंतामणी महाराजांनी मोठी शिळा ठेवली आणि त्यावर सिद्धी-ऋद्धीसहित मोरयाची मूर्ती बसवली. चिंतामणी महाराजांनी 1658-59 मध्ये त्यावर देऊळ बांधले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळ्याहून (जेजूरीच्या खंडोबाची मूर्ती सोमवती अमावस्येला स्नानासाठी कोथळे गावी नेली जाते.) आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसवली.
चिंतामणी महाराज संस्थानचा कारभार पाहू लागले. तेही वडिलांइतकेच साक्षात्कारी संत होते. त्यांच्या कारकिर्दीत समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू तुकाराम महाराज चिंचवडला आले. चिंतामणी महाराजांनी त्या प्रसंगी मोरयाला बोलावले तर ते स्वत:च मोरया झाले असे म्हणतात. खुंडादंडविराजित, चतुर्भुजमंडित असे त्यांचे गणेशरूप पाहून तुकाराम महाराजांनी त्यांना ‘देव’ म्हणण्यास सुरुवात केली. पुढे, तेच त्यांचे आडनाव झाले. शाळिग्राम-गोसावी-देव असा हा आडनावांचा प्रवास पूर्ण झाला.
चिंतामणी महाराजांच्या कृपेने पुण्याची देशमुखी कृष्णाजी काळभोर यांना 1664 मध्ये मिळाली, म्हणून कृष्णाजींनी चिंचवड-रावेतची देशमुखी चिंतामणी महाराजांना दिली. चिंतामणी महाराजांनी कारभाराला शिस्त लावली, यात्रा-उत्सव आखीवरेखीव केले. त्यांनी पौष वद्य चतुर्थीच्या रात्री देह ठेवला. ते वर्ष बहुधा इसवी सन 1694 असावे.
चिंतामणी महाराजांना चार मुले होती. पैकी नारायण महाराज गादीवर आले. नारायण रावांचे भाऊ काका महाराजांनी थेऊरला तपश्चर्या करून स्वतंत्र चिंतामणीची प्राप्ती करून घेतली; थेऊरची यात्रा सुरू केली. नारायण महाराज एका भाद्रपदी यात्रेत जेजुरीजवळच्या घोडेउड्डाण समोर कोथळ्याच्या देसाई पाटलांकडे उतरले होते. महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांची कोथळ्याला समाधी आहे.
नारायण महाराज राजगुरू होते. त्यांच्या काळात चिंचवड संस्थान श्रीमंत झाले. चिंचवड, वाकड, औंध, माण, चिखली, चऱ्होली, पिरंगुट इत्यादी गावे, कित्येक गावांच्या जमिनी, अनेक ठिकाणची देशमुखी, जकाती यांसारखी उत्पन्नाची साधने संस्थानास मिळाली. चिंचवडला येणाऱ्या मालाला जकात माफ असे. नारायण महाराजांनी 1719 च्या भाद्रपद शुद्ध सप्तमीला देह ठेवला.
नारायण महाराजांचा थोरला मुलगा चिंतामणी याने 1741 पर्यंत संस्थानचा कारभार पाहिला. त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे चिमाजी अप्पांचा वसईचा वेढा. हिंदू बांधवांची फिरंग्यांच्या छळातून सुटका करण्यासाठी चिंतामणी महाराजांनी पेशव्यांकडे आग्रह धरला, त्या मोहिमेला लागणाऱ्या खर्चासाठी दहा हजार रुपये कर्जही दिले. महाराजांचा भक्त गंगोजी नाईक अणजूरकर पठारे प्रभू त्या मोहिमेत होता. महाराजांनी दिलेली गणपतीची मूर्ती अणजूरला नाईकांच्या माडीत आहे. चिमाजी अप्पा 1739 च्या मोहिमेचा विजय साजरा करण्यासाठी पुण्याला जाण्याआधी चिंचवडला थांबले. त्यांनी वसईतून आणलेल्या मोठ्या घंटा चिंचवड, मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर या ठिकाणी आहेत.
चिंतामणी महाराजांचा थोरला मुलगा धरणीधर महाराज. त्यांची मोरयाचे वरदायक, साक्षात्कारी संत म्हणून ख्याती होती. धरणीधर महाराजांची गणेशभक्तीची अनेक पदे प्रसिद्ध आहेत.
पेशव्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. यात्रेच्या वेळी पेशवे स्वत: गणेशखिंडीत पालखीला सामोरे जात, त्यांचे स्वागत करत असत. यात्रेला शिधाशिबंदी देऊन, महाराजांचा आशीर्वाद घेऊन, पालखीबरोबर चार पावले चालून मंगलमूर्तीला निरोप देत असत. त्यांच्या काळात चिंचवडला टांकसाळ आली. टांकसाळीचा फायदा अन्नछत्रात वापरला जाऊ लागला. टांकसाळ इंग्रजी राज्य येईपर्यंत चालू होती.चिंचवड, मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक या देवस्थानांची व्यवस्था चिंचवड देवस्थानामधून होते. सर्वत्र त्रिकाळ पूजा, नैवेद्य, नंदादीप यांची व्यवस्था असते. चिंचवडला अन्नछत्र व वेदपाठशाळा चालू आहे. तसेच, एक ग्रंथालय व देवस्थानच्या पुढाकाराने चालू झालेले मोरया हॉस्पिटल आहे. माघ व भाद्रपद महिन्यांत दोन मोठ्या यात्रा असतात. श्री मोरया गोसावी त्यांना प्राप्त झालेल्या मंगलमूर्तीसहित वाजत-गाजत मोरगावला जातात. माघात थेऊर, सिद्धटेकलाही जातात. येताना जेजुरीला खंडोबा, शिवरीला यमाई, पुण्याला कसबा गणपती आणि जोगेश्वरी यांचे दर्शन घेतात. देवांची भेट होते, पालखीचे ठिकठिकाणी स्वागत होते. मिरवणूक निघते. श्री मोरया गोसावी यांच्या पुण्यतिथीचा चार दिवसांचा भव्य सोहळा मार्गशीर्ष वद्य षष्ठीला होतो. नामवंत कलाकारांची कीर्तने, प्रवचने, गायन-वादन, सत्कार समारंभ होत असतात. मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. इतर सत्पुरुषांच्याही पुण्यतिथी साजऱ्या होतात. देवापुढे गायनाचे कार्यक्रम रोज सकाळी व संध्याकाळी होतात. इतर अनेक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.

माहिती : संग्रहित 

by अमोल केळकर (noreply@blogger.com) at June 13, 2017 08:49 AM

June 12, 2017

" ऐसी अक्षरे मेळवीन !"

परीस

अगदी सातवी आठवीत येईपर्यंत सुशि, शरदचंद्र वालिंबे, सुभाष शहा, गुरुनाथ नाइक इथपासुन ते वेदप्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन भारती, मेजर बलवंत , ओमप्रकाश शर्मा प्रभुतीची ओळख झालेली होती. त्यामुळे आमच्या वाचनाच्या आवडी-निवडी सुद्धा तश्याच झालेल्या. नाही म्हणायला फ़ाफ़े, फेलूदा आणि अधुन मधून गोट्या, एलिस, पिनाकियो, गलिव्हर, टारझन असायचे जोडीला (यांची भेट कुर्डवाडीच्या नगर वाचनालायात झालेली – इयत्ता चौथी, पाचवीत @विकु). 
पण मग आठवी की नववीत असताना वुडहाऊसची एक कथा वाचनात आली. आमची शाळा मराठी मिडियम, त्यामुळे साहजिकच अडलेल्या इंग्रजी शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाडक्या काकड़ेबाईना पकडले. बाईंनी ती कथा तर समजावून दिलीच, पण त्याबरोबर एक मंत्रही दिला. वुडहाऊसचे इंग्रजी जर अवघड जात असेल तर सद्ध्या पुलदे वाच . मोठा झाल्यावर वुडहाउस वाचशीलच. गंमत म्हणजे पु.ल. वाचायला लागल्यावर लक्षात आले की ते सुद्धा वुडहाऊसचे प्रेमी आहेत. (भक्त म्हणायचे होते पण म्हटलं नकोच, उगीच कुणाच्यातरी भावना दुखावायच्या). तर सांगायचे इतकेच की काकड़ेबाईंनी पुलदे नावाचे जालिम व्यसन लावले आणि मी कट्टर व्यसनी बनलो.
तोपर्यंत विनोदी वाचन झालेले नव्हते अशातला भाग नव्हता चिं. वि. जोशीचा चिमणराव किंवा गडकरींचा बाळकराम वाचले होतेच. पण पुलंनी टेस्टच बदलून टाकली. माझ्याबाबतीत म्हणाल तर क़ाय वाचावे याबरोबर का वाचावे हे पुलंनी शिकवले. कुठल्याही जड़, अलंकारिक शब्दाचा आधार न घेता साध्या सरळ आणि नेमक्या, सोप्या शब्दात टोकदार तरीही न दुखावणारा विनोद क़ाय असतो हे पुलदे वाचताना समजले. तत्कालीन  विनोदी लेखकांच्या बहुतांशी लेखनातून आलेला विनोद हा तात्कालिक परिस्थितीवर आधारीत असायचा. आत्यंतिक दारिद्र्य, समाजाच्या जाचक रूढीपरंपरा, लोकांचे दुटप्पी वागणे, तत्कालीन सरकारचे जाचक नियम. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला शालजोडीतुन फटके मारत, त्या गोष्टीची, व्यक्तीची इनडायरेक्टली खलनायक/खलनायिका म्हणून प्रतिष्ठापना करत त्याला शब्दातुन विरोध म्हणून हा विनोद जन्माला आलेला असे. पुलंच्या विनोदाचे वैशिष्ठ्य हे की त्यात खलनायकाला स्थानच नव्हते. साध्या साध्या शब्दात खळखळून हसायला लावत , छोट्या छोट्या त्रुटी आणि उणीवावर बोट ठेवत हसवताना कुठेतरी नकळत पटकन डोळ्यांत पाणी आणणारा असा पुलंचा विनोद आहे. आठवा ना, व्यक्ती आणि वल्लीमधले कुठलेही पात्र आठवा. एक नंदा प्रधान सोडला तर प्रत्येक व्यक्तिचारित्र हे खळखळून हसवते आणि जाता जाता तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्यांत पाणी उभे करुन जाते. 
“…… अजुन थोड़ा वेळ लागला असता तर आमचा गणपती बाप्पा मोरया झाला असता म्हणणारे पेस्तनकाका असोत, तेवढं प्राचीला गच्ची जुळतय का बघा की, म्हणणारे रावसाहेब असोत, समस्त रत्नाग्रीच्या गाई तुर्तास गाभण क़ाय रे म्हणत येता जाता टोमणे मारणारे अंतुशेठ असोत किंवा पुराव्याने शाबित करेन अशी खात्री देणारे हरितात्या असोत. पुलंच्या प्रत्येक विनोदाला एक करुण, हळवी किनार आहे, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्की ओले करते, आतवर कुठेतरी हलवून जाते.
परवा एका मित्रांशी बोलताना त्याच्या कुणा गुणी मित्राचा विषय निघाला. तर आमचा मित्र कौतुकाने म्हणाला,” अरे त्याच्याबद्दल क़ाय सांगणार? क़ाय येत नाही असे नाही. प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे, तेंडुलकरच म्हण ना!” माझ्या मनात लगेच पु.ल.च आले. मला वाटते पुलंनी फक्त खेळ हे एकच क्षेत्र सोडले असेल. पण मला खात्री आहे की मनावर घेतले असते तर त्यांनी हे सुद्धा क्षेत्र लीलया गाजवले असते. भल्या भल्या दिग्गजांची सहज हातात बॉल नसतानाही हुकमी विकेट काढ़णारा कसबी गोलंदाज होते पुल. आचार्य अत्रेसारख्या हुकमी पेसरचे चेंडू लीलया सीमेपार पोचवणारा एकमेव फलन्दाज होता तो. गायन, संगीत, लेखन, वक्तृत्व, चित्रपट दिग्दर्शन हे सगळे पैलु तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला होतेच. पण पुलंचे वैशिष्ठ्य म्हणजे ते परीस होते. फेसबुकवरचे एक लोकप्रिय लेखक जयंतदादा विद्वान्स यांनी आजच्या त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीला, गोष्टीला, प्रसंगाला  पुलंचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श झाला त्या त्या व्यक्तीचे, गोष्टीचे , प्रसंगाचे सोने झालेय. 
त्यांची आणि सुनिताबाइंची जोड़ी हे साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्राला लाभलेले लक्ष्मी-नारायणच म्हणायला हवेत. आपलं जे काही होतं ते सगळं या जोडीने समाजाला देवून टाकलं. त्यांनी दिलेल्या दानावर, देणग्यावर आजही कितीतरी समाजोपयोगी ट्रस्ट चालु आहेत. 
पुलंनी मला क़ाय दिलं? तर जगण्यासाठी धन, संपत्ती नव्हे तर एक कारण हवे असते, एक उद्दीष्ठ्य हवे असते हे शिकवलं. प्रत्येक भल्या-बऱ्या गोष्टीकड़े सकारात्मक नजरेने पाहायला शिकवले. हे जग खुप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजुन सुंदर करायचे आहे याची जाणीव करुन दिली. 
आज पुलंचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या लेखनाबद्दल शेकडो पाने लिहून काढली आहेत साहित्यिकानी. मी पामर क़ाय वेगळे लिहिणार? एवढेच म्हणेन… 
थैंक्यू भाईकाका , तुम्हाला भाईकाका म्हणण्याइतकी जवळीक नसेल आपल्यात कदाचित. आपण कधीही भेटलो नसु. पण दररोज भेटणाऱ्या दर दहा व्यक्तीत कुठे ना कुठे आम्हाला पुलदे भेटतात , भेटत राहतील कारण ते आमच्या हृदयात पक्की जागा करून बसलेत हो. 
सुरूवातीला उगीचच वाटायचं … 
तुम्ही गेलात !

आज इतक्या वर्षानंतरसुद्धा स्वत:लाच खोटं ठरताना, चुकीचं ठरताना पाहूनही इतका आनंद होण्याची अशी उदाहरणे विरळाच ! _/\_
सादर अभिवादन ! 💐
© विशाल विजय कुलकर्णी


Filed under: प्रासंगिक

by अस्सल सोलापुरी at June 12, 2017 05:51 AM

काय वाटेल ते……..

Foxweber – Automatic website traffic system

स्त्रोत: Foxweber – Automatic website traffic system

by महेंद्र at June 12, 2017 03:59 AM

माझिया मना जरा सांग ना

गप्पा, न संपणाऱ्या.....

       शुक्रवारी कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा मेसेज आलेला होता व्हाट्स ऍपवर,"ओळखलंस का म्हणून?". इतक्या वर्षांनी फायनली तिचा मेसेज आला आणि संपर्क झाला म्हणून एकदम खूष होते. म्हणाली,"ओळखशील की नाही शंका होती.". म्हटलं,"बावळट, तुला किती शोधलं, म्हणजे ऑनलाईनच, पण शोधलं ना? कुठे होतीस?". शेवटी फोन करायचा ठरलं तर माझ्याकडचे पाहुणे, तिचे कार्यक्रम असं करत शनिवारी फोन लागला आणि बोलणं सुरु झालं. आता जवळची मैत्रीण म्हटल्यावर पोरं-सोरं बाजूला ठेवून बोलत बसलो बराच वेळ. म्हणजे दोनेक तास तरी. शेवटी मागे पडलेली कामं होतीच. जायला तर लागलंच. पण खूप वर्षांनी बोलून मन मोकळं झालं. विषय एकच असं नाही, विषय पाहिजेच असं नाही. फक्त 'पुढे काय बोलायचं?' किंवा  'मग काय विशेष?' असे प्रश्न पडले नाहीत. 
       तर या अशाच गप्पा, न संपणाऱ्या कितीतरी व्यक्तींसोबत केलेल्या, झालेल्या, न संपलेल्या सगळ्या आठवल्या. खूप दिवस झाले असं बोलून. त्या त्या व्यक्ती, गप्पा सगळं वेगळं पण नातं मात्र खासच. ती नाती कधीच विसरली जात नाहीत, कदाचित भेटी होत नाहीत, पण मनात नक्कीच राहतात. शाळेत असताना, जवळच्या मैत्रिणींसोबतच्या गप्पा. ११-१२ ला दिवसभर सोबत असून परत कोपऱ्यावरून वेगळं होताना तिथेच चौकात उभे राहून मारलेल्या गप्पा. परत दुसऱ्या दिवशी भेटणार आहे हे माहित असूनही. आणि मधेच एखादं कारण काढून लँडलाईन वरून केलेला फोन. पुढे कॉलेजमध्ये रात्री रूममेट्स सोबत गप्पा मारून परत भूक लागली म्हणून दोन वाजता चिवडा खात अजून मारलेल्या गप्पा. मित्रांसोबत रस्त्यावरून फिरत आणि नंतर बिल्डिंगच्या खाली उभे राहून मारलेल्या गप्पा. यातली एकूण एक व्यक्ती खास होऊन जाते. 
           नुसते मित्र-मैत्रिणीच असं नाही लग्नाला, माहेरी किंवा आजोळी गेल्यावर रात्री सगळ्या बायका आडव्या झाल्या की आळस देत मारलेल्या गप्पा, त्याला थोडं 'गॉसिप' वळणही असतं बरं का ! :) अगदी झोप ग, उशीर झालाय म्हणत पुन्हा एखादीने विषय काढायचा आणि सगळे परत सुरु. मधेच कुणी ऐकू नये म्हणून आपोआप बारीक होणारा आवाजही असतोच एखाद्या खास विषयावर बोलताना. सगळ्यात जास्त मजा असते ती एखादा कार्यक्रम संपला की त्यानंतर सगळं आवरण्यासाठी मागे राहिलेली मंडळी, शेवटच्या पंगतीत बसलेली खास लोकं आणि त्यांच्या गप्पा या वेगळ्याच असतात. कार्यक्रम चांगला झाला, एखादा घोळ झाला किंवा एखादया पाहुण्याला कसा सांभाळला यावर चर्चा घडत राहते. समोरचं ताट रिकामं होतं, हात सुकून जातात आणि मनही थोडं उदास झालेलं असतं आतून. तरीही या गप्पानी एक वेगळीच ऊर्जा मिळते. 
         एखादं असं जोडपंही असतं, नवरा-बायको आपले अगदी खास दोस्त. दिवस-रात्र तिथे राहूनही घरातून निघतानाही दारातच तासभर गप्पा होतात. दोघांनाही माहित असतं निघायचं आहे, उशीर झालाय तरीही दारातल्या गप्पा संपत नाहीत. 'चल बाय म्हणत बोलतच राहतो'. 'आता उशीर झालाय तर राहूनच जा' असंही होऊन जातं मग. दारातल्या गप्पांवरुन आठवलं, आमच्या शेजाऱ्यांशी मारलेल्या गप्पा. दोघीही 'खूप काम पडलंय' म्हणत दारातच उभं राहून बोलत राहायचं. यासारखी मजा नाही आणि शेजारही नाही. यातही गम्मत तीच. रोजच भेटायचं, तेच रुटीन, तेच लोक तरीही गप्पा मात्र संपत नाहीत. अशात गरम गरम चहाही मिळाला की मंग काय बासच. शेवटचं म्हणजे हे प्रेमातल्या गप्पा. रस्त्याने चालत, तर कधी बाईकवरून मारलेल्या, फोनवरून, पत्रातून आणि पुन्हा एकदा चार तासातच भेटून मारलेल्या गप्पा. किती वेगळ्या असतात ना? 
        या सगळ्यात काय असतं माहितेय का? तिथे तुम्ही मनातलं सगळं मोकळेपणाने बोलू शकता, उद्या एखादं गुपित बाहेर फुटेल या भीतीने काही राखून ठेवलं जात नाही. उलट कधी मनातलं साचलेलंही बाहेर पडून जातं.  कुणी माझ्याबद्दल काय विचार करेल, असं मनातही आणायची गरज वाटत नाही. जे आहे ते आहे, असं स्पष्ट बोललं जातं. मघाशी म्हटलं तसं, प्रत्येकाचे विषय वेगळे, काळाचे संदर्भ निराळे, तरीही या सर्व प्रकारातील एखादी तरी खास व्यक्ती आठवेलच तुम्हालाही, ज्यांच्यासोबत तुम्हीही अशा मनमोकळ्या गप्पा मारल्यात किंवा अजूनही होतात, अशाच कधी फोनवरून, कधी खूप वर्षांनी भेटल्यावर तर कधी कुणाच्या कार्यक्रमात. बरोबर ना? 

विद्या भुतकर. 
          
         

by Vidya Bhutkar (noreply@blogger.com) at June 12, 2017 02:51 AM

June 11, 2017

my first blog आणि नवीन लेखन

बालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आईबालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आई

माझी आई- कशी होती ? याबद्दल जगांत कोणीच पूर्णपणे सांगू शकणार नाही कारण तिच्याबद्दल विचार करायला बसल की लक्षांत येत की आपण आपल्या आईला कधीच नीट समजून घेतल नाही. ती आयुष्यांत इतक्या सहजपणे असते आणि वावरते की आपल्याला तिला वेगळी व्यक्ति म्हणून ओळखताच येत नाही. माझी आई सौ. लीला बलराम अग्निहोत्री (बालपणातील लीला दत्तात्रेय नामजोशी) अशीच सहजपणे व प्रसन्नपणे आमच्या आयुष्यात वावरली.

आईच थोडक्यांत वर्णन करायच तर सुंदर, बुद्धिमान,आरोग्यसंपन्न, गुरूत्यागीकष्टाळू,
सत्यवचनी, समंजस,  कृतज्ञता जोपासणारी, धीर देणारी, संस्कार घडवणारी अशी ती होतीमला जीवनात भेटलेल्या बुद्धिमान व्यक्तिंमधे माझ्या आईचा क्रम खूप वरचा लागतो. तिच्या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू मला पहायला मिळाले, जाणीवेत उतरले आणि काही तर संस्कारातही उतरले हे माझ भाग्यच. ती दूरदर्शी होती, अभ्यासात व शिकवण्यातही पटाइत होती. तिच्याकडे  दांडगी स्मरणशक्ती होती,  उतम व्यवस्थापन कौशल्य होत, हजरजबाबीपणा होता, तर्कशुद्ध विचार होते, आणि देवाने एवढी हुषारी दिली आहे -तिचा वापर लोककल्याणासाठी करा असा संस्कार देण्याची महत्ताही होती. 


तिची जी मुर्ति सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती आमच्या धरणगांवच्या गांवी आडातून पाणी ओढून कपडे धूत धूत माझ्याकडून पाढे म्हणून घेणारी. आणि मी देखील तिला लहान कपडे पिळून देत आणि दांडीवर वाळत घालायला मदत करत करतच पाढे आणि तोंडी गणित शिकलेली. तिथेच सकाळची वर्तमानपत्र लोकसत्ता आणि गांवकरी पसरून त्यावर अक्षर वाचायला शिकलेली. पण तिथे तिने मला कधी कोणत्याच घरकामात अडकवल नाही जा खेळ अशी तिची कायम परवानगी असायची. तिच्या पुढील आयुष्यांत नातवंड ठेऊन घेण्याची वेळ तिच्यावर खूपदा आली आणि प्रत्येक वेळी आई-बाबांकडे परतणारी ही मुलं एवढं काही शिकून आलेली असायची की आम्ही भावंड कौतुक व आश्चर्यात बुडून जात असू.

धरणगांवच घर खुप मोठ आणि गजबजलेल. आजोबा आणि त्यांचे धाकटे बंधू अशी चिकटलेली दोन घरे, सामाईक विहिर आणि मोरी. घरांत शिकायला राहिलेली बरीच आतेभावंड आणि काका काकूंसोबत चूलत भावंड. या सगळ्यांत जास्त शिकलेली म्हणजे मॅट्रिक झालेली आई. तिचाच मान जास्त. माझ्या जन्मानंतर तिने आजोबांना सांगितले -- पुढे शिकायचय नागपूरच्या SNDT विद्यापिठात मुलींनी बाहेरून तयारी करून परीक्षा द्यायला परवानगी आहे व परीक्षेच्या १ महीना आधी नागपुरातच होस्टेल मधे रहाण्याची सोय करतात. आजोबांनी विचारले पण तुझी मुलगी कुठे राहील? ती म्हणाली ठेवीन दीड महीना तुमच्याजवळ. राहील ती. अशा प्रकारे माझे पाढे, तोंडी गणित आणि वर्तमानपत्र वाचन या मधे आजोबांचाही निम्मा वाटा आहे. पुढे त्यांनी मला खूप वेगळ्या त-हेने गणित आणि बीजगणित शिकवले. धाकटया बहिणीच्या जन्मानंतर आम्ही दोघी आईच्या परीक्षाकाळांत आजोबांजवळ असू. वडील नोकरीच्या शोधात बाहेरगांवी असत. अशा प्रकारे भावाच्या जन्मापर्यंत तिने बीएचे शिक्षण पूर्ण करून ग्रॅज्युएट ही मानाची डिग्री मिळवून घेतली. धाकटया आत्या व माझी सगळी चुलत आते भावंड अभ्यासात तिची मदत घेत.

आई कोकणस्थ होती. देवरूखच्या नामजोशी कुटुंबातील. मॅट्रिकनंतर मुंबईला मोठया बहिणीकडे येऊन राहिलेलीघरांत सात भावंडे व परिस्थिती बेताची. तालुका कोर्टात वडील वकील म्हणून नावाजले असले तरी पैशाची सुबत्ता नव्हती. त्यातून कोकणस्थ म्हणजे पै न पै जपून वापरणार. कपडे, शाळेची पुस्तके याबाबत सदा ओढताण. त्यांत आई खूप स्वाभिमानी आणि धैर्यवान होती, अस मामा, मावशी सांगत असत. चूक नसताना आणि गरीबीवरून रागावलात तर खपवून घेणार नाही अस शाळेत बाईंना दणकावून सांगायची, तर कपडे फाटले आहेत, नवीन घेऊन देत नसाल तर उद्यापासून शाळेत जाणार नाही असे वडिलांनाही सांगायची. शाळेच्या वाटेवर एका झाडावर भुतं रहातात अशी वदंती होती, त्या झाडाखालून अंधारातही धाकटया भावाबहिणींना किंवा इतर मुलांना धीर देत बिनदिक्कत घेऊन यायची

तिच्या तर्कशुद्ध विचारांची चुणूक दाखवणारा तिच्या बालपणीचा एक किस्सा आम्ही ऐकलेला आहे. तिचा मोठा भाऊ घरकामात फारशी मदत करत नसे, धाकटा मामा मात्र आजीला खूप मदत करायचा. एक दिवस त्याच्या हातून एक बशी फुटली. आजोबा खूप चिडले, मारायला निघाले. मोठा भाऊ बघ, कधीही नुकसान करत नाही असे म्हणालेतेंव्हा आईने त्यांचा हात अडवला. मोठा भाऊ घरातल कामच करत नाही म्हणून चुकतही नाही म्हणून नुकसानही करत नाही. हा जो काम करतो ते तुम्हाला कस दिसत नाही? काम करताना एखादी चूक होऊ शकते. अस तिच तत्वज्ञान ऐकूण आजोबा थांबले व पुढे कित्येक बाबतीत तिचा सल्लाही घेऊ लागले.

मुंबईच्या मावशीकडे आईपाठोपाठ धाकटा मामा व मावश्या पण आल्या. ताई मावशीचीही परिस्थिती तेंव्हा बेताचीच. ती काम करून घ्यायची प्रसंगी बोलायची पण तरीही तिने पडल्या दिवसांत सांभाळ केला आहे, उपाशी ठेवलेले नाही याचे स्मरण ठेवा असे आई नेहमी इतरांना सांगत असे. पुढे सर्वांनाच भरभराटीचे दिवस आले आणि आई व मोठा मामा सोडून सर्व मुंबईकरच झाले. तेंव्हा त्यांच्यात आपापसात तेढ मिटवून मेळ ठेवण्यात आईचा मोठा वाटा होता. हे सगळ मी जवळून अनुभवलेल आहे. तिच्या तर्कबुद्धीला प्रेम व समजूतदारपणाची झालर होती.

धरणगांवला आजोबांच्या कुटुंबात बाई म्हणून आई एकटीच होती कारण आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होती. त्या काळात रिवाज होता  तरी आई बाहेर बसत नसे. तस तिने सुरूवातीलाच आजोबांना सांगितले होते व त्यांनीही संमति दिली होती, हे मला विशेष वाटत. काकू, चुलत बहिणी, आत्या अशा सर्वजणी "बाहेर" बसत. मी वयांत आल्यावर मला पण आईप्रमाणेच मोकळीक मिळाली. तेंव्हा मंदिरात जायच म्हटल की मन साशंक व्हायच. एकदा वडिलांना विचारलते म्हणाले श्वास घेतेस ना? तो प्राणवायू आपल्याला शुध्द ठेवत असतो त्याला एकच गोष्ट अपवित्र करते -- आपल्या मनातील दुष्ट विचार. ते येऊ दिले नाहीत तर मंदिरात जाऊ शकतेस आणि ते विचार मनांत असतील तर एरवी देखील मंदिरात जायचे नाही, बस्स. हे जगावेगळे तत्वज्ञान मला सातत्याने उपयोगी पडले. आता इतके वर्षानंतर मनांत विचार येतो -- नित्यनियमाने स्नान- पूजा- जप- ध्यान करणारे माझे वडील - मग हे तत्वज्ञान आईच्या सोबतीमुळे तयार झाले कां ?

धरणगांवच्या त्या लहान वयात पाहिलेला आईच्या समजूतदारपणा व दूरदर्शीपणाचा एक अनुभव आहे माझी धाकटी आत्या सासरच्या छळाला कंटाळून मुलीसोबत माहेरी आली. ही तिने येण्याची चौथी वेळ. आता परत गेली तर जिवंत रहाणार नाही अशी परिस्थिती. तिला माहेरीच ठेऊन घेण्याचा आजोबांचा निर्णय झाला तेंव्हा आईने निक्षून सांगितले तुम्ही यांना जन्मभर पुरणार नाही यांना नर्सिंगचा कोर्स करू दे तेवढी चार वर्षे यांच्या मुलीला मी सांभाळीन. किती योग्य निर्णय होता! इतरांना पुढचे दिवस चांगले जावोत म्हणून स्वतः थोडा काळ कष्ट सोसायचे अशी तिची वृत्ति होती. ती स्वतःच्या मुलांमधेही यावी यासाठी ती प्रयत्नशील असे.

ही घटना घडली तेंव्हा मी सात वर्षांची, धाकटी बहीण पाचाची, आतेबहीण चार वर्षांची आणि धाकटा भाऊ दोन वर्षाचा होता. आते नर्सिंगच्या कोर्सला गेली आणि इकडे वडिलांना जबलपुरला कॉलेजात प्रोफेसरची नोकरी मिळाली. आजोबा, आई, दादा आणि आम्हीं चार मुल जबलपुरला आलो. भाडयाचं घर, शहरातील महागाई आणि माझ शाळेच वय झालेल. त्यांत आजोबांना क्षयाची भावना झाली. म्हणजे पुनः पैशांची ओढाताण होणारच होती. घरमालक वृध्द व एकटेच होते. आईने त्यांच्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतली ती सुध्दा त्यांची "पक्की रसोई " ची अट मान्य करून. म्हणजे तिचे काम अजून वाढणारच होते. इकडे मला तर वाचनाची एवढी प्रचंड गोडी लागली की हातातल पुस्तक पूर्ण वाचून संपेपर्यंत मला दुसर काही सुचतही नसे. पण जबलपुरच्या त्या अडीच- तीन वर्षांच्या काळांतही आईने मला कधी घरकामाला लावल्याच आठवत नाही. सगळ तिच करायची. एवढ करून तिने एम ए चे शिक्षण पूर्ण केले.

एक प्रसंग चांगला आठवतो. तिला सिनेमा आवडत असे पण परवडत नसे. एकदा तिने जायचे ठरवले. शाळेच्या कार्यक्रमासाठी मला नवा फ्रॉक आणायला हवा होता. तिने स्वतःचा सिनेमा कॅन्सल केला व माझा नवा फ्रॉक विकत आणला. हे आई दादांचे बोलणे मी रात्री ऐकले तेंव्हा कळल की आईला त्यागमूर्ति म्हणतात ते कां !

ते दशक संपता संपता तीन गोष्टी एकत्र घडल्या. वडिलांना खूप लांब दरभंगा (बिहार) येथे चांगली सरकारी नोकरी मिळाली. तेंव्हाच इकडे आजोबा वारले. आत्याचाही नर्सिंग कोर्स पूर्ण होऊन तिला नोकरी मिळाली होती. म्हणून ती आमच्या आतेबहिणीला घेऊन गेली. असा आमचा परिवार सातावरून पाच वर आला व आम्ही दरभंगा नामक अपरिचित शहरात दाखल झालो. घरांत नवे बाळ येण्याचीही चाहूल लागली होती म्हणून नात्यातल्या एक काकीही जबलपुरहून आमच्या बरोबर दरभंग्याला आल्या.

कालांतराने सर्वात धाकटी बहीण जन्मली, पण पुढे आठच महिन्यात ती वारली. काकी कधीच परत गेल्या होत्या. माझी समज वाढत गेली तसे आईचे एकेक गुण जाणवू लागले. तिने हिंदी भाषा आत्मसात केली. आमच्या रहात्या मोहल्ल्यांत सर्वाधिक शिक्षित म्हणून तिला मान होता तसेच, ती अडीअडचणीला मदतीला धावून येते हे ही सर्वांना जाणवले होते. मराठी भाषा परकी होऊ नये म्हणून पोस्टाने रोजचे वर्तमानपत्र, मुलांसाठी चांदोबा आणि स्वतःसाठी किर्लोस्कर व स्त्री मासिके तिने लावली. वडील पूर्ण पगार तिच्याकडे देत व खरेदी करून आल्यावरही तिला पूर्ण हिशोब देत. ती रोज रात्री डायरीत जमाखर्च लिहायची. घरांत सुट्टया नाण्यांचा डबा ठेवला होता. अधून मधून आम्हाला ते मोजायला बसवायची. त्यामुळे पैसे उचलण्याचा मोह न होता ते हाताळण्याची आम्हाला सवय लागली. शाळेच्या बाहेर विकले जाणारे सामोसे, सोनपापडी इत्यादि जिन्नस मुलांनी खाऊ नये म्हणून घरी नित्यनियमाने फराळाचे पदार्थ व दर रविवारी सामोसे किंवा बटाटेवडे असा बेत करायची. तिचा स्वयंपाक उत्कृष्ट चवीचा असे. तो गुण माझ्या बहिणीने उचलला. तिने स्वतः सर्व पदार्थ वारंवार करून पाकसिध्दि प्राप्त केली आहे. मी मात्र "हाँ, पध्दत बघितलेली आहे, वेळ पडेल तेंव्हा जमले की" या वृत्तीची होते. तसे घरकामाच्या बाबतीत आम्ही सर्व भावंडे थोडीफार समजूतदार होतोच, पण आईने कधीही कुणाला हे कर म्हणून सांगितले नाही. जे आम्ही केले नसले ते करून टाकून मोकळी होत असे.

तिचे अक्षर खूपच सुंदर होते. पानेच्या पाने एकाच आकाराचे, सुंदर वळणाचे, खाडाखोड न करता अगदी छपाई केल्यासारखे दिसावे असे तिचे लिहिणे होते. आमच्या शाळेच्या पालक कमिटीवर ती सदस्य होती. आमची मुलींची शाळा होती व मुलींना घरून आणायला एक बस होती. ती बंद झाली किंवा ड्रायव्हर आजारी झाला की शाळेला सुट्टी दिली जाई. मुलींनी पायी शाळेत जाण्याची पध्दत नव्हती. आईने आग्रहपूर्वक ती बस विकायला लावली व मुलींना शाळेत पायी येऊ द्या हे मान्य करून घेतले. सायन्स शिकवणारे शिक्षक लावा व मुलींना तो पर्याय निवडू दे हे ही आग्रहपूर्वक मान्य करून घेतले. आम्ही खेळात मागे राहू नये म्हणून घरात बॅडमिंटनच्या रॅकेट्स, बुध्दिबळ, कॅरम, पत्ते, असे सर्व खेळ आणवले व स्वतःही आमच्याबरोबर खेळत असे. यासाठी नेमकी कुठे काटकसर करावी व मुलांना काटकसरीची झळ कशी लागू नये हे तिला बरोबर कळत असे. एमबीए वगैरे न करताच ती व्यवस्थापन कुशल होती.

दरभंग्याला आल्यावर सुरवातीला तिने एका शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली. मी नववीत गेल्यावर अॅडव्हान्स गणित व सायंन्स हे विषय निवडले होते. त्या काळी बिहारच्या शिक्षणात खूप विषयांपैकी चार विषय निवडण्याचा पर्याय होता. त्यात भौतिकी, रसायन, गणित, वनरचतिशास्त्र, जीवशास्त्र, ड्राइंग, संगीत, फर्स्टएड, कुकरी, डोमेस्टिक सायन्स, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, असे खूप पर्याय होते. मात्र दोन पेपर इंग्लिश, दोन हिंदी आणि समाज अध्ययन हे कम्पलसरी होते. शिवाय एक्स्ट्रा नावाने एक भाषेचा विषय घेता येत असे, ज्यातील मार्कांपैकी तीस वजा करून बाकी मार्क तुमच्या टोटल मधे मिळवत. यामधे संस्कृत, मैथिली, नेपाळी, बंगाली व पार्शियन या भाषांचा पर्याय होता. मी संस्कृत निवडून त्यांत नेहमी नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवले त्यामुळे माझी टक्केवारी सातने वाढून मी कायम पहिला नंबर काढत असे. मात्र नववीत भौतिकी रसायन प्राथमिक गणित- अडव्हान्स गणित असे विषय निवडल्यावर माझी दमछाक होऊ लागली. कारण त्या लेव्हलचे भौतिकी व रसायनशास्त्र शिकवणारे शिक्षक शाळेत नव्हते. मग आईने नोकरी सोडली व स्वतः पुस्तकावरून अभ्यास करून मला शिकवू लागली. खास करून अॅडव्हान्स गणिताचा कोर्स हा आपल्याकडील आताच्या आप्लाइड मेकॅनिक्सच्या कोर्ससारखा होता. तो तर आईला अधिकच दुर्बोध. तरीही ती जिद्दीने माझ्याजवळ बसायची व मला वाचून वाचून समजेल असे बघायची. थोडी मदत शाळेचे मुख्याध्यापक करत. हळूहळू मला ते येऊ लागले व मॅट्रिकमधे मी सर्व सायन्स विषयांत भरघोस मार्क मिळवून दरभंगा जिल्ह्यांत मुलींमधे पहिला नंबर काढला. जवळ जवळ तेंव्हाच मी आय्एएस ला बसायचे असे लोकांनी पक्के करून टाकलेपण या अभ्यासात व यशांत तिचा खूप मोठा वाटा होता.


त्या काळी सर्वत्र वीज नव्हती. आमच्या रहात्या भागांतही नव्हती. माझे बीएस्सी पर्यंत सर्व शिक्षण कंदीलाच्या उजेडातच झाले. मी दिवसभर उनाडक्या करीत असे आणि रात्री मला डोळ्यासमोर खूप अभ्यास दिसायचा. मग आई पण माझ्यासोबत थांबायची. १९६२-६३ च्या सुमारास बॅटरीवर चालणारे ट्रान्सिस्टर्स निघाले तसे आईने पण घेतला. रात्री ती विविध भारतीवर 'बेला के फुल' ऐकत माझा अभ्यास संपेपर्यंत बसायची. "रात्र झाली की हिला अभ्यास, कामं सुचतात. दिवसभर हीची बुध्दी कुठे जाते?" असं आई मला नेहमी म्हणायची. पण मला तिच्या बोलण्यांत कौतुकाचा भास व्हायचा. धाकटी बहिण मात्र सगळा अभ्यास, सगळी काम वेळच्या वेळी पूर्ण करायची. भाऊही तसाच गुणी. तरी पण हीच का म्हणून तुझी आणि दादांची लाडकी असा प्रश्न ते दोघे विचारीत. मलाही प्रश्न पडायचा पण मी घरातील सर्वात मोठी मुलगी असल्याने हे सुख मला मिळते, अस मला वाटे. अगदी अलीकडे आईने माझ्याबद्दल लिहून ठेवलेल वाचल--हिने कधी हट्ट केला नाही, कांही मागितल नाही म्हणून ती लाडकी होती. मला भरून आलं. आईने खेळायला अडवल नाही, पुस्तक तास् न तास वाचू द्यायची. घरकाम सांगायची नाही आणि अभ्यास कर म्हणूनही कधी ओरडली नाही. मग मी हट्ट करणार तरी कशाचा ?

आईला गॉसिप हा प्रकार अजिबात आवडत नसे. मोहल्ल्यांत तिच्या ओळखी व गप्पा खूप असायच्या पण कुणाची निंदा नालस्ती नसे. घराबाहेरही फारस जाण नसायच. तरीही बाजारात कोणत्या दुकानात कोणती वस्तू चांगली मिळते ते तिला नेमकं माहीत असायच. माझ्या दृष्टीने जगातील सर्वात कंटाळवाणे काम शॉपिंग. मला शाळेत, कॉलेजात जाऊनही दुकानं माहीत नसायची आणि हिला घरबसल्या कशी कळतात? पण तिची नजर आणि स्मरणशक्ती दांडगी होती. रिक्षात बसून जातांना कुणाचे घर, कुठले दुकान, कुठले वळण, तिथे कोण म्हातारी बांबूच्या टोपल्या विकते पासून कोणाच्या दुकानात नव्या साड्यांचा स्टॉक आला आहे हे सगळ ती क्षणांत टिपून घ्यायची. घरातही काही सापडत नाही म्हणून तिला विचाराव तर बसल्या जागेवरूनच अग ते अमुक ठिकाणी आहे, मला इथून दिसतय बघ, अशी  तिची सवय होती. तीच गोष्ट १५-२० वर्षांनंतर भेटलेल्या व्यक्तींची. बघताक्षणी तिला आठवे- नावं, गांव, कुटुंबातील माणस. मागे तुमच्या आई आजारी होत्या ना हो -- वगैरे. या प्रकारातील माझी स्मृति शून्य. मोठेपणी नातेवाईक मला विचारत तुमच्या आईला या सर्व गोष्टी, सर्व चेहरे आठवतात, तर तुम्ही कशा अश्या? तेंव्हा माझा खूप वैताग व्हायचा.

दरभंग्याला गेल्यावर वडिलांनी मला लेडीज सायकल घेतली व स्वतः शिकवली. बिहार सारख्या राज्यात जिथे बस नसेल तर शाळा बंद ठेवत तिथे एक मुलगी सायकलवर शाळेत जाते म्हटल्यावर काय विचारता? अरे देख देख छोरी साइकिल चलावै छे हे वाक्य खूपदा ऐकू येई. अशा धाडसीपणासाठी दादांना आईची पूर्ण साथ असायची. मात्र माझ्या बहिणीने जेंव्हा म्हटले मी नाही सायकलवर जाणार, तेंव्हा आई तिच्या बाजूने उभी राहिली. सगळी पोरं एकाच स्वभावाची कशी असतील असा तर्कशुध्द संवाद करून तिने दादांची समजूत काढलीमाझ्या शाळेच्या अभ्यासाला माझ्या बरोबर बसायची तसेच बहिणीच्या संपूर्ण डॉक्टरकीच्या शिक्षणांत तिच्यासोबत बसून आई तिला प्रोत्साहन देत असे.

आईचे ड्राईंग खूप छान होतेलग्वाच्या पंक्तीत पन्नास ताटांभोवती तिने पाच मिनिटांत फ्री-हॅण्ड रांगोळी काढली तर त्यातील एकही रांगोळी दुसरीसारखी नसायचीआमच्या दोघीं बहिणींना प्रॅक्टिकलच्या वहीतील ड्राईंग काढून देत असेपण भाऊ कॉलेजला गेला तसे एकदा ती म्हणाली -- आता मी म्हातारी झाले रेमग त्याने स्वतःच ते काम केलेपण आईला म्हणाला -- मला दरवेळी म्हातारी झालेरे म्हणशील तर चालणार नाही हांतसेच झालेत्याचा मुलगा इंजिनियरिंगसाठी चार वर्षे आई-दादांकडे राहिला व त्यांनीही कौतुकाने त्याला सांभाळले.

मी मुलींच्या शाळेतून मुलामुलींच्या एकत्र अशा कॉलेज मधे गेलेमहाराष्ट्रात वाढलेल्या आई दादांना हे कांही नवे नव्हतेपण मला होतेमग मुलांशी ओळखीगप्पाकधी चहाला जाणकधी थोडया उशीरा घरी येण अस सुरू झाल आणि मला जाणवल की जरी आपल्याला पाच रूपये पॉकेटमनी दर महिन्यालामिळत असला तरी त्याचा हिशोब आईला द्यावा लागतोमग मी एक दिवस डिक्लेअर केल -- माझ्या पॉकेटमनीचा हिशोब देणार नाही आणि माझ्या नांवाने आलेली पत्र कुणी फोडायची नाहीतमी एकदम मोठ्या वादळाच्या तयारीत होतेपण आई म्हणालीहां बरोबर आहेथोड स्वातंत्र्य तुला द्यायलाच हवमी आ वासून बघतच राहिलेतेवढ्यांत ती पुढे म्हणाली -- आणि तूही आमचा विश्वास टिकवायला हवातेवढ एक वाक्य पुरल मला जन्मभर कणखरपणा दाखवलाअसच माझा धाकटा भाऊ कॉलेजात जाऊ लागला आणि नेमकी सिगरेट ओढणारी दोन मुल त्याची दोस्त झालीआम्ही दोघी बहिणींनी त्याला सांगितल या मुलांशी दोस्ती सोडतो आईला म्हणाला आईमीच त्यांच्या संगतीत सिगरेट शिकेन अस असतं कां ते पण माझ्या संगतीत सिगरेट सोडू शकतात ना आई म्हणाली हां बरोबर तेवढा विश्वास ठेवलाच पाहिजे तुझ्यावरझालेतो पण त्या विश्वासाच्या बंधनात अडकवला गेलाआता आमची मुल म्हणतात -- आजी किती थोर होती ना तिच्या शिकवणीमुळे आमच्याही आई बापांनी आमच्यावर विश्वास टाकला.

अशी माझ्या बालपणातच बुद्धिमत्तेने भारून टाकणारी आईमाझ्या पुढील आयुष्यातील तिच्या आठवणींचा एक मोठाच ग्रंथ होईल. आम्ही मोठे झालो, स्वतः आई-बाप बनलो तेंव्हाही तीच हक्काची मदत मागावी अशी आई होतीतिची सहाही नातवंड तिच्याकडे दीर्घ काळ छान राहिलीत आणि तिच्याकडून खूप शिकलीतत्यांच्याकडे दुरून बघतांना जाणवायच की आईची मुलांना हाताळायची कसोटी कांही वेगळीच होतीती तिला मॉम म्हणत आणि तीच जगातील सर्वात आवडती व्यक्ती असा निर्वाळा देत

ती शेवटी शेवटी माझ्याकडे गोव्याला राहिली होतीकाय तिचे नातवंडांसोबत ऋणानुबंध जुळले होते कुणास ठाऊक पण योगायोग असा की सहाही नातवंडं तिला एकेक करून भेटून गेलेली होती -- तेही एखाद्या प्लानिंगशिवायजग भटकत असलेला भाचा एकदा अचानक माझ्याकडे  आला -- डॉक्टरेटसाठी पुम्हा अमेरिकेत चाललोय म्हणून मॉमला भेटायला आलोयदोन दिवसांनी अचानक भाची पण आली कायरात्री मी मॉमजवळ झोपणारसे सांगूनदोन दिवस तिच्याजवळ झोपली काय आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आईला अचानक मोठा हार्ट अटॅक येऊन ती अचानकपणेच वारलीजणू सर्वांच्या भेटीपुरतच थांबली होती.

माझा नातू अडीच वर्षे वयांत जेमतेम पंधरा दिवस तिच्यासोबत राहिला होतापण नुकतेच जेंव्हा मला म्हणाला -- मला मॉमला भेटावस वाटत गं तेंव्हा मला खरं समजल की मुलांना हाताळायची तिची कांय विलक्षण ताकद होतीत्या ताकदीनेच आम्हा भावडांना घडवलं.

-------------------------------------------------------------------------

by लीना मेहेंदळे (noreply@blogger.com) at June 11, 2017 10:35 AM

साधं सुधं!!

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ३
आधीच्या भागाच्या लिंक्स 
पहिला भाग 

दुसरा भाग 

आजचा दिवस युनिव्हर्सल स्टुडिओ, Sea aquarium आणि मग त्या नंतर मुस्तफा मार्केटला भेट देण्याचा होता. वीणा वर्ल्डच्या सहल व्यवस्थापकास बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. जर समजा ग्रुपला ९ वाजता बसने  निघायचं असेल तर दोन तास आधी वेकअप कॉल देण्याची पद्धत आहे. एक तास तुमच्या तयारीला आणि एक तास नाश्त्याला! सर्व गटाला न चुकता वेकअप कॉल देणं ही मोठी जबाबदारी! आपल्या कुटुंबास तयारीसाठी किती वेळ लागतो हे आपणास माहित असणं आवश्यक आहे. त्यामुळं बरेचजण सागरच्या वेकअप कॉलच्या आधीच उठून तयारीस लागायचे! ह्या बरेचजणांत  कोणाकोणाचा समावेश होत असेल हे सुज्ञास सांगणे न लगे! 


युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये अधिकाधिक राईड कशा घेता येतील ह्यासाठी सागरने आम्हांला बऱ्याचशा टिप्स देऊन ठेवल्या होत्या. दरडोई ५० डॉलर्स अधिक देऊन एक्प्रेस पास घेणं, सिंगल रायडर म्हणुन एक वेगळी रांग असते त्यात आपला नंबर लावणं आणि सुरुवात पार्कच्या अगदी शेवटच्या टोकाच्या राईड पासुन करणं ह्या क्लुप्त्यांचा समावेश होता.  

आदल्या दिवशी रात्री जेवणाच्या वेळी सागरनं आम्हां सर्वांना युनिव्हर्सल आणि Sea aquarium च्या परिसराची तोंडओळख करुन दिली होती. कोणत्या ठिकाणी एकत्र जमायचं, युनिव्हर्सलला समजा मध्येच बाहेर पडुन परत आत यायचं असेल तर रि-एंटरचा शिक्का कसा मारुन घ्यायचा, दरडोई १५ डॉलर्सची जेवणाची कुपन्स कोणत्या उपाहारगृहात चालणार, त्याचे सुट्टे परत मिळणार नसल्यानं त्याच्या महत्तम उपयोग कसा करून घ्यायचा ह्याची त्यानं बरीच माहिती दिली होती. त्यामुळं ह्या भागातील देशांच्या इमिग्रेशननं दिलेल्या चिठोर्याइतकं नसला तरी त्याच्याशी तुलना करु शकणारा एखादा काही क्लिष्ट प्रकार असु शकतो ह्याची आम्हांला जाणीव झाली. 

सकाळी पुन्हा एकदा चांगला कॉंटिनेंटल नाश्ता झोडपून आम्ही युनिव्हर्सलच्या दिशेनं प्रस्थान केलं. एव्हाना बसमधील दिलेले आसनक्रमांक धाब्यावर ठेवून आपल्या मर्जीनं आसन काबीज करण्यास आम्ही सुरुवात केली होती. बसप्रवास मर्यादित असल्यानं विशिष्ट् आसनांबाबतीत कोणीही जास्त आग्रही नव्हतं.  

युनिव्हर्सलचे आरंभीचे सोपस्कार आटपुन आम्ही एकदाचे आत शिरलो. थोडीफार चर्चा करून आम्ही 'Revenge Of The Mummy' आम्ही ह्या राईडची आम्ही निवड केली. २००२ साली ज्यावेळी आम्ही ही (किंवा सदृश्य) राईड लॉस अँजेलिसला घेतली होती त्यावेळी एका अंधारमय मार्गात आम्हांला चालायचं होतं. भयप्रद आवाज, दृश्यं आमच्यासमोर पेश केली होती. मध्येच एकदा सर्व मार्ग रोखुन धरण्यात आले होते. परंतु माझ्यावर फारसा काही फरक पडला नव्हता, प्राजक्ता त्यावेळी थोडीफार घाबरली होती आणि शेवटी राईडच्या बाहेर पडताना उभ्या असलेल्या महाकाय ममीने तिला 'हॉ' करुन अजुन घाबरवलं होतं. 

ह्यावेळी बैठ्या बाकांची आसने आमच्यासमोर आली. त्यानंतर नेहमीप्रमाणं डोक्यावरून एक दांडा आला आणि त्यानं आम्हांला बंधक बनवलं. बाकी सर्व जणांनी आपल्याजवळील मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये ठेवल्या होत्या. मी मात्र बहुदा मागच्या ममीची आठवण करत माझं वॉलेट आणि भ्रमणध्वनी माझ्याच जवळ ठेवला होता. ह्या सर्व राईडमध्ये एक समान धागा असतो. सुरुवातीला आपल्या मनात भय निर्माण करणारे बरेच मोठमोठाले संदेश ते गंभीर आवाजात बजावतात. ही राईड घेण्याआधी तुम्ही विचार केला आहे ना? पुढे बिकट प्रसंग येणार आहे वगैरे वगैरे! लहानपणी आई, शिक्षक ह्यांच्या धमक्या आणि त्यानंतर अभियांत्रिकी जीवन ज्यांनी पार पाडलं आहे त्यांच्यावर ह्या घोषणांचा फारसा फरक पडत नाही. ही राईड सुरुवातीला ठीक वेगानं चालली होती. मग एका ठिकाणी मात्र बंद दरवाजा आला. आमची बैठक मागं आली आणि एकाच वेळी अंधार होऊन मग मात्र प्रचंड वेगानं आमच्या बैठकी पुढं फेकल्या गेल्या. आतापर्यंत जो प्रवास एका नियंत्रित वेगानं चालला होता ते चित्र एका सेकंदात पालटलं होतं. ट्रॉली भयानक वेगानं पुढं चालली होती, सभोवताली किट्ट अंधार होता. असल्या राईडमध्ये मध्येच आपले फोटो काढले जातात. कोण किती भेदरला आहे ह्याचा पुरावा म्हणून! आमचा पण फोटो काढला गेला. पण तो घ्यायचा राहून गेला. ह्या सर्व प्रकारात माझ्या खिशात राहून गेलेलं माझं वॉलेट आणि मोबाईल माझ्या मनात प्रचंड चिंता निर्माण करत होता. एकदाची ती राईड संपली आम्ही सर्वांनी हुश्श्य केलं. मी सर्वांच्या नकळत माझा खिसा चाचपुन पाहिला. वॉलेट आणि मोबाईल दोघांनी प्रतिसाद दिला. मी पुन्हा एकदा हुश्श्य केलं. जणु काही त्या अंधाऱ्या मार्गिकेत विजेरीच्या साहाय्यानं ह्या दोघांचा शोध घेण्याचं दिव्य टळलं होतं!

काही मिनिटांतच इंद्रजित हे सुद्धा ही राईड घेऊन निहारिकासोबत बाहेर आले. आम्ही सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. अमिता ह्या मुळच्याच धाडशी! त्या वेगानं लूप असणारी रोलर कोस्टर राईड घेण्यास गेल्या होत्या. Battlestar Galactica takes to the sky again at Universal Studios Singapore असं काहीतरी ह्या ह्या राईडचं नाव आहे. एका डोळ्यानं वेगानं जाणाऱ्या त्या राईडकडे आणि दुसऱ्या डोळ्यानं आताच बाहेर पडलेल्या ममीकडे पाहत आम्ही ह्या रोलर कोस्टरचा विचार सोडून दिला. 

त्यानंतर होता तो Shrek ४ D  चा शो! हा अगदी बच्चे मंडळींसाठीचा शो होता. मुख्य खेळ सुरु होण्याआधी तुम्हांला छळ (Torture) सहन करावं लागेल वगैरे फंडे उभे राहुन देण्यात येतात. "बाबांनो, हिंमत असेल तर गर्दीच्या वेळी तुमच्या ह्या श्रेकला विरार ट्रेनला घेऊन या म्हणावं!" मी मनातल्या मनात म्हणालो. मग आम्ही आसनस्थ झालो. थोडीफार सीट मागेपुढं जाणं, हवेत पाण्याचे फवारे उडविले जाणं असले प्रकार पाहून आम्ही मग बाहेर आलो. 

थोडावेळ मग आमचा आपण युनिव्हर्सल मध्ये नक्की कोठे आहोत आणि ह्यावेळी आपण कोणती राईड घेणं इष्ट राहील ह्यावर विचारविनिमय करण्यात गेला. मग आमचा मोर्चा जुरासिक पार्कच्या राईडकडे वळला.  ह्या राईडला भलती मोठी रांग होती. नगरकरांनी योग्य वेळी सिंगल रायडर म्हणून जाण्याची सुचना केली आणि त्यामुळं आम्हां सर्वांना तुलनेनं बऱ्याच लवकर ही राईड घेता आली. परंतु निहारिकाला मात्र सिंगल रायडर म्हणून जाण्यास परवानगी न मिळाल्यानं इंद्रजित आणि डायनासोर ह्यांचा मुकाबला टळला. ह्या दोघांची  सिंगापुरात भेट झाली असती तर जागतिक इतिहासाला कोणतं वळण लागलं असतं ह्यावर केवळ तर्कवितर्क लढविणंच हेच आता आपल्या हाती आहे! जुरासिक पार्कच्या राईडमध्ये सर्वात शेवटी आपल्याला डायनासोरच्या जरा जवळपास नेलं जातं, आणि मग अचानक दोन तीन मजल्याच्या उंचीवरून खाली सोडलं जातं. 

आता जेवणाची वेळ झाली होती. १५ डॉलरमध्ये सेट मेनु होता. आम्ही तंदूर चिकनच्या एका पर्यायाची निवड केली. दीड वाजत आला होता आणि आमची पावलं झपाट्यानं वॉटरवर्ल्डच्या दिशेनं वळली. आधीच्या राईडमध्ये छायाचित्रणास वाव मिळाला नव्हता किंवा आम्ही आधुनिक गॅजेट्स खराब होण्याच्या भयास्तव छायाचित्रणाचा प्रयास केला नव्हता. आता मात्र भ्रमणध्वनीच्या साहाय्याने छायाचित्रणाची संधी होती. इथं समुद्रीचाच्यांची अनाकलनीय मारामारी सुरु होती. मंडळी उंचीवरील टॉवरवर चढत होती, तिथुन बुक्काबुक्की होऊन त्यांना उंचावरून पाण्यात ढकलून दिलं जात होतं, मध्येच मंडळी बोट घेऊन एका टोकावरून दुसऱ्या टोकाला वेगानं येत होती. समोरच्या सीटवर बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर बोटीनं पाण्याचे फवारे उडवीत होती. थोडा तोचतोचपणा आला की आगीचे गोळे निर्माण करण्यात येत होते. कथानकात खलनायक होता, नायक होता आणि नायिका सुद्धा होती. ही बारीक चणीची नायिका कमालीची फिट होती आणि उपलब्ध असलेला जल आणि भूभाग आपल्या धावपळीनं व्यापून टाकत होती. खलनायक नायकाला अधूनमधून बडवत होता आणि प्रेक्षकांकडे पाहुन गुरगुरत काहीबाही बोलत होता. त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर बसले असल्यानं प्रेक्षक (आणि मी सुद्धा) त्याला उलट उत्तरं देत होतं आणि थम्स डाऊनच्या खुणांनी खिजवत होता. भारतीय मंडळी सोडली तर बाकीची चिनी मंडळी हा सर्व प्रकार मनापासून एन्जॉय करत होती असं वाटून गेलं. आणि हो मध्येच एक जलविमान सुद्धा येऊन गेलं!


 हा सर्व लुटुपुटीचा खेळ आटपुन आम्ही बहुचर्चित आणि मोठी अपेक्षा निर्माण केलेल्या transformers ride च्या दिशेनं निघालो. ह्या राईडच्या बाहेर उगीचच ६० मिनिटांचा प्रतीक्षावेळ असं लिहिण्यात आलं होतं. जुरासिक पार्कच्या सिंगल रायडरच्या अनुभवानं प्रेरित होऊन इथंही आम्ही सिंगल रायडर म्हणून गेलो आणि आतली परिस्थिती पाहून दांडुके ओलांडून कौटुंबिक मार्गिकेत शिरलो. डॉक्टर नगरकरांनी मात्र एकला चलो रे धोरणाचा अवलंब करीत राईड घेतली. इथं आम्ही तिघेजण बसल्यावर माझ्या एका बाजुला तीन चार वर्षांचा छोटा चिनी मुलगा आला. त्याचे वडील पुढील बाकड्यावर बसले होते. ह्यात आपलं बाकडं ममीच्या राईडसारखं प्रचंड वेगानं कुठं जात नाही पण केवळ दोन ठिकाणी हलतं पण तिथं मात्र Visual इफेक्ट्स द्वारं आपल्याला आपण भयंकर वेगानं उंचावरून खाली, मग खालून वर वगैरे जात आहोत आणि आपल्यावर अस्त्रांचा मारा वगैरे होत आहे असा आभास निर्माण केला जातो. बाजूचं पोरगं सुरुवातीला बरंच घाबरलं होतं. बाकड्याखाली जायचा प्रयत्न करत होतं. त्याला मग मी हातानं थोपटलं, त्याचा परिणाम म्हणा किंवा सरावानं मग मात्र ते शांत झालं आणि नंतर त्यानं चक्क राईड एंजॉय केली. transformers ची राईड इतकी झपाट्यानं संपल्याच्या आनंदाच्या प्रीत्यर्थ आम्ही लगेच 'Light Camera Action with Steven Spielberg' हा शो पाहायला गेलो. इथं सुद्धा लगेचच आमचा नंबर लागला. इथं केवळ स्पेशल इफेक्ट्स द्वारे वादळवारं इत्यांदींचा प्रभाव स्टुडिओत कसा निर्माण केला जातो ह्याचा अनुभव आम्हांला देण्यात आला. एव्हाना बरीच चालपीट झाली होती. स्टारबक्स कॉफीच्या आसऱ्याला आम्ही गेलो. तिथं कॉफीचे घुटके घेतले. आणि छायाचित्रण सुद्धा!


 


आता वेळ झाली होती ती SEA AQUARIUM ची! इथं पुन्हा एकदा तिकिटांचा थोडा गोंधळ झाला. हरवलेल्या एका तिकीटाची पुनर्खरेदी करून आम्ही ह्या मत्स्यालयात प्रवेश केला. पुढील तास दीड तास एका अद्भुत विश्वात आम्ही वावरत होतो. माशांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात मुक्त संचार करताना पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. विविध रंगाचे, विविध आकारांचे मत्स्य आपल्याच धुंदीत विहार करत होते. विविध दालनांत मत्स्यांच्या विविध प्रजाती होत्या. माशांकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन हे मत्स्यालय आम्हां सर्वांना देत होतं. 


भ्रमणध्वनीमध्ये आपण विविध अँप्स आणुन ठेवत असतो. त्यातलं एक दिवसाला किती पावलं टाकली ह्याचा जमाखर्च आपल्याला देत असतं. ते मला दिवसात दहा हजार पावलं पुर्ण केल्याबद्दल माझं अभिनंदन करत होतं. ते अँप मनातल्या  मनात हा आळशी गृहस्थ असा अचानक सक्रिय कसा बनला ह्याविषयी आश्चर्य व्यक्त करत असणार! 

ह्यानंतर आम्ही मुस्तफा मार्केटच्या दिशेनं निघालो. हा भारतीय लोकांनी गजबजलेला भाग ! रविवारी संध्याकाळ असल्यानं हा अधिकच गजबजला होता. आमची एक बॅग नाकामी झाल्यानं ह्या मार्केटातुन आम्ही एका बॅगची खरेदी केली आणि सोबत छोटीमोठी खरेदी केली. खरंतर बायकांची खरेदी हा समस्त नवरेवर्गाचा नावडीचा आणि टिंगलटवाळीचा विषय! पण प्राजक्ताने मात्र अगदी थोडक्यात ही खरेदी आटपली. त्याबद्दल तिचं मनःपुर्वक आभार!

आम्ही जवळच्याच भारतीय उपहारगृहात रात्रीच्या जेवणासाठी शिरलो. तिथं सर्व्ह केलेलं चिकन हे डक असावं अशी शंका आमच्या गटात निर्माण झाली होती. 

सायंकाळी माझी पंकज आणि मिलिंदसोबत फोनवर बातचीत सुरु होती. आपल्या धावपळीच्या जीवनातून सुद्धा खास वेळ काढून हे दोघंजण मला भेटायला येणार होते. पंकज थेट उपहारगृहात आला. आमच्या गटाला हाय हॅलो करुन मग तो आणि मी मग रस उपहारगृहाच्या दिशेनं निघालो. पंकज आणि मी अभियांत्रिकी पुर्ण झाल्यानंतर प्रथमच भेटत होतो. रस उपहारगृहाची त्याची निवड उत्तम होती. सिंगापूरच्या एका उच्चभ्रू भागातील हे उपहारगृह! आणि एकंदरीत अँबियन्स पण उत्तम ! थोड्या वेळात मिलिंदसुद्धा आला. अभियांत्रिकीनंतरचा काहीसा struggle पिरियड, त्यानंतर आयुष्यात घेतलेलं विविध निर्णय, व्यावसायिक जीवनाची सद्यस्थिती ह्यावर खूप गप्पा मारल्या. मिलिंद structural इंजिनीरिंग मधला हुशार मुलगा! पाचव्या सत्रात त्यानं मिळविलेले १०० गुण माझ्या अजून लक्षात आहेत. त्याची आठवण करुन देताच त्याचा चेहरा खुलला! रात्री जवळपास पावणेअकरापर्यंत आम्ही गप्पा मारल्या. परतीच्या प्रवासात पंकजने मला सिंगापूरच्या जीवनाविषयी, तिथल्या शिक्षणपद्धतीविषयी, सरकारविषयी बरंच काही सांगितलं. 

पंकज, मिलिंद -  ही एक संस्मरणीय भेट सदैव लक्षात राहील! 

रूमवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. सकाळी हाँगकाँगला निघण्यासाठी  पाच वाजता हॉटेल सोडायचं होतं म्हणजे साडेतीनला उठावं लागणार होतं. जुन्या बॅगेतील सर्व सामान प्राजक्ताने नवीन बॅगेत स्थलांतरित केलं होतं. ऋणानुबंध जुळलेल्या त्या जुन्या बॅगेला परक्या देशात सोडून येताना आम्हांला गलबलून आलं होतं 

(क्रमशः )

by Aditya Patil (noreply@blogger.com) at June 11, 2017 06:42 AM

काय वाटेल ते……..

गाण्यांच्या कानगोष्टी

गाणी ऐकायला कोणाला आवडत नाहित? मला पण काही गाणी मला आवडतात म्हणण्यापेक्षा काही गाणी माझ्याशी कान गोष्टी  करतात. एखाद्या प्रसंगाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद / दुःख देतात.  जेंव्हा एखादं गाणं रेडीओवर अनपेक्षित पणे लागतं तेंव्हा इंटर्नली वायर्ड ब्रेन  त्या गाण्याशी निगडीत  व्यक्तीची … Continue reading

by महेंद्र at June 11, 2017 06:12 AM

Traveller's Tales

Planet Goa

Now that we had tasted the freedom a road trip to Goa gave us, it was inevitable we would try this again. So it was just five months later, we were packed on a wintry Pune morning headed out to our favorite Indian beach once again. Given our experience, I would strongly urge people to try and get to Goa right after the New Year's celebration and party hordes are gone.  The weather is every bit as desirable and the beach-side shacks are open. Yet, the prices are down when peak season ends on January 2nd.

This time, we decided to try out a newer resort, Planet Hollywood, not because we really wanted a Vegas/movie themed resort, but rather because of its splendid location.  Unlike our last trip when we camped within reach of the capital, this time we were amidst the quieter beaches of South Goa.

Planet Hollywood is another new resort that has come up in the last few years on a clean stretch of beach to the north of Majorda.  Uttorda beach on which it is located until now was best known as home to the popular seafood shack, Zeebop.We repeated our journey to Kolhapur, Pearl Hotel and a sumptuous dinner at Dehati.  However, from Kolhapur we took a different route for South Goa.  The road to Belgavi turned out to be another scenic route - this time through deep jungles and ravines.  I think we drove almost 30 kms through a narrow road through a protected national park without meeting another vehicle on the road.  The only signs of human habitation were the tasteless posters - every one of them had a specific wild animal lying in a  pool of blood with a warning to drivers not to speed since there may be animals crossing.We passed through Belgavi mid-way and stopped briefly to pick up a pack of Kunda, which I had heard was a popular local sweet.  It was about noon when we arrived at our resort. Having a car is a boon when in South Goa, especially if you want to explore more than the beaches themselves.

We dived into our 'Goa routine' of morning beach walks and breakfast buffets followed by long sessions in the pool.One one day we drove down to Fish Ka, a tastefully decorated shack near our hotel.  We savored some fresh catch of the day grilled different ways with glasses of wine.  The fish was fresh and the ambience of the evening even better.

One another day, we drove the long stretch to Panjim to repeat our dream lunch from last time at Mum's Kitchen.  This time too was perfect!

That evening we walked down the sandy stretch to Zeebop, a large beach-side shack.  This is where we were treated to this trip's stand-out dinner.  The fresh sea-bass grilled whole in tandoori spices was so good, it still makes me salivate!We returned to an old favorite in South Goa, Martin's Corner. They still haven't lost their touch. In addition to savoring several favorite dishes, we also discovered a new one: Caldin made of okra and cauliflower - two veggies we have never cooked together before.

Before we knew it, it was time to drive back.  Goa during early January is still crisp and cold during early mornings but fairly warm during the days.  The tourists are mostly gone and the beaches are less crowded.  There isn't a better time of the year to vacation here than this.

by Shantanu (noreply@blogger.com) at June 11, 2017 03:52 AM

Ambling Through Mumbai

Cities that have been a melting pot of cultures and attracted a steady stream of immigrants through the ages are the best ones if you are a foodie. Food moves in along with people bringing a variety of new cuisines and cooking styles even as completely new ones are created as the old melds with new. New York, New Orleans, Hong Kong and Kolkata all owe the richness in their food scene to this simple fact. So does Mumbai! In this teeming city of millions, there is always a new delightful place waiting to be discovered, no matter how many times you have visited this grand old city before.

As I moved from my jet-setting corporate life to that of a local entrepreneur, one of the nice things it let me do was discover street food, small local restaurants and other places I would rarely have the time to find and visit earlier.  As I (re-) discovered, there is a lot more to food than Michelin stars!Bengalis have long been migrating to Mumbai given the similarities these cities share right from the time of the British Raj. The two most important port cities of that time, both Mumbai and Kolkata employed a large number of immigrants from other parts of the country and even the surrounding region. Among the more recent restaurants serving Bengali cuisine to its people is Kolkata's Bhojohori Manna.  Quirkily named after a popular Manna Day song from the 70s that talks about a mythical chef, this restaurant now has two outlets in Mumbai.  I decided to visit the one in Oshiwara.An elaborate Bengali meal followed that included fish with mustard sauce, slow-cooked mutton in rich spices, a dish of banana florets, and palm sugar ice-cream.  I returned here again during my next trip and pretty much repeated the entire meal but with the fish replaced by a dish of tiger prawns in a coconut sauce.

On one day, after a long day of meetings, we sat down at tiny little Janta Bar at one end of swish Pali Hill.  This place barely shows up on Google Maps, but is quite a delight.  The best way to describe Janta Bar is to say this is like a 'daru-ka-adda' but with posh people trooping in.  In other words, a low-end gentrified Indian bar.  It was a warm day, so the pitcher of chilled beer was a welcome sight.  The tawa mutton we had ordered was excellent too!

We strolled to the other side of the road for dinner.  Jaihind is another one of those unassuming eateries that dot cities in India, but with fantastic food.  The local sea-food thali was amazing with crisply batter-fried fish, spicy gravy and fresh solkadi drinks.

La Pain Quotidian is another place I happened to have a business lunch in. This upscale boulangerie is a part of a global chain run by French-Belgian baker, Alain Coumont.  The name is Our Daily Bread in French, and they specialize in simple, elegantly made pastas, salads, breads and pastries.

Finally, during one of my trips here I walked the few blocks from my Juhu hotel to the once-iconic Prtihvi Theater.  Built by the 'first family' of Bollywood as a celebration of the performing arts, it is also home to Prithvi Cafe, a haunt for many aspiring artists during its heydays.  Even today, this is a is a wonderful place to chill out with one of their popular rolls and milkshakes.Finally, Mamagoto in Bandra, an expanding chain of Asian restaurants that combines a Asian staples with a casual, fun vibe, without taking itself (and its cuisine) too seriously. Everything tasted nice enough, even though I am quite a traditionalist when it comes to Chinese food.

by Shantanu (noreply@blogger.com) at June 11, 2017 03:51 AM

June 10, 2017

my first blog आणि नवीन लेखन

आतल्यासहित माणूस

पावसाच्या गोष्टी - १


जरा तपेलीभर पाऊस पडला की भक्क असा आवाज येऊन दिवे जात. प्रमोदबनमधे राहणारी काही मंडळी आपापल्या गॅलर्‍यांमधे रस्त्यावरून येणारे जाणारे लोक बघत. घरामधे मेणबत्त्या, गॅसच्या बत्त्या वगैरे. समोर डावीकडे कामवाल्यांची वस्ती. तिथली सगळी पोरंटोरं वस्तीच्या बाहेर येऊन पारेकर टेलरच्या दुकानाच्या बाहेरच्या फळीवर. पारेकरचं दुकान वस्तीत नाही. वस्तीला लागून असलेल्या दुमजली चाळीत. चाळीत ज्यांची घरे रस्त्याकडे तोंड करून तेही सर्व आपापल्या गॅलर्‍यांमधे. तिन्ही ठिकाणच्या समवयस्क जनतेमधे रस्त्याच्या आरपार गप्पा चालत. विशेषत: कॉलेजातल्या दादा ताई जनतेत. त्या गप्पाटप्पांचे प्रमोदबनमधल्या बालिकेस कोण कौतुक. पण ते ऐकायला घराच्या गॅलरीमधे उभे राहू न देता तिची आई तिला संध्याकाळचा परवचा म्हणायला लावायची. पाढे म्हणायला बस म्हणायची. एरवीही अभ्यासाचा कंटाळा असलेली ती मेणबत्तीच्या उजेडात हात धरून भिंतीवरच्या सावल्यांचे खेळ करत बसायची.
मग थोड्या वेळाने कुठून तरी ’आले आले...’ असा पुकारा अंधुकसा ऐकू यायला लागायचा. आवाज बदलत बदलत तो पुकारा प्रमोदबनमधून सुरू व्हायचा आणि तेव्हाच परत भक्क आवाज होऊन घरातले दिवे लागायचे.
गॅलर्‍यांतली मंडळी आपापल्या घरात परत. पाच दहा मिनिटात ज्यांच्या घरी टिव्ही आहे त्यांच्या घरून टिव्हीचे आवाज सुरू व्हायचे, काहींच्या घरचे रेडिओ सुरू व्हायचे. कुणाच्या घरच्या कुकरच्या शिट्ट्या, ताटं घेतल्याचे आवाज, कुणाच्या घरातलं भांडण, कुठून तरी हास्यविनोद असं सगळं कानावर यायचं.
जवळपासच्या वस्तीतला आप्पा वेगळ्या पातळीला पोचून रस्त्याच्या मधे बसून कुणाकुणाला शिव्या देत देत अभंग म्हणू लागायचा.
’ही रोजचीच संध्याकाळ, रात्र!’ जग आश्वस्त, निर्धास्त आणि सैलावलेलं.

by Nee Pa (noreply@blogger.com) at June 10, 2017 02:26 PM

राजकीय चिन्तन (Political Thoughts)

शेतकरी आंदोलन-- काही मुद्दे

शेतकरी आंदोलन चालूच आहे. दुःखद घटना घडतच आहेत. महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेशातही व्याप्त झालेलं आहे. याला राजकीय, मोठा-शेतकरी-प्रणीत वगैरे काहीही नावे दिली तरी गरीब शेतकरी सर्व बाजूंनी नाडला जातो ही खरी गोम आहे. जमत नसेल तर शेती सोडून द्या असा आगाऊ सल्ला कित्येक जण देऊ लागले आहेत. त्यांना सर्वत्र लवासा व सहारा सिटी हवे आहे. त्यांची एकूण मांडणी पाहिली की यांना मोठ्यांच्या गळ्यात शेती दावणीला बांधायची आहे हे उघड दिसते. शेतजमीनीवर मोठाले लवासा काढा, उद्योगघंदे काढा, मोठमोठे फार्म्स करा, मेकॅनाइज्ड शेती करा, खूप खूप आणि मोठ्ठं मोठ्ठं हा त्यांचा ध्यास आहे. गरीबांनी आपण आळशी, अजागळ, मूर्ख आहोत हे भान ठेऊन श्रीमंतीमुळे आपोआप शहाण्या होणाऱ्यांनाच शेती करू द्यावी असा सल्ला आहे.
यापायीच निसर्गाचे अतोनात नुकसान होते हे ही ते विसरतात. निसर्गासोबत भावनिक बांधिलकी हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच येथील निसर्ग टिकला व मनोहर राहिला. गंगा मैया जेंव्हा रिव्हर गँजेस झाली तेंव्हा कारखानीदारीने दूषित होणारी गंगा पाहून कुणाला काही वाटेनासे झाले. मग घराघरात ४०-५० वर्षे शुद्ध राहिलेल्या गंगाजळाची वैज्ञानिकतादेखील यांनी नजरेआड केली. आता एवढा कोट्यावधि टीसीएम जलसाठा असणारा गंगाप्रवाह पार घाण होऊन गेल्यावरही थोड्याच लोकांना कळू शकले आहे की संस्कृती-नाशामुळे आरोग्य-नाश आणि राष्ट्राच नाश कसा होऊ शकतो. पण आयात-संस्कृतीच्या सुभेदारांना त्याचे काही नाही --शेतमाल आयात करू, पाणी आयात करू, शासनकर्तेही आयात करू अशी आऊटसोर्सिंग संस्कृती सर्वत्र गाजते आहे. तिथे फक्त मोठे, धनाढ्य, ग्लोबल यांनाच वाव आहे. गरीब छोटे शेतकरी यांच्या डोळ्यांनी खुपतात. त्यांना इनएफिशिएंट ठरवून जमीन विकण्याचा सल्ला दिला जातो. मग इनएफिशिएंट असलेल्या राज्यकर्त्यांना बाहेर काढून एफिशिएंट चीनी किंवा अमेरिकन राज्यकर्ते का नकोत ?
शेतकऱ्यांना सहकारी कारखानदारीच्या नावाने लुबाडणारे व चुकीच्या दिशेने नेणारे जाणते राजे एकीकडे आहेत तर भारतीय शेती ही जगातील अमेरिकन-चीनी-युरोपीय शेतीपेक्षा कशी आगळी-वेगळी व युनिक आहे हे न समजू शकलेले राज्यकर्ते दुसरीकडे आहेत. पाळेकरांसारख्या कृषितज्ज्ञाला पद्मभूषण तर द्यायचे पण त्यांच सल्ला मात्र घ्यायचा नाही -- तो जाणत्या राजाचाच घ्यायचा कारण पाळेकर विकेंद्रित छोट्या शेताबद्दल बोलतात तर जाणते राजे मोठ्ठे-मोठ्ठे हाच मंत्र जपतात.
नोटबंदीनंतर बँकांकडे खूप पैसा गोळा झाला आहे. तो ग्रामीण भागात व शेतीकडे किती प्रमाणात वळवला ती आकडेवारी जाहीर करावी. ग्रामीण भागात छोटी छोटी पणन केंद्रें व ग्राहकाशी थेट संपर्क करायला प्रभावी इंटरनेट या सुविधा तातडीने निर्माण करा. सकस अन्न देणाऱ्या बीजप्रजाति, सेंद्रिय शेती, देशी गाई, देशी वाण यांचे उपकारक परिणाम दिसत आहेत त्यांची तातडीने दखल घ्या, भारतीय शेतीला १९७५च्या आसपास एकत्रिकरणाचा कायदा लागू केला तो बासनात गुंडाळावा लागला याची दखल घ्या.
संप संपवा नाहीतर शहरी जीवन सुकर करण्याचे कारण दाखवुन कायदा आणून सर्व शेतजमीनी अंबानींना देऊ व तुम्हाला तिथे गुलामी करायला लाऊ अशा धमक्या देणाऱ्या पोस्ट देखील सोशल मीडीयावर वाचायला मिळत आहेत. या संपाची परिणती ती न होवो हीच सदिच्छा.

by लीना मेहेंदळे (noreply@blogger.com) at June 10, 2017 10:57 AM

June 09, 2017

कृष्ण उवाच

सुमधूर हास्य आणि त्याचं रहस्य

“असं म्हटल जातं की प्रेमामुळे जातीभेदाचे,शिक्षणाचे आणि भाषेचेसुद्धा अटकाव दूर होतात, पण जर का त्या प्रेमात विनोद नसतील,हास्य नसेल,मजेदारपणा नसेल तर मात्र पैजेने मी तुम्हाला सांगेन की ते प्रेम जास्त काळ टिकेल याबद्दल मी साशंकच राहिन.” इति रघुनाथ

रघुनाथ कामत आणि माझ्यात नेह्मीच कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा चालू असते.त्यावर वाद होतात.एकमेकाला मुद्दा पटवण्याच्या प्रयत्नात आम्ही निश्चीतच असतो.पण हास्याच्या विषयावर आम्ही काही चर्चा केली तर बरेच वेळा आमची एकवाक्यता असते.अलीकडे असंच झालं.
एकदा आम्ही दोघे एका हॉटेलात चहा घ्यायला गेलो होतो.नेहमीप्रमाणे आमची चर्चा चालू होती पण ह्यावेळी विषय होता महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांच्या समस्येवर.रघुनाथचं म्हणणं असं होतं की शेतकर्‍यांना सरकारने कर्ज माफी द्यावी.पण माझा मुद्दा असा होता की असं वरचेचवर करणं बरं नाही.चर्चा रंगात येत होती तेव्हड्यात एक माणूस आपल्या खांद्यावर एक लहानसं माकडाचं पिल्लू ठेवून हॉटेलच्या आत शिरत असताना आम्ही दोघांनी पाहिलं.आणि आम्ही दोघेही एकमेकाकडे पाहून हसलो.

मी रघुनाथला म्हणालो,
आपण दोघे जे काही आता एकाच वेळी हसलो त्यावरून मला एक लक्षात येतं, नव्हे तर मी तुला खात्रीपूर्वक सांगतो, उर्‍यापुरलेल्या आयुष्यात हा क्षण आपण कधीच विसरणार नाही.विशेषकरून त्या माकडाच्या पिल्लाच्या द्रुष्टीकोनातून विसरणार नाही.

रघुनाथ मला म्हणाला,
सुमधूर हसण्याबद्दल मला विशेष वाटतं.
जगातल्या असतील नसतील त्या समस्या आपल्या मनातून येत असतात.जसा एखादा पायपीट करणारा, फक्त आपल्या पायवाटेकडेच द्रुष्टी ठेवून चालत असतो किंबहूना जर का तो इकडे तिकडे बघून चालण्याच्या प्रयत्नात असता तर कदाचित त्याला अडखळे नसलेला,सुखदायक मार्ग निवडता आला असता,आपण शेतकर्‍याच्या कर्जावर चर्चा करीत होतो ह्या विषयावर सगळीकडे चर्चा चालली आहे.माझ्या द्रुष्टीने ही चर्चा रटाळ वाटायला लागली होती.आपली एकाच मार्गावर पायपीट चालली होती, हे तशातलं काहीसं म्हणावं लागेल.

पण जर का, अशावेळी, म्हणजे अशी रटाळ चर्चा करत असताना, एखादी विनोदाची फुलबाजी बघायला मिळाली तर मात्र त्या रटाळ चाकोरीतून अंमळ बाहेर आल्यासारखं नक्कीच भासेल.त्याचं कारण अशी फुलबाजी योग्यवेळी येणं आणि तिने अनपेक्षीतपणे येणं हे त्याचं कारण म्हणावं लागेल.ती व्यक्ती त्या माकडाच्या पिल्लाला खांद्यावर ठेवून प्रवेश करताना पाहिल्यावर आपण दोघे खसखसून हसलो.तुझं म्हणणं बरोबर आहे.
हा असा क्षण आपण कधीच विसरणार नाही.

मी रघुनाथला म्हणालो,
विनोद हा असाच कामात येतो.विनोदातूनच हास्य निर्माण होतं.आपण एका गोष्टीच्या अपेक्षेत असतो आणि पिळवटलेलं दुसरंच ऐकायला येतं हिच तर त्या विनोदाची गोम आहे.जगाकडे पहाताना जरा तिरकस पहावं लागतं.आणि ते पहाणं तुमच्या मनात चिकटून रहातं. तुमच्या मेंदूने नवीनच दुवा स्थापित केलेला असतो.हे माझं म्हणणं मला अगदी अलंकारिक किंवा रुपकात्मक असं म्हणायचं नाही.उलट मला शब्दश: किंवा नैसर्गिकपणे म्हणायचं आहे.उदाहरण द्यायचं झाल्यास जणूं तुम्ही नवीन भाषा शिकता किंवा नाचण्याच्या नव्या स्टेप्स शिकता अगदी त्याचप्रमाणे.

रघुनाथला माझं हे म्हणणं खूप पटलेलं दिसलं.हास्य ह्या विषयावर आमच्या दोघांमधे एकवाक्यता यायला कठीण काहीच नसतं.किंबहूना एकमेकात जास्त काही बोलण्याची चढाओढ लागली तरच नवल नाही.

रघुनाथ आता अगदी रंगात आलेला दिसला.
मला म्हणाला,
“हास्याला भाषा,देश,जातपात,धर्म कर्म काहीही नसतं.कसं ते सांगतो.”
रघुनाथ मला काहिसं रंजित गोष्ट सांगणार आहे हे त्याने केलेल्या अविर्भावावरून माझ्या लक्षात आलं.मी पण अंमळ कान टवकारून ऐक्त होतो.

मला म्हणाला,
सुमधुर हास्य केल्याने जगाकडे नव्याने पाहिल्यासारखी आपली द्रुष्टी निर्माण होते,निरनिराळे लोक एकाच जागी आणल्या सारखं होतं.जरी जमलेले सर्व लोक एकच भाषा बोलत नसतील,आणि समजा एखादी मुकी चित्रफीत पहाण्यासाठी ते सर्व एकत्र जमून पहात असतील तर अशावेळी थोडाकाळ एकाच जगात वास्तव्य करीत आहो असं त्यां सर्वांना वाटेल.
अशावेळी एकमेकाच्या विश्वात जबरीने लादलेल्या कुठल्याही सीमारेषा सापडणार नाहीत,फक्त शब्दांच्या पलिकडे गेल्यासारखं वाटेल.”

मी रघुनाथाला म्हणालो,
“मी तर म्हणेन,
जर का दोन समोरासमोर आलेल्या व्यक्ती अगदी एकमेकाशी पटवून घेत आहेत असं तुम्हाला वर्तवायचं असेल तर मुद्दाम लक्ष देऊन पहा,कोणती तरी एक गोष्ट त्या दोघोनाही हसायला भाग पाडत असावी.
असं म्हटल जातं की प्रेमामुळे जातीभेदाचे,शिक्षणाचे आणि भाषेचेसुद्धा अटकाव दूर होतात, पण जर का त्या प्रेमात विनोद नसतील,हास्य नसेल,मजेदारपणा नसेल तर मात्र पैजेने मी तुला सांगेन की ते प्रेम जास्त काळ टिकेल याबद्दल मी साशंकच राहिन.”

मला रघुनाथ म्हणाला,
“आता मी जे तुम्हाला सांगत आहे ते सर्वांनाच माहित आहे.पण त्याचा उल्लेख मी जर केला नाही तर हास्यावरची चर्चा नक्कीच अपुरी राहिल्यासारखी होईल.
हास्यामुळे शरीरात एन्डोरफीन्स नावाचं द्रव्य तयार होतं,मनावरचा ताण कमी होतो,आणि आपली प्रतिकार शक्ती मजबूत होते.शरीराला करून देणारे हे फायदे त्यासाठी मिळवायचे झाल्यास तुम्हाला अगदी असली हास्यजनक गोष्ट हुडकून काढायची गरज मुळीच नाही.फक्त साधं हसा.तुम्हाला नकळत सर्व फायदे मिळतील.”

माझ्या शास्त्रज्ञ म्हणून केलेल्या कारकीर्दीत,वरचेवर होणारी एक गोष्ट ह्यावेळी मला आठवली नसती हे शक्य नव्हतं.
मी रघुनाथला विचारलं,
“आता तुला मी एक गम्मत विचारतो,तुम्ही कधी अशा परिस्थितीत आलाय का? जेव्हा चार-दोन लोक एकत्र बसून एक समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यांना ते कठीण जातय,आणि मधेच कुणीतरी हास्यकारक गोष्ट सांगून सर्वाना हसवतोय.
अशावेळी ताण कमी होतो,सर्जनशीलता उंचावते,आणि काही वेळाने प्रश्नाचं उत्तर आपोआप समजतं.कुणी ह्याचा विचारही केलेला नसतो.शिवाय ते अनपेक्षीत असतं आणि अगदी बरोबर असतं.
ह्या हास्याबद्दलच्या द्रुष्टीकोनातला तिढा सोडवण्यासाठी जर का तू त्या लहानश्या माकडाच्या पिल्लाच्या उदाहरणावरून पाहिलोस,किंवा एखाद्या अपरिचीत व्यक्तीच्या द्रुष्टीकोनातून पाहिलस तर,तुला नक्कीच निर्णयाला यावं लागेल की खळखळून हसणं किंवा मधुर हास्य करणं म्हणजेच शांतीसाठी त्या क्रियेला उपयोगात आणणं.असा त्याचा उघड उघड अर्थ झाल्यास नवल नाही.”

चर्चेचा समारोप करताना रघुनाथ मला म्ह्णाला,
“तसं पाहिलंत तर माझ्या आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी मी विसरलो असेन. वाटलं तर,मी काही ना काही लक्षात ठेवतोच असा माझ्यावर विश्वास बाळगणार्‍याला विचारा हवं तर,पण एक नक्की अशी कुठचीही गोष्ट मी विसरलेलो नाही की जी ऐकून,किंवा बघून मी हसलोच नाही.”

श्रीकृष्ण सामंत (कॅलिफोरनीया)


by shrikrishnasamant at June 09, 2017 12:45 AM

June 08, 2017

माझिया मना

दोन लक्ष आभार

लिहायचं असतं पण नेमक्या वेळी हातात लेखणी (अर्थात इलेक्ट्रॉनिक) नसते आणि मग तो विषय मनातच राहून जातो. मी स्वतः माझे जुने पोस्ट्स आठवण येते तेव्हा वाचत असते. त्यावेळी वाचकही जुने लेख वाचतानाची नोंद दिसते. अशावेळी काही तरी नवीन लिहायला पाहिजे असं नक्की वाटतं पण अर्थात त्यावेळी काहीच सुचत नाही. माझी जशी आजकाल मी कितपत सतत लिहू शकेन याची अपेक्षा नाही तसंच इथे सारखं कुणी वाचत राहील ही देखील

by अपर्णा (noreply@blogger.com) at June 08, 2017 10:59 PM

स्मृति

H 4 Dependent Visa (2)

पोस्डॉक पर्व संपले. विनायकला नोकरी लागली.. परत नवीन राज्य आणि शहर. मला माहीती होतेच की आता आपला H 4 visa आहे आणि J 2 visa सारखे वर्क परमिट काढता येणार नाही. साडेतीन वर्षाच्या पोस्डॉक च्या काळात फर्निचर घेतले नव्हते ते घेतले. विनायकचे ऑफीस घराच्या जवळ १० मिनिटांच्या चालत जायच्या अंतरावर असल्याने दुपारी तो घरी जेवायला यायचा त्यामुळे माझा सकाळचा वेळ पोळी भाजी करण्यात जायचा आणि त्यामुळेच मला एकटेपणा आला नाही. मनोगत मराठी संकेतस्थळ नव्यानेच माहीती झाले होते. मनोगताचा खूप मोठा आधार आम्हाला दोघांनाही वाटायचा. त्यावर येणारे लेख, कविता, चर्चा वाचता यायच्या. जेव्हा मनोगताच्या प्रशासकांनी पाककृती विभाग सुरू केला तेव्हापासून माझे रेसिपी लेखन सुरू झाले, म्हणजे साधारण २००५ सालापासून मी लिहायला लागले. रेसिपी लेखनाबरोबरच इतरही लेखन सुरू केले ते म्हणजे भारतातल्या आठवणी, अमेरिकेत येणारे अनुभव, प्रवासवर्णने. जसे सुचेल तस तसे लिहीत गेले. रोजनिशी लिहाविशी वाटली. माझ्या दोन ब्लॉगचा जन्मही याच काळात झाला.

अपार्टमेंटच्या समोर जे तळे होते तिथे जाणे व्हायचे. तळ्यात असणारी बदके, पिले, कासवे यांना नित्यनियमाने ब्रेड खायला घालायला सुरवात केली. त्याचबरोबर फोटोग्राफी सुरू झाली. डिजिटल कॅमेराने एक ना अनेक फोटो काढणे नित्यनियमाचे झाले. फोटोंची संख्या काही हजारात गेली. तळ्यावर रोजच्या रोज जाण्याच्या आधी जो काळ होता तो तर विसरणे शक्यच नाही. इंटरनेटवरून जगातल्या माणसांची घरबसल्या सहज संपर्क साधता येतो हे त्या काळात म्हणजे २००५ च्या सुमारास कळाले. त्या आधी आमच्याकडे संघणक नव्हता तर प्रत्यक्ष भेटणारी व बोलणारी माणसे होती.मनोगत व ऑर्कुट मुळे याहू मेसेंजर वर शंभराने मित्रमंडळी जमली. सकाळी संगणक आम्ही जेव्हा ओपन करायचो तेव्हा याहू निरोपकाच्या खिडक्या आपोआप उघडायच्या. भारतातल्या व युरोपमधल्या मित्रमंडळींचे ऑफलाईन निरोप वाचायचो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
मित्रमंडळी बोलायला यायची. कॉनफरन्सेस व्हायच्या. . समजा रात्री झोप येत नसेल आणि संगणक उघडला तरीही कोणी ना कोणी बोलायला असायचेच. बोलायचे म्हणजे सुरवातीला आम्ही टाईप करून बोलायचे. नंतर मेसेंजरवरून कॉल करायला लागलो. आवाज ऐकण्यासाठी याहूपेक्षा गुगल टॉक जास्त छान होते. . ही सर्व मित्रमंडळी आमच्या घरातच वावरत आहेत की काय? असे वाटायचे इतके हे इंटरनेटचे माध्यम प्रभावी आहे.
ऑर्कुटवर दोन समुदायात सामील झाले ते म्हणजे H 4 Dependent visa मराठी मंडळ आणि H 4 अमराठी होममेकर्स इन युएस ए. या समुदायात होणाऱ्या पाककृती व निबंध स्पर्थेत भाग घेतला. अमराठी समुदायात झालेल्या एका स्पर्थेत माझी "इडली" विजेती झाली. बाकी काही स्पर्धेत काही पदार्थ उपविजेते झाले. उदा. रंगीत सांजा, भरली तोंडली इ. इ. साधारण ३ वर्षे याहू मेसेंजरवर मित्रमंडळी येत राहिली, बोलत राहिली आणि नंतर पांगत गेली. अदुश्य रूपात भेटले सर्वजण. आवाज फक्त ऐकायचा, फार फार तर काही वेळा विडिओवर एकमेकांना बघायचो.भारतात बोलणे खुप कमी व्हायचे कारण की भारतात बोलण्यासाठी कॉलींग कार्ड विकत घ्यायला लागायचे. १० डॉलर्सला २० मिनिटे मिळायची सुरवातीला. नंतर नंतर ५ डॉलर्सला ६० मिनिटे मिळायला लागली. कॉलींग कार्डावरून बरेच नंबर फिरवायला लागायचे तेव्हा कुठे फोन लागायचा. इंटरनेटची फेज संपली. एकटेपणा जाणवायला लागला. घरात बसून बसून खूपच कंटाळा यायला लागला.


प्रत्यक्ष माणसे बघण्यासाठी आणि बोलण्यासाठी घराबाहेर पडावेच लागले. H 4 visa ची उर्वरीत कहाणी पुढील भागात.

by rohinivinayak (noreply@blogger.com) at June 08, 2017 01:04 PM

H 4 Dependent Visa (3)

मी घरबसल्या जरी बरेच उद्योग करत होते तरी एक प्रकारचा साचलेपणा आला होता. प्रत्यक्षातले मित्रमंडळ तीन वर्षे झाली तरी भेटले नव्हते आणि पुढे भेटतील याबद्दलही खात्री नव्हती. क्लेम्सनला आल्यावर सुरवातीच्या काळात मी बसने बरीच हिंडले होते. येण्याजाण्यात वेळ जातो. मॉलमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअर्स मध्ये तिथल्या गोष्टी पाहण्यातही वेळ जातो. त्यामुळे बसने हिंडायचे ठरवले.
आमच्या अपार्टमेंटच्या काही मिनिटांच्या अंतरावर बस येते हे माहीत होते पण तरी ती बस कुठे जाते याचा पत्ता नव्हता आणि नेमका बस-स्टॉप कुठे आहे तेही शोधायचे होते. गुगल शोधामध्ये आम्ही राहत असलेल्या शहरात कोणत्या बसेस धावतात हे शोधले. बसच्या वेबसाईटवर बघितले कोणत्या नंबराच्या बसेस धावतात, त्याचे वेळापत्र काय आहे आणि मुख्य म्हणजे बस थांबे कुठे आणि किती आहेत. शिवाय प्रत्येक रूटचा मॅपही बघितला. या सर्व गोष्टींची एक प्रिंट काढली आणि आमच्या घराजवळचा बस स्टॉप कुठे आहे तेही शोधले. त्यावर किती नंबरची बस थांबते तो आकडाही पाहिला. लायब्ररीत जाण्यासाठी ही बस माझ्यासाठी खूपच सोयीची होती, म्हणजे आमच्या घरापासूनचा बस थांबा आणि लायब्ररीतजवळचा बसथांबा १० मिनिटे चालण्याच्या अंतरावर होता.लायब्ररीत जायला सुरवात केली. नंतर लायब्ररीपासून दुसरी एक बस होती ती ग्रोसरी स्टोअर्स आणि मॉलला जाणारी होती. त्यामुळे एक दिवसा आड बसने फिरायला लागले. कंटाळा गेला. बसमधली माणसे दिसायची. त्यांचे संभाषण कानावर पडायचे, लायब्ररीत गेल्यावर काही ना काही वाचायचे. या वेगळ्या दिनक्रमा मुळे फ्रेश वाटायला लागले. घरातून निघताना धोपटीत पाणी पिण्याची बाटली, टोपी, एक स्वेटर, छत्री, थोड्या कुकीज अशी सगळी जय्यत तयारी करून निघायचे. कॅमेराही न्यायचे सोबत. लायब्ररीत जाण्यासाठी बसने जाण्यासाठी १५ मिनिटे लागायची.एकदा लायब्ररीत पुस्तके बदलताना तिथल्या बाईला विचारले की इथे नोकरी मिळू शकेल का? तर ती बाई म्हणाली नोकरी नाही पण voluntary work मिळू शकेल. मग तिने मला एक फॉर्म दिला. तो दुसऱ्या दिवशी भरून दिला. फॉर्म मध्ये कोणकोणते काम आहे याची एक यादी होती. त्यावर मला आवडणाऱ्या कामावर टीक मार्क केले. काही दिवसांनी लायब्ररीतून मला सुसानचा फोन आला कि तुझ्यासाठी एक काम आहे, मला येऊन भेट. मि लगेचच गेले तिला भेटायला, कारण की नुसते फिरण्यापेक्षा कामानिमित्ताने बाहेर पडायला केव्हाही चांगलेच. लायब्ररीच्या तिसऱ्या मजल्यावर सुसानला भेटले. तिने विचारले कि तुला बुक रिपेअरचे काम करायला आवडेल का? या आधी हे काम कधी केले आहेस का? तर मी म्हणाले की हे काम मला नक्किच आवडेल पण या कामाचा मला अनुभव नाही. सुसान म्हणाली काळजी करू नकोस. एलिझाबेथ तुला हे काम व्यवस्थित समजाऊन सांगेल. कोणत्या दिवशी आणि किती तास येशील? हे विचारल्यावर मी तिला आठवड्यातले २ दिवस आणि दुपारचे २ ते ४ येईन असे सांगितले. एलिझाबेथने मला काम समजाऊन सांगितले. मला हे काम खूपच आवडून गेले. काम करता करता तिथे रेडिओ ऐकता यायचा. त्यावरची इंग्लिश गाणी आवडायला लागली होती. काही गाणी तर आर डी बर्मन ने चाली लावल्यासारखीच वाटायची. एकूणच रेडिओवर संगीत कोणत्या का भाषेत असेना मला ऐकायला आवडते.गाण्याच्या अधून मधून जाहीराती असायच्या त्याही ऐकायला छान वाटायचे. लायब्ररीत काम मिळाल्याने माणसात आल्यासारखे वाटले. व्यवधान असले की माणूस आपोआपच त्या व्यवधानाच्या अवतीभवती फिरत राहतो. बाहेर पडले की घरातल्या कामाचीही आखणी करता येते. नेटवरून मित्रमंडळींशी रांत्रदिवस बोलता बोलता घरातली इतर कामेही असतात याचा विसरच पडला होता जणू. विनायक म्हणायचा जेव्हा पाहावे तेव्हा संगणकाजवळच असतेस. आणि जेव्हा विनायक ऑफीस मधून यायचा तेव्हा तो संगणक घेऊन बसायचा तेव्हा मला राग यायचा.
लायब्ररीतील बरीच पुस्तके रिपेअर केली. साधारण हजार पुस्तके असतील. पण त्यांनी मला चहापाण्यापुरतेही पैसे दिले नाहीत.

अर्थात अपेक्षा नव्हतीच. मी माझा वेळ जाण्यासाठीच हे काम करत होते आणि तेही आवडीने करत होते. तीन वर्षे हे काम केले. अजून दुसऱ्या प्रकारचे काम आहे का? असेही विचारले तर सुसान म्हणाली की दुसऱ्या विभागात मेल लिहून बघते काही काम आहे का ते. पण काम निघाले नाही.माझ्यासारख्याच अजून काही जणी तिथे कामाला यायच्या. काम झाले की एका फायलीत नाव, किती तास काम केले आणि दिनांक टाकायचा असतो तेव्हा कळाले की
माझ्यासारख्या अजून काही जणी इथे येतात तर !
H4 dependent visa या लेखमालेत अजून २ ते ३ भाग तरी होतीलच तेव्हा येईनच परत काहीतरी घेऊन.

by rohinivinayak (noreply@blogger.com) at June 08, 2017 01:04 PM

राजकीय चिन्तन (Political Thoughts)

माझी बजेटातील उदासीनता अशी संपली --चित्रप्रत तरुण भारत मार्च २०१४

माझी बजेटातील उदासीनता अशी संपली

तरुण भारत मार्च २०१४ ( 27/2/14 रोजी दुरुस्ती करून पाठवले होते)
by लीना मेहेंदळे (noreply@blogger.com) at June 08, 2017 07:50 AM

देवा तुझ्या द्वारी आलो

समाज मनातील बिंब

जमाबन्दीची शतकपूर्ती --मौज दिवाळी अंक १९९७

जमाबन्दीचीशतकपूर्ती (तपासणे)

परिच्छेद १ ते २६ गोव्यांत अश्विनीने टंकित केले.

१. स्थळआणिकाळ. स्पेसअॅन्डटाइम. अगदीमोक्षाचीकांसधरणाच्याऋषींपासूनतरआधुनिकविज्ञानवेत्त्यांपर्यंतसर्वांनीयांचमहत्वओळखल हो. स्थळआणिकाळाच्याठळकनोंदीकरुनठेवणारेविषयभूगोलआणिइतिहासयांचीमहतीहीयाचसाठीआहे. जमीनीचे,समुद्राचे, वाऱ्या-पावसाचेतसेचआकाशाचेहीनकाशेतयारकरुनत्यांचाअभ्यासकरण्याचेतंत्रशेकडो- हजारोवर्षापासूनचालतआलेलेआहे. त्याचेएकअतीमोडकळीतगेलेलेस्वरुपम्हणजेआताचेपंचांग.असो.

२. ब्रिटिशांनी १७५७ मध्ये  भारतातपहिल्यांदाभूप्रदेशजिंकला व पुढे राज्यवाढवण्याससुरवातकेली. राज्यासाठी जमीन महसुल कब्जात हवा. त्यासाठी महसुलाची पुनर्रचित पद्धत सर्वप्रथम बंगालमधे १७९० मधे अंमलात आणलीत्याचवेळीत्यांनी जमीनीच्याकाटेकोरमोजमापाचीघडीबसवली. याप्रक्रियेमध्ये देशातीलएका अत्यंत जुन्यासंस्थेचीसुरुवातझाली. तीम्हणजेसर्वेआँफइंडिया- स्थापनासन.... 

३. महाराष्ट्रांतसर्वेअॅडसेटलमेंटचीसुरुवातसन १८२७ मध्ये झाली आणि सेटलमेंटलॅण्डरेकॅार्डचेकार्यालयसन१९०७ मध्येअस्तित्वातआले. त्यावेळीत्याचीकार्यकक्षा मुंबई प्रॉविन्स होती. 

४. भारतत्याकाळीशंभरटक्केशेतीवरआधारितहोता. किम्बहुनाब्रिटन, फ्रान्ससकटसगळेचदेशजवळजवळतसेचहोते. यूरोपांतऔद्योगीकरणालासुरुवातझालीहोतीआणिशेतीऐवजीद्योगिकअर्थव्यवस्थानुकतीचस्थापनहोतहोती. सहाजिकचब्रिटिशांनीकांटेकोरमोजमापाचीपद्धतलावतांनाप्रामुख्यानेजमिन, जमिनीची-प्रतवारी, पर्जन्यमानपाण्याचीउपलब्धता, जमिनीतूनमिळणारीपिकं, मालकीहक्क, इत्यादीबाबीसर्वप्रथमहातीघेतल्या. शिवाय जमिनीतूनमिळणारामहसूलीकरहेराज्याच्याउत्पन्नाचमोठंसाधनहोत. त्याहीमुळेअसेलपणब्रिटिशराजवटीतमहसुलीप्रशासनआणिकलेक्टरहीयंत्रणाअतिशयमहत्वाचीठरली.

५. कामाच्यासोईच्यादृष्टिनेमहसूलीकामांचेदोनभागपाडलेगेले- जमाबंदीआणिमहसूलवसूली.  जमाबंदीअधिकाऱ्यांचेकामम्हणजेजमिनीचेसर्वेकरणे, परमनंट सेटलमेंट करणेमूळमालकीहक्कठरवणे,क्षेत्रठरवणे, नकाशेतयारकरणे, जमिनीचीप्रतवारीठरवणेत्याप्रमाणेमूळमहसूलीकरठरवूनदेणे. हेकामपंचवीसतेपन्नासवर्षातूनएकदाकरावेअसेठरवूनदेण्यांतआले. दरवर्षीकरवसूलीकरणे, पिकांच्यानोंदीकरणे, दुष्काळकीसुकाळतेजाहीरकरणे, त्यासाठीपीकपहाणीम्हणजेकितीपीकयेणारआहेत्याचेअंदाजइत्यादीकामेतलाठी, तहसिलदार, कलेक्टरयासाखळीच्यामाध्यमातूनकेलीजाऊलागली. त्यातचकायदासुव्यवस्थाराखण्याचीजबाबदारीपणकलेक्टरांवरटाकण्यांतआल्यामुळेत्यांनाजिल्हातालुकापातळीवरमॅजिस्ट्रेटम्हणूनपणघोषितकरण्यांतआले. अशातर्हेनेसन१९०७ मध्येजमाबंदीआयुक्तकार्यालयाचीस्थापनापुणेयेथेझाली.

६. जमाबंदीआयुक्तांचेकामम्हणजेजिथेसर्वेझालेलेनसतीलतेकरवूनघेणे, नकाशेतयारकरणे, मालकीहक्करेकॅार्डवूरआणणे, जमिनीचेवाटपमोजूनआखूनदेणे, मालकीहक्कातबदलझाल्यासत्यांचेरजिस्ट्रेशनकरणेत्यातूनशासनालामहसूलमिळवूनदेणे. त्यांचेनामाभिधानसेटलमेंटकमिशनर, अॅन्डडायरेक्टऑफ लॅन्डरेकॅार्डस्अॅन्डइन्स्पेक्टर जनरलआँफरजिस्ट्रेशनअसे तीनकामांचेद्योतकहोते. त्यांचास्टाफमध्येक्षेत्रमोजणारे, नकाशेआखणारे, हद्दीचेतंटेसोडवणारे, जमिनीचेवाटपकरुनदेणारे, खरेदीविक्रीचेरजिस्ट्रेशनकरणारे अशा वेगवेगळ्यास्तरावरीलअधिकारीउदाहरणार्थसर्व्हेयर, जिल्हा भूमि अभिलेख निरीक्षकसबरजिस्ट्रार, रजिस्ट्रार, सुपरिंटेंडेन्टऑफलन्डरेकॅार्डस्इत्यादीअधिकारीअसत. तिकडेविभागीयआयुक्त, कलेक्टर, तहसिलदार, तलाठीअशीमहसूलीशासनाचीदुसरीफळीअसे. दोन्हीमिळूनजमीनमहसूलाचेएकूणकामसांभाळलेजातअसे.

७. यासर्वयंत्रणेमार्फतकेल्याजााणाऱ्यामहसूलीकामांमध्येनिरनिरीळ्याकाळातकसाफरकपडत गेलातेआपणपाहूया.

८. महाराष्ट्रांतीलब्रिटिशकालीनसर्व्हेसर्वप्रथमइंदापूरयेथेसन.... घेण्यातआला. त्यावेळीचघोषणाझालीकिपुनर्सर्वेक्षणाचेकाम ------ वर्षांनंतरघेतलेजाईल. याचीपध्दत काय, गरजकायकायदायाबाबतकांयसांगतो?


९. जंगल वहिवाट
कोणत्याहीजमिनींचापहिलाप्रथमसर्वेकेलाजातोतेंव्हात्याजमीनीवरमालकीहक्ककाय,  इत्यादींबाबतरेकॅार्डकेलेजाते,  तसेचत्यात्याजागेचासर्वकंगोर्यांसकटस्केलीनकाशातयारकेलाजातोक्षेत्रफळकाढलेजाते. जमीनीचीप्रतठरवून, त्यावरमहसूलआकारणीठरवलीजाते. यासर्व्हेच्यावेळीएखाद्याजमीनतुकड्याच्यामालकीहक्काबाबतकांहीचसमजूनआलेनाही,  मात्रत्याजमीनीवरकुणाचीतरीवहिवाटआहे. असेदिसलेतरसर्व्हेयरनेत्यातुकड्याच्यारेकॅार्डवरजंगलवहिवाटअमुकतमुकव्यक्तिचीअसाशेरालिहायचाअसे. हेतूहाकीजिथेजिथेजंगलवहिवाटअसेलतिथेतहसिलदारकिंवाकलेक्टरनेशोधघेऊननेमकीमालकीकोणाचीतेठरवावे.प्रसंगीदिवाणीकोर्टातत्याचानिकाललावूनघ्यावा

१०. पुढेहीजंगलवहिवाटीचीनोंदचपुष्कळशाभ्रष्टाचाराला कारणीभूतठरूलागली. याचेकारणअसेकीमालकीहक्ककोणाचाहीठरलातरीवहिवाटदारालाबेदखलकरूनखर्यामालकालाजमीनीतप्रस्थापितकरण्याचतंत्रकोणालाचजमलनाहीअगदीआजपर्यंतही.अशापरिस्थितीतजंगलवहिवाटीनेकाहोईना, सातबाराउतार्यावरनांवलागलेकीनिदानवहिवीटीचामुद्दाशाबितहोतो, आणिजमीनकबजातठेवतायेते. असाहिशोबतयारझाला. मगसर्व्हेयरनेजंगलवहिवीटीनेनावलावावेअसेप्रयत्नहोऊलागले. त्यांतसामदामदंडभेदअशासर्वनीतिवापरल्याजाऊलागल्या.

११. आजहीमहसूलकायद्याच्याअंमलबजावणीतहीमोठीउणीवराहूनगेलेलीआहे. मुळातदिवाणीकोर्टामध्येजमीनीच्यामालकीहक्कांच्याप्रश्नलौकरसुटतनाही. असेम्हणतातकीदिवाणीकोर्टांची पध्दततयारझाल्यानंतरदेवाच्यालक्षांतआलेकीहेवादकांहीएकाजन्मातसुटूशकतनाहीतमगत्यानेत्यावरउपायम्हणूनपुनर्जन्माचीशक्कलकाढलीआणिमाणसालाचौर्यांशीकोटीवेळापुनर्जन्मघ्यावालागेल,   मगचमुक्तीमिळेलअसानियमकरूनटाकला. अशा प्रकारे दीर्घ कालावधीनंतर दिवाणी कोर्टाचा निकाल लागला तरी वहिवाटदाराला बेदखल करून मूळ मालकाला जमीन मिळण्यासाठी महसूल विभागाची साथ हवी व तिथे भ्रष्टाचाराला सुरूवात होते.

१२. महसूली रेकॅार्डचे गृहीतमूल्य प्रिझम्टव्ह व्हॅल्यू )
महसूलीरेकॅार्डलाएकगृहीतमूल्य( प्रिझम्टव्हव्हॅल्यू) असते. म्हणजेकांयतरमहसूलाच्यारेकॅार्डवरजेलिहिलेअसेलतेप्रथमदर्शनीखरेमानूनचालायचे, त्यांतीलफरकइतरपुराव्यानिशीसिध्दझालातरचतेवढेरेकॅार्डबादहोते. महसूलीरेकॅार्डमध्येबदलकरण्याचेअधिकारफक्तपहसूलीअधिकार्यांनाम्हणजेतलाठी, सर्कलइन्स्पेक्टर, तहसिलदार,. उपविभागीयअधिकारीकिंवाकलेक्टरयांनाचअसतात. त्यामुळेदिवाणीकोर्टातवहिवाटदाराच्याविरूध्दनिकाललागूनदुसर्याव्यक्तिचीमालकीसिध्दझाली, कोर्टाने तसा निकाल दिला तरी  महसूलीरेकॅार्डमध्ये तीनोंदलावूनघेण्यासाठीआधीमहसूलअधिकार्यांचीमनधरणीकरावीलागते. त्यानंतरहीवहिवाटदारसुखासुखीआपलीवहीवाटसोडूनदेतनाही. त्याचेउभेपीकशेतातअसेलतरकायद्यानेचत्यालामुभादिलेलीअसतेकीपीकतयारहोऊनत्यानेतोडूननेईपर्यंतत्यालाबेदखलकरूनये. मगहालपाछपीचाखेळसुरूहोतोनिम्मेपीककापूनत्यांतकाहीतरीदुसरापेराकरायचा, पीककापणीच्यादिवशीचत्यातनागरणीकरूननवीनपेरणीकरायची,दरमहिन्यालाशेतात काही  काही उभेअसेलअशीव्यवस्थाकरायचीइत्यादी.. शिवायआपलीवहिवीटसोडूनदेऊनमालकाच्याताब्यातजमीनदेण्यांरूकोणीचतयारनसतोत्यामुळेमालकाला गांवचातलाठी, कोतवाल, पोलीसपाटीलयांचीपूर्वीमदतघ्यावीलागे. म्हणजेत्यांचीसरबराईकरणेआले. आतातरपोलीसपार्टीशिवायपानहलतनाही. म्हणजेसरबराईचाखर्चतरवाढलाचपणत्यांतफुकटजाणारावेळहीवाढला. शिवायआतावहिवाटदारकोर्टांतूनस्टेआणतात. त्यामुळेत्यांचीमालकीनसलीतरीवहिवीटवर्षानुवर्षचालूराहूशकते. थोडक्यातकायद्याच्यामाध्यमातूनलौकरनिकाल, लौकरकारवाई, झटपटन्यायइत्यादीमिळूशकतनाही. मगजंगलराज्यसुरूहोते